लाहोर भारतात?

Submitted by सुपरचार्ज on 11 July, 2026 - 08:40

लाहोर भारतात असते तर आज वेगळा इतिहास असता का? भारताला फायदा/तोटा काय असता? पंजाबची राजधानी पाकिस्तानला जाणे हा पंजाब शीख ह्यांच्यासाठी धक्का होता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वरच्या बातमीत मराठी पानिपतच्या युद्धात तिथे गेले हे फारसे बरोबर वाटत नाही. कराचीचे मराठी हे नोकरीधंद्यासाठी तिथे गेले हे जास्त सयुक्तिक वाटते. जर मुंबै प्रांतात कराचीही असेल तर हे सहजशक्य आहे. तेव्हा मुंबै प्रवासही बोटीनेच व्हायचा. वेंगुर्ला - कराची बोटी असतील आणि तिकडे मराठी/हिन्दु लोक असतील तर कोकणी लोक धंदा शोधत गेले असावेत.

पानिपतच्या युद्धातले लोक युद्धबंदी म्हणुन बलोचीस्तानमार्गे अफ्गाणीस्तानात नेले गेले. त्यांचे वंशज आजही बलोचीस्तानात तिथे आहेत. जरी ते आज धर्माने मुस्लिम असले तरी काही मराठी प्रथा त्यांच्यात आजही आहेत असे वाचलेय.

बलोचीस्तान मध्ये एक शक्ती पीठ आहे. हिंगालजा माता देवी. त्या देवीचा अमारावातीशी काही संबंध आहे असे वाचले होते.

कराची शिक्षण संस्थेची कॉलेजेस कोकणात आहेत.

आमचे आडनाव असलेले एक बांधव कराचीवाले म्हणून ओळखले जातात, त्यांचा तिथे व्यवसाय होता. बहुधा कराचीमध्ये व्यापार करण्यासाठी बरीच मंडळी गेली असण्याची शक्यता वाटते

गंगाधरपंतांचे पानिपत "
ही डॉक्टर नारळीकरांनी लिहिलेली कथा आहे.

अगदी अगदी ! गंगाधरपंत समांतर मिती मध्ये पोचतात जिथे एक दुसरी संभावना सत्य असते ! त्यांना ते "जिजामाता एक्सप्रेस " मध्ये भेटलेले मियाभाई, अभी मुंबई के ब्रिटिश टेरिटरी में जाऊंगा, वहा पर बॉम्बे सेंट्रल से फ्रंटियर ले कर कराची जाऊंगा त्यात म्हणतो मुंबईत आलो की पासपोर्ट तयार ठेव !

Pages