Submitted by मनोजकुमार देशमुख on 6 November, 2026 - 11:03
देवालयी लुटीचा काही विवाद नाही
जो बोलला खरे, त्या साधा प्रसाद नाही
सल्ले हजार आले एका चुकीस माझ्या
पाळून कायदे मी, काहीच दाद नाही
ते बोलता निघाल्या फौजाच लाख मागे
मी ओरडून सुद्धा कोठून साद नाही
मी बापडा कशाला, चिंता उगाच माझी
गेले कितीक मोठे, त्यांचीच याद नाही
आता मनोज गाणे कोणास ऐकवावे
गोंगाट माजलेला, शब्दांस नाद नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा. झक्कास !
>ते बोलता निघाल्या फौजाच लाख मागे
>मी ओरडून सुद्धा कोठून साद नाही
वा. झक्कास !
आवडली.
आवडली.
छान लिहिली आहे
छान लिहिली आहे