Submitted by deepak_pawar on 21 October, 2026 - 06:11
किती दिवसानंतर, महिन्यानंतर, वर्षांनंतर
उमटलीत माझी पावलं... गावच्या मातीवर
जिथे बहरलेलं असतं माझं बालपण...
वसलेल्या असतात आठवणी
इथल्या कणाकणात.
पण, हा गाव आज ओळख दाखवत नाही.
येऊन उभा राहतो घरासमोर
तुटू पाहणाऱ्या वाश्याला बांबूचा आधार घेऊन उभं असलेलं घर पाहून
आठवतो कमरेत वाकलेला बाप हातात काठीचा आधार घेऊन उभा असलेला.
अनोळखी माणसाला पाहून करावी कुरकुर
तसं घराचं दार लागलंय कुरकुरायला
उघडता उघडत नाही.
आईनं हातानं सारवण केल्यावर
उमटलेली आमच्या पावलांची नक्षी केव्हांच पुसून गेलेली. आता दिवसा घराच्या सावलीत राहत असते
उदास शांतता
अन रात्री नांदत असतो भयाण काळोख.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माणसाच्या अंतर्मनात कधी
माणसाच्या अंतर्मनात कधी कधी अनोखी खंत सलत असते. मला वाटतंय त्याची ही कविता.
आवडली.
सुरेख कविता!
सुरेख कविता!
आवडली
आवडली