व्यसन.
माझ्याकडे एक ४८ वर्षाच्या बाई आल्या होत्या. त्यांचा डावा हात दुखत होता. त्यासाठी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या खांद्याची सोनोग्राफी करायला सांगितली होती.
सोनोग्राफी करण्याच्या अगोदर त्यांच्या आजाराची माहिती असावी म्हणून आणि मध्यम वयीन, डावा हात दुखतो आहे म्हणून मी त्यांना विचारले कि त्यांच्या हृदयाची तपासणी झाली आहे का?
त्यावर त्यांनी आपली फाईल दाखवली. त्यात इ सी जी , स्ट्रेस टेस्ट आणि इको कार्डिओग्राफी चे अहवाल होते ते सर्व व्यवस्थित होते म्हणजेच या बाईंना हृदयाचा काहीही आजार नव्हता.
यानंतर मी त्यांना विचारले कि हृदय तर व्यवस्थित आहे तुम्हाला मानेचे स्पॉनडायलोसिस पण असू शकते. त्यावर त्यांनी एक दुसरी फाईल दाखवली त्यात मानेचा एक्स रे आणि एम आर आय होता त्यामध्ये सुद्धा काही विशेष दिसत नव्हते.
मी सोनोग्राफी केली तर डावा आणि उजवा( तुलनात्मक तपासणी साठी) दोन्ही खांदे व्यवस्थित होते. आता मी त्यांना कोणत्या स्थितीत आहेत दुखतो आहे ते आणि तेंव्हा नक्की कुठे दुखतो आहे हे विचारले आणि त्या स्नायूंची तपासणी केली.
यानंतर मी त्यांना शांतपणे विचारले कि आपण बराच वेळ मोबाईल हातात घेऊन पाहत असता का?
त्यावर त्यांचे यजमान म्हणाले कि डॉक्टर ती दिवसात सात ते आठ तास मोबाईल घेऊन युट्युबवर विडिओ पाहत असते. पोळ्या लाटताना सुद्धा डावा खांदा वर करून आणि मान वाकडी करून ती मोबाईलवर बोलत असते. तुम्ही तिला काही तरी सांगा. हात दुखतो म्हणून तपासण्यांवर माझे आतापर्यंत २५ हजार रुपये खर्च झाले आहेत.
मी त्यांना म्हणालो कि ४८ वर्षाच्या बाईंना मी सांगावे असा मला काय अधिकार आहे. ज्याचे त्याने समजून घेणे आवश्यक आहे. मी त्यानं फारतर मोबाईल स्टॅण्डवर ठेवून व्हिडीओ पहा असा अनाहूत सल्ला देऊ शकतो. आणि मी त्यांना संगणकावर रुपये ९९ पासून मोबाईल स्टॅण्ड उपलब्ध आहेत असे सुचवले. https://www.amazon.in/Portronics-POR-122-MODESK-Universal-Mobile/dp/B07N...
.अशीच २ वर्षांपूर्वीची गोष्ट.
एक ३५ वर्षाचे गृहस्थ पोट बिघडले म्हणून सोनोग्राफी साठी आले होते.
त्यांची सोनोग्राफी करताना आणि जुने अहवाल पाहून मला लक्षात आले कि यांचे वारंवार पोट बिघडते आहे.
यावर मी त्यांना विचारले कि तुम्ही जे खाता आहात किंवा जे पाणी पिता आहात त्यामुळे हा आजार तुम्हाला होत असावा असा माझा कयास आहे. तुमच्या पोटात असा गंभीर काही प्रश्न नाही.
त्यावर त्यांनी सांगितले डॉक्टर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मी साकी नाका येथल्या औद्योगिक वसाहतीत नोकरी करतो.
तेथील कॅन्टीन मधले अन्न फारसे चांगले नाही. यावर मी त्यांना म्हणालो मग घरून डबा घेऊन जा. घरचे चांगले अन्न घेतले तर हा तुमचा प्रश्न निकालात निघेल. यावर त्यांनी तोंड वाकडे केले.
मी प्रश्नार्थक चेहरा केला तेंव्हा त्यांनी खालच्या आवाजात मला सांगितले कि डॉक्टर माझी बायको सकाळी ११ पर्यंत उठतच नाही.
मी त्यांना विचारले कि त्या नोकरी करतात का? यावर ते म्हणाले कि नाही ती रात्री २ पर्यंत व्हॉट्स ऍप वर असते आणि सकाळी ११-१२ पर्यंत झोपलेली असते. यावर आमची बरीच बोलाचाली आणि भांडणं झाली आहे पण ती ऐकतच नाही.
मी काय बोलणार? मी एवढेच म्हणालो, मुलुंड मध्ये बरीच चांगली पोळी भाजी केंद्रे आहेत. त्यातील एखाद्या चांगल्या केंद्रावरून पोळी भाजी डब्यात घेऊन जात जा. याशिवाय मी तर अधिक काय सल्ला देऊ शकलो असतो?
प्राप्त परिस्थितीत आपण योग्य
प्राप्त परिस्थितीत आपण योग्य सल्ले दिलेत. इथे पेशंटच्या हितचिंतकाच्या भूमिकेत जाउन व्यावहारिक उपाययोजना करणे ही बाब महत्वाची आहे
हिहीही, फेमिनिस्ट येतील आता
हिहीही, फेमिनिस्ट येतील आता
पहिला प्रश्न मोबाईल स्टँड ने
पहिला प्रश्न मोबाईल स्टँड ने सुटला तसा दुसरा प्रश्न रात्रीच टिफीन पॅक करून फ्रिज मधे ठेवल्यास सुटू शकेल.
आणखीही बरेच पर्याय आहेत.
कुठलही व्यसन हे त्या व्यक्तीने मनापासून ठरवले तरच सुटते.
मोबाईल अती वापरण्याला अन्य आवडते पर्याय समोर आले तर तेही सुटू शकेल.
मोबाईल व्यसनाला काही पर्याय
मोबाईल व्यसनाला काही पर्याय नाही. जास्तीत जास्त जागावे, कमीत कमी जगावे आणि व्यसन पूर्ण करून मरावे परी इन्स्टावर किर्तीरूपी उरावे!
नवऱ्याचे हाल होत असतील तर स्वयंपाकाला बाई ठेवणे उत्तम.
बाहेरचे खाण्याचा खर्च वजा करता थोडेफारच जास्त जातील.