Submitted by तुष्कीनागपुरी on 16 July, 2026 - 13:32
तू नसतांना तुझी आठवण हळवे करते
तू नसतांना वाट पाहते मन तगमगते
सर्व जगाला दिसतो मी नेहमी सारखा
तू नसतांना जगण्यातुन जगणे हारवते
.
विचारता मी ठीकच सगळे हृदय सांगते
नेत्र शहाणे ओठांवरही हसू राहते
तुझ्यावाचुनी जरी दिखावा चेहऱ्यावरचा
दिवस ओढणे रात्र जागणे छळ छळ छळते
.
तू नसतांना श्वास जरी नियमाने आले
तू नसतांना दिसले जरी मन सावरलेले
गर्दीमध्ये हात सुटुन भयभित बाळासम
नू नसतांना जगणे नुसते बावरलेले
.
तुष्की नागपुरी
नागपूर, गुरूवार, १६ जुलै २०२६, २१ः२४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा
वा