Submitted by इवाना on 10 January, 2022 - 00:03
Windows 11 preinstalled laptop बाजारात आता आताच आले आहेत. Hp ,15inch, 45 हजाराला सुरू आहे. ओफिससूट लाईफटाइम आहे, काही android apps आहेत असं दुकानदारकाका बोलले.
तर विंडोज ११ स्टेडी झाली का, घ्यावा की थांबावे? घरच्यासाठी पहिलाच laptop घेत आहे. ओफीसमध्ये तिथले वापरायची सवय आहे पण ते त्यांच्या कामासाठी लॉक्ट असतात. गेमिंगसाठी नकोय.
कुणाला काही अनुभव, सूचना आहेत का?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अलीकडेच मी माझा लॅपटॉप
अलीकडेच मी माझा लॅपटॉप Windows 11 वर अपग्रेड केला आहे.
गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर वारंवार क्रॅश होत आहेत ही समस्या फक्त आढळली
अलीकडेच मी माझा लॅपटॉप
..
विंडोज ११ बद्दल माहिती/अनुभव
विंडोज ११ बद्दल माहिती/अनुभव नाही, इतर लोक सांगतीलच.
त्यातून जर सध्या १० वर रहाणे ठीक असे ठरले तर:
विकत घेताना OS windows 11 लायसन्स असणारा लॅपटॉप Windows 10 ला डाऊनग्रेड करून घेऊन विकत घ्यायचा. दुकानात माहीत नाही पण ऑथराईज्ड डीलर्स करून देतात फ्री. पुढे 11 स्टेबल आहे चालेल असे वाटले की लायसन्स 11 चे असल्याने केव्हाही 11 इन्स्टॉल करता येईल. (11 OS installation पॅकेज व ड्रायव्हर्स पॅकेज HP site वरून डाउनलोड करुन ठेवावे.)
Windows 10 लायसन्स असणारा लॅपटॉप घेण्यापेक्षा हे चांगले. भविष्यात 10 to 11 फ्री अपग्रेड केव्हा बंद होईल सांगता येत नाही (वर्षभरात?) आणि मग 10 वरच रहा किंवा 11 OS विकत घ्या असे करावे लागेल.
११ च्या स्थैर्याबाबत अजुन
११ च्या स्थैर्याबाबत अजुन काही समजलेले नाही.ं मायक्रोसोफ्ट्च्या इतर उत्पादनाप्रमाणे ह्यतही सुरुवातीला काही 'बग्ज' असतीलच. किमान ३ महिने थांबुन नंतर घ्या असे सुचवेन
विंडोज १० असलेला लॅप्टॉप जर ११ ला अपग्रेड केला असेल तरच तो डाउनग्रेड करता येत असावा
डाऊनग्रेड करणे म्हणजे
डाऊनग्रेड करणे म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस (रोल बॅक/ डाऊनग्रेड अशी कमांड देऊन वगैरे) नव्हे तर वरचे लायसन्स असणाऱ्या संगणकात खालील OS इन्स्टॉल करून घेणे. (मग ती पद्धत कुठलिही असो.)
धन्यवाद प्रतिसादांसाठी.
धन्यवाद प्रतिसादांसाठी.
डाऊनग्रेड करणे म्हणजे
डाऊनग्रेड करणे म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस (रोल बॅक/ डाऊनग्रेड अशी कमांड देऊन वगैरे) नव्हे तर वरचे लायसन्स असणाऱ्या संगणकात खालील OS इन्स्टॉल करून घेणे. >> त्यामधे तुम्हाला डाऊनग्रेड वर्जनचे लयसेन्स मिळ्त नाही. जर volume license असेल (जे कंपन्याना घेणे बंधनकारक असते) तरच डाऊनग्रेड वर्जनचे लायसन्स असते
'गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट
'गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर वारंवार क्रॅश होत आहेत '-
- तर कठीण आहे.
फायरफॉक्स ब्राउझर वापरण्यास
फायरफॉक्स ब्राउझर वापरण्यास सुरुवात केली. सुदैवाने ते क्रॅश होत नाही, परंतु त्याची सवय नाही.
मी YouTube वर सापडलेल्या क्रोम आणि एज ब्राउझरसाठी दोन उपाय वापरून पाहिले, परंतु ते कार्य करत नाही
मी १ महिन्यापूर्वी लॅपटॉप
मी १ महिन्यापूर्वी लॅपटॉप विंडोजचे, १० ते ११ आवृत्ती, असे उर्ध्वश्रेणीकरण केले . अजून काही त्रास नाही. क्रोम आणि एज दोन्ही व्यवस्थीत चालत आहे. लॅपटॉप २ वर्षे जुना आहे.
सध्या मुलगा ऑनलाईन लर्निंगला
सध्या मुलगा ऑनलाईन लर्निंगला जे मशीन वापरतो त्यात विंडोज ११ आलं (किंवा त्याने केलं असेल). तो वापरतो ते गेम्स, क्रोम इ. कुठेही काही समस्या आली नसावी. अजुन तरी ब्रोकन करुन भोंगे वाजलेले नाहीत.
घरगुतीवापरासाठी काही समस्या असू नये. सध्याच्या हार्डवेअर वर अपग्रेड म्हणून ११ टाकत असाल तर समस्या समजू शकतो, पण नव्या मशीनला तात्पुरत्या समस्या कदाचित असतील. पण त्या फार मोठ्या नसाव्या.
लॅपटॉपकोणता घेऊ हा धागा
लॅपटॉपकोणता घेऊ हा धागा पाहिल्यावर माझ्या या धाग्याची आठवण झाली.
एचपीचा दुकानदार म्हणाला होता की अगदी तातडीने हवा असल्यास इथला कोणताही विंडोज १० वरचा घ्या. अथवा थांबा थोडे ११ स्टेडी झाल्यावार भरपूर मॉडेल्स येतील.
काही कारणांमुळे तसेच आमच्या ऑफीसमध्ये ( बँकेत) कोणतेही काम घरी देत नाहीत त्यामुळे अगदी निकड झाली नाही.
वडिलांनी एक टॅब घेतला त्यावर वायर्ड कीबोर्ड माऊस जोडून सर्वच कामे होऊ लागली. परंतू जून(२०२६) महिन्यात एका बँकिंग परीक्षेसाठी नाव नोंदवल्यावर ऑनलाईन परिक्षेला फोन किंवा टॅब चालणार नाही सांगितल्यावर पुन्हा लॅपटॉप घ्यायचाच या उद्देशाने शोधाशोध सुरू केली. यूट्यूबवर अनेक विडिओ पाहिले त्यात सल्ला मिळाला की प्रथम स्टोअरमध्ये जाऊन तिथे ठेवलेल्या वस्तू/ लॅपटॉप पाहून किंमती विचारा . मुख्य म्हणजे सक्रीन, स्पीकरचे आवाज इत्यादी समजले. इकडे सर्वच कंपन्यांची दुकाने( कंपनी स्टोअर्स नाही परंतू फ्रांचायझी) आहेत. एचपी, एसर, लेनोवो,डेल,एसुस,ॲपल ..त्यांचे लॅपटॉप पाहून किंमती विचारल्या. पहिल्याप्रथम ते बजेट आणि कोणत्या कामासाठी पाहिजे विचारतात. साधेसुधे, प्रोफेशनल, बिझनेस, विडिओ एडिटिंग वगैरे इतके प्रकार आहेत. तेव्हा साधे घरगुती काम, बजेट साठ हजार सांगितल्यावर मॉडेल दाखवली. आणखी कांपोझिट स्टोर्स डी.जी.वन , क्रोमा, आणि रिलायन्स डिजिटलमध्येही गेलो. तिथे वीस एक विविध कंपन्यांचे मॉडेल्स उघडून ठेवलेले होते. विक्रेते तत्परतेने सर्व दाखवत होते. त्यातला Lenovo Ideapad 3 15 IRH10 साठ हजार रु छापील किंमत लिहिलेला होता. त्याची किंमत सेंट्रल स्टोअरला फोन करून त्याने ५५ हजारला सांगितली. आज स्पेशल डिस्काउंट होता!. ( ५ जुलै). एक बॅग फुकट मिळाली. (लेनोवो स्टोरमध्ये 8gb ramवाला ६२हजारला देत होता!) यामध्ये २वॉट्सचे दोन स्पीकर्स वरतीच असल्याने आवाज मोठा होता तसेच चांगला बॅकलिट कीबोर्डही होता.
(या लॅपटॉपची अमेझोनवरची किंमत त्या वेळेस ६८ हजार दाखवत होते.) तो घेतला.रिव्यूमध्ये हाच लोकांनी जानेवारीत ४५हजारला घेतला होता म्हणजे किंमती वाढवत आहेत. विक्रेत्याने तिथेच laptop setupही करून दिला.
Lenovo Ideapad 3 15 IRH10 1 ... Laptop
83K100CFIN
The Lenovo IdeaPad Slim 3 15IRH10 (Model: 83K100CFIN) is a productivity and everyday notebook featuring an Intel Core i5 processor and a 15.3-inch anti-glare display.
Key Specifications
• Processor: 13th Generation Intel Core i5-13420H (8 cores: 4 performance + 4 efficiency, up to 4.6 GHz max boost, 12 threads)
• Graphics: Integrated Intel UHD Graphics
• RAM / Memory: 16 GB DDR5-4800 (8 GB soldered + 8 GB SO-DIMM, expandable up to 24 GB)
• Storage: 512 GB M.2 NVMe PCIe Gen4 SSD
• Display: 15.3-inch WUXGA (1920 × 1200 pixels) IPS, 300 nits brightness, anti-glare, 16:10 aspect ratio
• Operating System & Software: Windows 11 Home with Microsoft Office / Office Home
• Webcam & Security: FHD 1080p / IR hybrid camera with privacy shutter and Windows Hello facial recognition support; Firmware TPM 2.0
• Keyboard: Backlit keyboard
• Connectivity & Ports:
• 2x USB-A (USB 3.2 Gen 1)
• 1x USB-C (Power Delivery and DisplayPort support)
• HDMI 1.4
• SD Card Reader
• 3.5 mm headphone/microphone audio jack
• Wi-Fi 6 and Bluetooth 5.2
• Battery & Power: 50Wh battery with Rapid Charge Boost (about 15 minutes of charge for 2 hours of use); 65W round-tip power adapter
• Design & Weight: Luna Grey color, aluminum top cover, weight approx. 1.62 kg, thickness around 17.9 mm
• Warranty: 1-year standard warranty (varies by retailer package)
_________________________
आता Lenovo Ideapad 3 15 IRH10 याच कॅटेगरीतील अमेझोन सेलवर रु ७१००० दाखवत आहेत पण त्यात मेमरी १६ जीबी सोल्डर्ड आहे.
__________________
प्रतिसादांतून माहिती देणाऱ्या सर्वांचे आभार., धन्यवाद.