झोरान झिवकोविचचे TWELVE COLLECTIONS AND THE TEASHOP हे भन्नाट पुस्तक हातात पडले आणि पहीलीच कथा “Days” ही कथा वाचून भारावून गेलो. आपले सुदैव असे कि ह्या पुस्तकाला Michael Moorcock ह्या लेखकाने प्रस्तावना लिहिली आहे, Fantasy ह्या नव्या लेखनप्रकाराची ओळख करून दिली आहे. एके काळी नगण्य मानला गेलेला आणि नाके मुरडली गेलेल्या ह्या वाङ्मयप्रकारात अनेक हेवी वेट साहित्यिकांनी लेखन केल्यामुळे ह्याॉला थोडीतरी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. ह्या संग्रहातील बारा कथा ह्या माणसाच्या संग्रह करणाच्या वृत्तीबद्दल भाष्य करतात. Moorcock ने ह्या प्रवृत्तीचे छान विश्लेषण केले आहे. माणूस का म्हणून निरुपयोगी गोश्तीन्चा गराडा आपल्या सभोवती का उभा करतो? Moorcockच्या मते काळाची गती धीमी करून मृत्यू ला आपल्या पासून दूर ठेवण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे द्योतक आहे. ह्या बारा कथांना एकत्र जोडणारे हे सूत्र आहे,
रशिया आणि पूर्व युरोप मधल्या साहित्याबद्दल आपल्याला अगदी त्रोटक माहिती आहे. पण आता हे साहित्य इंग्रजीत भाषेत अनुवादित झाले असल्याने ही दारे उघडायला लागली आहेत. प्रस्तावनेत अजूनही बरेच काही वाचनीय आहे.
झोरान झिवकोविचचे वैशिष्ठ्य असे आहे कि कथा पूर्ण वाचली तरी आपल्याला नायकाचे नाव, गावाचे नाव, रस्त्याचे नाव, हॉटेलचे नाव ह्याचा पत्ता लागत नाही. लेखकाला त्याची गरज वाटत नसावी त्याच्या मुले कथेला यूनिवर्सल स्थान प्राप्त होत असावे. जणू कथा कुठल्याही जगात कुठल्याही काळी घडू शकते, स्पेस आणि टाईम पार करून जाते. पाश्चिमात्य कथा मध्ये बारीक सारीक डीटेल्स वर भर दिलेला असतो, ह्या बद्दल नंतर बोलता येईल.
आता कथेकडे वळूया,
नायकाला आज काहीतरी गोडधोड खायची इच्च्छा आहे. म्हणून तो केक आणि पेस्ट्री च्या कॅफेकडे वळतो. इथून कथेची सुरवात होते. कॅफेमध्ये जाम्भळ्या रंगाचे प्राबल्य आहे, पहा झोरानने किती मोजक्या शब्दात वर्णन केले आहे,
“WHEN I ENTERED THE PASTRY SHOP, a purple wave swept over me. Almost every surface was in some shade of this color: the wallpaper, curtains, rugs, tablecloths, chair covers. So were the shades on the lighted table lamps. The muted light gave even the air a purple tint...”
मेनू मधल्या आयटेम्सची नावे पहा.
“livid lightning rod” “shambling violin” “absent-minded bumblebee”
“enamored water lily” ही जरा काव्यमय आहेत पण “stinky grater”, “putrid acrobat” or “cheerful carcass” ह्याला तुम्ही लाय म्हणाल. ही खास झोरान खासियत आहे, “Teashop” ह्या कथेतही चहाची अशीच नावे आहेत.
हॉटेलचा शेफ समोर येऊन बसतो.
“कुठला आयटम खायची इच्छा आहे?”
“मला काहीतरी चवदार आणि गोड खायची इच्छा आहे, युम्हीच काही शिफारीश का करत नाही?”
“आहे अशी एक चीज आहे, stuffed monkey.तुम्ही कधी खाल्ली आहे?”
“पण तुमच्या ह्या मेनू मध्ये हा आयटेम नाहीये. “नायक जरा चक्रावून बोलतो.
“कसा असेल? कारण मेनू मध्ये प्रत्येक पदार्थाची किंमत लिहावी लागते. ह्या डीशची किंमत पैशात लीहिता येणार नाही.”
“का बरे?”
“कारण प्रत्येक डिशच्या बदली तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एक दिवस मला द्यावा लागेल.
तुमच्या आयुष्यातून एक दिवस पुसला जाईल आणि त्याच्या जागी पोकळी निर्माण होईल.विचार करा.”
नाटक विचार करतो, “एकाच तर दिवस ना.”
तो stuffed monkey खायला तयार होतो.
शेफ म्हणतो, “थांबा, मी तुमचा दिवस साठवण्यासाठी कुपी घेऊन येतो, विचार करा आणि मला एक दिवस द्या. कुठलाही द्या, तुमची निवड.”
नायक विचार करतो. आणि stuffed monkeyचा एक तुकडा तोंडात टाकतो.
अहाहा, अहाहा! काय चव आहे. अगदी स्वर्गीय, समोरची प्लेट साफ करून तो दुसरया प्लेटची ऑर्डर देतो.
“सॉरी, दुसरी नाही मिळणार.”
“पण मी माझाआजून एक दिवस द्यायला तयार आहे ना.“
“तरीही नाही. एकदा का ह्या डिशची चटक लागली कि खाणाऱ्याची हाव वाढत जाते. भूतकाळातले सगळे दिवस एक एक करून संपुन जातात, आठवणी सरत जातात, मागे उरते ती निव्वळ पोकळी. रिते पणा अशी पोकळ माणसेही अदृश्य होतात. इथेच भिराभिरत रहातात.”
नायक काय समजायचे ते समजतो. उठून बाहेर चालता होतो.
ही कथा मी माझ्या शब्दात वर्णन केली आहे. नसेल आवसली तर तो माझा दोष समजा, आवडली असेल तर मग झोराननेच लिहिलेल्या “लायब्ररी “ नावाच्या कथेचा नितीन रिंडेनी मराठीत अनुवाद केला आहे तो वाचा. ह्या पेक्षा अधिक नाही सांगणार. नाहीतर म्हणाल कि हा तर त्यांचा एजंट दिसतो आहे.
तर माणूस म्हणजे काय?
समाला पक्या तुमचा मित्र आहे. त्याची दाढ खूप दुखत होती. डॉक्टरने त्याची दाढ काढून त्या जागी दुसरी दाढ बसवली.
पक्या बदलला का? नाही पक्या पक्याच राहिला.
पक्याला चष्मा लागला. पक्याला हिअरिंग एड लावले. प्पायाच्या हाडाच्या जागी स्टीलचा रॉड टाकला. मूत्र पिंड रोपण झाले. नवीन हृदय टाकले.
पण आपला पक्या पक्याच राहिला.
पक्याच्या मेंदूत ८६ ते१०० बिलिअन मज्जा पेशी आहेत. एकेक करत डॉक्टरांनी त्या कृत्रिम पेशींनी बदलल्या. पण पक्या नाही बदलला.
पण एके दिवशी मात्र कहर झाला. डॉक्टरांनी पक्याच्या जुन्या आठवणी काढून त्या जागी नव्या आठवणींचा सेट टाकला.
आता पक्या आपली ओळख विसरला. आपल्याला बघून “तुम्ही कोण ?” म्हणायला लागला. एका मोठ्या कंपनीचा CEO झाला आहे. इंग्रजीत एक वाक्यही धड बोलता न येणारा पक्या आता अस्खलित इंग्रजी बोलायला लागला.
हा पक्या आपला नाही. आपली आठवण तो आता विसरला आहे.
तर आपल्या आठवणी जपून ठेवा. कडू गोड कशाही असल्या तरी त्या आपल्या आहेत. ह्या जगात शेवटच्या क्षणापर्यंत आपला साथ देणारी एकच गोष्ट आहे.
ते आहेत आपले आठवणीचे दिवस!
आठवणींचे दिवस.
Submitted by केशवकूल on 23 April, 2026 - 10:47
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान ओळख. आणि तुम्ही अनुवादित
छान ओळख. आणि तुम्ही अनुवादित केलेल्या दोन कथाही छान आहेत.
छान सारांश
छान सारांश
.....Moorcockच्या मते काळाची गती धीमी करून मृत्यू ला आपल्या पासून दूर ठेवण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे द्योतक आहे. ह्या बारा कथांना एकत्र जोडणारे हे सूत्र आहे,.
अखेरीला नकार देत
नकार घेत वाढते शरीर
काडीचाच आधार मागत
गाठू पाहते पैलतीर
आरती प्रभु
माबो वाचक, आभार. कुठल्या दोन
माबो वाचक, आभार. कुठल्या दोन कथा म्हणताहात ? एक तर मी भाषांतर केलेले नाही, मूळ कथेचा गाभा पहाडून अगदी अगदी थोडक्यात माझ्या शब्दात कथा सांगतो.
महान लेखकांनी एव्हढे इतके काही लिहून ठेवले आहे. हा ज्याच्या त्याच्या आवडीच्या भाग आहे.
दसा
thabks, त्या चार लाइनींसाठी!
गल्लीतल्या वळणाशी एक दुकान
गल्लीतल्या वळणाशी एक दुकान होतं,
नाव नव्हतं त्याला, फलक नव्हता;
फक्त उकळत्या वाफेतून
एक मंद सुगंध उठत होता.
मी आत गेलो.
कपांच्या रांगेत वेळ ठेवलेली,
बरण्यांत जुन्या आठवणी,
आणि काचेआड काही हरवलेले दिवस.
दुकानदार हसला हलकेच,
म्हणाला, “काय हवं तुम्हाला?”
मी म्हणालो, “शांतता द्या थोडी,
आणि विसरलेलं काही असेल तर ते.”
त्याने कपात चहा ओतला,
रंग होता सांजवेळेसारखा;
पहिला घोट घेताच
बालपण दाराशी येऊन बसलं.
दुसऱ्या घोटात भेटले
कधी न बोललेले शब्द सारे;
तिसऱ्या घोटात डोळ्यांत दाटले
जुन्या पावसाचे थेंब वारे.
मी विचारलं, “किंमत किती?”
तो म्हणाला, “इथे पैसे लागत नाहीत;
फक्त जे जपून ठेवलंय,
ते इथे ठेवून जावं लागतं.”
मी बाहेर आलो तेव्हा
हात रिकामे, मन भरलेलं;
आणि मागे वळून पाहिलं तर
दुकान कुठेच नव्हतं उरलेलं.
नितनवे
नितनवे
!
हे या लेखाचे भाग्य कि तुम्ही ही कविता इथे लिहिली.
अत्यंत आभारी आहे.
@केशवकुल धन्यवाद! छान पुस्तक
@केशवकुल धन्यवाद! छान पुस्तक परिचय. Kafka, Borges शैलीचं वाटतंय, वेळ काढून वाचायला हवं.
नितनवे सुंदर काव्य...
नितनवे
सुंदर काव्य...
नितनवे
नितनवे
हे पहा. हे आपल्या आवाक्यातले आहे,
'द लायब्ररी'- पुस्तक परिचय
by संप्रति१
https://www.maayboli.com/node/86161
असे अनुवाद अजून यायला पाहिजेत.
छान ओळख. नितनवे सुंदर काव्य.
छान ओळख.
नितनवे सुंदर काव्य.
ओळख आवडली.
ओळख आवडली.
हा लेखक वाचनयादीत आहेच.
तो हॉटेलमधला सीन, कुपी इत्यादी वाचून BEFORE THE COFFEE GETS COLD पुस्तकाची आठवण झाली.
शर्मिला ललिता-प्रीति
शर्मिला ललिता-प्रीति प्रतिसादा बद्दल आभार.
BEFORE THE COFFEE GETS COLD Noted.
ह्या संग्रहातही Teashop नावाची दीर्घ कथा आहे.
त्या बद्दल स्वतंत्रपणे लिहावे लागेल.
सुंदर कविता, नितनवे!
सुंदर कविता, नितनवे!
आणि छान पुस्तक परिचय, केशवकुल.
ही कविता तुमच्या परिचयात इतकी छान बसली आहे, की तुमचाच लेख प्रतिसादात वाढवून लिहिल्यासारखे वाटते.
>>>तो हॉटेलमधला सीन, कुपी
>>>तो हॉटेलमधला सीन, कुपी इत्यादी वाचून BEFORE THE COFFEE GETS COLD पुस्तकाची आठवण झाली.
होय माबोवर वाचून ते पुस्तक आवर्जुन विकत घेउन वाचले होते. परत शोधले पाहीजे.
BEFORE THE COFFEE GETS COLD
BEFORE THE COFFEE GETS COLD Noted.
पुस्तक परिचय : Before the Coffee Gets Cold (Toshikazu Kawaguchi)
https://www.maayboli.com/node/80959
ह्या संग्रहातही Teashop नावाची दीर्घ कथा आहे.
एका अनोळखी स्येषण वर एक तरुणी, तिची ट्रेन उशिरा आकेकी आहे त्यामुळे कनेक्टिंग ट्रेन हुकते आणि आता अडीच तासानंतर पुढची ट्रेन येणार असते. तो पर्यंत वेळ कसा काढायचा? ती आपले सामान लगेज रूम मध्ये टाकून तिथल्या क्लार्क कडून पावती घेऊन स्टेशन मधून बाहेर पडते. वेळ घालवणे ह्या एकाच उद्देशाने ती समोरच्या Teashop मध्ये शिरते खिडकीपासाची जागा पकडून बाहेरची मजा बफ्हात असते. त्या जागी तिला ओळखणारे कोणीही नसते त्यामुळे ती बिनधास्त असते. teashop मध्ये आधीच काही लोक बसले आहेत.
वेटर येऊन तिच्या समोर मेनू ठेवतो. कधीही नऐकलेल्या चहाची नावे मेनूत असतात. उदा.
here was tea made of cabbage (a “salutary digestive”),spinach (“relieves the pain of spondylosis”) and carrots (“helps fight anemia”). nettle tea was thought to improve one’s memory and moss tea purportedly calmed tense nerves, while papyrus tea rekindled the flames of desire.
वेटरला बोलावून ती Tea made of stories, ऑर्डर करते. teashop माद्गले लोक , काशिअर माना वळवून तिच्याकडे बघत रहातात. वेटर "चहा" घेऊन येतो आणि तिच्या समोर बसतो. ती आता गोंधळली आहे.
"मादाम तुम्ही Tea made of stories ऑर्डर केला आहे ना! मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे."
हॉटेलमधले सगळे जन एकेक करून तिला गोष्ट सांगतात,
त्या कथा मी इथे लिहिणार नाहीये,
सगळ्यांचे कथाकथन झाल्यावर ती रिकाम्या कपाकडे बघत रहाते. पर्स मधून ती सामानाची पावती काढते. उभी राहून हात उंच करून ती पावती सगळ्याना दाखवते, सगळे बघत असताना ती पावती फाडते, पावतीचे तुकडे टोपलीत फेकून ती बाहेर पडते,
No nore comments from me.
कथेचा परिचय खूप आवडला!
कथेचा परिचय खूप आवडला!
Oh.
Oh.
We are in luck!
तुम्ही ही कथा पूर्ण इथे वाचू शकता.
https://worldliteraturetoday.org/2011/november/teashop
रोचक कल्पना आहे.
रोचक कल्पना आहे.
नितनवे, सुंदर.
नितनवे, सुंदर.
तुम्ही दिलेली Zoran Živković
तुम्ही दिलेली Zoran Živković ची टीशॉप कथा वाचली केकू. बरीच मोठी आहे म्हणून बाजूला काढून ठेवली होती. मला खूप, खूप दिवस लागतात वाचायला. इंटरेस्टिंग आहे, वेगळी आहे. सर्बियन लेखकाचे आधी कधी काही वाचले नव्हते, काही तरी वेगळे वाचायला मिळाले. धन्यवाद.
बरेच लूप आणि छोटे छोटे कथानक आहेत, जे तुकड्यात सुद्धा रोचक आहेत. त्या सगळ्या छोट्या कथा उत्कंठावर्धक आहेत, आणि शेवटी वर्तुळ पूर्ण होते. काही भाग परत जाऊन वाचावा लागला कारण वेगवान कथा आहे. आवडली.
Thanks
Thanks
सध्या अशाच भारी भारी कथा वाचत आहे. काल Mathesonची "ghost ship" ही कथा वाचली. आपुले मरण देखिले म्या डोळ्या. असा काहीसा विषय आहे. Charles Beaumont ची "vanishing american" आणि "perchance to dream" ह्या दोन अगदी निराळ्या कथा वाचल्या. "vanishing american" ही मिलाक्रा ह्या themeवर आहे. तर "perchance to dream" ही मनो वैज्ञानिक कथा आहे.
https://archive.org/details/the-twilight-zone-1959-s-01-e-00-original-pi...
बघण्यासारखा एपिसोड आहे.
केकू तुमच्या रेकमंडेशन्स चा
केकू तुमच्या रेकमंडेशन्स चा एक धागा काढा. कधी तरी या सर्व साय- फाय आणि अद्भुत कथा वाचायच्या आहेत.
सॉरी ते "ghost ship"
सॉरी ते "ghost ship" नाहीये , "death ship" असे पाहिजे.
कथेची लिन्क
https://novel12.com/shock/death-ship-116251.htm
आणि विदिओ लिंक
https://dn720400.ca.archive.org/0/items/the-twilight-zone-1959-s-04-e-16...