Submitted by अनन्त्_यात्री on 7 June, 2025 - 11:02
त्रिमितीच्या तुरुंगात
घुसमटे जीव ज्यांचा
उघडीन त्यांच्यासाठी
मार्ग चवथ्या मितीचा
कळसा नंतर पाया
तिथे नियम असतो
कार्यकारण भावाचा
जाच जराही नसतो
स्थळ-काळात तिथल्या
पेव खाच खळग्यांचे
उतरवी वर्तमान
भूत वेडे भविष्याचे
दोर परतीचे मात्र
नाही कापणार नक्की
आपापल्या कोठडीची
खूण ध्यानी ठेवा पक्की
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>>>>दोर परतीचे मात्र
>>>>>>दोर परतीचे मात्र
नाही कापणार नक्की
आपापल्या कोठडीची
खूण ध्यानी ठेवा पक्की
होय.
अरे वा. आवडेल तिथे जायला
अरे वा. आवडेल तिथे जायला
अवल मला वाटतं कवि,
अवल मला वाटतं कवि, स्वप्नावस्थेबद्दल बोलत आहेत. बहुतेक.
मला wormhole अभिप्रेत आहे
मला wormhole अभिप्रेत आहे
ओह ओके ओके.
ओह ओके ओके. रोचक संकल्पना आहे.
>>>>>>>>>मला wormhole अभिप्रेत आहे Happy
A wormhole, in physics, is a hypothetical tunnel through spacetime connecting two distant points. It's a theoretical concept derived from Einstein's theory of general relativity. Wormholes are often depicted as shortcuts in space-time, potentially allowing for faster-than-light travel or even time travel.
सामो, अवल धन्यवाद
सामो, अवल धन्यवाद
सुंदर कविता..!
सुंदर कविता..!
धन्यवाद रूपाली
धन्यवाद रूपाली