पैठणी

Submitted by शिवानी बलकुंदी on 5 May, 2026 - 05:18

“मम्मा, अगं हा आत्ताच myntra वरूंन मागवलेला टॉप कसला cool दिसतोय आणि ही जीन्स बघ ना किती elegant दिसतेय !,
“अगं पण तुला मूला कडचे बघायला येणार आहेत.. “, इति आई
“ ओय, मग काय झालं, मी काय काकू बाई सारखी साडी बिडी नाही हं नेसणार, “ त्यांना पण कळायला हवे ना मुलगी किती स्मार्ट आहे ते. “
“ अगं, फक्त कंपड्यांवरूनच आपण आपली आधुनिकता दाखवायला हवी आहे का?”
पूर्वी यावर निरुत्तर झाली, पण तिने आई च्या बोलण्याकडे चक्क दुर्लक्ष केले, आणि आलेल्या पाहुण्यांसामोर ती शॉर्ट स्लीवलेसस टॉप आणि जीन्स घालूनच गेली, पूर्वी ने सगळ्यांना हाय केले, सुरुवातीला पूर्वी च्या आई ने तिला आलेल्या सगळ्यांची ओळख करून दिली. संगळ्यांशी थोडेफार जुजबी बोलणे झाल्यावर पूर्वी आणि ईशान ला एकमेकांशी काही बोलायाचे आहे म्हणून ते बाहेर जायला निघाले, ईशान ची नविकोरी ev गाडी बघून पूर्वी हसतच म्हणाली, भारतात गाडी चालवायची सवय आहे ना?
ईशान कोटेकर, कम्प्युटर मधे MS करून अमेरिकेतील नोकरी सोडून भारतातच परतलेला, चाळीस लाखांचे पॅकेज असलेला एकुलता एक मुलगा. आई वडीलांसोबतच राहणार एवढीच अट असलेला, अठ्ठावीस वर्षांचा पाच दहा ऊंची असलेला देखणा मुलगा. कोणतिही मुलगी त्याला नकार देऊ शकणार नाही असा, तरिही आई वडील सोबत राहणार म्हणून अनेक मुलींनी त्याला चक्क नकार कळवला होता.
पूर्वी, तर आत्ता पर्यन्त आई वडिलांची अगदी राजकन्या, तीला त्यांनी कायम अगदी फुलपाखरा सारखे जपले होते, तिचे सगळे हट्ट पुरवले जात असत, मला हवे तेच मी करणार असा तिचा काहीसा हट्टी स्वभाव, म्हणून तीला शोभेल असा नवरा त्यांना हवा होता, शिवाय पूर्वी च्या पण होणाऱ्या नावऱ्यामुलासाठी खूप काही अपेक्षा होत्याच, ईशान चे स्थळ सांगून आले त्यावेळी पूर्वी आणि तिच्या आई बाबांना ईशान पूर्वी साठी अगदी परफेक्ट मॅच आहे असेच वाटले, शिवाय आई वडील सोबत असतील तरी त्यामुळे पूर्वी आणि तिच्या आई बाबांना काही फरक पडणार नव्हता.
बाहेर च्या देशात एकट्याने राहून आल्यामुळे ईशानला समोरच्या माणसाला त्याच्या सोबत बोलताना तो माणूस कसा आहे हे सहज ओळखता येत असे, त्यामुळे पूर्वी ला सोबत घेऊन गाडी चालवत बोलताना त्याला तिचा हट्टी, स्वभाव, अल्लड पणा, तिच्यातली निरागसता त्याला जाणवली, आणि तो चक्क तिच्या प्रेमात पडला, आता काही झाले तरी हिच्याशीच लग्न करायचे असे त्याने ठरवले आणि तसे त्याने लगेच पूर्वीला सांगायचे ठरवले देखील,
जवळच्याच एक कॅफे मधे दोघे जाऊन बसले तसे ईशान ने सुरुवातीला पूर्वी ची शाळा, तिच्या मित्र मैत्रिणी, तिच्या आवडी निवडी असे एक एक विषय करत करत तीला बोलते केले, ईशान च्या प्रश्नांना उत्तरे देता देता पूर्वीची अखंड बडबड सुरू होती,
ईशान पूर्वी ला मधेच थांबवत म्हणाला, “ मग, करायचे ना आपण लग्न?,”.
ईशान च्या या गुगली ने पूर्वी बोलता बोलता मधेच् थांबली, आणि गोंधळुंन म्हणाली
, अरे, अजून माझे काहीच ठरले नाही.. मी.. मी इतक्यात काहीच सांगू शकत नाहीय, माझे अजून पी जी चे लास्ट सेम पण नाही झाले, मी आधी मम्मा शी बोलते ”
“ अगं, पण मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तुझ्या मम्माशी नाही..” असे म्हणून ईशान खुदू खुदू हसू लागला.
पूर्वी ला खरे तर ईशान च्या बोलण्याचा रागच आला, पण ती तसे काही न दर्शवता, म्हणाली, “चल, जायचे ना परत? सगळे वाट बघत असतील आपली, आणि हो तसेही आपल्या आई वडिलांची पण काय इच्छा आहे ते तरी बघूयात,”.
गाडी पूर्वी च्या घराजवळ आली तसे ईशान पूर्वी म्हणाला, “म्हणजे, तुझे उत्तर हो आहे असे मी समजतो, ”
“आणि हो पुढल्या वेळी आपण सगळ्यां सोबत भेटू तेव्हा प्लीज साडी नेसुन येशील ना”, काय आहे ना माझी आई शाळेत शिक्षिका होती, तीला मी कायम साडी मधे च् बघितले आहे, आणि त्यामुळे माझ्या मनात कुठेतरी साडी मधल्या स्त्रीची ची एक सुंदर प्रतिमा तयार झालेली आहे, मला तुला साडीत बघायला आवडेल पूर्वी, तू माझ्या घरी येताना साडी मधे येशील ना प्लीज.”
ईशान च्या ‘येशील ना प्लीज,’ या शब्दांनी, पूर्वी चक्क लाजली, “ अरे पण पुढल्या वेळी आपण भेटू आणि तुझ्या घरी हे कधी ठरले?”
ईशान ने गाडी घराजवळ पार्क केली दोघे उतरून घरात आले, सगळे जण त्या दोघांकडे बघून हसत होते, पूर्वी ला कधी नव्हे एवढे स्वतः च्याच घरी येताना उगाच छाती मधे धडधडू लागले, तरिही चेहऱ्यावर शक्य तेवढे हसू ठेवत दोघेही आत आले, तशी पूर्वी सरळ आपल्या खोलीत निघून गेली. ईशान पण पूर्वी च्या आई बाबांन कडे बघून म्हणला, “आता आम्ही निघतो, पण पुनः लवकरच भेटूया,”
पूर्वी आणि तिचे आई बाबा ईशान च्या घरी आले, त्यावेळी ईशान च्या आजीने पूर्विला प्रेमाने जवळ बसवून घेतले, आणि त्याला काय काय आवडते, तो लहान असताना कसा दंगा करायचा, आता तो आजीची कशी काळजी घेतो, हे सगळं त्यांनी पूर्विला सांगीतले, पूर्विला ईशान ची आजी आणि त्यांच्या घरचे वातावरण खूपच आवडले.
ईशान त्याच्या एंशी वर्षांच्या आजींचा अतिशय लाडका नातू, आजीने होणाऱ्या नातसुनेसाठी तिच्या ठेवणीतली, पन्नास वर्षे जुनी पैठणी ठेवली होती, पूर्वीने ती साडी लग्नात नेसावी अशी त्यांची इछा होती.
साखरपुड्याची तारीख ठरली. तसे दोन्ही घरची मंडळी कामाला लागली, खरेदी आमंत्रणे, हॉल, मेनू आणि काय काय करायचे, याचे प्लॅनिंग सुरू झाले.
साखरपुड्याचा दिवस उजाडला, सकाळी सहा लाच पूर्वी चा फोन खणखणला, साखरझोपेत असलेल्या पूर्वीने ईशान चा नेहमी सारखाच फोन असेल म्हणून उचलला नाही, एवढ्यात आईने खोलीत येऊन पूर्वी ला आवाज दिला, “ पूर्वी अगं उठ उठ, ईशान चा फोंन आहे, आजी ला काल रात्री ICCU अॅडमिट केले आहे, त्तब्येत काही खूप चांगली नाहीये, सकाळी त्या शुद्धीवर आल्यापासून तुझी आठवण काढताहेत, एकदा आजी ला तुला बघायचे आहे अस ईशान म्हणाला, आणि तो दहा मिनिटात तुला घ्यायला येतोय, उठ तयार हो..
हे ऐकून पूर्वी, ताडकन उठून उभी राहिली. एवढ्यात ईशान आलाच, आल्या आल्या चल लवकर म्हणून पूर्वी ला घाई करू लागला., “ हो थांब आलेच”.. असे म्हणून पूर्वी तयार व्हायला गेली. ईशान खूप अस्वस्थ झाला होता, आज च् असे का झाले याचे त्याला राहून राहून वाईट वाटत होते.
खूप वेळ झाला तरी पूर्वी बाहेर येत नव्हती, ईशान चा पारा चढू लागला, तसे त्याने पूर्वी च्या आई बाबांकडे नाराजी व्यक्त केली, “काय हे, तीला परिस्थिति चे गांभीर्य कळत नाहीय का,?” वगैरे पण बोलून झाले, वीस मिनिटे झाली अर्धा तास झाला आणि पूर्वी अगदी नववधू सारखी तयार होऊन बाहेर आली. ईशान तिच्या कडे बघतच राहीला, तीला बघताच त्याचा राग कुठल्या कुठे पळाला, आई बाबांना पण तीला असे तयार झालेले बघून नवलच वाटले, “अगं पुर्वी हे काय?” आणि ही कुठली साडी नेसलीय?”
“ सगळे सांगते, दोन दिवसांपूर्वी च् आजींनी मला बोलावून ही पैठणी दिली होती, आणि सांगीतले होते की माझे आता काही खरे नाही, पण साखरपुड्याला तू हीच पैठणी नक्की नेस म्हणजे मला तुला बघून खूप आनंद होईल आणि मग मी सुखाने डोळे मिटेल, यावर मी आजी ना म्हटले ही,
“आजी असे काय बोलताय. तुम्हाला आमच्या लग्नात आशिर्वाद द्यायला हजर राहायचे आहे, त्याच वेळी मी ही पैठणी नेसेन,”
पण आजींनी मला कुणालाही न कळू देता ही पैठणी दिली, मी आज हीच नेसून साखरपुड्यासाठी तयार होणार होते, आता आजीला काही झाले तर मला खूपच वाईट वाटेल, म्हणून आज आत्ता च मी ही पैठणी नेसली.
सुंदर डाळिंबी रंगाची पैठणी, अगदी नवी कोरी दिसत होती, आणि पूर्वी तर त्या मधे खूपच लोभस दिसत होती.
ईशान आणि पूर्वी ICCU मधे दाखल झाले, आजी ने पूर्वी कडे डोळे भरून बघितले, तिच्या चेहऱ्यावरून त्यांनी मायेने हात फिरवला, आणि दोघांचे हात हातात दिले त्यांना बोलताना त्रास होत होता, पण त्यांचे डोळे जणू म्हणत होते, “माझ्या इशू ची साथ कधीच सोडू नको”. आजींना श्वास घ्यायला परत त्रास होऊ लागला, तसे डॉ. नी दोघांना बाहेर जायला सांगीतले. बाहेर पूर्वी चे आणि ईशान चे आई बाबा, आणि इतर नातलग बसलेले होते, तसे पूर्वी बाहेर येऊन आई च्या गळ्यात पडून रडू लागली.
थोड्याच वेळाने डॉ. नी बाहेर येऊन सांगीतले, “ आता सगळे संपलेले आहे. “ .....
पूर्वी चा हात ईशान च्या हातात चा होता, आणि ईशांन तिचे डोळे पुसत होता..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ह्म्म… चांगला प्रयत्न.

इशान तिला खुप गृहित धरतोय, पुर्वीने विचार करायला हवा अजुन.

पुर्वी साडी ‘घालते’ म्हटल्यावर आजच्या जमान्यातली मुलगी म्हणुन माफ केले. पण आजीही साडी ‘घालते’ हे मात्र चुक. आजी इतके चुक मराठी बोलणार नाही.

लेखक आहात तर असल्या चुका अजिबात करु नका. आमच्याइथे असेच बोलतात हे समर्थन लेखकाला चालत नाही कारण कथेत त्यांच्याकडे जसे बोलतात ती भाषा अभिप्रेत नसते तर त्याने ज्यांची गोष्ट लिहिलीय त्यांची भाषा अभिप्रेत असते.

नाहीतर उद्या ए आय ह्याच चुका करत बसणार.

पूर्वीमध्ये झालेला बदल mature वाटला.
तिने आजीला थोडा तरी आनंद द्यायचा प्रयत्न केला ही चांगली गोष्ट.

छान कथा.
साडी ‘घालते’ मलाही खटकले

प्रतिक्रियांसाठी मनःपूर्वक धन्यवाद @ ऋतुराज, @ धनवंती @साधना @ हह @ मनीमोहोर @ सुमेधा
आपल्या सगळ्यांच्या सूचनेनुसार बदल केलाय. Happy

मला ही कथा डायजेस्ट झाली नाही. पैठणी घालुन ICCU मध्ये हे मला पचले नाही. ही कथेची मागणी असू शकते नव्हे पूर्ण कथा त्यावरच आहे, आणि तरीही.
पण पूर्वी हट्टी वाटलेली आधी नंतर तिची ऋजु बाजू सामोरी आली. Happy