Submitted by अनन्त्_यात्री on 3 May, 2026 - 03:20
तुका विठू नाते कसे
सूक्ष्माचे जे विराटाशी
थेंबाचे जे सागराशी,
ठिणगीचे चांदणीशी,
क्षणार्धाचे कालौघाशी..
..तसे त्या दोघांचे नाते
तुका विठू नाते कसे
लेक माऊलीचे जसे
थोडे रुष्ट, थोडे तुष्ट,
तर्कापार, स्वयंस्पष्ट,
दृश्या खेळवी अदृष्ट..
..तसे त्या दोघांचे नाते
तुका विठू नाते कसे
ज्ञाताचे ज्ञेयाशी जसे
एकमेकाला जोखता,
क्षणा-कणाने वाढता,
घेई कवेत अनंता..
..तसे त्या दोघांचे नाते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
देव भक्त विलक्षण
देव भक्त विलक्षण
कोणा कळेचि नाते
सुंदर, भावस्पर्शी काव्य... __/\__
सामो, शशांक धन्यवाद!
सामो, शशांक धन्यवाद!
तर्कापार, स्वयंस्पष्ट, सुंदर.
तर्कापार, स्वयंस्पष्ट,
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
मला माऊलींच्या या ओळी आठवल्या
कोणाचे हें रुप देह हा कोणाचा ।
आत्माराम साचा सर्व जाणे ॥१॥
मीतूं हा विचार विवेकें शोधावा ।
गोविंद हा ध्यावा याच देहीं ॥२॥
वा वा!! सुंदर!
वा वा!! सुंदर!
खुपच सुन्दर कविता अनन्त्
खुपच सुन्दर कविता अनन्त्_यात्री !
जोतिराम, द. सा., स्वाती
जोतिराम, द. सा., स्वाती_आंबोळे, नितनवे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वा
वा