Submitted by अनन्त्_यात्री on 26 April, 2026 - 00:15
तुझ्या कवितेच्या ओळी
काळजात रुतलेल्या
अवचित ओथंबून
आज कंठात दाटल्या
कंठी दाटता दाटता
शब्द शब्द विखुरले
काही ओठी उमटले
काही पापण्यांचे झाले
ओठावरल्या शब्दांना
ओठंगून अर्थ आले
तरी वेड्या वळीवाला
पापण्यांनी थोपविले
आज सरीवर सरी
कशी करू मोजदाद
कोलाहलात दुरून
तुझ्या कवितेची साद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर....
सुंदर....
आवडली. कातर आहे.
आवडली. कातर आहे.
काही ओठी उमटले
काही ओठी उमटले
काही पापण्यांचे झाले >>>>> केवळ !!
आवडली, छान लिहिलेय.
आवडली, छान लिहिलेय.
प्रतिसाद देणाऱ्या सर्व कविता
प्रतिसाद देणाऱ्या सर्व कविता-रसिकांना धन्यवाद.