Disclaimer: This article is based on personal experience only. I am not a trainer or vet. But more of a Dog Whisperer.
मायबोलीवरील एक प्राणी मैत्रीण व पर्यावरणप्रेमी व्यक्ती म्हणुन खालील माहिती लिहीत आहे. खूप लोकांना कुत्रे तसेच इतर पाळीव प्राणी फारसे आवड्त नाहीत. आपल्या साहित्यातही कुत्रे/ पक्षी पाळणार्यांची गणना विक्षिप्त लोकांच्यात केली जाते किंवा बालीश आवड म्हणुन ह्या छंदाची बोळवण केली जाते. अर्थात वानुची गोष्ट व तसे सन्माननीय अपवाद आहेतच. कुत्र्यांबद्दल खालील गैरसमज प्रचलित आहेत.
१) कुत्रा चावला की रेबीज मग इन्जेक्षने नाहीतर हायड्रो फोबीया व मरणच. हे घरात न पाळलेल्या/ रस्त्यावरील भट्क्या कुत्र्यांच्या बाबतीत खरे असु शकते. त्यांच्या बाबतीत चान्स घेउ नये. पण घरात पाळलेल्या कुत्र्यांचे जन्मल्यापासुनचे अतिशय कड्क इन्जेक्षन्स चे शेड्यूल असते ते काटेकोर पणे पाळले व नंतर दर वरषी बूस्टर डोस दिला तर त्रास नसतो.
http://www.who.int/mediacentre/factsheets/fs099/en/
प्रगत देशांमध्ये रेबीज वट्वाघुळे, जंगली प्राणी यांच्या चाव्यामुळे व्हायचा धोका जास्त असतो.
घरी पपी आणणार असल्यास प्राणीतज्ञांचा सल्ला जरुर घ्या.
२) कुत्रे पालन हा श्रीमंतांचा षोक/ शौक आहे. पॅरिस हिल्ट्न वगैरे जे खेळणी टाइप
कुत्रे घेउन हिंड्तात ते बघुन किन्वा राव बहादुर टाईप लोक भला मोठा अल्सेशिअन घेउन जाताना बघुन असा गैर समज होणे साहजिक आहे. पण छोट्या ब्रीडचे कुत्रे किंवा शेल्टर मधुन दत्तक घेतलेले कुत्रे तर
अतिशय कमी खर्चात येतात. त्यांचा पहिल्या वरषी व्हेट चा खर्च असतो.
३) त्यात काय? आणू की कुत्रा!
कुत्रा घरी आणणे हा लग्न/ मुल होउ देणे या पातळी वरचा महत्त्वाचा निर्णय आहे. मुले मोठी होतात पण कुत्र्याला कायम तुमच्या आधाराची गरज असते व तो दिला नाहीत तर ते दुक्खी होतात. हा निर्णय घाइत किन्वा चुकीच्या कारणांसाठी घेउ नये. घरातील सर्वांचा विचार घेउनच घरी पेट आणावे. जनरली कपल पैकी एकाला पेट्स आवड्तात व दुसर्याला आवड्त नाहीत. मुलांना आवड्तात पण कुत्र्यांचे जे काम रोज करावे लागते ते त्यांच्या ने होत नाही. व ज्याच्या वर ते काम पड्ते तो वैतागण्याची वेळ येते.
४) कुत्र्यांचे काम फार असते
कुत्र्यांचे जे मेन खाणे पेट फूड ते फार महाग नसते. कुत्रे अतिशय प्रमाणात खातात. मोठ्या ब्रीड ला अर्थातच जास्त खायला लागते पण ग्रेट डेन वगैरे घरी आणणारा माणुस नक्की त्याची सोय करणार. दुध वगैरे देणे आपल्या हातात आहे. बाकी औषधे, शांपू, बेल्ट व लीश हे महत्त्वाचे खर्च. पण ते आपल्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण आणतात त्या मानाने तो खर्च जास्त वाट्त नाही. कुत्र्यांना फॅन्सी कपडे/ दागिने/ कॉस्च्युम्स वगैरे घालणे वेस्ट आहे. तो एक हौसेचा भाग आहे. त्याना ते आवड्त नाही. अपमान वाट्तो. त्यांना महागडे झोपायचे बेड्स व इतर वस्तु लागत नाहीत. जुने आराम दायक क्विल्ट/ पोते हिवाळ्यात व जमीन उन्हाळ्यात त्याना बास होते.
( भारतात तरी. परदेशात प्राणी तज्ञाचा सल्ला घ्यावा. )
५) कुत्रे पालन ही एक सुपरफिशिअल अॅक्टिविटी आहे.
कुत्रे तज्ञ असे म्हणतात की आयुष्यातील कोणती ही बदलाची प्रक्रीया सह्य करायची असेल तर कुत्रा पाळावा. जसे तारूण्यातुन मध्यमवयाकडे जाणे, मुले परदेशी/ बाहेरगावी गेल्याने एकदम येणारे रिकाम पण
मानसिक धक्क्यातुन सावरण्यासाठी आवश्यक असणारा वेळ घालविण्यासाठी. अपंगपण सहन करताना इ. थेरपी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलेले असते. त्यांच्या रूटीन बरोबर आपले रुटीन फिट करता येते.
http://en.wikipedia.org/wiki/Therapy_dog
http://news.nationalgeographic.com/news/2002/08/0808_020808_therapydogs....
या विषयावर सगळ्यात चान्गले काम दस्तुरखुद्द अमेरिकेतच झाले आहे व होते आहे. भारतात शहरातील व्हेट्स व समुपदेशकांना याची माहिती असते.
६) २४ तास बांधले तर बरे या मेल्या कुत्र्यांना!
महत्त्वाचे म्हणजे भारतात कुत्र्यांना बांधून घालायची सवय असते ते कुत्र्यांच्या द्रुष्टीकोनातून अतिशय घातक. एक तर हालचाल नाही. व स्वातंत्र्यावर घाला. असेच कुत्रे जास्त वाइट स्वभावाचे व चावरे भुंकरे होतात. आपल्या घरात त्यांना चान्गली वागणूक मिळाली तर ते वाइट स्वभावाचे होत नाहीत. बांधलेले
कुत्रे काळजी एकटे पण, भय याने ग्रस्त असतात व त्यातुन भुंकत असतात. कुत्रा हा अतिशय सोशल प्राणी आहे. त्याला मागे बांधून घालणे व मालकाने इग्नोअर करणे यासारखे दु:ख नाही.
७)कसली ती कुत्री? काय उपयोग कुत्री पाळून?
मालकावर प्रेम, आज्ञाधारक पणा घरातील सभासदांसाठी लॉयल्टी हे त्यांचे गुण अनन्यसाधारण आहेत.
८) माझ्या जीवनात मी कुत्र्याला लिमिटेड अॅक्सेस देइन.
कुत्र्यांना व्यायाम आवड्तो, खेळायला आवड्ते. याचा उपयोग करून आपण व मुले आपल्या बैठ्या जीवनातुन बाहेर पडून चालणे पळणे असे व्यायाम करू शकतो, जिम ला न जाता. कुत्र्यांमुळे आपल्या इतर नातेसंबंधांना पण एक वेगळे अस्तर मिळते. अर्थात हे सर्व कुत्राप्रेमींसाठी. कुत्रे आवड्तच नसतील तर त्यामुळे वाईट भांड्णे पण होउ शकतात. कुत्र्यांना जास्त वेळ व लक्ष दिले तर दुसर्या पार्टनर ला ते आवडेलच असे नाही. मला कुत्रे चालविताना काही लोक असे भेट्ले आहेत की जे कुत्र्यांपेक्षा टेरीटोरिअल असतात व त्यांना कुत्रा म्हणजे आपल्या वैयक्तिक स्पेस वर आक्रमण वाट्ते.
९) मला घर अतिशय, फारच स्वच्छ लागते. मी हाउस प्राउड आहे. कुत्रा बाहेरच बरा!
कुत्रे छोट्या घरात पाळताना घरातील स्वच्छता टिकविणे अवघड गोष्ट आहे. कितीही ट्रेन केले तरी.
लहान पपीजचे दात शिवशिवतात. गाद्या, उश्या, क्विल्ट्स फाड्तात. चपला बूट व रबर स्लिपर्स पण!
ते कधी मधी ओकतात, कार्पेट घाण करतात. त्यांचे केस पड्तात. विचार करा! सोवळे ओवळे पाळणे अशक्यच कारण त्यांना चिकन/ बीफ खायला लागते. घरात हाड्के सांड्तात.
१०) कुत्रा अलग माझी फ्यामिली अलग.
मला अमेरिकन कुटुंबांची एक गोष्ट खूप आवड्ते म्हण्जे ते कुत्र्यांना पण एक घरचे सभासद मानतात.
घरे मोठी असल्या ने बहुतेक सोपे जात असेल. मुलांना वाढताना कुत्रे अतिशय चान्गले मित्र बनतात.
व म्हातार्यांना सोबत. मार्ली व मी पाहावा. वुफ वुफ.
कुत्र्यांची ऐकण्याची व वास
कुत्र्यांची ऐकण्याची व वास घेण्याची क्षमता फार उच्च असते म्हणुनच त्यांना अगदी बारीक आवाज ऐकू येतात. व फटाक्यांचा त्रास होतो.
अ. व अ. विधान अलर्ट.
खरे तर कुत्र्यांच्या सारखे राहिल्याने आपली तब्येत चान्गलीच होणार.
नियमित व्यायाम अगदी जरुरी पुरतेच व भूक लागल्यावरच खाणे. उत्तम झोप. अंमली पदार्थ वगैरे चे सेवन नाही. ( दारु सिगरेट इ.) उत्तम रिफ्लेक्षेस. व जीवनात कुणावर तरी नि:स्सीम प्रेम करणे व त्यावर अतिशय विश्वास टाकणे. मदत लागल्यास मागणे. भलत्या रिस्क्स न घेणे. आपल्या गल्लीतच राहणे.
हे जमविले तर सारे प्रोब्लेम्स छू.
नेट वर कुत्रेप्रेमीं साठी भरपुर साइट्स आहेत. प्रत्येक ब्रीड साठी जवळ जवळ. इथे लिन्क्स देउ का?
मी अजिबातच टेरिटोरिअल नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------
द यर्त इज माय बेड, द इस्काय इज माय सीलिन्ग. द होल वर्ल्ड इस माय नेटीव प्लेस.
आयाम मामी. माइंड इट. ( क्विक गन मुरुगन कडुन साभार उचलला आहे ड्वायलाक.)
छान लिहिलंय हो मामी. पिल्लू
छान लिहिलंय हो मामी.
पिल्लू म्हणजे लहान मूलच. त्यांचं सगळं लहान मुलांसारखं करावं लागतं. पहिलं १ वर्ष जास्त. हे आर्टिकल वाचा, तुम्हाला आवडेल -
http://www.time.com/time/magazine/article/0,9171,1921614,00.html
खूप वर्षं माणसांबरोबर राहून कुत्र्यांमध्ये सोशल इन्टेलिजन्स डेव्हलप झालाय..
आशुतोष, बाईकचा आवाज नव्हे. त्याला तुमचा वास येतो.
>>आशुतोष, बाईकचा आवाज नव्हे.
>>आशुतोष, बाईकचा आवाज नव्हे. त्याला तुमचा वास येतो >> शर्मिला
मी ही अगदी हेच बोलणार होते, तोषा अंघोळ वगैरे करायचास ना?
थोडं विषयांतर, मैत्रिणीच्या घरी मांजर होतं, मांजराचं नाव गौरी... मूळात तो बोका
होता ते पहिल्यांदा त्यांना कळलंच(??) नाही म्हणून मांजरीण समजून गौरी नाव ठेवलं ते शेवटपर्यंत. तिला मटण-माश्यांपेक्षा ही बेसनाचे पदार्थ जास्त आवडायचे.
मटण आणि फरसाण एकत्र ठेवलं तर ती मटणाकडे ढुंकुनही पहायची नाही.
आमचे पण पेढे व फरसाण लै आवडी
आमचे पण पेढे व फरसाण लै आवडी ने खातात. ( त्यांचा बाबा गुजराती असेल काय?)
कोणी विचारलं तर म्हणायचं
कोणी विचारलं तर म्हणायचं गौरीशंकरचं लाडानी आम्ही गौरी म्हणतो हा का ना का ?
मी खरच लिहायला सुरवात केली ना तर एक १२ पानी ललित होइल. उगाच कशाला लोकांना पिळा त्या पेक्षा हायलाईटस लिहीतो.
१) लहान असताना कुत्र्यांच्या अगदी २-३च जाती माहित होत्या पामेरियन (पॉमेरॅनियन बहुतेक), डॉबरमॅन (डोबरमन) आणि अल्सेशियन. पामेरियन कधी आवडले नाही, अल्सेशियन फारच केसाळ वाटले म्हणुन मी ८वीत असताना आइ-बाबांना मस्का लावायला सुरवात केली " आपण डॉबरमॅन पाळुयात". आम्ही राहायचो ५२५ स्केवर फुटाच्या फ्लॅटात (तेव्हा बर्या पैकी मोठा वाटायचा हो
तिथे कुठे पाळणार वगैरे अस्सा विच्चार सुद्धा मनात आला नाही. माझ्या आणि आई बाबा दोघांच्याही नाही
.
). माझ्या बापुनी मग गावात माहित असलेले सगळे ब्रीडर्स पालथे घातले अन एक दिवस मला गाडित घातला आणि घेवुन गेले त्र्यंबक रोड ला (नाशिक) एका छानश्या बंगल्यात. म्हणे ह्यांच्या कडे मस्त "बॉक्सर" नावाची ब्रीड आहे आणि नुकतीच पिल्लं झालीत. मी जरा हिरमुसला झालो. हे काय काढलय आता बॉक्सर बिक्सर, एक गोष्ट ऐकतील तर शप्प्त. आत जाऊन पाहतो तर मी जरा गांगरुनच गेलो! हा प्राणी असा काय दिसतोय? घरातल्या प्रशस्त लिवींग रुम मध्ये कारपेट वर अंगावर सोनेरी पट्टे (ब्रिंडल) असलेला बसक्या तोंडाचा एक प्राणी बसला होता. अशी ही ब्रीड्स असतात??
२) हो नाही हो नाही करत एकदा बाबा हो म्हणाले तेव्हा बात पक्की झाली. माझा बाप्पु पण एकदम सनकेल माणुस. एखादं काम नाही तर नाही करणार पण करायला घेतलं की मग त्याची पार पाळं मुळं खणुन काढणार. (मला वठणीवर आणायचं काम असच ते अगदी आवडीनी मनावर घ्यायचे
३) नंतर त्यांच्या गड्या नी कोपर्यात असलेलं एक दार उघडलं आणि काय सांगु? तीन लाईट ब्राऊन रंगाची बसक्या तोंडाची पिल्लं जरा झोकांड्या खातच बाहेर आली अन मी फुल्ल फिदा! मी आयुष्यात इतकं क्युट दिसणारं काहीच पाहिलं नव्हतं. सोल्ड!!!! हेच, हेच आणि हेच ब्रीड घ्यायचं हे ठरलं.(मी तो विविक्षीत (?) शब्द म्हणायचा टाळतोय हे तुमच्या लक्षात आलं असेलच)
४) दुसृया दिवशी मी शाळेत गेलेलो असताना आइ बाबा त्या तिघांमधली त्यातल्या त्यात देखणं , कपाळा पांढरा टिळा, आणि चारी पायत पांढरे हातमोजे असलेलं पिल्लु घरी आणलं. तिचं ठेवलं "जिनी" .
५) जिनी नी स्वतः अन मग नंतर तिच्या लेकानी आमचं आयुष्य (माझ्या आइचं सरवात जास्त) अगदी व्यापुन टाकलं.
तर आता आपण जिनीच्या सवयी, स्वभावाचे हायलाइट्स कडे वळुयात
सवयी:
मी पहिलीच पाहिली.
), गॅलरीच्या गोल ग्रील मध्ये मान आडकुन घेणे..........आजुन बर्याच आहेत पण फिर कभी सांगिन....
१) खाली फिरायला नेलं की तोंडात एक तरी विटकरीचा भला मोठा तुकडा ती घरात घेऊन येणार आणि मग तो कर्र्र्र्र्र कर्र्र्र्र्र करत दिवस भर त्याचा भुगा पाडणार आणि घरभर पसरवणार (आईचा फुल्ल संताप). विटकरीला पर्याय फक्त एकच तो म्हणजे चेंडु. तिच्या बसक्या तोंडात आजिबात दिसायचा नाही चेंडु फक्त तिला गालफुगी झालीये असं वाटायचं. हा तोंडातला चेंडु जर मी काढुन घेऊन वर कपाटावर ठेवला तर ती कपाटाखाली त्या चेंडु वर नजरे बिछाये बसुन राहायची (तासनतास!). पुर्ण वेळ एकच सीन चालायचा. ती मान वर करुन बसलेली. गुळ्गुळीत फरशी मुळे तिचं बुड हळु हळु मागे सरकतय अन थोडं अंतर ते सरकलं की ती परत मागचे पाय उचलुन दोन पावलं पुढे सरकुन आधीच्या जागेवर यायची. तासनतास!!
२) गाडीत तिला कुठे घेऊन जायचं म्हंटलं की फक्त आणि फक्त ड्रायवर सीट च्या शेजारच्या सिटवरच बसायची. मग तिथे कोणी बसलं असेल तर त्या व्यक्तीच्या मांडीवर येवढीच काय ती तडजोड. बसली की काच खाली आणि हिची मुंडी बाहेर. वडिल दररोज तिला चक्कर मारायला न्यायचे.
३)रसत्यात कुठेही पाणी दिसलं तर ती बरोबर कडेकडेनी जायची. मांजरी खरं तर पाण्यापासुन वगैरे लांब राहतात पण ह्यांच्यात ही
४)जमीन खणने. बाहेर गेल्यावर मातीत ठीक आहे पण फ्लॅट मध्ये? हो तिला हुक्की आली की ती आमच्या फ्लॅट मध्ये एखादा कोपरा धरुन खणायला लागायची. एकदाम आम्ही तिला बराच वेळ घरात एकटं सोडुन गेलो होतो, आम्ही परत आलो तर तिनी हॉल मध्ये जवळ जवळ आपला अर्धा तळहात जाइल इतका बोगदा तयार केला होता. अजुन थोडा वेळ आलो नसतो तर शेजारच्यांच्या घरा पर्यंत तिनी तो बोगदा नेला असता! (मी आजिबात चेष्टा करत नाहीये, पुराव्यानी शाबीत करु शकतो, ते शेजारी अजुनही माझ्या टच मध्ये आहेत)
४) वाट्टेल ते खाणे. तिनी चिकन चा वाटलेला मसाला , अमुल बटर चा आख्खा पॅक, सॉफ्ट ड्रिंक, असं काय काय खालेलं, प्यायलं आहे.
५) इतर सवयी: नवीन माणुस घरात आला तर त्याच्या पुढे अगदी शेपटी सकट कंबर हलवत पुढे जाणे, ४ पाय वर करुन मेल्यागत पडणे (आईला तर दर वेळी धस्स व्हायचं, आमची आई पण ना....
स्वभावः अत्यंत घाबरट.
१) तिला कॉलनीतले पोरं "ससु" म्हणायचे. फटाक्याचा किंवा कुठलाही मोठा आवाज झाला की ही बाई टेबला खाली पळायची. वडिलांचा आवाज जरा जरी वाढला की बाई टेबलाखाली! मांजर दिसली की तिच्या मागे पळायची पण ती केस फुगवुन फिस्कारली की ही शेपुट दाबुन धुम ठोकायची.
२) आळशी: बाहेर फिरुन आली की नुसती बसुन राहायची. दिसायला पण नुसतं भरलेलं "पोतं" किंवा "गोणी" सारखी होती. जास्त हालचाल नसल्यामुळे तिला सतत अपचनाचा वगैरे त्रास व्हायचा. कधिही निवांत बसली की सारखे ढेकर येत राहायचे. ढेकर आला की नंतर जिभल्या चाटायची आणि ते इतकं विनोदी दिसायचं के विचारु नका. एखादा वयस्क माणुस तोंडाच्या बोळ्क्यावर कसं जीभ फिरवुन बोलतो तसं दिसायचं एकदम.
३) ती चिडुन भुंकण्यापेक्षा घाबरुनच भुंकायची. कॉलनीतले लोकं म्हणायचे की चोर आला तर जिनी त्याच्याशी पण खेळेत मस्त!
आजुन खरच खुप गोष्टी आहेत पण काय काय लिहायचं आता. ती ९८ साली गेली. त्याआधी तिला ९५ मध्ये ६ पिल्लं झाली (एकदाच). त्यातलं १ आम्ही ठेवुन घेतलं बाकी देऊन टाकली. तो नं १ रंगानी पांढरा होता. अल्बायनो नव्हता. तो १४ वर्ष राहिला. त्याचं नाव "सनी" तो गेल्यावरच आई पहिल्यांदा अमेरिकेत म्हणजे थोडक्यात घर सोडुन आली.
त्याची लिला तर अपरंपार आहे. त्याच्याबद्दल आता सवडीनी लिहीन.
धन्यवाद मामी!
माझ्याकडे रोज सकाळी एक कावळा
माझ्याकडे रोज सकाळी एक कावळा येतो. त्याला आदल्या दिवसाची शिळी चपाती घातली तर तो खात नाही. तसेच चपातीचा तुकडा त्याच्यादिशेने टाकलेलाही त्याला चालत नाही. मी ताजी चपाती व्यवस्थित तुकडे करुन गच्चीच्या काठावर ठेवेपर्यंत तो बाजुला बसुन वाट पाहतो आणि मग ती चपाती खातो. मी कितीही जवळ गेले तरी तो अजिबात उडत नाही. आणि मी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर गच्चीतुन सरळ हॉलमध्ये येतो. हे फक्त सकाळीच.. दिवसात नंतरही येतो, पण काहीही मागणार नाही आणि दिले तरीही खाणार नाही. सकाळी मात्र हक्काने मागुन घेतोच घेतो.. मी सकाळी नसले तर माझी बाई घालते त्याला चपाती..
माझ्या घरात माझ्या परवानगीशिवायच घुसुन बसलेल्या मांजरीला मी एकदा कच्च्या माशाचा मोठा तुकडा घातला. त्याला मध्ये मोठा कठीण असा काटाही होता. तिने मऊ मांसाचा भाग खाल्ला. काटा खाता येईना, तसे तो तिथेच ठेऊन ती गेली. मी बाईला सांगितले उचलुन टाकुन दे म्हणुन. थोड्या वेळाने भावाने बोलावले मला बाहेरचे दृष्य बघायला. तिने स्वतःच्या बॉयफ्रेंडला बोलाऊन आणले होते तो काटा खायला. आणि तो खाताना स्वतः बाजुला बसुन त्याच्याकडे प्रेमळ दृष्टीक्षेप टाकत होती
माझ्या बंटीला आइसक्रिम इतकं आवडायचं की तो रिकामा कपही फाडुन चाटत बसायचा. त्याची ही आवड लक्षात ठेऊन मुलगी नेहमी दोन कप विकत आणायची, एक त्याला आणि एक स्वतःला....
आमच्या लहानपणी एक
आमच्या लहानपणी एक काळाकुळकुळीत्,चमकदार रंगाचा लॅब होता. टुटु त्याचं नाव. इतका भक्कम शरिराचा कि लाडानं अंगावर उडी मारली कि पडायचोच आम्ही . त्याला चक्क मराठी ही समजायचं..त्याला नुस्तं 'टुटु,पाल बघ्"तर झटकन भिंतीवर पाहायचा..
आमच्याघरी वडील असेपर्यंत दोन
आमच्याघरी वडील असेपर्यंत दोन कुत्रे पाळायची प्रथाच होती. तसं कुडकेल्लित प्रत्येक घरात किमान एक कुत्रा व एक मांजर पाळलिच जाते, कुत्रा चोरांपासुन संरक्षण देतो, व मांजर घरातिल उंदराचा नायनाट करत असते. खेडयागावत, खासकरुन शेतकरी माणसांकडे कुत्रा पाळणे गरजेचं असतं. आमच्याकडे कुत्रा हा मालकाचा बॉडिगार्डच असतो. रानात गुरं चारायला नेताना कुत्रा सोबत असतोच, आमच्या भागात फार घनदाट अरण्य आहे, चारपाच घरचे लोक एकत्र गुर घेऊन रानात चारायला जातात. गुरांचा कळप जेंव्हा रानात निघतो तेंव्हा शेळ्या सगळ्यात पुढे चालतात, त्या मागे गायी व बैल, सगळ्यात शेवटी हल्ले (इकडे रेडा म्हणतात बहुतेक) व म्हसी. हि कुत्री मात्र कळपाचं जणु प्रोटेक्शनच करत असतात. बरेच वेळा आसपास असणा-या हिंस्र प्राण्यांचा आम्हाला या कुत्र्यांमुळे सुगावा लागायचा. नंतर आम्ही तसं कळपाला संरक्षण दयायचो. बरेच वेळा हे कुत्रे लहान सहान शिकार करुन आमच्य जवळ आणुन द्यायचे. घोरपड, ससा, तित्तर ह्या असल्या लहान सहान शिकार हमकास करतात व मालकाकडे आणुन देतात. आम्ही पहिला पाऊस पडला रे पडला कि दोन्ही कुत्रे घेऊन रानात घोरपडिची शिकार करायला निघायचो. आमच्या दोन कुत्र्यापैकी एक काळा कुत्रा होता, त्याला मी कालु म्हणायचो. तसं आमच्या घरी वडील जात पर्यंत कुत्र्याची पाच-सात जनरेशन झाली असावित, कारण एक कुत्रा मेला की लगेच दुसरा कुत्रा पाळणे गरजेचं असायचं. हा कालु एकटाच रानात फिरायला जायचा व एखादी घोरपड वैगरे दिसली की तिचा पिच्छा करायचा. एकदा घोरपड झाडावर चढली कि तिथेच भूंकत बसायचा. मग कुणितरी वाटसरु आम्हाला येऊन सांगायचा की तुझा कुत्रा तिकडे भुकंत बसलाय. आम्ही जात पर्यंत तो तिथेच भुंकत घोरपडिवर पाळत ठेवलेला असायचा. नंतर गावातल्या लोकाना त्याच्या झाडाखाली बसुन भुंकण्याचं राज समजल्यावर लोकं ती शिकार आमच्या पर्यत पोहचु देत नसत.
आमच्याकडे कुत्र्यामुळे चोरांपासुन बचाव होतो, बाहेर आंगणात गायी वासरं बांधलेली असतात, तडस व लांडग्या सारखे प्राणि बरेचदा गावात शिरतात, पण कुत्र्यांमुळे पुढील हाणी टळते. लोकं रानात फिरताना कुत्रा हमखास सोबत असतोच व त्याची मदतही होते.
मी एकदा रानात शिंदी कापायला गेलो व वाट विसरलो, कुत्रा सोबत नव्हता. आता गावाकडे कसे जावे माहितच नव्हत. मग मला कुणाचातरी एक कुत्रा रानात हिंडताना दिसला, मी त्या कुत्र्याच्या मागे मागे गेलो, त्यानी बरोबर गावात आणुन सोडलं. ही जाणावर रानात वाट विसरत नाही.
कुत्रेतर खेड्यागावातील जान असतात.
उत्तम लिहीताय रे सगळे. याचा
उत्तम लिहीताय रे सगळे. याचा वेगळा बीबी बनवुत की. घरी जावुन आरामात वाचते. वैद्य बुवा. जिनी को प्यार प्यार. प्यार. सनी को भी. हसु व रडु एकदमच.
कुत्र्यामुळे होणार्या एका
कुत्र्यामुळे होणार्या एका रोगाचा मात्र कुणीच उल्लेख केलेला नाही. हायडॅटिड सिस्ट. कुत्र्याच्या शी मधून याचे जंतू पसरतात. ते कुत्र्याच्या अंगावरच असतात. कुत्रे हाताळणार्याना त्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो. हे जंतू पोटात गेले तर लिव्हरमध्ये गाठी होऊ शकतात.
त्यामुळे पाळीव कुत्रा अगदी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कुत्रा हाताळल्यावर हात स्वच्छ धुवून घ्यावेत. कुत्र्याना रेग्युलरली प्राझिक्विंटलचे औषध द्यावे, म्हणजे त्यांच्या पोटातील जंतू मरतील.
हा रोग प्रामुख्याने शेतीमधील कुत्र्यांमध्ये असतो. विशेषतः शेळ्या मेंढ्या वगैरे जवळ असतील तर.
http://en.wikipedia.org/wiki/Echinococcosis
घरचा कुत्रा चावला तर रेबीजचे इन्जेक्शन घ्यावे लागते का? हाही एक कॉन्ट्रावर्सियल इश्यु आहे. घरच्या मालकाला कुत्र्याला इन्जेक्शन दिले आहेत का हे माहीत असते. पण दुसर्या कुणाचा कुत्रा कुणालाही चावला तर त्याच्या घरमालकाला कोण हा प्रश्न विचारणार? आणि समजा घरमालकाने दिले उत्तर- हो, त्याला आम्ही इन्जेक्शन देतो वेळेवर म्हणून.... तरी ज्याला कुत्रा चावला तो या ऐकीव माहितीवर निवांत राहू शकेल? कुत्र्याचे इन्जेक्शन कोर्सचे रेकॉर्ड असेल तरच फायदा होतो.
बर्याचदा लोकही हुशार असतात, अशावेळी सरळ डॉक्टरच्याच गळ्यात प्रश्न घालून मोकळे होतात... तुम्हीच ठरवा, आता मी इन्जेक्शन घेऊ का नको? अशावेळी ज्याला कुत्रे चावले त्याला रॅबीपूर्/विरोरॅबचा कोर्स देणे चांगले.
मी कोकणात सरकारी दवाखान्यात एम ओ शिप करत असताना श्वानदंशावरील इन्जेक्शन संपली होती. तेंव्हा 'सेने'च्या लोकानी आम्हाला दवाखान्यात येऊन घेराव घातला होता. दुसर्या दिवशी पेपरात बातमी पण होती.. कुत्रा या शब्दाशी माझी ही एक आठवण कायमची जुळलेली आहे. आता हसू येते हे आठवले की!
छान लेख मामी . सर्वांचे
छान लेख मामी . सर्वांचे प्रतिसाद व आठवणी पण आवडल्या. मी पण ह्या करताच पळत नाही की आपल्या हातुन त्या मुक्या प्राण्याचे करण्यात दुर्लक्ष झाले तर त्याचे हाल व्हायला नकोत. आणि दुसरे कारण ते सोडुन जातात तेव्हाचा विरह पण सहन होणारा नसतो. मुलीला हवय, पण तरी अजुन विचार नाही.
काही लक्षात राहिलेले प्रसंग.
स्थळ, अमेरिकेतला एक चालायचा पार्क > काही दिवसापुर्वी, मी व मुलगी पार्कात चालायला गेलो. ती छोट्या सायकलवर व तिच्या पुढे मी चालत होते. गवतात एक आजी-आजोबा गप्पा मारत बसले होते. आजी च्या हातात साखळीला एक भलामोठा कुत्रा उभा होता. आणि काय झाले माहीत नाही, त्या अजस्त्र धुडाने साखळीला हिसका मारला, आजीच्या हातातुन सुटला व जोरात भुंकत मुलीच्या दिशेने झेप घेत पळत आला. मुलगी तर घाबरलीच, पण माझा पण पुतळा झाला. शब्द्शः १ सेकंदात निर्णय घ्यायचा होता, आता काय करु?
all I could do was , कुत्र्याच्या व मुलीच्या मधे जाऊन उभी राहिले. 'ये बाबा, काय उडी घेतो ते माझ्यावर घे' असे म्हणत. तो आला, थांबला व अंदाज घेत राहिला माझ्याकडे पहात. मी विचारशुन्य!! पण तितक्यात ती आजी कुत्र्याहुन जोरात धावत आली व त्याची साखळी पकडली... आणि १०० वेळा सॉरी म्हणुन निघुन गेली.
दुस्रा प्र. >> कांदिवलीत >> नोकरी ला सकाळी निघाले बस स्टॉप कडे. माती चा रस्ता होता. माझ्या समोर एक कुत्रा रिकामटेकडा बसला होता. तितक्यात माझ्या मागे त्याचा वैरी दिसला वाटते. त्या दोघांनी एकदमच खच्चुन भुंकायला सुरुवात केली व रागारागाने एकमेकांच्या अंगावर ऊडी घेण्यासाठी पळत येऊ लागले. आता मधे मी होते, पण रागाने आंधळे झालेले ते, त्यांना इतकी मोठी मी दिसलेच नाही आणि दोघांनी जे एकमेकांवर ऊडी मारलीये ती चक्क माझ्या अंगावर मारली!!!! इतक्या जोरात ते दोघे मला धडकलेत की मी धाडकन मातीत अक्षरशः आडवी. आणि तेव्हा ते दोघे घाबरले व भांडण विसरुन पळपुटे होउन परत गेले आपापल्या जागी. आणि मी??? मुकाट्याने उठले, कोणी पाहिले तर नाही ना हे न पहाता चुपचाप घरी गेले, धुळीने भरलेले कपडे बदलले व ऑफीस ला गेले. नंतर खुप हसु आले मला.
सुनिधी,मी कुत्र्यांची आणि
सुनिधी,मी कुत्र्यांची आणि तुझी मारामारी इमॅजिन केली.
सुनीधी. तुमचे बरोबर आहे.
सुनीधी. तुमचे बरोबर आहे. अमेरिकेत पेट्सने होणार्या अपघातांचे प्रमाण खूप आहे. तसेच मॅस्टिफ वगैरे जातीचे कुत्रे जात्याच अग्रेसिव व जास्ट टेरिटोरिअल असतात.( अगदी छोटया मुलांना जिवाचा धोका असतो.) माझे डॅशुन्ड असल्याने कायम पायात येतात व आम्ही धडपडतो. दोन असल्याने दोघी एकेका साइड ने एकदम खेचतात आणि मी पण खूप वेळा पड्लेली आहे अगदी गल्लीत काटया कुट्यात पण. तेवढे जपावे लागते. पण एक आहे की कुत्र्याला चालायला नेणे याने मुले रीअल लाइफ क्रायसीस हाताळायला शिकतात. जे ज्ञान महाग स्टिम्युलेशन गेम्स खेळून ही येत नाही. ( हा वैयक्तिक अनुभव आहे.)
कुत्रे जोरात पळत रोड्वर आल्याने गाडी/ स्कूटर वगैरे वाहन चालविणार्या पब्लिकचा एकदम घोटाळा होउ शकतो व त्यांच्या गाडीला, शरीराला इजा होउ शकते. हे अगदीच लक्षात ठेवायला लागते. बागेत न्यायचे तर आय्पॉड लावून चालणारी लोके हुसकावून लावतात. त्यामुळे कमी गर्दीवाल्या गल्लीतून न्यावे. ते त्यातल्या त्यात सेफ.
अमेरिकेत थेरपी कुत्र्यांना अतिशय चान्गले शिक्षण दिलेले असते. मला तेवढ्यासाठी अमेरिकेला यायचे आहे
DO - 1 visa. वर.
मामी पाठवू का व्हिसा ? इकडे
मामी पाठवू का व्हिसा ? इकडे माबोचे एक GTG करुया.

मी ७वीत असताना मला भाजीवालीचा कुत्रा चावला होता तेव्हा ७ इंजेक्शन घ्यावे लागले होते बेंबीच्या गोल. तेही सहामाही परिक्षेच्यावेळी.
हैद्राबादमध्ये त्यावेळी एकच दवाखाना होता. खुप गर्दी असायची. मजेशीर गोष्ट म्हणजे डॉ. पहिल्या दिवशी म्हणाला होता जर ते कुत्रे तीन दिवसात मेले तर मला येउन सांग. मी रोज त्या कुत्र्याचे दर्शन घेउन यायचे
सर्फ करताना ही एक चांगली लिंक
सर्फ करताना ही एक चांगली लिंक सापडली.
http://www.stumbleupon.com/su/7ER5J6/1vkvEKKfi:d2s0wG-u/thebarkpost.com/...
मामी, हा आमचा ब्राझिल रिटर्न
मामी, हा आमचा ब्राझिल रिटर्न झिको. त्याच्या ब्राझिल वारीची एक स्टोरीच आहे.

सध्या बिचारा अंथरूणाला खिळून आहे.
विकि, ब्राझीलवारीची स्टोरी
विकि, ब्राझीलवारीची स्टोरी लिहा. मला कुत्र्यांना विमानातून कसे न्यायचे ह्या बद्दल समजत नाही. ग्रे एरिआ आहे. हैद्राबादून शिफट होताना कुत्रे सामानाच्या ट्रक बरोबर आले. पण तो एक त्रासदायक अनुभव होता. रिको वयस्कर आहे का? काय वय आणि ब्रीड? त्याची गादी व पांघरूण मस्त आहे.
डॉगस्पॉट्.इन वर सर्व कुत्र्यांचे व पेट्स चे सामान घरपोच डिलिवरी मिळते. लॉट्स ऑफ लव्ह अँड स्पीडी रिकवरी टु रिको.
जर्मन शेफर्ड, वय तेरा. अनेक
जर्मन शेफर्ड, वय तेरा.
अनेक किस्से आहेत लिहिण्या सारखे खर तर. लिहीन कधी तरी.
हम्म्म .. कुत्रा चावला की
हम्म्म ..
कुत्रा चावला की रेबीज मग इन्जेक्षने नाहीतर हायड्रो फोबीया व मरणच
. हे घरात न पाळलेल्या/ रस्त्यावरील भट्क्या कुत्र्यांच्या बाबतीत खरे असु शकते. त्यांच्या बाबतीत चान्स घेउ नये. पण घरात पाळलेल्या कुत्र्यांचे जन्मल्यापासुनचे अतिशय कड्क इन्जेक्षन्स चे शेड्यूल असते ते काटेकोर पणे पाळले व नंतर दर वरषी बूस्टर डोस दिला तर त्रास नसतो...............
म्हणून काय आपण इंजेक्शन घ्यायचे थांबविणार काय कुत्रा चावल्यावर , कुत्रा भटका असो कि पाळलेला शेवटी ठूस तर करावेच लागते.
श्वानप्रेमीसाठी चांगली माहीती आहे लेखात ... मी कधीच श्वानप्रेमी होऊ शकत नाही तो भाग वेगळा.
मला कुत्र्यांबद्दल आदर आहे पण
मला कुत्र्यांबद्दल आदर आहे पण मी तो पाळणार नाही....
दुसरे कारण ते सोडुन जातात
दुसरे कारण ते सोडुन जातात तेव्हाचा विरह पण सहन होणारा नसतो
>>
हे फार वाईट आहे तीन वेळा मांजरांचा अनुभव घेतला आहे. एक पळून गेले दोन स्वतःच्या हाताने पुरले ... आता कानाला खडा !
वैद्यबुवा तुमच २००९ चे जिनीचे
वैद्यबुवा तुमच २००९ चे जिनीचे पोस्ट नुकतेच पुन्हा वाचले. लै हसलो. मला विस्मरनाचा आजार असल्याने नव्यानेच वाचल्यासारखे झाले. ( पाच वर्षापूर्वीचे आठवणे कसे शक्य आहे , मला तरी )
रॉहू, बोके असतील तर सहसा ते
रॉहू, बोके असतील तर सहसा ते टेरिटरी बदलतात आणि घरातून निघून जातातच
कितीही लाडाकोडाचे असूद्यात.
रॉहू, बोके असतील तर सहसा ते
रॉहू, बोके असतील तर सहसा ते टेरिटरी बदलतात आणि घरातून निघून जातातच
ते जाऊ नयेत म्हणून घरात एक मांजर पाळावे आणि साधारण २ महिन्यांने बदलावे काय ..
मध्यंतरी विशेष मुलांसाठी पेट
मध्यंतरी विशेष मुलांसाठी पेट थेरपी वर लेख वाचला होता. तपशील आठवत नाही. अशा मुलांचे व त्या कुटुंबाचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी काही प्रशिक्षित भुभुंचा उपयोग होतो. अशी थेरपी देणार्या बाईंचा कार्याचा परिचय त्यात होता.
अगदि, मांजरा एवढा नालायक
अगदि, मांजरा एवढा नालायक प्राणि दुसरा नसेल, भुख लागली असेल तरच सारख पायत घोळत राहत. मग एकदा पोट भरले की शेपटीचा झेंडा वर करुन लागले चालायला आपल्या वाटेला.
तस कुत्र्याचे नाही भुख लागली असो वा नसो, एकदा 'युSव' करुन बोलावले, की त्याला कितीही वेळा अंगापासून दुर लोटा स्प्रिंग टेंशन सारख ते पुन्हा अंगाला येऊन चिटकत.
मला कुत्र्यांना विमानातून कसे
मला कुत्र्यांना विमानातून कसे न्यायचे ह्या बद्दल समजत नाही ..>>>>> मलाहि, ़कुणाला माहित असेल तर शेअर करा. दुबई मुंबई. तिकडे आल्यावर climate change मुळे काय त्रास होवु शकतो? वय १ वर्ष.
प्राणी परदेशात नेताना त्यांना
प्राणी परदेशात नेताना त्यांना पासपोर्ट्ची गरज असते का ? आणि विमानात त्यांना स्पेशल जागा असते का ?
मी आमच्या जर्मन शेफर्ड्ला
मी आमच्या जर्मन शेफर्ड्ला (झिको) ब्राझिलला नेउन आणले आहे. पण प्रत्येक देशाचे वेगळे नियम असतात.
क्लायमेट चेंज मुळे काहिही त्रास होणार नाही (दुबई - मुंबई).
३६ तासांचा प्रवास करून झिको मुंबईहून मुंबई - लंडन - साओ पावलो असा आला. पण माझा आवाज ऐकल्यावर बागेत फिरतोय तसा फ्रेश झाला. :). त्याला नेण आणि परत आणण हा एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट होता. त्यावर कधी तरी लिहायला पाहिजे.
मुंबई विमान्तळा वरुन घरी हा
मुंबई विमान्तळा वरुन घरी हा प्रोजेक्ट लिहा. काय कराव लागते, किति वेळ लागला? लगेच देतात कि वेळ लागतो.
Pages