लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : सामो

Submitted by सामो on 24 September, 2026 - 10:05

२००३ - मे महीना.
माझा इन्टर्व्ह्यु देउन झालेला होता. रोज सकाळी उठले की धावत जाउन ईमेल चेक करणे - का तर अमेरिकेतून तोवर रिप्लाय आलेला असतो. आणि काहीतरी २५ की २६ मेला उत्तर आले. 'सिलेक्टेड' - अमुक इतका पगार. लवकरात लवकर जॉइन व्हायचे आहे - २८ मे ला
नंतरचे २-३ दिवस प्रचंड धामधुमीचे गेले. प्रोफेशनल कपडे, प्रवासाच्या बॅग्स, डॉलर्स तर होते कारण नवरा जहाजावर जात असे. घरात युरो पासून केन, डॉलर सगळ्या करन्सीजच्या नोटा , नाणी असत.
मुलीचा आणि नवर्‍याचा निरोप घेताना इमोशनल व्हायला झाले. जरी हे माहीत होते की एका महीन्यात ते सुद्धा अमेरिकेत एच ४ वरती येणार आहेत. विमानतळावर निरोप द्यायला आई-बाबा आलेले. तेव्हा कुठे माहीत होते पुढील ११ वर्षे आम्ही भेटणार नाही.
एल ए ला जायचे होते व्हाया हीथ्रो.
मला नीट आठवणार्‍या ३-४ गोष्टी इथे लिहीते -
.
(१) तेव्हा मी डिओड वापरत नसे. तशी सवय नव्हती कारण ते प्रकरण माहीतच नव्हते. बाप रे!! आय मस्ट बी स्टिंकिंग आफ्टर २०-२४ अवर्स जर्नी कारण हिथ्रोवरती बराच मोठा ले-ओव्हर होता. बिच्चारा माझ्या बाजूला बसलेला माणूस Sad
.
(२) हिथ्रोवरती मोठ्ठा चॉकलेट बार घेतला. याईक्स!! तो होता पिनट बटर चॉकलेट बार. स्निकर्स मला वाटतं. टाकुन द्यावा लागला.
.
(३) विमानात एक कागदी खाकी रंगाची जाड बॅग असते. विमान उतरते वेळी, मी इमानेतबारे माझा सर्व कचरा गोळा करुन त्या बॅगेत टाकला आणि विमान उतरताना, हवाईसुंदरीने कचरा कलेक्ट करतात तेव्हा तिला दिला. तिने चिमटीत ती पिशवी धरली आणि पट्टकन तिच्या केर गोळा करण्याच्या पिशवीत टाकली. नंतर खूप महीन्यांनी कळले की विमान लागले तर ती पिशवी उलटी करण्याकरता वापरतात.
.
(४) उतरताना सारे लोक शिस्तीत उतरतात. पहील्यांदा पुढच्या रांगेतील व्यक्ती बाहेर निघते मगच आपण जायचे असते. पण मी सवयीने ट्रेनमध्ये करतात तशी धक्काबुक्की करण्याचा क्षीण प्रयत्न केला. मग लक्षात आले इथे सर्व शिस्तीत चालते. Happy
.
(५) उतरल्यावरती माझ्याकडे , $१०० ची नोट होती. चिल्लर काहीच नाही. मला घ्यायला माझी एक मैत्रिण येणार होती. मला त्यांना फोन करायचा होता पण पब्लिक फोन करता क्वार्टरच नव्हता. कित्येक लोकांना विचारले पण कोणाकडेच चेन्ज नव्हती. मग शेवटी ज्या विमानकंपनी च्या विमानाने आले त्यांना म्हणजे ब्रिटिश एअरवेज च्या रिसेप्शनिस्टना सांकडे घातले व चिल्लर मिळवुन फोन केला.
.
(६) तपासणी, प्रश्नोत्तराच सोपस्कार पार पडल्यावरती पहील्यांदा एअरपोर्टबाहेर म्हणजे अमेरिकेच्या भूमीवर पाऊल टाकले आणि खूप आनंद झाला - अरे अमेरिका अमेरिका म्हणतात ती हीच का! Happy तेव्हा माहीतच नव्हते की पुढील कित्येक वर्षे (आयुष्य?) इथे या भूमीवरती जाणार आहे. जस्ट लागली लॉटरी जाउन येउ १-२ वर्षे असे वाटलेले होते. अमेरीकेचा मोठ्ठा ध्वज वार्‍यावरती गर्वाने, फडकत होता आणि माझ्या मनात आनंदाचे उधाण आलेले होते की येस्स!! डन इट. पुढील कित्येक वर्षे स्वप्नात भारतच येत असे. खरेच वाटत नव्हते की आपण अमेरिकेत आलेलो आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

होय लंपन. नवरा आंतर राष्ट्रीय, जहाजावर चीफ इंजिनिअर होता आणि ही हॅड अ परमिशन टु ब्रिन्ग हिस स्पाउस ओन शिप. पण कधी नेले नाही. आणि आम्ही डोमेस्टिकही कधी विमानाने गेलो नाही कुठे Happy
तेव्हा हाच पहीला Happy

वाह सामो! Happy समकालीन प्रवासानुभव असल्याने छान वाटले वाचताना. थेट अमेरिकन कंपनीत इंटरव्ह्यू देऊन गेलात का? असो. पण बरेचसे कोरिलेट झाले. असे काही वाचले की पुन्हा एकदा परदेश प्रवास करण्याची उर्मी उफाळून येते. थँक्स सामो.

Pages