रुपये ५० हजार ते १ लाख मध्ये करता येणारे नाविन्यपूर्ण उद्योगांची कल्पना सुचवा

Submitted by सुमित बागडी on 4 February, 2026 - 01:00

रुपये ५० हजार ते १ लाख मध्ये करता येणारे नाविन्यपूर्ण उद्योगांची कल्पना सुचवा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१ शेव बनवणे
२. पाणीपुरी ची पुरी बनवणे
३ हॉटेलला लागणारे लोणचं, गोड सौप बनवणे
४ लॉजेसला लागणारे छोट्या आकाराचे साबण बनवणणे
५. हॉटेलचे बेडशीटस, टॉवेल्स धुवून इस्त्री करणे - लॉड्री
६ सायकल आणि स्टोव्ह रिपेअर
७. दुचाकी चारचाकी पंक्चर
८. किराणा दुकानात लागणारे जिन्नस पुरवणे
९ मॉलमधे लागणारे आयटम्स स्वस्तात खरेदी करून पुरवणे.
१०. पापड बनवून विकणे.
११. रेल्वेला लागणाऱ्या चपात्या बनवणे

थोडी अधिक माहिती द्यायला हवी.
तुमचे शहर, गांव, शिक्षण... तुमच्याकडे काय skills कौशल्य आहेत ज्याचा तुम्ही वापर करु शकाल ? सभोवतालचा अभ्यास झाला आहे का? नसेल तर करा. कुठला व्यावसाय चालेल ? कुठल्या वस्तूची (किंवा एखादी सेवा service ) मागणी आहे ? किंवा तुम्ही नव्याने निर्माण करु शकाल?

सायकल वर भाजी विकून किंवा अगदी छोट्या टपरीने सुरवात करुन आज शेकडो कोटीचे उद्योग धंदे उभारलेली उदाहरणे आहेत. एखाद्याला उद्योगांत यश / अपयश आले म्हणजे प्रत्येकालाच तसा अनुभव येत नाही. टायमिंग पण महत्वाचे आहे. पुढील प्रवासा करिता शुभेच्छा.

अजून एक
१२. एकाने घरपोच दूधाच्या पिशव्या पोहोचवण्याची सेवा सुरू केली. प्रत्येक पिशवीमागे एक रूपया. वर्षभरात त्याचे १००० कस्टमर्स झाले. नंतर त्याने मुलं ठवली. पहाटे तीन वाजता उठून वेगवेगळ्या दूधाच्या गाड्या आल्या कि पिशव्या घेणे. त्या पिशव्याचे डिस्ट्रीब्यूशन करणे आणि सात वाजेपर्यंत घरोघरी टाकणे यात कधी चूक झाली नाही. पाऊस थंडी मुळे काम अडले नाही. फक्त गाडी आली तर दुसऱ्या डेअरीचे दूध घ्यावे लागत होते. पण एकाही बाईने तक्रार केली नाही.

या कामातून त्याने किराणा दुकान टाकले. पिठाची गिरणी टाकली. आता पाणी फिल्टर करून जागोजागी एटीएम केंद्रे लावली आहेत.

भाकऱ्या आणि चपात्यांसाठी स्पेशल बाया (क्वचित बाप्ये) ठेवणे हॉटेलांना परवडत नाही कारण असे गिरहाईक कमी जास्त होते शिवाय बाजरी सारख्या भाकऱ्या खाणारे लोक कमी असतात. तांदळाच्या जास्त खातात जर होटल मासे वाले असेल तर.

त्यामुळे अशा भाकऱ्या/चपात्य/ फ्लॅट ब्रेड्स होलसेल मधे करून अशा हॉटेलांना विकणे (ज्या सर्व करताना गरम करता येतील), सकाळ संध्याकाळ दोन वेळेस.
त्यासाठी मशीन्स मिळतात आजकाल.

त्याच आउटलेट मधून रिटेल सुद्धा करता येते.

सांगली मधे होलसेल इडल्या विकणारे उद्योजक आहेत.

महान व्यक्तिमत्व. इन्स्टंट मार्गदर्शन.
मध्यंतरी दुबईला गेले होए. तेव्हां दुबईच्या फूटपाथवर कॅमेरा फिरवून इथेही मराठी माणसाला संधी आहे, तिथेही आहे असे सांगत होते.
https://www.youtube.com/watch?v=7cNdUTHb7HU
मराठी माणसाने ऐकले पाहिजे. नोकर्‍या सोडून व्यवसाय करा हे त्यांचे ब्रीदवाक्यं आहे.

कधी कधी वाटतं कि नामदेवरावांचे उधळलेले वारू जर रोखले नाही तर उद्योगांना कामगारच मिळायचे नाहीत. बाहेरून आणावे लागतील.

कुंभकोणमला गेलो होतो तिथे जागोजागी ( म्हणजे बरीच) दुकाने दिसली त्यात इडली डोसा पीठ रगडायची चार पाच यंत्रे लावून पीठ रगडत होते. म्हणजे ते तयार पीठ हॉटेलवाले लागेल तसे घेत असणार.

- बारसे, मुंज, डोहाळेजेवण, जेंडर रीव्हील पार्टी, वाढदिवस आणि तत्सम सोहळ्यांकरता घरात / हॉलवर डेकोरेशन करणे . फुगे , फुलं , दिव्यांच्या माळा आणि इतर मटेरियल लागेल पण याचा स्टॉक हळू हळू वाढवू शकता

-मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला डीजे आणि एण्टरटेनर पुरवणे ( फुग्यांचे प्राणी, फेस पेंटिंग , थोडी माफक जादू इ )

- घरगुती पार्टी साठी बार टेण्डर पुरवणे

- बाळंतविडा किंवा इतर गिफ्ट आर्टिकल्स बनवून विकणे

- समारंभासाठी साडी ड्रेपिंग / हेअर स्टाइलिंग / मेकप , ग्राहकांच्या घरी मेकप / ब्यूटी सर्विसेस

- ज्येष्ठ नागरिकांना थेरपी / डॉ अपॉइण्टमेण्त साठी नेणे आणणे

- स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेणे

मेंदी काढून देणे.
मध्यंतरी एका पोलिसाची बातमी वाचली होती. त्याच्याकडे मेंदीसाठी सहा महीन्याचं बुकिंग असतं. ड्युटी अवर्स सोडून रात्री, पहाटे तो मेंदी काढायला जातो. त्याची वेळ अ‍ॅडजस्ट करून घेतात पण त्याच्याकडून मेंदी काढली जाते. ( लग्नात). असं काही कला कौशल्य आहे का ?

असा धंदा पाहिजे की ज्याला नेहमी डिमांड असेल त्यामुळे तुमच्या जवळच्या एरियात बघा तुमच्या बजेटनुसार कोणता धंदा तेजीत आहे, मग त्यानुसार तुमच्या एरियात तसा धंदा सुरु करा. एकदा धंदा नफ्यात आला आणि रिपीट कस्टमर जमले की त्याच्यात काहीतरी नाविन्य आणण्याच्या प्रयत्न करा.

सुमित बागडी
तुम्हाला व्यवसाय करायच आहे याबद्दल सर्वात आधी तुमचे अभिनंदन. तुम्हाला जे आवडेल तो व्यवसाय करा. याबाबतीत मी सल्ला देऊ शकत नाही. पण अशा पद्धतीने ठराविक बजेटमधे करता येणारा व्यवसाय सुचवा असे विचारून तुम्ही खरंच त्यातून व्यवसाय निवडणार आहात का ?

तुमचे मित्र, ओळखीतले कुणी व्यावसायिक असतील त्यांच्याकडे तुम्ही जाता का ? त्यांचे सल्ले घेता का ? तुम्ही कोणता व्यवसाय करायला जमेल, आवडेल याची यादी बनवली आहे का ? त्यासाठी लागणारे भांडवल पुरेसे आहे का ? बँकेच्या योजनांची, सरकारी योजनांची माहिती घेतली आहे का ? व्यवसाय करण्यासाठी त्या क्षेत्राचा जवळून अनुभव घेतलाय का ?

सोशल मीडीयात प्रश्न विचारणे पण चूक नाही. पण तुम्हाला नेमके काय करायचेय हेच माहिती नसेल तर तुम्हाला उपयोगी पडेल असा सल्ला कुणी देऊ शकेल असे वाटत नाही.

तुम्ही जे बजेट ठरवले आहे तेव्हढे तुम्ही उभे करू शकता कि एव्हढे पैसे लावून एखादा धंदा उभा करू म्हणून तसे बजेट ठेवले आहे ? दुसरी केस असेल तर थोडे पैसे का असेना ते अशा पद्धतीने धंदा करून बुडावेत हे योग्य नाही. उत्पादन करणार असाल तर उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत सखोल माहिती घेतल्याशिवाय धंदा करू नका. वर काही जणांनी तुमच्या भागात कोणत्या गोष्टीची डिमांड आहे हे बघा असे सांगितले आहे ते बरोबर वाटतंय.

तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा ! यशस्वी व्हा आणि कळवा.

रानभूली बरोबर सहमत.
हेच लिहायला आले होते, माझे टायपिंग चा वेळ वाचला Happy

सुमित बागडी
तुम्हाला व्यवसाय करावासा वाटतोय याबद्दल तुमचे अभिनंदन.
रानभूली यांचा सल्ला चांगला आहे.
पण कदाचित तुम्ही 'एकदा व्यवसाय करून पाहूया ' या विचारात असाल तर खाद्य व्यवसाय त्यातल्या त्यात बरा.
खाद्य व्यवसाय

प्रोसेस्ड स्नॅक्स या व्यवसायाला सुरुवातीला तरी बूस्ट मिळतो कारण लोकांना नवीन काहीतरी खाऊन बघायचे असते. घरगुती फ्लेवर्ड मखाणे, फ्लेवर्ड काजू , बदाम , घरी केलेले चॉकलेट्स ( बहुतांशी विकतचे चॉकलेट्स वेगवेगळ्या मोल्ड मध्ये घालून आकार देतात फक्त) किंवा आपले नेहेमीचे फराळी पदार्थ, लाडू, इतर पौष्टिक पदार्थ या वस्तू विकणे तुलनेने सोपे आहे.
किंवा विविध पिठे देखील तयार करून विकु शकतात.
तुमचे मित्र मैत्रिणी, आजूबाजूचे लोक किमान एक दोन वेळा नक्की घेतात. चव चांगली असेल तर त्याहून जास्त वेळा घेतात.
या सगळ्याचा उपयोग DTC विक्री अनुभव घेण्यासाठी चांगला आहे.
पण या ( तसे तर कोणत्याही) व्यवसायात ग्रोथ हवी तर खूप कठीण आहे. कारण त्यासाठी मॅन पॉवर, जागा , मार्केट रिच लागेल. ' पाटील काकी ' हा एक ब्रँड बघा , घरगुती पदार्थ विकून त्यांनी हा ब्रँड उभा केला आहे.
खाद्य व्यवसायासाठी तुम्हाला foscos चे एक लायसन्स किंवा सुरुवातीला किमान रजिस्ट्रेशन घ्यावे लागेल . ते ऑनलाइन मिळते. रजिस्ट्रेशन मिळणे सोपे आहे.

ज्वेलरी /, सेमी प्रेसियस स्टोन ज्वेलरी
Ha देखील एक सतत मागणी असणारा व्यवसाय आहे. फक्त यात सतत ट्रेंड बदलत असतात त्यामुळे त्यासाठी लक्ष देत रहावे लागते. बायकाना खूप व्हरायटी हवी असते त्यामुळे जास्त स्टॉक ठेवावा लागतो. यात एखादे निश शोधले जसे terracota ज्वेलरी, कॉपर ज्वेलरी वगैरे तर छान होईल.
सुरुवातीला यात कोणतेही लायसन्स लागणार नाही.

इतर व्यवसाय
तुमच्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट असतील तर लाकडी खेळणी, बांबूच्या वस्तू, रुरल भागात तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू यांचा विचार करू शकता. या विकणे तसे कठीण आहे. इथे एखादी इमोशनल स्टोरी, ngo बरोबर collab वगैरे लागेल.

व्यवसाय करायचाच आहे तर तुम्ही अशा छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू शकता. त्याला एक सहा महिने वर्षभराचे लिमिट ठेवा. त्या काळात अनुभव घेऊन, तुमचे हिरो प्रॉडक्ट शोधून निश मार्केट रिसर्च करू शकता. शिवाय या काळात मिळणारा प्रॉफिट, पुन्हा व्यवसायात गुंतवून फंड उभा करू शकता.
सरकारी योजना आणि लोन यांच्या मागे सुरुवातीला तरी जाऊ नये ( अर्थात ज्यांना मोठे manufactruring युनिट , शॉप, सुरू करायचे त्यांची गोष्ट वेगळी ) तुम्ही जे कमीत कमी बजेट घेऊन ( आणि probably कमी रिस्क घेऊन ) करायचं ठरवत आहात त्यासाठी लोन , योजना साठी जाऊ नका.
व्यवसाय चांगला असेल आणि पूर्णवेळ करायचा ठरवला की या योजना बघा. त्यात फंड मिळण्यासाठी भरपूर कागदपत्रे आणि पेशन्स लागतो.

व्यवसायासाठी शुभेच्छा.

शाळा कॉलेज आसपास विद्यार्थ्यांना फोटो कॉपी, प्रिंटआऊट्स, प्रोजेक्ट रिपोर्टचे बूक बाइंडिंग वगैरेंसाठी किती लांब जावे लागते तिथे किती चार्जेस घेतात, कुठल्या क्वालिटीचे प्रिंटआऊट्स त्यांना चालतात, त्याठिकाणी जवळच वगैरे टपरी असुन इथे प्रिंटिंगला देऊन तिथे मुलं चहा बिस्किटे खात गप्पा मारत थांबतात का वगैरे टेहळणी करावी. आणि जिथे मुलांना लांब जावे लागते तिथे जवळपास बल्क प्रिंटर घेऊन फोटोकॉपी, कलर प्रिंटिंग दुकान शक्यतो चहा टपरी जवळ काढता येईल का याचा विचार करावा. शक्य असल्यास चहा टपरी आणि प्रिंटिंग दोन्ही काढता येईल का हे सुद्धा पहावे. त्या सोबत ऑनलाइन रजिस्ट्रेशन्स (उदा: GST रजिस्ट्रेशन सोपे आहे, कुणासाठी कोणत्या प्रकारचे रजिस्ट्रेशन लागते याची व्यवस्थित माहिती करून घ्यावी), Encumberence certificate (सातबाराचा इतिहास) काढुन देणे असेही करता येईल.

मोबाईल रिपेअरिंगचे कोर्सेस असतात, ते करून मोबाईल रिपेअर आणि ऍक्सेसरीजचे दुकान काढता येईल का याचा विचार करावा.

हे करण्यापूर्वी त्या त्या दुकानात त्यांचे काय प्रोब्लेम्स असतात आणि गिर्हाईकांच्या काय तक्रारी असतात याची खुबीने माहिती काढावी. यासाठी तिथे जाऊन थोडे प्रिंटआऊट्स काढुन येणे, मोबाईलच्या दुकानात स्वस्तातील गोरिला ग्लास वगैरे बसवुन आणणे अशी माफक इन्व्हेस्टमेंट करावी.

प्रोसेस्ड स्नॅक्स वगैरे इतर किराणा दुकानातून विकायची असल्यास आपण त्याचे जे काही नाव ठेवले असेल, उदा. सुबा चकली तर आधी आपल्या मित्रमंडळींना सांगुन सुरवातीला पहिल्या दिवशी एकदा, दुसऱ्या दिवशी दोनदा, तिसऱ्या दिवशी गॅप चौथ्या दिवशी दोनदा असे सात आठ दिवस पाठवुन "सुबा चकली आहे का?" असे विचारायला लावायचे. मग एक दिवस आपण स्टॉक घेऊन जाऊन त्या दुकानांमध्ये आमची सुबा चकली ठेवता का विकायला, तिकडे चांगली खपत आहे सांगावे.
ती तिथे ठेवल्यावर दुकानात गर्दीच्या वेळी आपल्या पंटर्सना पाठवुन परत सुबा चकली है क्या असे खणखणीत आवाजात विचारायला, आणि मिळाल्यावर खणखणीत 'अरे वा, फार मस्तंय ही चकली आम्हाला तर फार आवडते' असे म्हणायला पाठवावे. ओव्हर ऍक्टिंग निक्षून टाळावी आणि परत त्याच दुकानात दुसरा अंक करू नये. चव, क्वालिटी ब कन्सिस्टन्सी अर्थातच मेन्टेन केलीच पाहिजे.

सावली पोस्ट चांगली आहे. पण जिथे संभाव्य ग्राहक बायका असतील तिथे मारवाडी चिकाटी असेल तरच तो व्यवसाय करावा. सर्वात किचकट गिऱ्हाईक असते ते. हां पण जर का तुम्ही आव्हान म्हणून स्विकारले आणि सतत बार्गेनिंग, नावं ठेवणे, टोमणे मारणे हे हसत हसत घेऊ शकलात, सतत बदलती डिमांड सॅटिस्फाय करू शकत असाल तर मग तुम कोणताही डी२सी व्यवसाय करू शकता.

एखाद दोन वर्षे कुठल्यातरी गॅरेजमध्ये कामाला लागून वेल्डिंग शिकून घ्या! फॅब्रिकेशनचा व्यवसाय टाका. चिकाटीने केला नी वाढवला तर हा व्यवसाय प्रचंड पैसा देतो!

माननीय नामदार नामदेवराव जाधव यांना भेटा.
नवीन Submitted by एक लेखक on 4 February, 2026 - 19:14

>>

ते मटण खाऊ नका म्हणतात. त्यातून वाचलेल्या पैश्यातून मर्चिडिज घ्या म्हणतात.