शशक स्पर्धा - मॅगी - मन तळ्यात...मळ्यात... (शृंगार/करूण, रूपक)

Submitted by मॅगी on 22 September, 2026 - 06:08

हसताना तिचं अख्खं शरीर थरथरायचं. जसा काही आनंद लपवता येऊ नये. तिला सांगायचं होतं की तिचं हास्य मला किती आवडतं आणि तिच्याबरोबरचा प्रत्येक क्षण कसा दैवी असतो. तिचे डोळे म्हणजे मधाचं पोळं. पाझरले की गालावर मध सांडायचा.

पण माझे शब्द म्हणजे बिनकामाचा बुडबुडा. विरून जाणारा. याउलट ती. तिचे शब्द कसे ठाशीव, खरे आणि प्रामाणिक.

पण तिच्या डोक्यातले विचार मात्र कधीच माझ्याइतके आतूर, उत्कट नव्हते, ना ती हुरहूर होती जी तिला सांगण्यासाठी माझा जीव तुटत होता. ना मी रोखून ठेवलेला आवेग. कदाचित त्यामुळेच त्या रात्री माझ्या हृदयात कळ आली, जेव्हा ती मला मिठी मारत म्हणाली,
"तू मला अगदी बहिणीसारखी आहेस."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

… डोळे म्हणजे मधाचं पोळं. पाझरले की गालावर मध सांडायचा….

हे तर एकदम गुलज़ार, शिवानी, जॉन एलिया, किंवा जांनिसार च्या लेव्हल चे ❤

जियो !

जम्या! Happy

अहो अमितव इतकं उद्गारवाचक मॅटर होण्याचं काय कारण आहे मला? दोघी स्त्रिया वाटतायत आणि प्रेमिक वाटतायत म्हणुन मी संत्र सोलत होते.