मायबोलीवरचे लेखन सुरक्षित करता येईल का?

Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2013 - 23:22

नमस्कार.

मायबोलीवर आपण जे लेखन करतो ते प्रताधिकार कायद्याखाली येऊ शकत नसावे असा माझा अंदाज आहे. त्यामुळे, ते लेखन कोणी जसेच्या तसे पूर्वपरवानगीशिवाय इतरत्र प्रकाशित केले (मूळ लेखकाचा नामोल्लेख करून अथवा न करून ) तर त्यावर मूळ लेखक किंवा मायबोलीकडून विरोध व्हावा / होईल अशी शक्यता ते लेखन इतरत्र प्रकाशित करणार्‍याच्या मनात येईल असे वाटत नाही.

मी पहिल्या वाक्यात वर्तवलेला अंदाजच चुकीचा असला, म्हणजे प्रताधिकार कायदा लागू होत असला तर प्रश्नच निराळा!

पण तो अंदाज जर बरोबर असला, तर ते मान्य करूनही मनात एक धोक्याची घंटा वाजत आहे की आंतरजालावर आपण केलेले लेखन कोण, कधी, कसे व कुठे प्रकाशित करत असेल व त्याचे काय परिणाम होत असतील, होऊ शकतील.

मायबोली प्रशासनाकडून अशी अपेक्षा व्यक्त करता येईल का की सदस्यांच्या लेखनाचे इतरत्र पुनर्प्रकाशन (त्याच सदस्यांशिवाय इतरांनी) केल्याचे समजल्यास मायबोली त्यावर काही विरोध दर्शवणारी भूमिका घेईल.

(हे अ‍ॅडमीन महोदयांना विपूतून विचारू शकलो असतो, पण सर्वांना आपले मत देता यावे म्हणून जाहीर लिहीत आहे. असे लिहिणे गैर असल्यास अथवा या विषयावर पूर्ण चर्चा आधी कोठे झालेली असल्यास हा धागा अ‍ॅडमीन महोदयांनी कृपया रद्द करावा).

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखन चोरीला जाऊ नये या उद्देशाने काढलेल्या धाग्यावर लेखन चोरायच्या युक्त्या सांगितल्या जात आहेत. >> Lol कसंही चोरता आलं तरी 'रेजिंग द बार' हे करतच रहायचं असतं.

(लिखाण ब्रेक चालू आहे, पण लिहावं लागलं.तुमच्या प्रतिसादाना प्रतिसाद देऊ शकणार नाही त्याबद्दल आधीच माफी मागते.)
या बाईंनी माझ्या लेखातले 4 पॅरा तसेच्या तसे कॉपी करून वर स्वतची 2 वाक्य टाकून लेख स्वतःचा म्हणून खपवला.हे एका मैत्रिणीने माझ्या लेखाची लिंक देऊन सांगितल्यावर तिथे 'मी असं सगळं नेहमी लिहीत असते, इथे लिहिलेलं मी इतर कुठे कुठे वाचलंय,माझ्या वॉल वर आधी पण मी असे लेख लिहिलेत, चेक करा' वगैरे उत्तरं दिली.कमेंट उडवून टाकल्या.
1. बाई किमान पूर्ण लेख कॉपी करून 'इतरत्र वाचलेला' लिहू शकल्या असत्या.
2. स्वतः लिहिला असं दाखवायला स्वतःची 2 वाक्य टाकणं ही सराईत चोरी आहे.
3. लेख चोरायच्या लायकीचा आहे असा दावा मी मुळीच करत नाही.स्क्रॅप उर्फ भंगार चोरी करणारेही जगात अस्तित्वात आहेत
https://www.facebook.com/share/8ZHVT3G7QQarKz4p/
https://www.maayboli.com/node/50929

जमल्यास, भूमिका पटल्यास तिथे कमेंट लिहा, मूळ लेखाची लिंक देऊन.मीही लिहिते थोड्या वेळात.
Screenshot_2024-12-10-11-36-45-174_com.android.chrome.jpg

सपोर्ट केल्यास आगाऊ(ऍडव्हान्स) धन्यवाद.बाई इतक्या निर्ढावलेल्या आहेत की ज्यांनी लेखाची लिंक दिली त्यांच्या कमेंट डिलीट करून व्यक्तिगत संपर्क करून 'तिथे वाद नको म्हणून कमेंट डिलीट केली, मी असे लेख लिहीत असते,तो माझाच ओरिजिनल आहे, हा माझ्या आधीच्या लेखाचा दुसरा भाग आहे' असं सांगत आहेत.माझ्या मैत्रिणींनी, भरत यांनी वेळात वेळ काढून लिहिलेल्या कमेंट डिलीट करणे(अजून काही कमेंट ठेवल्या आहेत, पाहिल्या नसाव्या) हा मूळ लेख कॉपी करण्यापेक्षा मोठ्या लेव्हलचा बेरडपणा आहे.तेथे कमेंट केल्यास उडेल.स्क्रीनशॉट काढून ठेवा.

धन्यवाद, पोस्ट उडवली आहे.या आधी बाईंनी व्यक्तिगत निरोपात एका मायबोलीकर मैत्रिणीशी खूप वाद घातला, 'मी लेख आधी लिहिलाय, दुर्दैवाने माझ्याकडे प्रूफ नाहीत,नोटपॅड मध्ये लिहिला होता' म्हणून.
लेख उडाला हे आवडलं.फेसबुक कमेंट्स, व्यक्तिगत पाठपुरावा केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पेन इज मायटीयर डॅन सोर्ड' हे वाक्य नव्याने पटलं.

ईरा या ब्लॉगवर मायबोलीवरची सुपरमॉमची हक्क कथा almost word तो word ढापली आहे फक्त characters बदलेले आहेत. अगदी संवाद सुद्धा सारखेच आहेत.
https://www.facebook.com/100044448998878/posts/pfbid0YwtzXeZyREnuiXyWnyk7wFcDhBYsXBq3ZQSfuJWfc3NAVW4DsnqB3BM717QiKXDsl/?app=fbl

लेख उडाला छान झाले
त्यांनी अजूनही कोणाचे काही चोरले असावे.
सगळे मालक वाद घालायला धावत आले किंवा आपण त्या सर्व चोरी शोधून तिथे दाखवल्या तर लोकांना समजेल की त्याच बाई चोर वृत्तीच्या आहेत.

एक प्रश्न सार्वजनिक रित्या विचारावा कि न विचारावा म्हणून राहून गेलाय. आता मात्र विचारावाच लागतोय.
एक सिनेमा आहे ज्याचा ट्रेलर पाहिल्यापासून अस्वस्थता आहे. गेल्या दहा वर्षातल्या काही बातम्यांवरून एक कथा सुचत होती. ती या वर्षीच्या एका बातमीने पूर्ण होत आली. काही कारणाने गेले काही दिवस टायपिंग जमत नसल्याने लिहून पूर्ण करता आली नाही. तर हा ट्रेलर आल्यापासून माझ्या कथेचा आणि चित्रपटाचा विषय सारखाच असेल का , किंवा थीम किंवा त्यातली एक कल्पना सारखी असेल का असा विचार मनात येतो. बहुतेक मायबोलीवर अन्यत्र मोघम उल्लेख केला होता.

सिनेमा आल्यानंतर तो पहायची काही हिंमत होत नाही. न जाणो सारखाच विषय असेल तर ?
तर मग सुचलेली कल्पना सोडून द्यावी लागेल याचं दु:खं आहे. म्हणजे सुचलेले प्रत्येक आपण लिहून काढतोच असं नाही. पण असे जर असेल तर लिहायचा प्रश्नच येत नाही.
परत वाटतं कि बघायला काय हरकत आहे ? म्हणजे जर साम्यस्थळं काय आहेत हे समजेल. पण तरीही साम्यस्थळं असतील तर मग कथेच बदल करावेसे वाटतील.
आधी लिहून काढून बघावा आणि साम्यस्थळं बरीच सारखी असतील तर मेहनत वाया जाईल. शिवाय न बघता पोस्ट केली तर कल्पनाचौर्याचा आरोप होईल.
काय करावं तेच समजत नाहीये. त्याचा परिणाम सध्या लिहीत असलेल्या कथेवर पण होतोय. विचाराने काहीच करता येत नाही.

त्रांगडं आहे खरे. तू डिस्क्लेमर लिही ना की एकाच वेळी सुचलेल्या असू शकतात.

तो आहे मार्ग. कुणाला पटो ना पटो असंच करावं लागेल. या विचाराने त्या सिनेमाला जायचा आनंदही धड घेता येत नाहीये.

जर आयुष्य जगताना तुमची आयुष्य जगायची पद्धत कोणाला पटतेय की नाही याचा विचार न करता जगत असाल तर एखाद्या कथेसाठी/धाग्यासाठी किती तो विचार करायचा Happy

जर आयुष्य जगताना तुमची आयुष्य जगायची पद्धत कोणाला पटतेय की नाही याचा विचार न करता जगत असाल तर >>> असा प्रतिसाद आहे का माझा मायबोलीवर ? मी विचार करत असेन किंवा नसेन, ते इथे कशाला सांगू ? Lol

अहो तर म्हटले आहे...
तसे करत असाल तर.. करता असे म्हणत नाहीये

असो, शुभरात्री !

रानभुली माझ्या वडिलांनी एकदा मला बोलता बोलता सत्यजित रे ह्यांच्या एका सवयी बद्दल सांगितले होते. त्यांना रस असणार्या एका विषयावर जर इतर कुणी काही कलाकृती (सिनेमा/नाटक/किंवा लिखाण) निर्माण केली आहे असं त्यांना कळलं तर ते आवर्जून आधी त्या विषयावर त्यांच्या मनात असलेली कथा/पटकथा लिहुन काढायचे आणि मग ती आलेली कलाकृती बघायचे किंवा वाचायचे, आणि स्वतःच्या मनात दोन्ही कलाकृतिंचे वस्तुनिष्ठ परिक्षण करायचे. एक लेखक/दिग्दर्शक म्हणून आपण आपल्या कामात सुधारणा कुठे करु शकतो ह्यासाठी चार गृहपाठ म्हणुन.

तुम्ही तुमची कथा आधी नक्की लिहुन काढा. ती मेहनत वाया जाणार नाही त्याचा फायदा आत्ता नाही तर पुढे नक्की होईल.

Pages