Submitted by बिपिनसांगळे on 15 September, 2026 - 02:09
हिना
रात्रीची वेळ. तो दुकानात गेला .तो एक रासवट माणूस होता.
‘उदबत्ती पाहिजे ‘.
दुकानदार म्हणाला , ‘नेहमीची ? हिनाच ना ?’
त्यावर तो नाही म्हणाला.
दुकानदार हसतहसत म्हणाला , ‘ हिना सारखी सारखी वापरून कंटाळा आलाय ना ?’
मग दुकानदाराने त्याला एक वेगळी उदबत्ती काढून दिली.
तो घरी गेला.
बऱ्याच दिवसांपासून त्याने तिला जवळ घेतलं नव्हतं.आज तिची फार इच्छा झाली होती. त्याचा तो रासवटपणा अनुभवायची. तिने झोपताना तसा इशाराही दिला.
त्यावर तो हसतहसत म्हणाला,’ नको ! ही ना सारखी सारखी वापरून कंटाळा आलाय .’
आधी तिला त्याचं बोलणं कळलं नाही. मग त्याच्या पुरुषी मानसिकतेचा दुष्टपणा जाणवून तिचे डोळे झरू लागले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
आपल्या या माबो उत्सवाला खूप शुभेच्छा !
एक विनंती
कथा अयोग्य वाटल्यास उडवून टाकावी
आभार
डेंजर ट्विस्ट
डेंजर ट्विस्ट
छान आहे.
छान आहे.
श्लेष अलंकार भन्नाट.
श्लेष अलंकार भन्नाट.
मस्तच. भारी जमली आहे
मस्तच. भारी जमली आहे
मस्त, औषध न लगे मजला आठवले
मस्त, औषध न लगे मजला आठवले
भाई जमलीय!
भाई जमलीय!
अरेरे.. जमलीये.
अरेरे.. जमलीये.
खूप आभार मंडळी
खूप आभार मंडळी
छान आहे कथा.. बिपिनजी..!
छान आहे कथा.. बिपिनजी..!
ही ना छान आहे.
ही ना छान आहे.