मॉरिशस ट्रिप बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by Ashwini_९९९ on 7 November, 2026 - 04:29

नमस्कार
माझी मुलगी आणि काही जवळचे नातेवाईक डिसेंबर मधे मॉरिशस ला फिरायला जात आहेत.
त्या सगळ्यांचीच ही पहिली विदेश ट्रिप आहे. माझ्या फॅमिलीतून फक्त माझी मुलगी जात आहे.
मॉरिशस ला जे कोणी जाऊन आले असतील त्यांनी प्लीज थोडी तिथली माहिती दया. कितपत safe ahe... काय काय काळजी घ्यायची? It's a customised tour planned by Girikand.

Group content visibility: 
Use group defaults

मी गेलो होतो ते जहाजाने. काहीच प्लानिंग करावे लागले नव्हते. राहणे जहाजावर होते.
ग्रुप लिडर्स फिरण्याची व्यवस्था करायचे. त्यामुळं माहिती देऊ शकत नाही.

मला माहितीच नाही ग, नाही तर नक्की दिली असती.
इथे लोकं दिवाळीमुळे इकडे जास्त येत नसतील त्यामुळे प्रतिसाद कमी असतील.

आयोजित सहलींच्या जाहिराती तपासल्या का?
मेक माय ट्रिप तपासली का?
स्वतंत्रच जायचे असेल तर तिकडच्या भागाचे वाहते पान पाहून विचारा किंवा मिसळपाव साईटवर विचारा. तिकडे काही आहेत माहितगार किंवा तिकडेच राहणारे.
लोनली प्लानेटचे पुस्तक मिळाले तर पाहा. डिटेल माहिती मिळेल.
Lonely Planet covers Mauritius primarily through its multi-country guide Mauritius, Reunion & Seychelles.

About the Guidebook

• Title: Mauritius, Reunion & Seychelles
• Latest Edition / Publication Date: January 31, 2024 (by Lonely Planet)
• Coordinating & Contributing Authors: Paula Hardy, Fabienne Fong Yan, and Rooksana Hossenally
• Page Count: 296 pages
• ISBN: 9781788684477

What the Book Covers

• Destinations Included: Port Louis, Central Plateau, Grand Baie, Flic en Flac, Rodrigues, Réunion (St-Denis, the Cirques, St-Pierre), and the Seychelles (Mahé, Praslin, La Digue, Denis Is
(एआइ मधून)
ही पुस्तके मुंबईत हुतात्मा चौकात जरा स्वस्तात मिळतात.

खुप मस्त आहे, माणसेही चांगली आहेत. आपण भारतीय त्यांच्यासारखेच दिसतो त्यामुळे फिरायला उत्तम. खाणे पिणे ही चांगले आणि भारतीय मिळते. चायनीज ची आवड असेल तर तेही मिळते. समुद्र किनारे , हॉटेल्स छान आहेत. बर्‍याच लोकांना हिंदी , इंग्रजी येते काळजी नसावी. सहा महिने राहून आलोय पूर्वी, खूप आवडलेली जागा..