Submitted by ऋतुराज. on 21 September, 2026 - 22:08
लक्ष
संध्याकाळची ट्रेन तशी गर्दीने खचाखच भरलेली असतेच. त्यात बसायला जागा मिळाली म्हणजे नशीब. जेंट्स कंपार्टमेंटमधे समोरच एक तरुण युगुल, एकमेकांत मग्न. सगळ्या लोकांच्या नजरा त्यांच्यावरच.
त्याने तिचा एक हात आपल्या दोन्ही हातात घेऊन घट्ट धरला. मग आपल्या बोटांनी तिच्या गुलाबासारख्या ओठांना स्पर्श केला. तिने त्यावर पटकन एक झटका दिला आणि तोंड फिरवले. त्यामुळे तिचे नागीणीसारखे काळेभोर केस त्याच्या चेहऱ्यावर आले. त्यांना आता आजूबाजूचे कसलेच भान राहिले नव्हते.
सगळेजण चोरून, तिरप्या नजरेने, अधूनमधून तिकडेच पाहत होते. सगळ्यांच सगळं लक्ष तिकडेच.
इतक्यात घोषणा झाली. "प्रवाशांनी कृपया गाडीचे पायदान आणि फलाटाची उंची याकडे लक्ष द्यावे."
आणि आता सगळ्यांच लक्ष्य विचलित झालं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
पण ऋतुराज, यात लक्ष शब्द
पण ऋतुराज, यात लक्ष शब्द तिन्ही ठिकाणी एकाच अर्थी आलाय ..म्हणून श्लेष साधला जात नाहीये !
(No subject)
धन्यवाद हर्पा, स्वानंदी१,
धन्यवाद हर्पा, स्वानंदी१, रानभुली
स्वानंदी,
श्लेष नव्हताच मनात. उपमा वापरला आहे वर.
पण आता तुम्ही म्हणता तर श्लेष पण घ्या.
(No subject)
मस्त
मस्त
अर्जूनाचे लक्ष लक्ध्यावर
अर्जूनाचे लक्ष लक्ष्यावर
आणि लक्ष्याचे लक्ष
आणि लक्ष्याचे लक्ष म्म्म्म्म्म्म्महेशवर. डॅमिट!
हर्पा
हर्पा
(No subject)
(No subject)
लक्ष लक्ष्य म्हटले की अर्जुन
लक्ष लक्ष्य म्हटले की अर्जुन आणि पोपटच आठवतो
ऋतुराज म्हटलं की फलाट आणि
ऋतुराज म्हटलं की फलाट आणि पायदान आलच पाहिजे
Lol
Lol
ऋतुराज म्हटलं की फलाट आणि पायदान आलच पाहिजे Wink
>>> मी गटग शब्द पण कुठे दिसतोय का बघितलं :p
(No subject)
भारी
भारी
(No subject)
लक्ष आपले मोबाईल मध्ये असू
लक्ष आपले मोबाईल मध्ये असू द्यावे हेच बेस्ट
… चोरून, तिरप्या नजरेने
… चोरून, तिरप्या नजरेने तिकडेच पाहत होते. सगळ्यांच सगळं लक्ष तिकडेच….
कसले लक्ष्यदर्शी लोकं आहेत, ज़रा म्हणून प्रायव्हसी मिळू देत नाही तरुण मुलांना 😜
लक्ष आपले मोबाईल मध्ये असू
लक्ष आपले मोबाईल मध्ये असू द्यावे हेच बेस्ट…
होय तर. पण लक्षात कोण घेतो ?
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
सर्वांना धन्यवाद ....
सर्वांना धन्यवाद ....
फारच अरसिक हे रेल्वे कर्मचारी
फारच अरसिक हे रेल्वे कर्मचारी

मस्त कथा..!
मस्त कथा..!
(No subject)