वाड्यातल्या गप्पा

Submitted by अस्मिता. on 24 June, 2021 - 11:18

वाड्यातल्या गप्पा
IMG-20240909-WA0003_1.jpgहा धागा एक माणसांनी भरलेला वाडा आहे , कोणीही या, कधीही या, अंगणात कोणीतरी बाज टाकून बसलेले असेलच. तुमचे हसूनच स्वागत होईल.  मायबोलीवरचे इतर लेखन इथे कॉपी करून आणू नका. त्या विषयीचे गॉसिपही नकोच. राजकारण नकोच. कसलेही चित्र द्या , कसल्याही शुभेच्छा द्या. रोज द्या / कधीतरी द्या. लिंक्स द्या.

धाग्याचे नियम-
कुणालाही हेटाळणीजनक प्रतिसाद देऊ नका. प्रत्येकजण (अमेरिकेतले/ भारतातले/ किंवा अजून कुठलेही) आपापल्या अनुभवविश्वातील गप्पा मारायला येथे येणं साहजिकच आहे. हा धागा फनहितार्थ आहे, जनहितार्थ नव्हे. त्यामुळे अपेक्षा नकोत आणि दबाव आणण्याचे प्रयत्नही नकोत. त्यांना आपापल्या समविचारी लोकांसोबत आनंदाने गप्पा मारायचा अधिकार आहे. सर्वांशीच सौजन्याने वागा आणि गोड बोला. Happy
धन्यवाद.


Happy करा सुरू.. !

***दवंडी***
वाडा निवडक हा धागा वाडा, मग, अग वरील निवडक पोस्ट्ससाठी काढला आहे. तो पहाण्यास पश्चिम महाराष्ट्र ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वाड्याची तिजोरी गप्पांचाच ठेवा.
ही तिची किल्ली-उघड दार वाडेकरा
प्रताधिकारमुक्त चित्र सौजन्य - अनिरुद्ध

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय हॅलो सुप्रभात रामराम वाडा

ओह शर्मिला
फारच बातम्या येत आहेत नाशिकच्या.
एकाचवेळी सगळीकडे खोदले आहे.
काळजी घ्या सगळेच.

कुकीज चर्चा Lol

मानव,बहिणीला शुभेच्छा. सुखी, निरामय आयुष्य लाभो.

शर्मिला, काळजी घे. भाच्याला लवकर बरे वाटो.

आज सकाळपासून मनाला विनाकारण हुरहुर वाटत होती.
येसुदासचे, जब दीप जले आना हे गाणे सुरू झाले आणि वाटले किती शांतवन करणारा आवाज आहे त्यांचा. खूप बरे वाटले. सकून मिला.

भाच्याला लवकर बरे वाटू दे.

बद्रीनाथ मंदिराच्या पायऱ्यांवरून वाडेकरांना शुभेच्छा.
20260829_141131.jpg

देवकी तै , अगदी!
उबो, जबरदस्त फोटो! खूप चढण आणि चालणं आहे का ?

देवकी तै , अगदी!
उबो, जबरदस्त फोटो! खूप चढण आणि चालणं आहे का ?

फारेन्ड यांनी दिलेला पूजा दलाल यांचा व्हिडिओ पाहीला. पूर्वी बघत असे. मग हरवलेला. कसली स्मार्ट आहे. माझी आवडती कंटेंट क्रिएटर अहे.

>>>>>>येसुदासचे, जब दीप जले आना हे गाणे सुरू झाले आणि वाटले किती शांतवन करणारा आवाज आहे त्यांचा. खूप बरे वाटले. सकून मिला.
येस्स्स!!!
.
किल्ली कपचा शेप व रंग फार गोड.

मी Valley of flowers trek करून आज बद्रीनाथला गेलो होतो. रस्ता उत्तम आहे, कुठेही दरडी कोसळून रस्ता बंद आहे किंवा वाहतूक कोंडी झाली आहे, असे अनुभवायला आले नाही.

आता मूळ प्रश्न चढण आणि चालणं आहे का? मी ऐकलं की बाहेरच्या ठिकाणाच्या गाड्या आता थेट मंदिराच्या जवळपास नेऊ देत नाहीत. पण शेवटी हा भारत देश आहे, वाटा तितक्या पळवाटा. आमची Trek The Himalayas (TTH) ची मिनीबस अशीच अडवली तर ड्रायव्हरने सिक्युरिटीवाल्याला सांगितले की Sardeshwari (शारदेश्वरी?) रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात आहोत, तर त्याने गाडी सोडली. तिथून प्रत्यक्ष मंदिर चालत फक्त १० मिनिटांवर आहे. आमच्या गाईडने सांगितले की त्या रेस्टॉरंट मालक आणि सिक्युरिटीचे "सेटिंग" आहे. आता चढण आणि एकंदर त्रास किती आहे, ते तुम्हीच ठरवा.

लक्षात आले, धन्यवाद!
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे फोटोही काढले असतील तर द्या!

एक आयडिया चालते का बघा. स्वतःचा एकट्याचा कायप्पा ग्रूप करून फोटो पाठवायचे व आपल्यालाच आलेले फोटो सेव्ह करायचे परत एकदा. त्यांची साईझ लहान होते. नाही तर त्या फोटोंचे स्क्रीनशॉट घ्यायचे, ते स्क्रीनशॉट शेअर करायचे.
माहितीही लिहा या ट्रिपची, जमेल तशी.

मी कोकोनट सोबत आता रात्री एकदम प्रसन्न वॉक घेऊन आले. थोडं आभाळ आलं आहे पण ढगाआडून थोडा लपलेला पौर्णिमेचा चंद्र अगदी मोठा दिसत होतं. वारं सुटलं आहे पण अगदी थोडं. ब्रीझ! झाडांची पानं सळसळ करत आहेत. शांत निवांत आहे सगळं. जेमतेम अर्धा तास फिरून मग परत आल्यावर फ्रंट डोअर काढताना एकदम आयुष्य किती मोठं होऊ शकतं, आपण किती छोट्या छोट्या गोष्टींमधे अडकून पडतोय असं वाटलं. दीर्घायुषी असले तर खूप जख्खं झाल्यावर मला आजचा दिवस आठवणारही नाही इतका सामान्य दिवस, आयुष्याच्या मोठ्या कॅनव्हासवर एक छोटा ठिपकाच. मग आपण छोटे छोटे आनंद घेणं का सोडून द्यावं ?! Happy काही तरी वाटलेलं लिहून टाकलं.

खरं आहे अस्मिता! मनातील तरंग आवडले.

कधी कधी किंवा बरेचदा असे क्षण अवचितपणे समोर येऊन ठाकतात आणि त्या त्या वेळी मन उजळून टाकतात.

हुश्श! सखाराम गटने (ण आहे.) झाला माझा.