पाककृती स्पर्धा ३ : फळे वापरून तिखट मिठाचा पदार्थ - थाय फ्रुट सॅलड - प्रतिज्ञा

Submitted by pratidnya on 29 August, 2025 - 09:11

पूर्वी कधीतरी थाई सॅलड केलं होतं. पाककृती स्पर्धेसाठी आज पुन्हा करायचं ठरवलं. मूळ पदार्थात खाली दिलेल्या साहित्याव्यतिरिक्त सुकी कोळंबी आणि फिश सॉसही घालतात. ते दोन्ही घटक वगळून हे सॅलड तयार केलं आहे.

साहित्य:

१. तुमच्या आवडीची कुठलीही फळे - मी सध्या सिंधुदुर्गमध्ये राहत असल्याने इथे एरवी फळांचे खूप कमी पर्याय उपलब्ध असतात. तरी गणेशोत्सव असल्याने मला सफरचंद, पेअर, डाळिंब, केळी आणि पेरू ही सर्व फळं एका वेळी मिळाली.
सुक्या मिरच्या किंवा पाव चमचा लाल तिखट, पाव कप भाजलेले काजू , २ लसणीच्या पाकळ्या, ३ टे. स्पून नारळाचा गूळ, २ टे.स्पून चिंचेचा सॉस, ३ टे स्पून लिंबाचा रस, मीठ
WhatsApp Image 2025-08-29 at 6.07.49 PM.jpgWhatsApp Image 2025-08-29 at 6.07.57 PM.jpg

कृती:

सर्व फळे स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि त्यांचे एकसारखे लहान तुकडे करा. लसणीच्या पाकळ्या, सुक्या मिरच्या, नारळाचा गूळ, भाजके काजू खलबत्त्यात एकत्र कुटून घ्या. ( घरातल्या सुक्या मिरच्या संपल्या होत्या म्हणून मी त्याऐवजी लाल तिखट वापरलं आहे.)

WhatsApp Image 2025-08-29 at 6.07.31 PM.jpg

कापलेली फळे एका वाडग्यात घ्या. त्यात आता खलबत्त्यात कुटलेले मिश्रण, लिंबाचा रस, मीठ, चिंचेचा सॉस आणि चवीपुरतं मीठ घाला. फळे कुस्करली जाणार नाही अशा बेताने सर्व जिन्नस एकत्र करा.

WhatsApp Image 2025-08-29 at 6.07.55 PM.jpg

थाई फ्रुट सॅलड तयार आहे.

WhatsApp Image 2025-08-29 at 6.07.51 PM.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! छानच लागेल हे. तो गूळ नोलेन गुड असावा. बंगाली वापरतात. ताडाचा गूळ. सौदागर सिनेमामध्ये नूतन बनवत असते तो.

आवडलं!

अलीकडे खालेल्या पपया सलाडची आठवण झाली.

नारळाचा गूळ नसल्यास साधा चालेल का? >> चालेल की.

ते मग थाई सॅलड राहणार नाही ?>>>> मी सुद्धा मासे काढून टाकले की

वाह अनोखे ड्रेसिंग आहे. मस्त लागत असणार.
इथे कोकोनट शुगर मिळते ती वापरावी असे वाटतेय.
पण चिंचेचा सॉस म्हणजे काय? कसा करायचा?

Coconut jaggery is a natural sweetener made by reducing the sap from coconut palm inflorescences (flower blossoms). It's a minimally processed, unrefined product that retains some minerals like calcium, iron, and potassium, and offers a rich, earthy, caramel-like flavor. Unlike refined sugar, it's a nutrient-rich alternative for sweetening dishes and is popular in tropical regions, especially in Goan cuisine.

नीरेपासून बनवतात हे मला आताच कळले. माडापासून बनवतात हे ऐकून होतो, पण कसा ते माहीत नव्हते.
अमेझॉन , फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. याशिवाय अन्य वेबसाइट्सही आहेत.