माणसांची ही झुंबड उडाली होती.
विमान फलाटावर आलं तसं लोकांनी एकच गलका केला.
डोईवरची गाठोडी, काखेच्या वळकट्या असा लवाजमा सांभाळत विमानाच्या शिड्यांवरून लोकांची गबगब चालू झाली. ती बघूनच विमानाच्या दारात यमदूतासारखी उभी असलेली आददांड हवाईचिचुंद्री आपलं काठापदराचं लुगडं कंबरेला खोचत चिवचिवली "अय गाबड्यांनो, वाईच शिस्तीत येता येत न्हाई व्हय? हे ईमान हाय का यष्टी?"
पण पब्लीकला काहीच पडलं नव्हतं.
दारात नुसताच घुसनळकल्लोळ झाला. बारीक पाईपातून जाणारी पाण्याची चिळकांडी पुढं मोठ्या पाईपात घुसल्यावर जशी तिची धार फुटती तशी गर्दी विमानाच्या दारातल्या चिंचोळ्या जागेतून केबिन मधे गेल्यावर फुटली, म्हणजे अक्षरश; एकमेकांच्या अंगावरच पडली.
टांगेरावच्या हातात लालनबाईचं गाठुडं आलं. जरा वेगळंच लागतंय म्हणून बघितलं तर गाठुड्यातून एक चोळी हातात आली. तिच्याकडं टांगेराव बघत असतानाच लालनबाईनं त्याला शिवी हासडली अन दी हिकडं म्हणत त्याला हिसडा दिला.
बाकीच्या गर्दीत पण हेच चाललं होतं. कसे बसे लोक शीटांवर जाऊन बसले.
लालनबाई खिडकीच्या शीटावर बसली. तर खिडकीवर कुणीतरी काठी आपटत होतं.
तिनं खाली वाकून बघितलं तर खाली ट्रॉलीवर उभी राहून मैनाबाई काठी आपटत होती अन जोरजोरात ओरडत होती.
" ए लाले, मी रूमाल टाकलाय त्या शीटावर"
ऐकू येत नसलं तरी तिच्या ओठांच्या हालचाली स्लो मोशन मधे एव्हढ्या स्पष्ट होत्या कि लालनबाईला सगळं समजलं.
तिनं पण त्याच स्लो मोशन मधे छ शब्दाने सुरू होणारा तीन अक्षरी आदरार्थी शब्द वापरत तिला ऐकवलं " अॅहॅ गं सटवे ! आली मोठी शानी, यष्टी हाय व्हय गं टवळे??"
आणि मग दोघींची स्पर्धा मुक्यानेच रंगली. म्हणजे लालनबाईचे डायलॉग्ज विमानाfunction at() { [native code] }अ सर्वांना ऐकू येत होते तर मैनाबाईचे खालच्यांना.
मग कुणीतरी मैनेच्या कानात सांगितलं " अय मै ने ! " मै वर जोर आणि ने वर पण जोर. तिनं चमकून बघितलं तर पोपटराव संधी साधून अंगचटीला आला होता. त्याला तिनं भ वरून दोन अक्षरात आदराने संबोधन केलं "निघतो गुमान का टकुर्यात घालू हा हांडा ?"
तसा पोपट मागं सरकत म्हणाला "न्हाई मी काय म्हनत व्हतो, आत जाऊन भांड कि काय असंल ती. विमान गेलं कि मंग तू राहशील खाली अन लालन जाईल भुर्र "
तशी मैना पदर खोचत लालनचा उद्धार करत लगबगीनं निघाली. त्या नादात ती गर्रकन फिरली तेव्हां तिच्या डोईवरचा पाण्यानं भरलेला हंडा पोपटच्या पायावर पडला तसा तो कळवळून वाकला.
तेव्हढ्यात मैना "पाणी सांडलं भाXनं" म्हणत हंडा उचलून वळाली अन उरलेल्या पाण्यासहीत पोपटच्या पाठीत जोरात आपटला. तसा पोपट जमिनीला समांतर झाला.
अशा सगळ्या घडामोडी घडत असताना कसं बसं को पायलटनं लोकांना बसायला लावलं.
तरी भांडणं चालूच होती.
कुणीतरी म्हणालं "कंडक्टर डबल बेल द्या"
तसा मारत्या को पायलट भडकला.
त्याने त्याला भोसरी गावाचा समजून त्याला हाक मारली अन विचारलं " कंडक्टर वाटलु व्हय रं म्या?"
विचारणार्या किसन्याला लोकांनी गप्प केला.
"कंडक्टर हाय व्हयं रं त्यो ? लेका इमानाचा किन्नर हाय त्यो"
हे ऐकून मारत्या अजून भडकला.
"आता इमान काय हलणार न्हाई"
आणि मग एकच गलका झाला.
आता सरपंच उठलं " येड्यानु कुठं काय बोलावं याला काय सुमार हाय का तुम्हाला? मी काय म्हंतो येडी हाईत ही, त्यांचं मनावर घेऊ नका. मी सांगतु हाणा तुम्ही इमान. त्येना किन्नर अन डायवर मधला फरक बी कळंना"
आता मात्र मारत्याला काय करावं ते समजंना.
सरपंचाला काय बोलावं तर त्ये पावरबाज गडी. तिकडं म्हमद्या वाट बघत होता.
त्यानं हवाईचिचुंद्री धुरपाला सांगितलं "एय धुरपे, ते मारत्या पब्लीकला गप कराय गेलंय का काय अजून काय करतंय बग?"
हवाईचिचुंद्री जेव्हढी धिप्पाड होती, तेव्हढंच तिचं पोट पण घेरदार होतं. ते पावलापावलाला भूकंप व्हावं तसं हलत होतं.
ती म्हणाली
" ए म्हमद्या, नाश्टा वाटायची वेळ होऊन गेली. मला बी भूक लागलीय कवाची. जवर यांना वाढत न्हाई तंवर मला बी गिळता यायचं न्हाई. तू अन मारत्या काय गोंधळ घालायचा तो घाल"
तिनं मग छकड्यासारखी एक ट्रॉली घेतली अन विमानात फिरू लागली.
लोक हात पुढं करायचे तशी धुरपाबाय त्यांच्या हातावर भाकरतुकडा ठेवायची अन त्यावर बेसन ठेवायची. दुसर्या हातात कांदा, चटणी द्यायची. पब्लीक पण भांडण करून दमलेलं.
नाश्ता वाटून झाला आणि विमानात शांतता प्रस्थापित झाली. आता फक्त खाताना येणारा मचमच आवाजा येऊ लागला. पण पब्लीकची भूक जास्त खवळलेली होती. एका भाकरीनं काय होणार. धुरपा पण मागंल त्याला बेसन अन भाकरी वाढत होती.
एकदाचं पब्लीकचं पोट भरलं.
तंवर म्हमद्या खाली उतरून गेला होता. आता हा कुठं गेला म्हणून त्याला शोधायला मारत्या पण गेला.
तर तो कँटीनला भुर्जॉ पाव खात होता.
भरल्या पावावरन खाता खाता त्याला उठवावं हे काय मारत्याला बरं वाटंना.
पण लाऊडस्पीकर वरनं स्टार्टर ओरडत होता.
" फलटण ते कंवठेमहाकाळ जाणारं फलाट क्र. बाराचं विमान ताबडतोब हलवा. पंढरपूर ते गडचिरोली विमान ताटकळलं आहे"
आता मारत्याचा नाईलाज झाला. त्यानं म्हमद्याला सांगितलं.
"मर्दा, बांधून घी कागदात भुर्जीपाव अन चल लवकर. रस्त्यात खा "
म्हमद्याला पण पटलं.
"वाईच एक बिडी मारून मंग निघू"
मारत्याला पण तल्लफ आली होती. एका बिडीनं काय होतंय म्हणून त्यानं पण मान हलवली.
एक झुरका आळीपाळीनं मारल्यावर दोघांच्या अंगात हुषारी आली.
डुलत डुलत ते विमानात चढले.
आत गेल्या गेल्या दोघं ताबडतोब पळतच पुन्हा खाली उतरले..
म्हमद्या म्हणाला "मारत्या विमान काय हलणार न्हाई"
"व्हय रं मर्दा"
दोघं तसेच जमिनीवर फत्कल मारून बसलेले बघून कंट्रोल रूम मधून कंट्रोलर अनाऊन्समेंट करायला लागला.
पण दोघंही काही हलायचं नाव घेईनात.
आता कंट्रोलर स्वतःच चालत विमानाकडं आले.
माईकवरून बोलत असल्यानं तुंबलेलं शब्दांचं धरण बदाबदा फुटलं. म्हमद्या फक्त म्हणाला
"आत जाऊन बगा कि वाईच"
कंट्रोलरने दारातून आत पाय टाकला मात्र, एकदम पोट डचमळल्यासारखा जिन्यावरनं गडगडत आला.
' आय्योव , काय रं ह्ये?
मारत्यानं त्याच्या कानाला लागत सगळं सांगितलं.
कंट्रोलर कंट्रोल रूममधे गेला.
आगार प्रमुख त्यांच्या केबीनच्या काचेतून सगळा प्रकार बघत होते.
त्यांनी कंट्रोलरला फोन लावला.
"हबसनिस, काय भानगड विमान का हलत नाही?"
"नाही हलणार"
" अरे पण काय कारण?"
" साहेब बेसनडा:ळ कच्ची होती"
"त्याचा आणि विमान न हलण्याचा काय संबंध?"
"साहेब पब्लिकनं बेसन मागून मागून खाल्लंय"
"खाऊ दे की, म्हणून विमान हलणार नाही?"
तसं हसबनीसांनी एकदम खालच्या कुजबुजत्या आवाजात सीक्रेट सांगितल्यासारखं कारण सांगितलं.
आता आगारप्रमुख पण चिंतेत पडले.
त्यांच्याकडं मीडीयाचे फोन खणखणत होते.
टीव्हीवर ब्रेकींग न्यूज येऊ लागल्या. एक विमान बेमुदत फलाट क्र बारावर उभं आहे ही बातंई वार्यासारखी देशभर पसरली.
शेवटी नागरी वाहतूक मंत्र्यांपर्यंत ती पोहोचली.
त्यांचा फोन आला तेव्हां आगारप्रमुखांनी खरं काय ते सांगून टाकलं.
थोड्याच वेळात मंत्रीजी टिव्हीवर दिसू लागले.
"काळजीचं कारण नाही, विमानात तांत्रिक बिघाडामुळे गॅस टर्ब्युलन्स वाढला होता. बिघाड दूर करायचं काम चालू आहे. थोड्याच वेळात विमान मार्गस्थ होईल"
तिकडं पब्लीक उतरून सार्वजनिक शौचालयाकडे धूम ठोकत होतं आणि नाकाला चिमटे लावलेले सफाई कर्मचारी युद्धपातळीवर व्हॅक्युम क्लीनर घेऊन विमानात घुसले होते.
शेवटी तासाभराने ते विमान आगारातून बाहेर पडलं आणि रस्त्याने धावू लागलं.
पुन्हा रस्ते वाहतूक मंत्री टिव्हीवर दिसू लागले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी क्रेडीट घेतलं.
गॅस टर्ब्युलन्स!
गॅस टर्ब्युलन्स!
झकास जमलंय...
झकास! आमच्या गावाकडं शंकर्
झकास! आमच्या गावाकडं शंकर्याला वाटायच की यष्टी निघाली की पाटकुनी मागच्या शिडीव जाउन टपाव बसायच आन आपल गाव आलं की अदुगरच टपावून् शिडिव यायच आन यष्टी थांबली की लगी उडी मारायची अन पळून जायच असा फुकाट प्रवास करायचा. कधी कधी त्याच्या डोक्यात अशी आयडीया यायची की इमानदारीत तिकिटआदुगरच काढायच अन मंग कंडक्टर तिकिट तिकिट अस करत आला की कावरबावर झाल्यावानी करायच. मंग कंडक्टर तुमच्या समोर भ्वॉक पाडायचा चिमटा वाजवत हुबा रायला अन तिकिट म्हनून इचारल की खिशातून तलवार उपसत काढाव तस तिकिट बाहेर काडायच अन त्येच्यासमोर फडकावीत त्याला म्हनायच की ह्ये कोन तुहं म्हतार हाये का? तुमच्या ईमाईनात बी असच करायल लागन
(No subject)
(No subject)
धमाल आहे लेख...
धमाल आहे लेख...
डोळ्यांसमोर विमानप्रवास उभा राहिला लेखातला..!
जबरदस्त लेख. भाषा मस्तच जमली
त्येना किन्नर अन डायवर मधला फरक बी कळंना >>
जबरदस्त लेख. भाषा मस्तच जमली आहे.
ह्या लेखावरून एखादी स्टँडअप कॉमेडी म्हणून नक्कीच चालेल.
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार