पासंग

Submitted by अनन्त्_यात्री on 20 August, 2026 - 04:34

अभंग भंगेल
ओवी ओठंगेल
लावणी लोपेल
लौकरच

उत्स्फूर्त निमेल
उत्कट आटेल
चाकोरी उरेल
लौकरच

काव्य, शिल्प, चित्र
एका प्रॉम्प्ट वर
होतसे हजर
अहर्निश

मानवी सृजना
कृबुचा पासंग
युद्धाचा प्रसंग
रात्रंदिन

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता..!
कृबू म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता का..?

खूप छान अनन्त्_यात्री! कृबु कितीही प्रगत झाली तरी तुमच्या सारख्या सृजनशीलांच्या पासंगालाही ती पुरणार नाही.