नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।।
आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन थाटामाटात झालेले आहे.
यंदा बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणता नैवेद्य अर्पण केला?
लाडक्या बाप्पासाठी काही विशेष खिरापत केली की नाही? दर्शनाला आलेल्या गणेशभक्तांना कोणता प्रसाद वाटला?
मोदक, गूळखोबरं, पंचामृत, लाडू-पेढे, बर्फी- वड्या, खीर-बासुंदी, वरणभाताची मूद त्यावर तुपाची धार, बटाट्याची भाजी, चटपटीत चटण्या-कोशिंबिरी, भजी-पापड-कुरडई....
याचबरोबर ऋषींची भाजी, गौरींसाठी नैवेद्य, फराळ आणि बाप्पाची शिदोरी!
नैवेद्याची प्रकाशचित्रं तसेच त्याबद्दलची माहिती आणि विशेष आठवणी इथेच प्रतिसादात लिहा.
मग वाट कसली बघताय, घ्या मोबाईल, करा क्लिक आणि द्या इथे फोटो.
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया!
इथे एकही कॉमेंट-फोटो नाही ?
इथे एकही कॉमेंट-फोटो नाही ?
कुणीच गणपती बाप्पांना पाहुणचार केला नाही ?
चला, सुरुवात करतो.
चला, सुरुवात करतो.
उत्सवानिमित्त विस्मृतीच्या तळघरातून ओढून आणलेला पदार्थ- पाकातले चिरोटे.
फोटोत चिरोटे तितकेसे चांगले दिसत नाही आहेत मात्र.
आणि पारीत कणभर ऐवजी मणभर मीठ पडले चुकून पण खुसखुशीत का काय म्हणतात तसे झालेवते.
आमचा बाप्पा गावाला. त्याला
आमचा बाप्पा गावाला. त्याला इथूनच नमस्कार करतो.
कोकणात गणपतीसाठी या चण्याच्या पिठाच्या करंज्या करतात. त्या यंदा घरबसल्या ( विकत) मिळाल्या.
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक

चण्याच्या पिठाच्या करंज्या !
चण्याच्या पिठाच्या करंज्या ! मी पुरण भरलेल्या चाखल्या आहेत.
ह्याचेही Savoury Version करता येईल, झकास आयडिया दिली @ भरत
नितनवे, तुमच्या मोदकांना हा
नितनवे, तुमच्या मोदकांना हा झब्बू. 👇
पण आमच्याकडे तळलेले.
खोबरे नावडते म्हणून गूळ खोबऱ्याऐवजी ड्रायफ्रूटस् चे सारण भरून.
अनिंद्य, मला तळलेले मोदक
अनिंद्य, मला तळलेले मोदक असेच आवडतात. खुसखुशीत आणि खुटखुटीत. गुळचूण उकडीच्या मोदकांत फिट. पण याचं सारण कोरडंच आवडतं.
तळलेले पदार्थ वाईट का लागतील
तळलेले पदार्थ वाईट का लागतील ? बेस्टच असतात ते.
Everything fried and fattening tastes great 😀
ते खरंच आहे. तळलेलं प्रचंड
ते खरंच आहे. तळलेलं प्रचंड आवडतं. आणि मोजकंच खावं लागतं.
पण ओल्या नारळाच्या सारणाचे तळलेले मोदक खुटखुटीत नाही राहत. म्हणजे मला तरी तसे मिळालेले नाहीत कुठे.
त्यामुळे मऊ लुसलुशीत उकडीसोबत ते चांगलं सामावून जातं.
… ल्या नारळाच्या सारणाचे
… ओल्या नारळाच्या सारणाचे तळलेले मोदक खुटखुटीत नाही राहत…
True that. नारळाला पाणी सुटत असावे.
ll नैवेद्यम् समर्पयामी ll
ll नैवेद्यम् समर्पयामी ll

चिरोटे मोदक आणि कोकण स्पेशल
चिरोटे मोदक आणि कोकण स्पेशल चण्याच्या पिठाच्या करंज्या छान दिसतायत.
सिमरन मोदक छान दिसतायत.
आमच्याकडे उकडीचे की तळलेले हा वादच नाही. उकडीचेच
मनिमोहोर + १
मनिमोहोर + १
… आमच्याकडे उकडीचे की तळलेले
… आमच्याकडे उकडीचे की तळलेले हा वादच नाही.…
आमच्याकडेही.
घरात तीन पक्ष आहेत. (दोन्ही प्रकारचे मोदक न आवडणारा तिसरा पक्ष). प्रत्येकाच्या आवडीचा मान राखला जातो. ज्याला जे आवडतात ते करतात आणि खातात. कुणीही वाद घालत बसत नाहीत
आमच्याकडे उकडीचे की तळलेले हा
आमच्याकडे उकडीचे की तळलेले हा वादच नाही. उकडीचेच>> आमच्याकडे पण ! तळणीचेच
बाप्पाचे नैवेद्य मस्त आहेत सगळेच
मी पण केले गेल्यावर्षी गणेश
मी पण केले गेल्यावर्षी गणेश चतुर्थी नंतर यंदाच घाट घालायला जमले.
घरातले मेंबरे पण करू लागल्यामुळे साईझ मध्ये फरक आहे
सगळ्यांचे नैवेद्य छान.
@सिमरन यांचे फार फार सुरेख देखणे झालेत.. बघूनच छान वाटले
तुमचे पण छान झालेत अगदी शुभ्र
तुमचे पण छान झालेत अगदी शुभ्र पान्ढरे !! सुबक आणी सुन्दर
थँक यौ प्राजक्ता
थँक यौ प्राजक्ता
… घरातले मेंबरे पण करू
… घरातले मेंबरे पण करू लागल्यामुळे साईझ मध्ये फरक…❤
हा फरक फार क्यूट आहे. त्यांना करू लागावेसे वाटले याचे खूप कौतुक.
थँक यो अनिंद्य
थँक यो अनिंद्य
मुलींनी केलेला फोटो मदे नहिये, नवरोबा करू लागले होते.. मोदक गणेश चतुर्थी करणे असा नियमच झाला आहे जरी घरी बाप्पाचे आगमन होत नसले तरी.
नवरोबा करू लागले होते..…
नवरोबा करू लागले होते..…
हे तर सर्वात बेस्ट 🙂
Power to him 👍
जे आवडे स्वत: ला
जे आवडे स्वत: ला
तेची अर्पावे देवाला
बाप्पाला पाहुणचार अंगूरी रसमलाईचा.
Bit unconventional, पण गंपू बाप्पा दोस्त आहे माझा
सारे पदार्थ खूप सुरेख आणि
सारे पदार्थ खूप सुरेख आणि कौतुकेबल.
ओल्या नारळाच्या सारणाचे तळलेले मोदक खुटखुटीत नाही राहत….. माझ्या सासूबाई तळणीचे मोदक प्रसाद म्हणून पाठवायच्या, ते छान खुटखुटीत असायचे. सारण मात्र साखर+खोबऱ्याचे असायचे.
सगळ्यांचेच नैवेद्य मस्त!
सगळ्यांचेच नैवेद्य मस्त! आम्ही च लावतच नाही. दोन्ही करतो पहिल्या दिवशी तळणीचे नंतर कधीतरी उकडीचे. कोणी रुसायला नको.
जे आवडे स्वत: ला
तेची अर्पावे देवाला>>> मम
.. आम्ही च लावतच नाही…
.. आम्ही च लावतच नाही…
असं कसं असं कसं ?
“च” लावले की चाऊन चोथा झालेल्या या विषयावर चारदोन अधिकच्या पोस्टी येतात. तेव्हढाच चाळा मनाला 😁
गंपू बाप्पाला होम मेड काजू
गंपू बाप्पाला होम मेड काजू कतलीचा पाहुणचार.
याच मटेरियल चे काही मोदक केले होते पण ते काही खरे मोदक नाहीत, जस्ट आकार मोदकाचा.
अनिंद्य काजू कतली कातिल
अनिंद्य काजू कतली कातिल दिसतेय.
वाह होममेड काजू कतली सुंदर
वाह होममेड काजू कतली सुंदर
आता आमच्याकडे गौरीपूजन नाही
आता आमच्याकडे गौरीपूजन नाही होत, पण मी घरीच अन्नपूर्णेसाठी नैवेद्य केला. डावीकडून - दह्याची कवडी, खोबरंकोथिंबीर चटणी, काकडीची कोशिंबीर, लिंबू, दूध, कटाची आमटी, बटाटा भाजी, फरसबी-गवार-उसावरचा घेवडा अशी मिश्र भाजी, वरणभात, दहीभात. मधे अळूवड्या, पुरणपोळी, साधी पोळी.
यंदा सजावट करायलाही वेळ नाही झाला. पण एक छान झालं, ते म्हणजे आमच्या बाल पुजारीण-कम- फोटोग्राफरीण बाई उत्साहाने सगळं करतायत. संध्याकाळी पूजा, आरतीची तयारी आणि तबक घेऊन आरती, नैवेद्य वाढायला हातभार लावणं... जमेल तसं करतेय.
काजूकतली कमाल दिसतेय. मी
काजूकतली कमाल दिसतेय. मी घेतल्या 2-3.
Pages