Submitted by मनोजकुमार देशमुख on 12 October, 2026 - 05:15
मी तरीही गात आहे
काजळीने दाटलेली एक वैरी रात आहे
उंबऱ्याशी एक छोटी तेवणारी वात आहे
संकटांची काय चिंता, वादळांची काय भीती?
माउलीचा आजही तो मस्तकी या हात आहे
ठेवले होते मनाला बांधुनी मी कैक वेळा
एकदा ती हासली की, निग्रहाला मात आहे
पाहती ना काम माझे, आडनावा शोधती ते
माणसाचा प्रश्न नाही, प्रश्न त्याची जात आहे
मोठमोठ्या घोषणांनी भूक भागे का कुणाची?
झोपली लाखो उपाशी, कागदी हा भात आहे
मैफिलीचे लोक गेले, ओस सारे भोवताली
फाटलेल्या काळजाने मी तरीही गात आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काजळीने दाटलेली एक वैरी रात
काजळीने दाटलेली एक वैरी रात आहे
उंबऱ्याशी एक छोटी तेवणारी वात आहे......
वाह.....
छान, गजल!
vilasrao धन्यवाद !
vilasrao धन्यवाद !
ठेवले होते मनाला बांधुनी मी
ठेवले होते मनाला बांधुनी मी कैक वेळा
एकदा ती हासली की, निग्रहाला मात आहे
पाहती ना काम माझे, आडनावा शोधती ते
माणसाचा प्रश्न नाही, प्रश्न त्याची जात आहे
मोठमोठ्या घोषणांनी भूक भागे का कुणाची?
झोपली लाखो उपाशी, कागदी हा भात आहे
हे शेर विशेष आवडले.
मतला आणि शेवटचा शेर उत्तम!
मतला आणि शेवटचा शेर उत्तम!
शेवटचा फारच आर्त