Submitted by उपाशी बोका on 9 April, 2026 - 12:25
आधीच्या भागात २००० प्रतिसाद झाले म्हणून नवीन धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या भागात २००० प्रतिसाद झाले म्हणून नवीन धागा.
हा धागा उघडून इतके तास झाले
हा धागा उघडून इतके तास झाले तरी इथे एकही प्रतिसाद नाही. हा मला बसलेला कल्चरल शॉक.
कल्चरल/भाषिक शॉक -
कल्चरल/भाषिक शॉक -
"हम आज पोळा मनाते है" मी.
"हम भी हफ्ते मे एक बार पौवा करते ही है" विहिणबाई.
.
"मैं आज एकदम नवरी हू" विहिणबाई.
"तुम कैसे...... तुम्हारी बेटी बनेगी नं नवरी....." अर्थातच मी.
#गुजरात-महाराष्ट्र
दुसरा कळला नाही.
दुसरा कळला नाही.
दुसरा कळला नाही.>> गुजराती
दुसरा कळला नाही.>> गुजराती भाषेत नवरी म्हणजे रिकामी (रिकामटेकडी).
अच्छा
अच्छा
मी आधीच्या धाग्यावर लिहिलं
मी आधीच्या धाग्यावर लिहिलं तसं - माझ्यावर आपल्या संस्कृतीचे संस्कार जरा कमी झाले, त्यामुळे मला काही कल्चरल शॉक्स बसले.
आमच्या एका परिचितांनी प्रथम आईवडिलांच्या घरातून , मग भाड्याच्या आणि त्यानंतर स्वतःच्या विकतच्या घरी राहायला गेल्यावर मी आईबाबांना मुद्दाम त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. आईचे वय तेव्हा ८० च्या जवळपास असेल. यजमान माझ्याच वयाचे.
तर यजमानीणबाईंनी माझ्या आई पहिल्यांदाच त्यांच्या त्या घरी आली म्हणून तिची खणानारळाने ओटी भरली. हाच प्रकार माझ्या मावसबहिणीकडे झाला. ती आईपेक्षा १८ वर्षे लहान.
माझ्या आईला कुंकवाची अॅलर्जी होती. खाज येई आणि चट्टे पडत. त्यामुळे ती कोणाकडे गेली की हळद कुंकू लावून घेत नसे. पण आमच्याकडे कोणी आल्या की त्यांना जाताना हळद कुंकू लावायलाही तिला सुचत नसे. काही पाहुण्यांसाठी हा कल्चरल शॉक असू शकतो.
निघताना कुंकू लावायची प्रथा किती महत्त्वाची आहे, ते इथे पहा
माझी आई डिसेंबर २०२० मध्ये
माझी आई डिसेंबर २०२० मध्ये गेली. त्यावेळी फार कोणी भेटायला येऊ शकलं नाही. काही काळाने माझ्या दोन बहिणी भेटायला आल्या. एक मावसबहीण. एक आतेमामेबहीण (आईच्या आतेभावाची मुलगी). आत्या सवाष्ण गेली. नशीबवान होती. हे ती माझ्या मावसबहिणीसमोरच म्हणाली, जिचे यजमान जाऊन १७-१८ वर्षे झाली असतील.
मी इंदूरला राहत असताना
मी इंदूरला राहत असताना पाहिलेला प्रसंग.
शेजारच्या एक बाई अमावास्येला शिधा (डाळतांदूळ असावेत) आणून माझ्या लँडलेडीला देत. आणि वाकून नमस्कार करत.
मी विचारलं की तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या बाई तुम्हांला वाकून नमस्कार करतात, तर तुम्हांला विचित्र वाटत नाही का?
त्या म्हणाल्या. नाही. आम्ही ब्राह्मण आहोत, म्हणून त्या शिधा देतात आणि नमस्कार करतात.
हा शिधा त्या आपल्या मोलकरणीला देत.
ऑफिसात एका अभ्यागताने मी त्यांचं काहीतरी लहानसंच काम केल्यावर मला आशीर्वाद दिले आणि यह ब्राह्मण का आशीर्वाद है, जाया नही होगा की असंच काहीतरी खणखणीत आवाजात सांगितलं.
कट टु लँड लेडी आणि लँड लॉर्ड. त्यांच्या नात्यातल्या कोणाचातरी मृत्यू वेगळ्या शहरात झाल्याची बातमी आली. त्यांनी घरात जे शिजवलेलं अन्न होतं, ते टाकून दिलं. घरातलं पीठही टाकून दिलं म्हणे. म्हणजे कच र्यात टाकलं की आणखी कोणाला दिलं ते माहीत नाही. कारण त्या दिवसापुरतं पीठ त्यांनी माझ्याकडून नेलं. गंमत म्हणजे दोन्ही घरं , त्यांचीच आणि आतून जोडलेली होती.
निघताना कुंकू लावायची प्रथा
निघताना कुंकू लावायची प्रथा किती महत्त्वाची आहे, ते इथे पहा>>>>>भरत, अगदी हाच संदर्भ मी देणार होतो. लहानपणी पाहिलेल्या या चित्रपटातील प्रसंग अगदी मनात रुतून बसला आहे.
लग्नाचा बस्ता बांधणे (?) हा
लग्नाचा बस्ता बांधणे (?) हा बहुधा पुण्यात मोठा प्रकार असावा. काय काय खरेदी केली ते जवळच्या नातेवाईक+मैत्रिणींना एकाचवेळी दाखवतात.
लांबच्या नात्यातील एक बाईने आईला लग्नाचा बस्ता उघडायला सांगितला. 'मामी, तुमच्या शुभ हस्ते बस्ता उघडा. त्यावेळी पपा हयात होते. 3-४ वर्षांनी त्याच बाईच्या मुलाचे लग्न ठरले.मधल्या काळात पपा वारले होते. या बस्त्याच्या आईला बोलावले नव्हते. व्यक्ती तीच, पण नवऱ्याच्या हयात असण्यानसण्यावर तिचे हात शुभ अशुभ ठरले.
कल्चरल शॉक बसला नाही. पण सखेद हसू आले.
भरत,
भरत,
किती वर्षांनी पाहिला असेल हा चित्रपट.
एक खाद्य संस्कृतिक शॉक
आपल्याकडे हॉटेलमध्ये गेल्यावर आपण जो मसाला पापड मागवतो. तो साधारणतः एक मोठा तळलेला/ भाजलेला पापड/ खिचा त्यावर बारीक कापलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर तिखट मीठ चाट मसाला असा असतो.
इंदूरला गेल्यावर पहिल्या दिवशी आम्ही हॉटेलात मसाला पापड मागवला तर त्यांनी एका प्लेटमध्ये भाजलेल्या पापडांची चळत आणि दुसऱ्या वाटीत बारीक कापलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर तिखट मीठ चाट मसाला असा मसाला दिला. आम्ही एकमेकांकडे पाहून हे काय आणलसं? अस विचारलं. तर म्हणे ये मसाला और ये पापड.
आम्हाला वाटले त्याला नीट कळलं नाही म्हणून गुपचुप खाल्ल. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो तर असाच प्रकार. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या हॉटेलमध्ये गेल्यावर असाच प्रकार.
मग शॉक नक्की कितव्या दिवशी
मग शॉक नक्की कितव्या दिवशी बसला?
(No subject)
एकदा पाणीपुरी ऑर्डर करून
एकदा पाणीपुरी ऑर्डर करून बघायची होती
>>>>>>पण सखेद हसू आले.
>>>>>>पण सखेद हसू आले.
हळद कुंकू, सवाष्ण आदि खूप मूर्खपणाचे धंदे आहेत आपल्या धर्मात. फक्त बायकांकरता बर्का!!
आमच्या सोसायटीला पाच विंग्ज
आमच्या सोसायटीला पाच विंग्ज आहेत. प्रत्येक विंगला तळ+ चार मजले. प्रत्येक मजल्यावर समोरासमोर दोन घरं.
आमच्या बाजूच्या विंगमधल्या एका काकींची मोलकरीण त्यांनी दिलेलं संक्रांतीचं वाण आमच्याकडे घेऊन आली. इतक्या वर्षांत त्यांनी माझ्या आईला वाण दिल्याचं मी पाहिलं नव्हतं. म्हणजे दिलं नव्हतंच. त्यांना फोन करून विचारलं की तुमची कामवाली हे घेऊन आली आहे. तर त्या म्हणा ल्या की हे माझ्या मुलीने पाठवलं आहे आणि ते तुमच्या समोरच्या काकींना द्यायचं आहे.(त्याच त्या समोरच्या घरात वाण देताना हळदीकुंकवाच्या पुड्या देणार्या) . आमची या वाण पाठवणार्या काकींच्या कुटुंबासोबतची ओळख समोरच्या काकींपेक्षा ९ वर्षे जुनी.
त्यामुळे मला डबल शॉक. एकतर संक्रांतीचं वाण मोलकरणीसोबत पाठवायचं. आणि दोन शेजार्यांपैकी एकीलाच द्यायचं. याचं जातीशिवाय दुसरं कारण मला सुचलं नाही.
माझ्या सोबत एका साईटवर एक
माझ्या सोबत एका साईटवर एक नेदरलँड चा ७० वर्षीय होता, त्याचा कुटुंब परीचय चालला होता, त्याने सांगितले की “she is still with me” हे तो एखादी अचिव्हमेंट मिळवली असे सांगत होता, ह्यात काही विशेष नाही असे मला वाटल्याचे त्याला जाणवले व तो चूप बसला. नंतर त्याने मला लग्नाबद्दल विचारले, नाही झाले सांगितल्यावर तो बोलला की gf? नाहीये म्हटल्यावर तो बोलला की तुझे लग्न कसे होईल? मी त्याला सांगितले, माझे आईवडील माझ्यासाठी मुलगी शोधून आणतील नात्यातून आणी लग्न लावतील, ह्यावर तो चालता चालता थांबून विचार करून मला बोलला, “How they know you will be happy with her?” इथे अशीच system आहे सांगितल्यावर त्याला धक्का बसला. आम्ही दोघे शिर्डीला गेलो, तिथल्या मंदिरात वशिल्याने लवकर आत गेलो, डोके टेकवण्यासाठी चाललेली घाई गडबड नी रेटारेटी पाहून त्याला धक्का बसला, त्याने त्या गर्दीत घुसायला नकार दिला. तो प्रकार पाहून धक्का बसल्याचे त्याने सांगितले.
बाबासाहेबांचे 'जात नाही ती
बाबासाहेबांचे 'जात नाही ती जात' हे वाक्य किती चपखल होते याचा वारंवार प्रत्यय येत असतो.
गेल्या वर्षीच भारत भेटीत हा संवाद कानावर पडला, अगदी घरातच.
ही माझी मैत्रीण {नाव} {आडनाव} !
ओह {आडनाव} म्हणजे {जात} ना ?
हो, कसं ओळखलत ?
त्यात काय एवढ्सं ?, {जात} मध्ये {अ} {ब} {क} अशी तीनच आडनावे असतात बहुतेक करून .
हो ना !
हा संवाद ज्या दोघींमध्ये होता त्यांना काहीच शॉक बसला नाही , मी मात्र आता घरावर मोर्चा येइल की काय या ट्न्शन मध्ये !
भरत, आधी मला वाटलं होतं अशी
भरत, आधी मला वाटलं होतं अशी ही बनवाबनवीची लिंक असेल
वावे,
मग शॉक नक्की कितव्या दिवशी बसला?>>>>>
दररोज
वावे,
मला सुद्धा भरत यांच्या लिंक मधे हाच बनवाबनवी मधला सीन असेल असेल असे वाटले होते.
हळदीकुंकू आणि सवाष्ण किस्से
हळदीकुंकू आणि सवाष्ण किस्से माझ्याकडे इतके आहेत की दिर्घ कथा होईल

असाच आहे समाज, चिल करायचं आपण.. लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे.
>>>>असाच आहे समाज, चिल करायचं
>>>>असाच आहे समाज, चिल करायचं आपण.. लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे.
+१
अश्यांपासून दूर रहाणे हाच मार्ग असतो.
माझ्या लग्नापूर्वीच सासरे
माझ्या लग्नापूर्वीच सासरे वारले होते. एकदा माझ्या वाढदिवसाला आई, बाबा, साबा सगळेच होते. आईने औक्षण केले आणि ताम्हण त्यांच्याकडे दिले की आता त्या ओवाळतील. त्या म्हणाल्या की मी तुला हळदी कुंकू लावू का? तुला चालेल का? मला २ मिनिटं कळलेच नाही अश्या काय विचारतात. सुदैवाने बाबांच्या लक्षात आले. ते पटकन म्हणाले की अहो तुमचीच सून आहे ना? बिनधास्त लावा.
नंतर समजले की मध्यम वयात सासरे गेल्यावर घरातल्यांनी त्यांना इतका त्रास दिला होता की त्यांनी टिकली काय साधी पावडरही लावायची बंद केली होती.
पूर्वी फार होतं, माझी आजी
पूर्वी फार होतं, माझी आजी वडिलांची आई विधवा होती , चार माणसं जमली घरात तर तिच्याजवळ जेवायला ही कोणी बसायला तयार नसे. माझी आई नेहमी त्यांना आपल्याजवळ बसवून घ्यायची. असो.
अजून ही छूपं असेलच.
आताही आहे उघडपणे आहे
आताही आहे
उघडपणे आहे
तीव्रता कमी दाखवली जाते. की आम्हांला काय बाई चालतं.
भावना तीच!
दिखाऊपणा आणि pure intention feel होतं लगेच, हे त्यांना कळत नाही की काय देव जाणे!
अमेरिकेत आल्यावर बसलेला पहिला
अमेरिकेत आल्यावर बसलेला पहिला cultural shock म्हणजे मुलांना शाळेत फी हा प्रकारचं नाही.. सगळंच फ्री ..
आणि फुकट पब्लिक/ चार्टर स्कूल
आणि फुकट पब्लिक/ चार्टर स्कूल असताना देसी लोक अवाच्यासवा फी भरुन प्रायव्हेट स्कूलला मुलांना घालतात हा दुसरा शॉक असेल.
आणि फुकट पब्लिक/ चार्टर स्कूल
आणि फुकट पब्लिक/ चार्टर स्कूल असताना देसी लोक अवाच्यासवा फी भरुन प्रायव्हेट स्कूलला मुलांना घालतात हा दुसरा शॉक असेल.
>>>
मासे असे निरीक्षण आहे की
माझे असे निरीक्षण आहे की समाजातल्या स्त्रियांवरच्या या विचित्र अपमानास्पद निर्बंधांना स्त्रियाच जास्ती कर्मठपणे पणे जपताना दिसतात ; पुरुष त्या मानाने (जास्ती संख्येने) अशा प्रथा अजिबात न पाळण्याच्या समर्थनाच्या बाजूने असतात
+१ पशुपत,
+१ पशुपत,
महिला अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या ट्रांसफर करत असतात!
Pages