Submitted by Bhumika on 31 July, 2008 - 22:49
मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे. मग ते काय असेल ? तुम्हि हि कोणि काहि माहित असेल तर नक्कि सान्गा. खालि काहि लिन्क्स आहेत.
[video:http://www.youtube.com/watch?v=XAtgPaggeTM&feature=related]
[video:http://www.youtube.com/watch?v=V5MS5Odp2qQ&feature=related]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बायकी
बायकी संघटनांनी ......... या शब्दावर काही आक्षेप नाही का?
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
श्र मला
श्र

मला काही इतकी उदाहरणं आठवली नसती!
हुश्श!!! लय
हुश्श!!!
लय म्हणजे लय हसवलं या बीबीने.
पण गंभीरअरीत्या सांगायची बाब अशी की इंकाचा मूळ पुरुष लवकरच या धरतीवर नवीन अवतार धारण करणार आहे आणि २४% आणि १ % वाले तो स्वतः ठरवणार आहे, ही अनमोल माहिती मला एका जुन्या द्राविडी भाषेतल्या पोथीमधे सापडली. (ही पोथी चेन्नईमधल्या एका देवळात आहे. तिथे गेल्यावर ते तुम्ही मागच्या जन्मी कोण होतात आणि पुढल्या जन्मी काय होणार ते सांगतात. तिथे गेल्यावर कंपल्सरी मृगार्जिनावर बसावं लागतं आणि आठ तास प्रार्थन करावी लागते.
--------------
नंदिनी
--------------
इंकाचा मूळ
इंकाचा मूळ पुरुष लवकरच या धरतीवर नवीन अवतार धारण करणार आहे >>>> करणार आहे नव्हे केला आहे
आणि तोच २०१२ नंतर रामावतार होणार आहे 


.
आत्ता आठवले, माझे पारपत्र जुन २०१२ मधे संपते आहे. म्हणजे मी नक्कीच १% किंवा २४% मधे नाही
.
म वा, तु मराठी वाचक आहेस, मराठी माणुस नाही. त्यामुळे कुणासाठीही काहीही धडक किंवा बेधडक एक्/अनेक कलमी कार्यक्रम करु नकोस. काय करायचे ते माणुस बघुन घेईल
प्रा.
प्रा. हरवळ्करान्चे पुस्तक वाचले का? प्राचीन भाषा, लिपी आणि लेखन्शैली यावर आहे... त्यात दिले आहे.... पूर्वी ? हे चिन्ह उद्गार वाचक वापरले जात होते... त्यामुळे माया सन्स्क्रूतीतील ते चिन्ह मुळात प्रश्नचिन्हच आहे का?? ( इथे वापरलेले ?? चिन्ह मात्र प्रश्नचिन्हच आहे..)
=---------------------------------------=========================????????
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
माझे
माझे पारपत्र जुन २०१२ मधे संपते आहे<<< मुदत वाढवून मिळु शकते. रिझर्व्ड कोट्यात जागा मिळेल! रामावताराला शरण जा!
<<करणार आहे
<<करणार आहे नव्हे केला आहे आणि तोच २०१२ नंतर रामावतार होणार आह<<>>
रामावतार ऑलरेडी आहे पृथ्वीवर. फक्त २०२५ साली त्याचं राज्य येणार आहे..
२०१२ ते
२०१२ ते २०२५ यामधल्या कालावधीत काय होणार मग?? युद्ध का?
हंSSSS. टण्या
हंSSSS.
टण्याचं म्हणनं मला पटतंय.
म्हणजे असं, ७५% आणि २४% या जगायला अनुक्रमे जास्त आणि कमी नालायक असलेल्या लोकांमुळे जगबुडी होणार.
थोडक्यात उरलेले शेवटचे १% लोक रामराज्य चालवणार.
लॉजिकली विचार केला, तर रामराज्य या ७५% आणि २४% लोकांमुळेच येणार, नाही का?
थोडक्यात हे ७५+२४ % लोक या घटनेचे शिल्पकार. हा म्हणजे आपल्याला की-फॅक्टरच सापडला.
आता काळाची मोजणी गणितशास्त्राशिवाय होणार नाही, हे कुणीही मान्य करेल. गणित काय म्हणतंय?
१) ७५ गुणिले २४ = १८००. अंकांची बेरीज ९.
२) ७५ अधिक २४ = ९९. अंकांची बेरीज १८. पुन्हा या अंकांची बेरीज ९
३) ७५ भागिले २४ = ३.१२५. राउंडेड ऑफ टु ३. अंकांची बेरीज ३....... अ)
७५ वजा २४ = ५१. अंकांची बेरीज ६................................... ब)
वरील उत्तरे अ) अधिक ब) = ३+६ = ९. अंकांची बेरीज ९.
४) बापूंचे रामराज्य कधी येणार? तर २०२५ साली.
२+०+२+५ = अंकांची बेरीज ९
५) आता, ७५ आणि २४ या संख्या त्यांच्या सर्व भाजकांच्या स्वरूपात मांडू या.
७५ = ५ गुणिले ५ गुणिले ३ = (५ चे २ रे मुळ) गुणिले ३.
या अंकांची म्हणजे ५, २, ३ यांची बेरीज १०............................. अ)
२४ = ३ गुणिले २ गुणिले २ गुणिले २ = ३ गुणिले (२ चे ३ रे मुळ)
या अंकांची म्हणजे ३, २, ३ यांची बेरीज ८................................ब)
आता या अ) आणि ब) यांची बेरीज १८. पुन्हा अंकांची बेरीज ९.
मी आणखी कमीत कमी २५ प्रकारची Mathematical Signs & Functions वापरून बघितली, तर शेवटी अंकांची बेरीज ९ च येते. ते सगळं इथं नको, कारण तुम्हाला बोअर होईल.
--
आता हे पुन्हा-पुन्हा येणारे ९ उत्तर काहीतरी दाखवतेय, हे नक्की. मला वाटतं आपण उगीचच ८ हा आकडा धरून बसलोय. खरा कळीचा मुद्दा ९ हाच ठरणार आहे.
खोटं वाटतंय? बघा, रामराज्याच्या सालातनं ९ वजा करत गेल्यास
२०२५ - ९ = २०१६
२०२५ - ९ - ९ = २००७
यातलं २००७ साल तर होऊन गेलं. पण यातील आकड्यांची बेरीज पुन्हा ९ येते म्हणजे जगबुडीची अख्खी गंमत २००७ सालातच दडली आहे. याच वर्षी भावी जगबुडीची पाळेमुळे रुजली गेली.
ती कारणं शोधून काढणं हा वेगळा विषय झाला. पण आता शेवटचं गणित म्हणजे २०१६ मधल्या आकड्यांची बेरीज. ती देखील ९च यावी ना????
म्हणून--
जगबुडीचं साल २०१२ नसून ते आहे २०१६, हे मी शपथपुर्वक लिहून देऊ शकतो.
बघा बॉ.
ते
ते पुस्तकाचे शेवटचे पान कोरे राहिल्यामुळे अजून आम्हास कळले नाही.
त्यातच आमच्या सहजानंद बापूंनी आम्हास ते पुस्तक वाचण्यास सक्त मनाई केली आहे.
आमच्या नम्र अंदाज आहे की त्या १३ वर्षांत (बघा काय ही लीला, १३=१२+१) इतर अवतारांची सायकल आटोपून परत रामावतार धारण केला जाईल.
दोन्ही बापूंचे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट्स असल्याने हे अजून संदिग्ध आहे.
रामावतार
रामावतार ऑलरेडी आहे पृथ्वीवर. फक्त २०२५ साली त्याचं राज्य येणार आहे..>>>> बरोबर आहे. राम २०१२ मधे १४ वर्षासाठी वनवासात जाणार आहे. या घटनेला लोकांनी जगबुडी अस नाव दिल आहे. चांगल्या वागणुकीसाठी १ वर्ष वनवास कमी होउन २०२५ मधे रामराज्य येइल.
पुस्तकाचे
पुस्तकाचे शेवटचे पान कोरे<<< ते सामान्य जनतेच्या मनाचं प्रतिबिंब आहे!
रामावतार
रामावतार ऑलरेडी आहे पृथ्वीवर. फक्त २०२५ साली त्याचं राज्य येणार आहे..रामावतार ऑलरेडी आहे पृथ्वीवर. फक्त २०२५ साली त्याचं राज्य येणार आहे..
--- चिनुक्स मी तुम्हाला विश्वासाने (माझ्या बद्दलची !) माहिती दिली होती आणि तुम्ही कुणालाही न सांगण्याचे तसेच त्याचा पुसटसाही उल्लेखही न करण्याचे वचन दिले होते. काय आहे हे?
वर्ष
वर्ष मोजण्यात निर्मात्याची थोडी चुक झाली आहे, कामातील गलथान पणामुळे (पसारा मोठा मांडला आहे म्हणुन म्हणुन कामाचा खुप ताण पडतो आहे) मधल्या काळातील ४ वर्ष मोजण्यात थोडा घोळ झाला आहे, म्हणजे आपण २०१२ मधे आतात पोहोचलो आहोत. ७५% लोकांना सुटी देण्याचा निर्णय हा प्रशासनातील काम-काजात सु-सुत्रता यावी म्हणुन घेतला गेलेला निर्णय आहे. मायबोलीवर (अधुनिक गंगा) ज्यांनी एक वेळा पण भेट दिली असेल त्या सर्वांना १% मधे वेगळे ठेवले आहे.
आज ८-८-८ काही तरी विशेष होणार आहे (अजुन दिवस संपायचा आहे)...
चांगल्या
चांगल्या वागणुकीसाठी १ वर्ष वनवास कमी होउन >>>

.
रामावताराला शरण जा >>>>
.
रामावतार ऑलरेडी आहे पृथ्वीवर. फक्त २०२५ साली त्याचं राज्य येणार आहे..>>> तर मग सांगा रामाची सीता कोण ? आणि ती १%, २४%, ७४% कोणत्या गटात येते ? रामाचा वनवास कमी झाला तर तो सीतेला तशीच सोडुन परत फिरेल का ? आणि मग त्या हरणाचे काय ?
>>चांगल्या
>>चांगल्या वागणुकीसाठी १ वर्ष वनवास कमी होउन
हरणाची
हरणाची कधीच चोळी झाली.. उरलेल्या हरणाचे, स्वातीच्या मते बटाटा घालुन स्ट्यु करण्यात आले आणि चिनूक्षच्या मते भातात घालुन बिर्याणी करण्यात आली.. सध्या ते आपापल्या गुरुंना नक्की कोणते उत्तर बरोबर आहे ते विचारत आहेत..
|| हरि ओम
|| हरि ओम ||
गड्यानो काय हे ? बी बी कुठला आणि तुम्हि विचारविमर्श कुठला करता आहात? राम राज्य, बापु , युद्ध हे इथे रास्त नाहिये. मला असे वाटले कि यावर सामाजिक प्रतिक्रिया काय असेल म्हणुन बी बी टाकला... पण इथे भलतेच दिसतय.
गम्भीर विषयाला सुद्धा लोक गम्मत म्हणुन घेतात. मानसिकता बदलायला हवी. कुठलाहि अभिनिवेश बाजुला ठेवुन पारदर्शक पणे चर्चा व्हाव्ही हि रास्त अपेक्शा आहे. शुद्ध लेखन चुक आहे, वेळ जात नाहि म्हणुन बी बी उघडतेय इत्यादि आरोप करण्यापुर्वी " आपण स्वतः असे बी बी ( किवा याहुनहि चान्गले बी बी) काढा. मलाहि आनन्दच होइल. चुकातुन मी शिकतेय पण त्याच बरोबर जर माझे बी बी चे विषय नीट वाचलेत तर त्यामागे काहितरि गहन आहे हे जाणवेल. ज्याना पटत नाहि त्याना समजवायचे काम मी एकदाच करते. पण जर टिन्गल टवाळि करायची असेल तर त्या प्रतिसादाना उत्तरे देणे मी कटाक्शाने टाळेन हे इथे नमुद करावेसे वाटते.
भूमिकाताई,
भूमिकाताई, तुमचे लेखन सुधारायला लागले हो...
<<तर मग
<<तर मग सांगा रामाची सीता कोण ? आणि ती १%, २४%, ७४% कोणत्या गटात येते ? रामाचा वनवास कमी झाला तर तो सीतेला तशीच सोडुन परत फिरेल का ? >>
या प्रश्नाची उत्तरं बांद्र्याला अथवा शेवटचे पान कोरे असलेल्या पुस्तकात मिळतील.
<,आणि मग त्या हरणाचे काय ?>>
त्या हरणामुळेच तर हे सगळं रामायण झालं. त्यामुळे आधी खरवस, आणि मग स्ट्यू आणि बिर्याणी..
तर त्या
तर त्या प्रतिसादाना उत्तरे देणे मी कटाक्शाने टाळेन <<< खुलाश्याबद्दल धन्यवाद!
'जगबुडी येणार का नाही '..काय चर्चा अपेक्षीत आहे? हा कुठला गहन सामाजिक प्रश्ण आहे? बरं बुडलो तर बुडलो! आम्ही पापी माणसं मनास लावून घेणार नाही!
माझ्या रोजच्या रांधा वाढा टाईप आयुष्यात ह्या बीबीने चार करमणुकीचे क्षण आणले. करीता सर्वप्रथम हा बाफ उघडल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
एका
एका बीबीवरून दुसरीकडे जावे तर तिसरा बीबी भरून वाहतोय..
या धावपळीमुळे बहुतेक रामराज्य काही माझ्या नशिबी नाही.
|| हरि ओम
|| हरि ओम ||
हा कुठला गहन सामाजिक प्रश्ण आहे?
--- मी सामाजिक प्रश्न असे म्हटलेले नाहिये. प्रश्न आहे सामाजिक प्रतिक्रिया कशी असेल असे म्हटले आहे.
दुसरे म्हणजे चर्चा सुरुच आहे म्हणुन ओघाने आले ते लिहतेय... रामाने सीतेला कधिहि जन्गलात सोडले नव्हते. रामायण हे फक्त " सुन्दरकान्ड" पर्यन्त चेच खरे आहे.
बाकिचे रामाने गर्भवति सीतेला वनात सोडुन दिले वगैरे ह्या गोष्टि साफ चुक आहेत हे सन्शोधनाने सिध्ह झालेले आहे. रामाने गर्भवति सीतेला वनात सोडुन दिले ( उत्तरकान्ड) हे मागाहुन जोडले गेले आहे. वाल्मिकि रामायण हे फक्त " सुन्दरकान्ड" पर्यन्त च आहे.
हे सर्व विक्रुत रुपान्तर कोण्या एका माथेफिरुने लिहुन मग ते जोडले गेले. असो.
गम्भीर
गम्भीर विषयाला सुद्धा लोक गम्मत म्हणुन घेतात. मानसिकता बदलायला हवी. कुठलाहि अभिनिवेश बाजुला ठेवुन पारदर्शक पणे चर्चा व्हाव्ही हि रास्त अपेक्शा आहे. >>> जौ द्या हो भुमिकाताए हे सरव कोत्य मनची धदक क्रुति न करनारे कुथल्याहि उद्धस तयरित नसलेलि शुधद लिहिनारि (त्यातली काही नागडी पळणारी वात्रट) व फकत दोन वेलेचा जेवनाचि चिनता करनारि मानसे आहेत....तुमि मनावर घेउ नका....तुमि त्यान्ना प्रतिसाद देउ नकाच पन असे विचर्पुरवक बाफ पन कादु नका...काहिहि उपयोग होनर नाहि....ह्य्ना चानगले बाफ म्ह्नजे काय ह्या जनमात कलनार नाहि...त्यासाति जगबुदि आलि पाहिजए....
कसे जमवलेस
कसे जमवलेस गं सिंडरेला असे लिहायला?? तू शेवटच्या १% पैकी तर नव्हेस???
सिंड्रेला,
सिंड्रेला,
गे माझी गुरूमाऊली!!!
चिन्मय, धावपळीमुळे रामराज्य नशिबी नाही म्हणतोस? अजून रामराज्यातल्या बर्याच रोल्सची वाटणी व्हायचीय. धीर सोडू नकोस! (फक्त रामाचा आणि शत्रुघ्नाचा पार्ट तेव्हडा वाटाल्या गेलाय!)
तोपर्यंत
तोपर्यंत जिवंत राहिलो तर रामराज्य नशिबी. आणि बांद्र्यात सीता , लक्ष्मण आहेत. वानरसेना तर तिथे आणि कुठे कुठे आहेच...
२०१२ नंतर
२०१२ नंतर मी जगेन किंवा नाही हे माहित नाही पण २००८ सालापर्यंत जिवंत राहून ही चर्चा वाचल्याने माझ्या मनुष्यजन्माचे सार्थक झाले आहे असे वाटते.
ते हरणाचे व्रत भारी आहे. आमच्या गावची सगळी हरणे एका मंत्र्यानी मारून संपवल्याने मी सुद्धा हरणाचे चित्रच लावणार.
हरणाची कुठली स्पेसिफिक प्रजाती असावी असा काही नियम आहे का?
सुवर्ण्मृ
सुवर्ण्मृग मीलाला तर बघा!
चिनुक्स,
चिनुक्स, राहशील रे बाबा रामराज्यापर्यंत. फक्त फटाफट हे सगळे बीबी उप्डेट करून वाचत जा बघू. थोडी धावपळ होईल, पण नंतर जमेल बघ.
तु मघाशी वाचले नाहीस का? 'वाचाल तर वाचाळ' म्हणून??
---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!
Pages