नमस्कार मायबोलीकर मंडळी!
साधारणपणे एका पदार्थाचा / जिन्नसाचा वापर आपण एखाद्याच पाककृतीपुरता मर्यादित ठेवतो. पण त्याच पदार्थापासून वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या रूपांचे पदार्थ तयार करून एक छानशी थाळी सजवली तर?
यंदाच्या पाककृती स्पर्धेत हीच कल्पना घेऊन एकाच घटक पदार्थापासून एक कल्पक थाळी तयार करायची आहे.
उदाहरणार्थ, भोपळा निवडला तर भोपळ्याची भाजी, भोपळ्याची पुरी, भोपळ्याच्या सालीची चटणी, भोपळ्याच्या बियांचा कोशिंबिरीत वापर किंवा भोपळ्याच्या फुलांची भजी अशा अनेक शक्यता आजमावता येतील. निवडलेल्या पदार्थाचे वेगवेगळे खाद्य भाग उपलब्ध असल्यास त्यांचा उपयोग करून या कल्पनेला आणखी वेगळे रूप देता येईल.
चला तर मग, एका पदार्थाची किती रूपं करता येतात ते पाहूया!
एक पदार्थ, अनेक रूपं आणि एक कल्पक थाळी!
नियम
१. प्रवेशिका पाठवण्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२६ या ग्रुपचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्यनोंदणीकरता १४ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल.
२. नवीन लेखनासाठी पाककृती हा पर्याय निवडा.
३ प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे. पाककृती स्पर्धा १- तुमचे सदस्यनाम - निवडलेला मुख्य घटक
४. स्पर्धेसाठी एक मुख्य घटक निवडून त्याचा वापर करून एक थाळी तयार करावी.
५. थाळीतील किमान तीन पदार्थांत निवडलेल्या मुख्य घटकाचा ठळक आणि ओळखू येईल असा वापर असावा.
तीनच पदार्थ असलेली मिनी थाळी सुद्धा चालेल.
६. आवश्यकतेनुसार इतर पूरक घटक, धान्य, पीठ, मसाले इत्यादि साहित्य वापरता येईल.
७. निवडलेल्या मुख्य पदार्थाचे वेगवेगळे खाद्य भाग उपलब्ध असल्यास त्यांचा विविध पदार्थांमध्ये वापर करता येईल. मात्र त्या पदार्थाचे सर्वच भाग वापरणे बंधनकारक नाही.
८. फक्त खाण्यायोग्य आणि सुरक्षित भागांचाच वापर करावा.
९. प्रवेशिकेसोबत संपूर्ण थाळीचा फोटो, तसेच मुख्य घटक वापरलेल्या प्रत्येक पदार्थाची स्वतंत्र पाककृती द्यावी.
१०. प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२६" अशी शब्दखूण द्यावी.
११ . प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६, अमेरिकेतील पॅसिफिक टाइम झोननुसार रात्री १२ वाजेपर्यंत आहे.
१२. एक सदस्य कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
१३. लेखन पूर्वप्रकाशित नसावे.
१४. स्पर्धेचा निकाल मतदानाने ठरवण्यात येईल.
गणपती बाप्पा मोरया!
नवीन आहे ही स्पर्धा आणि
नवीन आहे ही स्पर्धा आणि आयडिया
Polymorphism करायचंय म्हणजे
...
मोरया!
छान कल्पना.
छान कल्पना.
Idea भारी आहे..
Idea भारी आहे..
अशीही बनवाबनवी सिनेमा आठवला..
अशीही बनवाबनवी सिनेमा आठवला..
अशोक सराफ आणि अश्विनी भावे , लिंबाचे लोणचे, लिंबाचे मटण...
सहभागी होण्याकरता, गृप खुला
सहभागी होण्याकरता, गृप खुला झालाय का?
सामो, नियम १ पहा.
सामो, नियम १ पहा.
हा ग्रूप सदस्यनोंदणीकरता १४ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल.
मस्त वेगळीच स्पर्धा आहे ही.
मस्त वेगळीच स्पर्धा आहे ही. लहानपणी साजरी केली जाणारी सब कुछ कांदे कांदे नवमी आठवली.
ह्यात भाज्याच फक्त सिलेक्ट करायच्या आहेत का की कडधान्य, तांदूळ वगैरे सारखी धान्य पण चालतील ?
मस्त आहे स्पर्धा!
मस्त आहे स्पर्धा!
'एक होता कार्व्हर' पुस्तकात वाचल्याचं आठवतंय की कार्व्हरनी भुईमुगाच्या पिकाचा प्रचार करण्यासाठी शेंगदाण्यापासून विविध पदार्थ तयार करून लोकांना खिलवले होते.
मनीमोहोर, यात पदार्थ म्हणून
मनीमोहोर, यात पदार्थ म्हणून तांदूळ, कडधान्ये किंवा इतर धान्ये ही निवडू शकता.
धन्यवाद संयोजक. माय अपॉलॉजिज.
धन्यवाद संयोजक. माय अपॉलॉजिज.
मनीमोहोर, यात पदार्थ म्हणून
मनीमोहोर, यात पदार्थ म्हणून तांदूळ, कडधान्ये किंवा इतर धान्ये ही निवडू शकता. >> थँक्यु संयोजक
मला एक घटक आणि त्यावरचा जोक
मला एक घटक आणि त्यावरचा जोक सुचलाय /आठवलाय

>>>>>सामो, नियम १ पहा.
>>>>>सामो, नियम १ पहा.
हा ग्रूप सदस्यनोंदणीकरता १४ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल.
किल्ली तू बोललीस ना हे?
नाही गं
नाही गं
यंदा मी table च्या इकडच्या बाजूला आहे
आपल्या मंडळातले संयोजक reply देत आहेत
....
मी भाग घेणार आहे ह्या वर्षी !!
ओह ओके ओके
ओह ओके ओके
छान आहे स्पर्धेचा मसुदा.
छान आहे स्पर्धेचा मसुदा. विचार करुन, कीस काढून नीट लिहीलाय
सूचना - ५, ७ आणि ८ - बराच विचार केलेला आहे.
छान स्पर्धा आहे. भाग घेण्यास
छान स्पर्धा आहे. भाग घेण्यास कल्पक काही सुचायाचा प्रयत्न सुरू केलाय.
इडली, खिचडी, तांदळाची खीर वगैरेत मजा नाही.
आठवा नियम आवडला
केळीच्या पानावर केळीच्या सालीने सजावट करून मध्ये शिकरण अशी थाळी चालणार नाही.
>>>>>>मुख्य घटकाचा ठळक आणि
>>>>>>मुख्य घटकाचा ठळक आणि ओळखू येईल असा वापर असावा.
हे ब्येष्ट केलत नाहीतर कोणीतरी मीठ हा जिन्नस घेउन पदार्थांची रेलचेल उडवुन दिली असती
पदार्थ शाकाहारी असणे गरजेचे
पदार्थ शाकाहारी असणे गरजेचे आहे का ?
असल्यास/नसल्यास कृपया हेडरमधे समाविष्ट करावे.
छान स्पर्धा आहे.
छान स्पर्धा आहे.
फक्त प्रत्यक्षात एकाच घटक पदार्थापासून अनेक प्रकार केलेली थाळी कोणी खायला दिली तर आवडणार नाही.
पण तरीही कोणी खावीशी वाटावी अशी थाळी करतील माझे मत त्यालाच.
शाकाहारी पदार्थ नमूद केले नाही म्हणजे मांसाहारी पदार्थ चालू शकतो असे वाटतेय आणि हेच योग्य राहील. ही स्पर्धा आहे देवाचा नैवेद्य नाही. म्हणून कोणावर सक्ती नसावी
अरे वा, सुरेख कल्पकता.
अरे वा, सुरेख कल्पकता.
Header मधे ingredient/s साठी
Header मधे ingredient/s साठी “जिन्नस” शब्द लिहूनच जिंकले आहेत संयोजक ❤
५ वा नियम नसता तक मीठ आणि साखर वापरून भरपूर पदार्थ केले असते लोकांनी 😀
आता कल्पक पाककृतींची प्रतीक्षा 👍
छान स्पर्धा आहे, खूप कल्पक
छान स्पर्धा आहे, खूप कल्पक पाककृती बघायला मिळतील.
मला हा धागा दिसलाच नाही संयोजक, ग्रूप एवढ्यात बनवायचा नसेल तर नेहमीप्रमाणे पहिला घोषणेचा धागा काढून त्याची पताका वर चिकटवून तेथे हे जोडा.
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.
लिखित नियमांव्यतिरिक्त काय काय अध्याहृत आहे?
पनीर चालेल का? म्हणजे जिन्नस
पनीर चालेल का? म्हणजे जिन्नस म्हणून पनीर चालेल का???
लंपन, जिन्नस म्हणून पनीर
लंपन, जिन्नस म्हणून पनीर चालेल की!
पनीर चालेल का? म्हणजे जिन्नस
छान स्पर्धा आहे, खूप कल्पक पाककृती बघायला मिळतील. >> +१ पनीर चालेल का? म्हणजे जिन्नस म्हणून पनीर चालेल का???>>> पनीर कोणत्या प्रकाराचं आहे ते लिहीणे आवश्यक आहे का