Submitted by हेमंतकुमार on 7 June, 2026 - 01:45
फेब्रुवारीतील पुणे गटगच्या धाग्यावर दोनच दिवसांपूर्वी ऋतुराजने आठवण काढली होती की पुढचे गटग कधी?
योग कसा असतो बघा . . .
आज सकाळी अचानक ध्यानीमनी नसताना ३ मायबोलीकर आणि ३ मायबोली वाचक यांचे सुरेख गटग पुण्यातील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर जमून आले. . .
फोटोतील मायबोलीकर अनुक्रमे हेमंतकुमार, मोहना आणि DJ........
आणि
आपल्या वाचकांसह :

वरील फोटोत अनुक्रमे शशिकांत, हेमंतकुमार, मोहना,पर्णिका, सुषमा आणि DJ........
बाकी वृत्तांत वगैरे जरा वेळाने….
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! अनायासे इतके जण
अरे वा! अनायासे इतके जण एकत्रित भेटणे म्हणजे दुर्लभ योग
मी सुद्धा फक्त कुमार सरांना ओळखले
हे काय? दुसरा दिवस उजाडला ,
हे काय? दुसरा दिवस उजाडला , गटगचा धागा येऊन २४ तास व्हायला फक्त १५ मिनिटे उरली, तरी इतर दोघा गटगकरांचे वृत्तान्त आले नाहीत.
आमच्या पुणे तळजाई गटगमध्ये किडनॅपिंगचा संशय होता. या गटग नंतर खरंच कोणी किडनॅप झालंय की काय?
आता गटगच्या शिरस्त्यानुसार आचरटपणा करायचाच म्हणून कोण कोण अंघोळ न करता आले होते?
काय काय खाल्लं पिल्लं?
शब्द आणि स्नेहभावना याव्यतिरिक्त काही देवाणघेवाण झाली की नाही?
अवांतर -
डॉ कुमारहेमंतकुमार यांच्या डीपीतलं शाईचं पेन आवडलं. खरा फोटो टाकता आला तर पहा.मायबोलीवरच्या राजकीय रणधुमाळ्यांत डीजे आणि मी एका बाजूला असू. त्यामुळे त्यांना पाहून आनंद झाला.
मोहना यांचं छापील लेखनही वाचलं आहे, त्यामुळे त्यांना पाहूनही.
त्या वाचनमात्र मेंबरांना मायबोलीकर करून घ्यायचा प्रयत्न केला की नाही? केला नसेल तर का नाही?
ओह, राजकीयवाले डीजे होय.
ओह, राजकीयवाले डीजे होय. मलाही आवडायच्या त्यांच्या पोस्ट
lagwankars असा आयडी आहे, तो
lagwankars असा आयडी आहे, तो शशिकांत यांचा असावा.
तसे असेल तर वामा सदस्य आहेत. त्यांनी निदान या धाग्यापुरते वामा मोड मधुन बाहेर यावे.
बघा. मानव सुद्धा शेरलॉक झाले.
बघा. मानव सुद्धा शेरलॉक झाले.
वॉटसन फारतर.
वॉटसन फारतर.
कुणीच लिहिलं नाही तर हेमंतकुमार यांना "DJ वाले बाबू मेरा धागा चला दो" म्हणावे लागेल.
त्या आधी त्यांनी तरी सुरुवात करावी.
गटग छोटेखानी होते त्यामुळे
गटग छोटेखानी होते त्यामुळे मर्यादित संवादाविना इतर काही करायला वाव नव्हता. मी सोडून इतरांना कामे असल्याने आमचा नाइलाज होता. याहून अधिक काही इतर दोघांनी लिहावे; वाचकांना त्यांच्या शैलीत वाचायला मिळेल.
* lagwankars असा आयडी >>> नाही ! शेरलॉक व वॉटसन दोघेही चुकले आहेत.
Shubhada Lagwankar या अमेरिकास्थित आहेत व त्यांचा कालच्यांशी काही संबंध नाही. कालचे वाचक अन्य समाजसेवी कामांत खूपच व्यग्र असतात. त्यामुळे ते इकडे येण्याची शक्यता कमी वाटते. तरी नंतर पाहू.
छान!
छान!
मला नीटसं आठवत नाही.
या म्हणावं रेग्युलरली.
डीजे यांच्या धुव्वाधार पोस्ट/ मारामार्या वगैरे असायच्या का? नसेल तर सॉरी
मोहना यांचं लिखाण आवडलेलं आहे. हल्ली त्यांच्या ही पोस्ट दिसत नाहीत.
इथे प्रत्यक्ष फोटो बघुन छान वाटलं.
मोहना यांचे लिखाण मी वाचले
मोहना यांचे लिखाण मी वाचले आहे असे बरेच जण आठवून म्हणत आहेत...
मी तर ते फेसबुकवर वाचत राहतो. म्हणजे बघा कसले दुर्लभ-दुर्मिळ मायबोलीकर मी फेसबुक फ्रेंडलिस्टीत घेऊन बसलो आहे
पण ते ऋतुराज नसलेले गटग
पण ते ऋतुराज नसलेले गटग अधिकृत धरले जाते का?

>>>> १०० मार्क तुला
डॉक्टरांनी मायबोलीवर इनमिन ३
डॉक्टरांनी मायबोलीवर इनमिन ३ मायबोली सभासद, २ वाचक आणि माझं शेपूट (लेक) ह्यांच्या गटगबद्दल लिहिलेलं आज समजलं आणि लगेच लिहिते आहे.
खूप वर्षांपूर्वी केरीमध्ये अंजलीकडे गटग झालं होतं तेव्हा काहीजणांची भेट झाली होती. DJ ना यावेळी मी दुसऱ्यांदा भेटले. त्यांची भेटीची चिकाटी दांडगी असल्यामुळे भेट झाली .
DJ ची ओळख मायबोलीमुळे म्हटल्यावर माझे मेहुणे सरसावले. म्हणाले, 'माझा एक मित्रही लिहितो मायबोलीवर बोलवू का त्याला?' सध्या मी आणि DJ इकडे फेरफटका मारत नाही त्यामुळे कुमार की हेमंतकुमार याबद्दल चर्चा होईपर्यंत ते आलेच. मग त्यांनी लिहिलंय तसं 'मायबोलीकरांवर' चर्चा झाली, मराठी भाषेबद्दल अस्मिता जागृत झाली आणि आता परत इथे लिहायला हवं अशी खुमखुमीही. अभिप्रायांमध्ये माझं लेखन वाचलं असल्याचा उल्लेख वाचून आनंद झाला.
ऋन्मेषसारखे काही मायबोलीकर फेसबुकवर मित्रयादीत आहेत. सध्या लघुपट करण्यात मग्न असल्यामुळे इथे लेखन टाकलं जातं नाही पण आता नक्की लिहेन.
लघुपट इथे पाहू शकाल.
https://youtube.com/playlist?list=PLG9bwQIPG_DD43BkgkUcIazdqnbp63AdR&si=...
आवडले तर वाहिनीचे सभासदही व्हा.
Pages