शिकुया माडीया भाषा

Submitted by मधुकर on 7 January, 2010 - 12:40

शिकुया माडीया भाषा

माडिया भाषेबद्दलचं हितगुज

Discussions related to Madiya Language

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातिला काही बेसिक शब्द शिकुया.

मी=नान्ना
तु=निम्मा
तुम्ही=मिट, मिर
आपण्=माट
ते=वोssग$ ($ चा अर्थ ग सायलेंट आहे, शेवटचा उच्चार खरजचा "अ" सारखा यावा )
हा=व्याssग$
हे=वेरु

नियमः '$' ज्या अक्षरानंतर लावला जाईल तो शब्द अक्षर सायलेंट असतो.
जसे याग$ ईथे ग सायलेंट असणार.

मधुकर माफ करा एक शंका आहे हि जरा तेलुगुच्या जवळ जाणारी भाषा आहे का? कारण
नान्ना,निम्मा, मिर हे शब्द तेलुगु मध्ये हि याच अर्थासाठी वापरतात म्हणुन विचारत आहे.

कागी$यना=शिकणे (कागी$यकाळ=शिकुया)
दाट्=चला

आता वाक्य
१) दाट माडियांग कागी$यकाळ= चला माडिया शिकुया
२) नी पोरुल बाताल= तुझं नाव काय?
३) बेके दायनिन्=कुठे चाललास?
४) हिक्के वाय्=ईकडे ये.
५) हाक्के हान्=तिकडे जा.
६) बार किनिन= काय करतोस
७) बेग्गा दायनीन्=कुठे जातोयस/चाललास.
८) याग$ हिम= पाणी दे.
९) गाटो तित्ती ना =जेवन झालं का
१०) या$ उट्टी ना= पिणी पिलास का

नान्ना,निम्मा, मिर हे शब्द तेलुगु मध्ये हि याच अर्थासाठी वापरतात म्हणुन विचारत आहे.>> नाही फक्त काही शब्द तसे वाटतात पण फरक आहे.
तेलगुमधे
नान्ना=बाबा
नेनू=मी
निम्मा=हा शब्द तेलगुत नाही
मिर्, मिरु =आपण
पण असे फारच थोडे शब्द आहेत. कारण मला तेलुगु येते. आणी माडिया तेलगु पेक्षा सोपी आहे.

कारण नुसत 'याsssss' म्हटल्यास त्याचा काहीच अर्थ होत नाही.
संगितात खरजचा रियाज करतात ना तसा त्या ग चा दिर्घ उच्चार आहे. आणी प्रत्येक ५ व्या शब्दात हा ग आहे. म्हणुन सुरुवातिपासुनच त्याचा सराव कराव. नाहि तर उच्चार चुकतो.
जसे तुम्ही एका पुस्तकाच नाव दिला होतात.
नेगल= याचं खरं उच्चार नेगल नाहिच. त्या ग ला खरज चा दिर्घ (सायलेंट) ओढावं लागत.
मग तो उच्चार लिखाणात म्हणायचे तर साधारणता काहिसा असा असेल.
नॅग$sssssल= ईथे तुम्ही ग सायलेंट केल्यावर जो उच्चार निघेल तो आहे खरा (८०%) उच्चार.

पाणी=याssग$sss. असा उच्चार हवा.
पण मराठीतुन माडिया शिकलेली माणसं त्याचा उच्चार एरु/येरु असं करतात.
मग भैयालोकाना आपला 'ळ' जसा जमत नाही ना, ईथे तोच प्रकार होतो.

चिनुक्स निम्मा हात्तीना =चिनुक्स गेलेत का तुम्ही.
जाताना (पाणी प्यायला, शी,सु, मधली सुट्टी, पुर्ण सुट्टीला ) सांगत जा, म्हणजे मी शिकवणी बंद करेण.

नाही. आहे.
पण आजच्या दिवशी इतकं पुरे. Happy

एक-दोन दिवस याचीच उजळणी करू.

हा बाफ सुरू केल्याबद्दल धन्यवाद. Happy

छान, चांगले, सुंदर, चालू द्या, आवडले .. असे शब्द सांगून ठेवा.. लोकाना निदान प्रतिसाद तरी त्या भाषेत देता येतील....

छान=बेस
चांगले=बेस / नेहना
सुंदर=पाक्का बेस
चालूद्या =किमट (जवळ पास तशा अर्थाचा)
आवडले= मान्नास वाता. ( मान्नास वावो= नआवडणे)
आहे=मांता
झालं=आssता
केलं= कीsतीन

माडिया भाषेसाठी कुठली लिपी वापरतात, देवनागरीच का?>> हि फक्त बोली भाषा आहे. या भाषेची लिपी नाहिच.
या 'ग' चा उच्चार इतका जालीम आहे, की तो देवनागरित सुद्धा लिहता येत नाही. वरुन पुर्ण सायलेंटहि नाही ग चा सराव करताना गळा खवखवायला लागतो, उल्टी पण होते.

छान=बेस
बेस शब्द आमच्याकडे सर्रास वापरला जातो.
छान साठी आमच्याकडे बेस किंवा सुदा हेच शब्द जास्त प्रचलित आहेत.

हो,
बेस चे माडीयात दोन अर्थ आहेत. ( चांगला व बाळंतपण)
पुल्ला बेस आता=भाजी चांगली झाली.
मुत्ते बेस आता= बायकोचं बाळंतपण झालं.

माडिया भाषेत वाक्याच्या शेवटी 'आ" लावल्यास वाक्य प्रश्ननार्थक बनतो. पण शेवटच्या अक्षराचा उचार 'आ' असा भासत असल्यास वाक्याला प्रश्नार्थक करणयासाठि 'आ' ऐवजी 'या' वापरतात.
जसे.

नी प्रश्नार्थक बननारी वाक्ये

१) रामा नाsगss हात्तोगss आ ?= रामा गावाला गेला का ?
२) निम्मा दायनिन आ ? = तु जातोयस का ?
३) गाटो गावाल आ ? = जेवन हवय का ?

या नी प्रश्नार्थक बननारी वाक्ये
१) पुल्ला बेस आता या ?=भाजी चांगली झाली का ?.
२) मुत्ते बेस आता या ?= बायकोचं बाळंतपण झालं का ?.

हो साहेब,
अरे वा आजुन एक नियम सापडला.
रे (काय रे वाला )= रा
गं (काय गं वाला) =दे

या आणी आ च्या व्यतिरिक्त क्रियापदा नंतर रा आणी दे लावल्यास वाक्य प्रश्नार्थक होतात.
जसे

मराठितील रे, गं= माडियातिल रा, दे

बेके हात्तीन रा? = कुठे गेलास रे ?
बेके दायनीन रा ? = कुठे जातोयस रे ?
बाताल किनीन दे ? = काय करतेयस गं?
बेके दायनीन दे ? = कुठे जायेयस गं ?

मराठीतील का = माडियातील आ व या

जातोयस का ? = दायनिन आ ?
येतोयस का ? = वायनिन आ ?

त्याचं काम होतय का ?= ओना काबाड आस्ता या ?
त्याला बोलता येते का ? = ओंकू वाडकला वस्ता या ?

Pages