Submitted by निल्स_23 on 31 August, 2025 - 13:46

हि एकदम झटपट होणारी, चटण्या वगैरे काही गरज नाही. कमीत कमी साहीत्यात होणारी, टेस्टी चटपटीत, थोडीफार हेल्दी रेसिपी.
साहीत्यात चाटच्या पापडी मिळतात त्या नाहीतर टोकरी पण चालतील.
अर्थातच अवाकाडो.
कांदा, टाॅमॅटो, कोथिंबीर, जीरे पूड, चाट मसाला, लिंबू, मीठ.
सजावटीकरता बारीक शेव, डाळिंब, खारी बुंदी.
कृती एकदम सोप्पी आहे. अवाकाडोचा गर काढून मॅश केला. त्यात आवडीनुसार कांदा, टाॅमेटो चिरून घातला.
मीठ, जीरे पूड, चाट मसाला, लिंबाचा रस आणी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेतले.
पापडी वर हे मिश्रण, त्यावर बारीक शेव, डाळिंबाचे दाणे, खारी
बुंदी घालून खायला तयार.
करून बघा आणी कळवा आवडले की नाही.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप मस्त वाटते आहे. फोटो तर
खूप मस्त वाटते आहे. फोटो तर इतके सुरेख आलेत. एकदम प्रो.
मस्त!
मस्त!
प्रो+७८६
काळया लांबलचक ट्रे ने एक वेगळाच शो आला आहे.
पाकृ सुद्धा छान
तुमचं प्रेझेंटेशन मस्तच आहे.
तुमचं प्रेझेंटेशन मस्तच आहे.
ग्वाक डिपचं इंप्रावझेशन?
ग्वाक डिपचं इंप्रावझेशन?
मस्तच...
मस्तच...
खूप सुंदर आणि तोंपासू!
खूप सुंदर आणि तोंपासू!
Pro +12345
Pro +12345
पहिला फोटो कातिल आलाय
ग्वाक डिपचं इंप्रावझेशन?
ग्वाक डिपचं इंप्रावझेशन? Happy >>>>>होयचं !
विथ इंडीयन ट्विस्ट
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
फोटो एकदम प्रो आलेत.मस्त
फोटो एकदम प्रो आलेत.मस्त प्रेझेंटेशन.
प्रेझेंटेशन आणि फोटो मस्तच
प्रेझेंटेशन आणि फोटो मस्तच
फोटो बघूनच तोंपासू!
फोटो बघूनच तोंपासू!
फोटो खूपच मस्त आलाय. लगेच
फोटो खूपच मस्त आलाय. लगेच उचलून खायची इच्छा होतेय.
धन्यवाद सगळ्यांना. माझ्या
धन्यवाद सगळ्यांना. माझ्या मुलिंना पण फार आवडले. पुन्हा करायला लावले त्यांनी.
Such a winsome presentation !
Such a winsome presentation !
सोपी दिसणारी पण चवीचे balancing फार tricky असलेली रेसिपी. क्रीमी, क्रंची, तिखट, आंबट आणि अगदी थोडी फळांची गोडी अशा सर्व चवी एकत्र तुफान लागल्या असतील यात शंका नाही.
वॉटरी/ ओल्या चटण्या नसल्याने पापडीचा क्रंच जास्त टिकेल. so thoughtful !
प्लस तुमच्या उत्तम presentation नी चार काय चौदा चाँद लावलेत पापडी चाट ला.
👏
(No subject)