(निवेदन)
मी लेखिका किंवा कवियत्री नाही. पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा मला काहीतरी लिहावसं वाटतं.
कधी ते गद्य असतं किंवा कधी ते पद्य असतं किंवा कधी ते ग-पद्य पण असू शकतं. भावना लक्षात घेऊया ना.
(संपलं)
एक आहे बापट, तो मुळीच नाही तापट
उंची आहे कमी त्याची, शरीरयष्टी माफक
मधल्या आळीतल्या अंतूच्या तैलबुद्धीसकट,
पुण्यात येऊन त्यानं आणली की हो आफत
"पुणे तेथे काय उणे" उक्ती झाली खोटी,
डीजेच्या आठवणीनंही धडधडते छाती
सरळ साधी मागणी त्याची होती एकच फक्त
रस्ते हवेत मोकळे आणि ध्वनी प्रदूषण मुक्त
सार्वजनिक उत्सवांनी सोडलंय समाजभान
ढोलताशांच्या घोषांनी वितळत चाललेत कान
सभागृहाला सवाल केला अचूक मुद्द्यांवरी
गदारोळ माजला, गाडी घसरे गुद्द्यांवरी
एकांडा शिलेदार हा व्यवस्थेशी लढतो आहे
विचार-अभ्यास-तर्कानं दांडग्यांना नडतो आहे
नाही वल्गना फुकाच्या, नाही शिव्याशाप
ज्याच्या त्याच्या पदरामध्ये टाकतो नेमकं माप
इंग्लिश, संस्कृत, लॅटिन, मराठी ही दणकट
घरी याच्या पाणी भरती, युक्तिवादही बळकट
आधी त्याला गल्लीतलं कुत्रंही नव्हतं ओळखत
एका रात्रीत स्टार झाला नाव विद्यानंद बापट
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान! आवडलं. दोन दिवसांत भरपूर
छान! आवडलं. दोन दिवसांत भरपूर मुलाखती ऐकल्या आणि ऐकाव्याशा वाटतं गेल्या..
वाह वाह सुमेधा, अगदी बापट
वाह वाह सुमेधा, अगदी बापट यांचे सर्वसमावेशकगुण कविता केली आहेस, मस्तच.
लोकवर्गणी,लोकसहभाग डीजे
लोकवर्गणी,लोकसहभाग डीजे वगैरेंसाठी निश्चित नाही.
गंमतीशीर कविता. भावना
गंमतीशीर कविता. भावना पोहोचल्या.
आवडली कविता!
आवडली कविता!
संस्कृत सुभाषिते मुबलक वापरत असल्याने तथाकथित उजव्या धर्मवादी जनतेला काही सुधरत नाहीए काय बोलावं बापट यांच्या पुढे ते.
कविता आवडली !
कविता आवडली !
जमली आहे रत्नागिरीचा संबंध,
(No subject)
वाह मस्त जमली आहे..
वाह मस्त जमली आहे..
पोहोचवा त्याच्यापर्यंत..
किंवा तुम्हीच रीळ बनवा.. वायरल होईल
छान.
छान.
चपखल
चपखल
छान
छान