मद्रास वासी (चेन्नईमधले मायबोलीकर)

Submitted by sumoka on 1 December, 2008 - 07:16

नमस्कार,

चेन्नई हून कुणी सदस्य आहेत का ?
असल्यास जरूर कळवा.

सुयोग.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेन्नईमध्ये कुठे राहणार आहात? त्यावर बरंचसं अवलंबून आहे. साऊथ चेन्नई बरीच कॉस्मोपोलिटन आहे. आम्ही एकदम खेड्यांत आहोत तरी आमच्याकडे मारवाडी दुकानदार आणि युपी बिहारकडची कामगार वस्ती थोडीफार आहे.

मनपक्कम भागात बरेच फ्लॅट मिळतील. हा भाग शांत आहे, एअरपोर्टपासून जवळ आहे. गिंडी, पोरूर हे भागही जवळ आहेत. ऑफिससाठी चेन्नईच्या वाहतुकीचा त्रास होणार नाही.

.

.

मला शाळांबाबत माहीत नाही. दवाखाने आहेत, हे बघितलं आहे. शाळाही असतीलच, कारण तिथे जवळ बर्‍याच औद्योगिक वसाहती आहेत.

तुम्ही लिहिलेलं MAD रास 0 - 5 वाचालं। अप्रतिम लिहिता तुम्ही।<< धन्यवाद. Happy

डीएलएफ आयटीपार्क जवळचा भाग चांगला रेसिडेन्शिअल आणि छान आहे. नवर्‍याचे हेड ऑफिस मनपाक्कमला असल्याने त्याचे काही सहकारी या भागामध्ये राहतात. आसपास चांगल्या शाळा आहेत. गरज भासल्यास शाळांची नावे त्यांनाच विचारून देऊ शकेन. हा एरीआ चिनूक्स म्हणतो तसा अतिशय शांत आणि सर्व अमेनीटीज आसपास असलेला आहे.

ओके

काही दिवसांसाठी चेन्नईत सप्टेंबरमध्ये जाणार आहोत. तिकडे लोकल ट्रेनची ओफीसला जाणाऱ्यांची गर्दी केव्हा सकाळी/ संध्याकाळी कोणत्या दिशेने असते? चेन्नई सेंट्रल / एगमोर ते गिंडी किंवा कस्तुरबा स्टेशन?

सकाळी दहाला हॉटेल रुम चेकाऊट केल्यावर संध्याकाळी सातची रामेश्वरम ट्रेन पकडण्याच्या वेळेपर्यंत बॅगा घेऊन गिंडी पार्क किंवा अड्यार पार्कमध्ये वेळ काढायचा विचार आहे. आदल्या दिवशी(संपूर्ण दिवस) जमेल तेवढं चेन्नई पाहणार आहोत. ( लोकल ट्रेन तसेच मेट्रो स्टेशन टाइम टेबल एका ॲपमधून Chennai Travel - Route Map _ Appspundit infotechमिळवले आहे.)