Submitted by भरत. on 4 September, 2026 - 07:29
जेन झीला नवा हिरो मिळाला.
त्याची ही मुलाखत इंटरनेटवरून गायब व्हायच्या आत लवकर बघून घ्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अटक झाली.
अटक झाली.
सोडविण्यासाठी कुठला भैय्या फोन करेल आधी?
कपिल, चिराग का मोदी?
हा व्हिडिओ बघुन माझ्या
हा व्हिडिओ बघुन माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. बंद केला.
उदय , नाही अजून दिल्ली
उदय , नाही अजून दिल्ली पोलिसांनी ७२ तासांची मुदत मागितली आहे म्हणे.
भयानक आहे.. मी दोन
भयानक आहे.. मी दोन मिनिटांपेक्षा जास्त नाही बघू शकले.
पूर्ण बघू शकले नाही. भयंकर
पूर्ण बघू शकले नाही. भयंकर आहे हे! फक्त तो जे बोलतो आहे तेच नव्हे, ज्या प्रकारे बोलतो आहे तेही, आणि हे उघडपणे air होतं हेही!
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर,
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, सीजेपी, एक खासदार आणि कुठला तरी आझाद पक्ष/संघटनेचा मुख्य यांनी धरणे धरल्यानंतर पोलीसांनी डिटेन केलंय, अटक नाही. आणि ते फक्त डोक्याला मारले तशी आधीच तक्रार नोंदवलीय म्हणुन. या व्हिडीओत द्वेष पसरवतोय, धमक्या देतोय वगैरेवरून कारवाई नाही.
https://www.hindustantimes.com/india-news/hindutva-influencer-swatantra-...
“चारही बाजूंनी घेरला गेला
“चारही बाजूंनी घेरला गेला होता, स्वसंरक्षणार्थ हात पाय हलविले .
मारण्याचा उद्देश नव्हता…” असा बचाव होणार.
मॉब पासून रक्षण करण्यासाठी तुरुंगात सुरक्षित ठेवतील. बाहेर आल्यावर जय श्री राम.
हा जंतरमंतर वर कशासाठी गेला होता? कुणाच्या सांगण्यावरून/ आदेशावरून ?
<< डिटेन केलंय, अटक नाही.>>
<< डिटेन केलंय, अटक नाही.>>
— हो, फरक आहे. स्थानबद्ध म्हणायचे.
अटक करायला पूर्वपरवानगी लागेल.
What the hell? स्वतंत्र
What the hell? स्वतंत्र भारद्वाज विकृत आहे. भयंकर वाटली मुलाखत. जेमतेम तीन मिनिटे पाहिली. अस्वस्थ वाटलं एवढा निर्ढावलेपणा पाहून!
मानव, दिल्ली युथ काँग्रेसचे
मानव, दिल्ली युथ काँग्रेसचे पदाधिकारी होते त्यात. काँग्रेसची लीगल टीम सुद्धा. भीम आर्मीचे खासदार चंद्रशेखर आझाद रावण, अपक्ष खासदार पप्पू यादव आणि सीजेपीचे सौरभ दास होते.
क्रोनोलॉजी नंतर लिहितो.
अच्छा. मी तो व्हिडिओ आणि
अच्छा. मी तो व्हिडिओ आणि हिंटाच्या बातमी तेवढी बघितली.
फक्त सव्वा दोन मिनिटे पाहिले.
फक्त सव्वा दोन मिनिटे पाहिले. एखादा युपी बिहारचा रावडी राठोड सारखा चित्रपट बघतोय की काय असे वाटले.. अवघड आहे च्यायला जर अश्या वृत्तीला सुद्धा पाठीशी घातले जात असेल.
शीर्षकात जेन झीला नवीन हिरो मिळाला असे का लिहिले आहे हे नाही समजले? काही संदर्भ आहे का त्या जनरेशनला टारगेट करायचा?
सत्ताबदल झाल्यानंतर या असल्या
सत्ताबदल झाल्यानंतर या असल्या कीडेला इशान्य भारतातल्या खुल्या बंदीगृहात नेऊन टाकलं पाहीजे. यांचे पाठीराखे, नाझी संघटना वगैरे सगळ्यांचा समूळ नायनाट केला पाहीजे. हे लोक चर्चेच्या लायकीचे नाहीत.
^^स्वतंत्र भारद्वाज विकृत आहे
^^स्वतंत्र भारद्वाज विकृत आहे. भयंकर वाटली मुलाखत. जेमतेम तीन मिनिटे पाहिली. अस्वस्थ वाटलं एवढा निर्ढावलेपणा पाहून!^^
अगदी हेच वाटले... शब्दशः माथेफिरु आणि विकृती.. ह्या प्रकाराला जरा जाज्वल्य हिंदुत्व म्हणायचे तर मी माझ्या धर्माचा विचार करायची वेळ आली आहे..
वरचा व्हिडिओ उडू दे किंवा नको
वरचा व्हिडिओ उडू दे किंवा नको उडू दे पण गेला आता हा स्वतंत्र भारद्वाज.
CJP रडार वर आला आहे.
https://www.instagram.com/reel/Dc0iaWgAF5X/?igsi=aXlvcHB6NjEzMDFq
.
https://www.instagram.com/reel/Dc26IptJbq7/?igsi=MXdhMGZvaWk1bGV2aA==
https://www.instagram.com/reel/Dc3hWTSxzA2/?igsi=aXhndmZ6bnZ2ZXAx
पण एवढे खुलेपणाने बोलून सुद्धा याला अटक व्हावी म्हणून आंदोलन करावे लागत असेल तर काय स्थिती आहे देशाची असा प्रश्न पडतो
भयानक आहे.. मी दोन
भयानक आहे.. मी दोन मिनिटांपेक्षा जास्त नाही बघू शकले. >> ++ १
पोलिसांचा धाक नसेल तर हेच
पोलिसांचा धाक नसेल तर हेच होणार. कंट्री विल गो टु डॉग्ज लाईक धिस भारद्वाज.
आधीचा भाग आहे. ट्कला गान्धी
मुलाखतीचा आधीचा भाग आहे. ट्कला गान्धी, पोलीसान्चे बुट कसे मिळले याला?
त्या मुलीला पण सरळ धमकी आहे.
https://www.facebook.com/reel/891649173809111/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v
<< पोलिसांचा धाक नसेल तर हेच होणार. >>
—— बुलंदशहर पोलीस अधिकाऱ्याला ( सुबोध कुमार सिंग यांना ) सुनियोजितरित्या घडविलेल्या दंगलीत ठार मारण्यात आलं होतं.
अजून एक गुजरातचे माजी पोलीस अधिकारी संजीव भट किती तरी वर्षांपासून तुरुंगात सडत आहेत.. बेलही नाही.
पोलीस काय करणार?
गुन्हेगारांना निवडून
गुन्हेगारांना निवडून पंतप्रधान आणि गृहमंत्री बनवल्या नंतर दुसर काय होणार.
TOI च्या लिंक मधे शेवटी
TOI च्या लिंक मधे शेवटी व्हिडिओ आहे, सेल्फ डिफेन्स मे हाथ चलाये म्हणतो. अनेकांना अडचणीत आणणार होता, कानपिचक्या मिळाल्या असतील म्हणून २४ तासांत भाषा बदलली आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/i-could-have-been-lynched...
<< ह्या प्रकाराला जरा
<< ह्या प्रकाराला जरा जाज्वल्य हिंदुत्व म्हणायचे तर मी माझ्या धर्माचा विचार करायची वेळ आली आहे.. >>
------ (जसा तालीबान आणि मुस्लीम धर्माचा संबंध नाही तसाच ) हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्म यांचा संबंध नाही.
धर्म शांतताप्रिय आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे.
Submitted by धनवन्ती on 4
Submitted by धनवन्ती on 4 September, 2026 - 10:31
Submitted by anudon on 4 September, 2026 - 14:14
Submitted by सामो on 4 September, 2026 - 14:24
Submitted by उदय on 4 September, 2026 - 19:30
सर्वांच्या मनस्वी भावना पोहोचल्या.
स्वतंत्र भारद्वाजला मोदींच्या
स्वतंत्र भारद्वाजला मोदींच्या २०२४ मधल्या शपथविधी समारंभाचं निमंत्रण होतं.
हे त्याचं ट्विटर हँडल
https://x.com/_kattar__hindu
On one-day Police custody of
On one-day Police custody of Swatantra Bhardwaj, Rishav Ranjan, counsel for Nishu Azad, says, "It is very strange. We were all present in the Court and waiting for the hearing to begin. Later, we came to know that legal aid counsel joined through video conferencing and accused was presented before the judge at his residence. One-day Police custody was sought in such a serious offence. We did not receive any details as to what charges were added and what additions were made to the FIR...I don't know what is being hidden. Delhi Police have not made any official statement regarding the sections, so far."
स्वतंत्र भारद्वाजला फार त्रास होऊ द्यायचे नाहीत. यामागे त्याची काळजीबिळाजी आहे, असं नाही. आम्ही अशा लोकांचे समर्थन करतो, अशा लोकांना पोसतो हे ठणकावून सांगण्याचा हा प्रकार आहे.
प्रग्या सिंग ठाकुरला खासदारकी देण्यामागेही हाच विचार असणार.
वरचे रिषभ रंजने हे काँग्रेसच्या लिगल सेलचे आहेत.
पूर्ण बघू शकले नाही. भयंकर
पूर्ण बघू शकले नाही. भयंकर आहे हे! फक्त तो जे बोलतो आहे तेच नव्हे, ज्या प्रकारे बोलतो आहे तेही, आणि हे उघडपणे air होतं हेही!>>> +१००
<<आम्ही अशा लोकांचे समर्थन
<<आम्ही अशा लोकांचे समर्थन करतो, अशा लोकांना पोसतो हे ठणकावून सांगण्याचा हा प्रकार आहे.>> खरंय.
एका चित्रपटात शक्ती कपूरचा डायलॉग आहे. त्याच्या टोळीत सामील होणारा गुंडा म्हणतो " मै आप के लिए जान भी दे सकता हुं.'
शक्ती कपूर म्हणतो "ठीक है. जरूरत पडने पर हम वो भी ले लेंगे. इसे ले लो." तसंच वेळ पडली तर याला/अशा कुणाला बस खाली ढकलण्यात येईल.
भयानक आहे हे!
भयानक आहे हे!
(No subject)
आता अनेक स्वतंत्र भारद्वाजना
आता अनेक स्वतंत्र भारद्वाजना प्रेरणा मिळेल. सरकार विरोधात आंदोलन केलं की डोकं फोडायचं.
१. मुस्लिमांबद्दल द्वेष आहे.
१. मुस्लिमांबद्दल द्वेष आहे. त्याचं काही कारण नाही. त्यांना बघितलं तरी उलटी येते. दिल्लीत अकबर रोडच्या नावाला काळं फासलं तिथे मी होतो. (व्हिडियोत ओळखू येत नाही. दुसरा एक चेहरा दक्ष चौधरी असावा)
२. भारत सेक्युलर नव्हता, नाही , नसेल. घटना लिहिणार्यांची ती वैयक्तिक मतं होती. इथे आंबेडकर - राव दोघांची नावं घेतली. इंडिया गेटवर लिहिलेल्या शहीदांच्या यादीतले मुस्लिम खरं तर ईस्ट इंडिया कंपनीसाठी लढले.
मुसलमान स्वातंत्र्यलढात असतीलही. पण त्यांनी आपला वेगळा देश घेतला आहे. इथे जे आहेत, ते भाडेकरू आहेत. हिंदू घरमालक आहेत.
३. मुसलमानांना तूप जरी दिलं तरी पचणार नाही. मोदी म्हणतात , एका हातात कुराण - दुसर्यात कॉम्प्युटर. मोदींना कळत नाही, त्यांना विकास नकोय. ते कधीच मोदींना मत देणार नाहीत.
४. शेतकरी आंदोलनात हिंसाचार, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले. पोलिसांवर तल वारीने वार केले. यात फक्त पंजाब हरयाणा या दोन राज्यांतलेच शेतकरी का होते? यात खलिस्तानी होते.
५. मोदींना प्रेमाने सांगा. मेलोडी द्या ते ऐकणार नाहीत. आईबहिणीवरून शिव्या द्या. ते ऐकतात. मोदींना नोबेल पुरस्कार हवाय. ते भारताचे पंतप्रधान आहेत , केवळ म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो.
६. आम्ही मस्त हिंदू (वि) मुस्लिम करत होतो. दलितांना जवळ करत होतो. विरोधातले सगळे पक्ष मुस्लिम धार्जिणे आहेत, म्हणून भाजप च्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करत होतो. पण भाजपमध्ये दुसर्या पक्षातून आलेले जे लोक आहेत, ते हिंदुत्वाचा मुद्दा पातळ करत आहेत. २०२९ मध्ये भाजप येणार नाही. आणखी कट्टर हिंदु त्ववादी पक्ष येईल - कदाचित भाजपमधून फुटून - राजा सिंग ( हैद्राबादचा आमदार) योगीजी, नुपूर शर्मा यांनी हिंदुत्वासाठी पुढे आलं पाहिजे. निवडणुकींच्या वेळी प्रचार कर ण्याकरता सगळ्या पक्षांकडून इन्फ्ल्युएन्सर्सना पैसे मिळतात. पण आमच्यासारख्या कट्टर हिंदुत्वावद्यांना दूर ठेवलं जातं.
७. कॉक्रोच आंदोलना नंतर जंतरमंतरवर आरक्षण विरोधी आंदोलन झालं. त्यातल्या हर्ष दुबेला फुटेज मिळालं. तो घाबरट आहे. मी आंदोलनात आधी नव्हतो. मग मदत करायला गेलो. जमावबंदी आदेश तोडला म्हणून स्वतःहून पोलिसांना स्वाधीन झालो. पण पोलिसांनी मला अटक केली नाही. फक्त डिटेन केलं आणि खाजगी बसमध्ये बसवलं. हे संशयास्पद होतं. त्यातच फोन आला की दुसर्या नेत्याला अटक झाली. म्हणून तिथल्या आंदोलकांसाठी मी बसच्या खिडकीतून उतरून पळून आंदोलन स्थळी गेलो. पोलिसांना सांगितलं. तुम्हांला मारायचं तर मला मारा, मला अटक करा. मी नेता आहे. आंदोलकांना नको.
मग मारलं का पोलिसांनी? - नाही मारलं. अंदरुनी बात है, पोलिसवाले हमारे साथ है.
आमची मागणी आहे आरक्षण आर्थिक आधारावर असावं. या सगळ्याचं ट्रिगर युजीसी नियम आहे. काला कानून.
८ मला वाटत होतं मोदी आंतरराष्ट्रीय संबंध बनवण्यात बिझी आहेत. ट्रंप नेता न्याहू सारख्या लोकांशी त्यांची मैत्री आहे. ते मेलोडी वाटतात. त्यांचं लक्ष देशात इतकं नसेल. पण कॉकरोच आंदोलनानंतर त्यांनी रील बनवायला सुरुवात केल्यावर कळलं, की त्यांचं जंतरमंतरवर लक्ष आहे. कॉकरोच पे ध्यान दिया तो शेर पर भी तो दो. आम्ही सवर्ण मोदींचा कोअर व्होटर आहे. शिव्या न देता आणि पोलिसांवर दगडफेक न करता आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेऊ.
९ झुरळांच्या आंदोलनाचा एकच चेहरा होता - अभिजीत दिपके कारण ते पोलिटिकल होतं. आप त्याच्या मागे होतं. आमचं आंदोलन लोकांमधून आलंय. त्यामुळे अनेक नेते आहेत . आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी करणार्यांना फंडिंगची गरज नाही कारण आम्ही सधन आहोत. झुरळांसारखी जुनैदची बिर्याणी खायला येत नाही.
१०. मुल्लानी - मुस्लिम मुली माझ्यावर फिदा आहेत.
११. सीजेपी आंदोलनातली एक मुलगी म्हणतेय - याने माझ्या कुटुंबियांना मारहाण केली - किती खरं आहे?
२०० टक्के. ती माझी बाबू आहे. माझ्या प्रत्येक रीलवर तिची प्रतिक्रिया असतेच - कधी बाजूने कधी विरोधात.
माझ्यावर हनुमानजींची कृपा आहे. माझ्या हातून नेहमी योग्य व्यक्तीच मारल्या जातात. मला माहीत नव्हते की हे तिचे वडील आहेत. माहीत असतं तर मारलं नसतं. त्याने माझ्यावर कॅमेरा रोखला , तो खाली करायला गेलो. तिथे जमावाशी हातापायी झाली . मी खाली पडलो. इज्जत का सवाल . म्हणून हातातल्या कड्याने मारलं. आता आहे, त्याच्यापेक्षाही मोठं कडं होतं. ते आता पोलिस स्टेशनला जमा आहे. मारल्यावर कळलं की हा निशुचा बाप आहे. मी म्हटलं सासरेबुवांना मारून चूक केली. माफी मागू. पण प्रकरण चिघळलं. आता ती मुलगी पण टारगेट आहे. कोणी क्षत्राणीच मारेल तिला. फक्त मौके की तलाश आहे.
१२ आमच्या आंदोलनात दलित , आदिवासी, ओबीसी आहेत. वाल्मिकी आहेत.
१३. आता मी निशुच्या वडिलांचं डोकं फोडलं. यात कलम ३०७ लागतं. हाफ मर्डर. सात टाके पडले. अँबुलन्सने नेलं त्याला. त्याची मुलगी पोलिस स्टेशनच्या बाहेर उभं राहून म्हणत होती की माझ्या वडिलांना न्याय मिळाला नाही , तर विष खाऊन जीव देईन.
पण मी तर बाहेरच होतो. तुरुंगात सुद्धा गेलो नाही. रात्रभर फिरत होतो. माझ्यावर हनुमानजीची कृपा आहे. कपिल मिश्रा अपने बडे भैया है. ये लोक क हते हैं कपिल मिश्रा का कॉल आ गया छोड दिया गया. चिराग पासवान अपने बडे भैया. मोदीजी भी अपने बडे भैया है. आम्ही सनातनसाठी काम करतो.
१४ बिहारमध्ये दोघे तिघे आहेत जे सनातन, आमचे देव , ब्राह्म णांबद्दल वाईट साइट बोलत असतात. पण सम्राट चौधरी ( बिहारचे मुख्यमंत्री) काही अॅक्शन घेत नाहीत. अशा वेळी आम्ही डोकं फोडून टाकतो.
हे लोक एकदा भेट्ले की डोकं फोडून टाकेन. हे लोक तिथेच संपतील. माझ्याकडे मोठं कडं आहे. आणखीही शस्त्र आहेत. तेव्हा सम्राट चौधरी मला सपोर्ट करतील. बस मौके की तलाश है. सम्राट चौधरी और हम अलग नही है. सरकार अपना है बिहार में.
१५ भरत तिवा रीचं एनकाउंटर झालं. मी फक्त एक व्हिडियो टाकला की त्याला न्याय मिळायला हवा. माझं डायरेक्ट सम्राट चौधरींशी बोलणं झालं. ते स्पष्ट म्हणाले, एक महिना थांब.
१६ चिराग पासवानचं तुमच्या आंदोलनाबद्दलचं म्हणणं ऐकलंस का? -. हो. आमच्या मागणीचा फटाका त्यांना बसणार आहे. तुमच्या मुलाला आरक्षणाची गरज काय? एका कुटुंबात एकाला आरक्षण मिळालं ना? चिराग पासवान, चंद्रशेखर आजाद यांच्या कुटुंबाला, टीना दाबीला आरक्षणाची गरज नाही. रक्षाबंधन झालं. आता मी दिल्लीला चाललो. मोठं आंदोलन उभं करू
.१७ मग मनिष कश्यप सन ऑफ बिहार आणि मनोज तिवारी वरून प्रश्न. मनोज तिवारींना फोन केला - माझ्यासाठी नाही - दुसर्या कोणासाठी तरी - ते ते काम करतात.
सन ऑफ बिहार कोण आहे माहीत नाही (कौन राहुल सारखं) मग त्याच्याबद्दल भरभरून बोलणं. अर्थात वाईट- दोगला इन्सान. जनस्वराजमध्ये गेला. त्याच्यासाठी मीच सगळ्यात आधी उभा राहिलो कारण तो बिहारी आहे.
१८ सीजेपी प्रोटेस्टमध्ये तुझ्याकडे डंडा होता, तो कुठून आला? ये मेरा जूता दिख रहा है? दिखा दीजीए कॅमेरा पे. ये जूता दिल्ली पुलिस का है. डंडा कहा से आया ये प्रायव्हेट बात है.
सीजेपी प्रोटेस्टमध्ये दोघे पोलिस मुफ्तीमध्ये होते. पोलिस करतात तसा त्यांनी लाठीमार केला. त्यांना व्हायरल केलं गेलं. टारगेट केलं.याचं मला वाईट वाटलं. म्हणून मी मध्ये पडलो. म्हटलं रियल गुंडा मी आहे. मी केला लाठीमार.
मग या लोकांनी मला धमक्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही त्यांच्यावर एफ आय आर केला. मी म्हटलं - गरज नाही. ते बाहेर राहिले तरच मला मिळतील. मी कफन घेऊन चालतो. मला सेक्युरिटीची गरज नाही. त्यांना आहे. एक वेळ ते मला सोडतील, मी त्यांना सोडणार नाही. लाखाची गर्दी असू दे. त्यात माझा शत्रू तो निशूचा बाप असेल, तर त्याला हुडकून मारेन.
१९ मी झारखंड, बिहार विद्यार्थी आंदोलनांत मी गेलो नाही कारण माझ्या प्रतिमेमुळे त्या आंदोलनांचं नुकसान झालं असतं. सीजेपी च्या सगळ्या मागण्या बरोबर होत्या. पण तिथे उमर खालिद, ब्राह्मणवाद असलं काय काय चाललं होतं, म्हणून मी तिथे गेलो
कोणत्याही विद्या र्थी आंदोलनात उमर खालिद, अभिजीत दिपके, सौरभ दास , नेहा बोरा आले तर मी तिथे येईन आणि त्यांचा इलाज करेन.
२०. अशा वादग्रस्त गोष्टी केल्याने राजकारणात जायला मदत होते का? हो -
माझ्या कुटुंबातले सगळे वर्दीधारी - पोलिस किंवा आर्मीत आहेत.
२१. टकल्या गांधीची एक गोष्ट आवडते -Be the change you wish to see in the world.
मी मुल्ल्याकडून काहीही घेत नाही - तहानेने जीव जाऊ दे . मुल्लाच्या दुकानातलं पाणी घेणार नाही. मुल्लाला पैसे दिले की ते बाँब बनवतात.
२२ राजकारण फार वाईट आहे. बहुतेक नेता चरित्रहीन आहेत. रात्री कोणाला किती मुली पुरवल्या जातात पहा. मी रात्री कनॉटप्लेसला फिरत असतो. तिथे मंत्र्यांची घरं आहेत. तिथे मी बघत असतो- रात्री कुठून कुठून मुली येतात. ही सिस्टम सुधारायला मला राजकारणात जायचं आहे.
२३ कट्टर हिंदूंचा वेगळा पक्ष- मुल्लामुक्त भारत. जेन झीतले चांगले शिकलेले कट्टर हिंदू आहेत. त्यांचा मला पाठिंबा आहे. मुल्ला मुक्त भारत झाला की लव्ह जिहाद, लँड जिहाद, थूक जिहाद्, टॉयलेट जिहादपासून मुक्ती मिळेल. माझ्या उलट्या थांबतील.
२४ आमच्या आघाडीच्या मागण्या - युजीसी नियम मागे घ्या. आर्थिक आधारावर आरक्षण. जात्याधारित आरक्षणामुळे गुणवत्तेवर अन्याय होतो. त्यामुळे भारत मागास राहतो.
चिराग पासवानचे वडील मेडिकल ट्रीटमेंटसाठी परदेशा त जातात कारण त्यांना माहीत आहे इथे उणे चाळीस गुण मिळालेला आरक्षणवाला डॉक्टर आहे. लालू यादव मॉरिशसला जातात.
युजीसी नियम सवर्ण शाळकरी मुलाने द्लित मुलाला पागल म्हटलं तर त्याच्यावर केस होईल. तेच सवर्ण , ब्राह्मणांना काही म्हटलं, शेंडी ओढली तरी काही होत नाही. आमचं आर्थिक आरक्षण मोर्चा पेज आहे.
नेता असा हवा ज्याला केसेस आणि अटकेची , लाठ्यांची भीती नाही. माझं वय काय असेल ? २१-२२. माझ्यावर त्यापेक्षा जास्त केसेस आहेत. नेता असा हवा.
Pages