वाड्यातल्या गप्पा

Submitted by अस्मिता. on 24 June, 2021 - 11:18

वाड्यातल्या गप्पा
IMG-20240909-WA0003_1.jpgहा धागा एक माणसांनी भरलेला वाडा आहे , कोणीही या, कधीही या, अंगणात कोणीतरी बाज टाकून बसलेले असेलच. तुमचे हसूनच स्वागत होईल.  मायबोलीवरचे इतर लेखन इथे कॉपी करून आणू नका. त्या विषयीचे गॉसिपही नकोच. राजकारण नकोच. कसलेही चित्र द्या , कसल्याही शुभेच्छा द्या. रोज द्या / कधीतरी द्या. लिंक्स द्या.

धाग्याचे नियम-
कुणालाही हेटाळणीजनक प्रतिसाद देऊ नका. प्रत्येकजण (अमेरिकेतले/ भारतातले/ किंवा अजून कुठलेही) आपापल्या अनुभवविश्वातील गप्पा मारायला येथे येणं साहजिकच आहे. हा धागा फनहितार्थ आहे, जनहितार्थ नव्हे. त्यामुळे अपेक्षा नकोत आणि दबाव आणण्याचे प्रयत्नही नकोत. त्यांना आपापल्या समविचारी लोकांसोबत आनंदाने गप्पा मारायचा अधिकार आहे. सर्वांशीच सौजन्याने वागा आणि गोड बोला. Happy
धन्यवाद.


Happy करा सुरू.. !

***दवंडी***
वाडा निवडक हा धागा वाडा, मग, अग वरील निवडक पोस्ट्ससाठी काढला आहे. तो पहाण्यास पश्चिम महाराष्ट्र ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वाड्याची तिजोरी गप्पांचाच ठेवा.
ही तिची किल्ली-उघड दार वाडेकरा
प्रताधिकारमुक्त चित्र सौजन्य - अनिरुद्ध

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय हॅलो सुप्रभात रामराम वाडा

माझेमन ते काय ओरिजिनल रबडी सारखे लागणार नाही.
अर्थात माझ्यासारख्या गोड खाउ माणसाला आवडेल हे प्रकरण Happy

सुप्रभात वाडा.

पुस्तकपेठ ला भेट द्यायला गेले होते, पण त्यांची पुस्तकं घेतली गेली सगळी आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच ते बंद केलं असं समजलं. काहीतरी एकदम तुटल्यासारखं झालं मनात. खरंतर मी कधीच पुस्तकपेठेत गेले नव्हते, त्यामुळे काही ऋणानुबंध वगैरे नव्हते. पण तिथे पुस्तकं होती इतकं पुरेसं होतं. मी नोकरीला लागायच्या आधीच्या शिक्षणाच्या ७ वर्षांत (आणि आधी शाळेतही) पुस्तकांवरच जगले. रत्नागिरी नगरवाचनालयात नियमित फेरी असायची पुस्तक बदलायला. परीक्षा असेल तर १० दिवस नाहीतर ४-५ दिवसाला एक पुस्तक वाचून होत असे. मी नंतर ती आत्तेला दिली मेंबरशिप. मग वहिनी आणायची माझ्या नावाने, मग कोणालाच झेपेना तेव्हा वहिनीने ते बंद केलं.
नाशिकलाही मी सावाना ची मेंबरशिप घेतली होती, पण खूप लांब पडायला लागलं मग बंद केली.
आताही बदलीभर इच्छांमधे बरीच पुस्तकं आहेतच. म्हणून जेव्हा पुस्तकांचं दुकान बंद पडतं तेव्हा काहीतरी गमावल्याचं दु:ख होतं. पूर्वी बाजीराव रोडला मॅजेस्टिकचा गाळा होता. बेहेरे आंबेवाले रत्ना मँगो हाऊसच्या जवळ. मी त्या गल्लीत राष्ट्रभाषा भवनच्या समोर रहायचे. मॅजेस्टिकचा गाळा बघून मी खूष आणि बाबा काळजीत असं झालं होतं. नशिब, ते दुकान असल्यामुळे विकत घेतल्याशिवाय पुस्तक मिळत नसे. त्यामुळे मी तिथे मेंबर होईन ही भिती नव्हती. तरीपण मैत्रिणीला, तिच्या लहान भावाला, माझ्या मामेबहिणीला भेट द्यायला पुस्तक घ्यायचं निमित्त काढून मी तिथे पुरेसा वेळ घालवून आले होते. मामाकडे खूप पुस्तकं असायची. आम्हा बहिणींना वेळेवर जेवायला बोलावणं जिकीरीचं होतं कारण आम्ही सगळे पुस्तकात गढलेले असायचो. सगळेच कमी-जास्त प्रमाणात गटणे होतो Proud मामीपण खूप वाचायची. तिनेपण कुठेतरी जवळची लायब्ररी शोधून मेंबरशिप घेतली होती. आवडनिवड खूप वेगळी, पण पुस्तकांची संगत असायची.
चंपक-ठकठक-चांदोबा-किशोर-कुमार इथपासून पुल-वपु (मला नाही आवडले कधी फार), रणजित देसाई वगैरे टिपिकल वळणं घेत पार राजकारण, चरित्र, नव्याने सुरूवात झालेली You can Win सारखी लाईफकोच कॅटेगरीतली पुस्तकं, अनुवाद, कीरोचं हस्तरेषा मार्गदर्शक... काय वाट्टेल ते असायचं कोणाच्याही हातात! आणि मग जे वाचलंय त्यावर गप्पा असायच्या.
एक पुस्तक अनेक वाटा दाखवत असे. अजूनही दाखवतं. फक्त आता त्यापेक्षा रीळं जास्त बघितली जातात. कळतं पण वळत नाही.
माझ्यासाठी "मिळवावं" असं फार काही टार्गेट नाहीये जे मी कागदोपत्री सिद्ध करू शकेन... म्हणजे अमक्या कंपनीत नोकरी-प्रमोशन-गाडी-घर...
केवळ परमेश्वरी कृपेने काही गोष्टी न मागता मिळाल्या. आता एकच मागणं असतं - पुस्तकांचा आणि गाण्याचा मनसोक्त आस्वाद घेता येईल इतपत हातीपायी-कानीडोळी नीट रहाता यावं. मन आणि बुद्धी शाबूत असावी.
असो. फार रँडम काहीतरी खरडलंय.

प्रज्ञा,
छान।लिहिले आहेस.
पुस्तकपेठ ची सगळी।पुस्तकं पटापट संपली बहुतेक.

मोतीचूर खीर छान आहे प्रकरण!
अर्थात मोतीचूर संपवायला फार कष्ट नाही लागत.. ... +१.
ते लाडू उरतात कसे?खीर करायची असेल तर मुद्दाम आणले पाहिजेत.

प्रज्ञा, प्रतिसाद आवडला/ भिडला.कोणे एकेकाळी अशीच पुस्तकवेडी होते.

आज टीस्माला गोडसे वाद्यवादन विद्यालयचा अमृत महोत्सवी सोहळा होता. गोडसेंचा भाचा आणि भाचेसून माझे bmcc पासून चे जवळचे मित्र मैत्रीण. त्यामुळे कार्यक्रमाला गेलो होतो. बारावीत असताना काकूंनी मला व्हायोलिन शिकवायचा प्रयत्न केला होता Proud छान हृद्य झाला कार्यक्रम, उद्या उत्तरार्ध आहे. माडगूळकर होते प्रमुख पाहुणे म्हणून. आणि अजून बरेच नामवंत वादक पण होते पुण्यातले. झकोबाला पाठवेन क्लिप्स तुम्हा लोकांपर्यंत पोचवायला. पुण्यात छोटेखानी कार्यक्रम पण फार व्यवस्थित नियोजन केलेले असतात, त्यात पुणे ३० म्हणजे तर विचारायलाच नको Happy

छान पोस्ट प्रद्न्या. खरेच आहे गाणे आणि पुस्तकं अजून काय हवे. Happy माझी पुणे मराठी ची होती मेंबरशिप. तिथे शिफारस लागत असे. महाऊर्मट कारभार. पण मस्त पुस्तके असत आणि दिवाळी अंक. BCL ची पण होती. वैशाली समोर होती BCL. कसली भारी होती. त्याचे I card च एकदम यो होते. Proud

र्थात मोतीचूर संपवायला फार कष्ट नाही लागत.. ... +१.
ते लाडू उरतात कसे?खीर करायची असेल तर मुद्दाम आणले पाहिजेत.>> सेम सेम! लाडु उरतात कसे?
खिर आणि बुन्दिच्या पोळ्या दोन प्रयोग बाकि आहेत आता.
मागे मी एक बेक्ड बुंदी रबडी रेसिपी दिली होती. मस्त लागते. >>रेसिपी परत देणे.

अर्थात मोतीचूर संपवायला फार कष्ट नाही लागत >> हेच म्हणेन.

खरे तर मोतीचूर कमीच पडतात. अजून हवे होते असेच वाटते Lol

प्रज्ञा >> छान लिहिले आहे. पुस्तके आणि लायब्ररी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. संगमनेरला आजोबांची दोन ठिकाणी मेंबरशिप होती. त्यांनी पुस्तक आणले की मी पण वाचून टाकायचो. सुट्टी मध्ये एक लायब्ररी मध्ये विशेष लहानांना मेंबरशिप असायची. ती घेऊन तिथे जाऊन किंवा दर दोन दिवसांनी पुस्तके बदलून भरपूर पुस्तके वाचली. इथे पण लायब्ररी ची मेंबरशिप घेतली होती पण जास्ती काही आणले गेले नाही तिकडून.

धन्यवाद झकासराव !
फार भारी वाटतेय रेसिपी.
आमच्याक्डे दोन दिवस वार्षीक सॅन्टा आना वारा महोत्सव पार पडला...७२ तास लाईटशिवाय घालवल्यावर घरी गेल्यावर लाइट लावले तर एकदम स्वदेशची बिजलीवाली आज्जीच झाली होती..असला मेटाकुटीला आलेला जीव..पॉवर बॅन्क आणी लायब्ररीची सोय त्यामुळे तगलो...यु एस च्या लायब्ररी हे केवढ मोठ वरदान आहे ते परत परत जाणवल.
टिनाला कन्व्हिन्स करुन त्याचा हेअरकट करुन आणला....एकदम अन्दाज अपना अपनाच आठवला वटट ३० + डॉलर खर्चुन देवेन वर्मा आमिरला विचारतो "बाल कटे भी है तेरे" सेम असच फिलिन्ग आल.

प्राजक्ताचा मेसेज डिकोड करायला 3 वेळा वाचला. Happy
मला खरंच वाटलं काहीतरी उत्सव.
वादळ येउन गेले ना?
टिना कोण हे लक्षात आले नाही , मग टीनेजर लक्षात आलं Lol
आमच्याकडे टीनेजर ने केसांचे जंगल केलेय, मात्र नीट मेंटेनन्स नाहीये.
कशालाच तयार नसतात.
मजा असते.
मी ही कमी जास्त असाच असेन त्याच्या वयात असताना म्हणा.

हॅलो वाडा.
How is weekend?

प्राजक्ता, झकासराव मी हि यातून जातेय, समजू शकते, आमच्या घरात टिनेजर आणी पेरीमेनोपॉस असे डेडली कॉम्बिनेशन आहे, रोज घरात रामायण, महाभारत, कितीही ठरवले तरी काहीतरी निघतेच.

केसांच्या बाबतीत सगळेच टीन्स सारखेच असतात बहुतेक, आमच्याकडे जंगल आहे ज्याला पाणी (तेल), छाटणी आणी इव्हन कोम्बिंग ही चालत नाही, का तर म्हणे मला फॅशन सेन्सच नाही. कोम्बिंग केल्याने चोमु दिसते. हा तोच मुलगा बोलतो ज्याला शाळेत जाण्याआधी रोज मम्मीकडूनच केस विंचरून पाहिजे असायचे मी मग कितीही कामात असली तरी.

माझं सगळं छान ऐकणार बाळ, प्रत्येक गोष्ट मला विचारून करणार बाळ कुठे हरवलंय आणि मला कधी परत मिळेल काय माहित. मी तर रोज आता १० दिवस ट्रिप ला निघून जाईन म्हणजे समजेल असा प्रण करते पण पाय घरातून निघत हि नाही. होप हा फेस लवकर संपेल

माझेमन छान आहे तो व्हिडीओ
पाहिला
स्किल काम आहे.

दिव्या
रोज एक दिवस
त्यांच्या कलाने घेत आपलेही करून घायचे.
कठीण असते पण असाच मार्ग निघतो.
कालचं काल सोडून आज नवीन दिवस म्हणून सुरू.
Perfection थोडे बाजूला ठेवावे लागते.

झकास +१
दिव्या चेन्ज असणारच आहे.
आमच्या बाळाला शॉपिन्ग मधे शुन्य इन्ट्रेस्ट होता, तु आणशील ते कपडे मी घालेल ते एकदम बदल होवुन आता मीच शॉपिन्गला जाणार त्यातही एकजात प्लेन कपडे लागतात, त्यावर काहिही लिहलेले नको..घरात सध्या ४ ब्लॅक्,४ व्हाइट, २ मरुन टीशर्ट आहे तेच आलटुन पालटून चालतात.
मध्यतरी ४ दुकान फिरलो तरी एकही शुज आवडले नव्हते...
रुम मधे सारख सारख डोकावु नका, कपडे आवरुन ठेवु नका नाहितर सापडत नाहित...काय भारी लॉजिक!!
डेस्क, चेअर, बेडचा कठडा सगळीकडे पताका लोन्बत असतात.
बाकी "हात नका लावु माझ्या केसाना "यावर तर एक ललित पाडता येइल...केस कर्ली आहेत आणी सध्या ते ट्रेन्ड मधे आहेत त्यामुळे आम्ही स्वतःवर खुश असतो..त्याला जेल लावणे, सतत दोन्ही हातानी गोन्जारणे चालु असत..
काल तो क्रॉस कन्ट्रि मिट वरुन आला त्याला म्हटल आज हेअर कट करायचाच आहे...तर अगदी दचकला "व्हॉट?? नो नो किमान एक विक लागेल म्हणे मला डिसाइड करायला कुठला कट करायचा...बरोबर आहे जन्गल कापायच तर विभागाला एक विकची तरी नोटीस नको??शेवटी फक्त कानावरचे केस कमी करायचे आनी वरच्या जन्गलाला धक्का लावायचा नाहि आणी एक फ्रॅप फ्रॉम स्टारबक्स हे ठरल...हेअर कट करणारी एक्दम चतुर होती तिने बरोबर याला फक्त साइडने कट करुन चालणार वरच्या जन्गलाला थोडे ट्रिम करावेच लागेल अस छान कन्व्हिस केल...इती हेअर कट पुराण समाप्त!!