कुत्रे पालन - काही गैरसमजुतींचे निराकरण

Submitted by अश्विनीमामी on 2 December, 2009 - 10:53

Disclaimer: This article is based on personal experience only. I am not a trainer or vet. But more of a Dog Whisperer.

मायबोलीवरील एक प्राणी मैत्रीण व पर्यावरणप्रेमी व्यक्ती म्हणुन खालील माहिती लिहीत आहे. खूप लोकांना कुत्रे तसेच इतर पाळीव प्राणी फारसे आवड्त नाहीत. आपल्या साहित्यातही कुत्रे/ पक्षी पाळणार्‍यांची गणना विक्षिप्त लोकांच्यात केली जाते किंवा बालीश आवड म्हणुन ह्या छंदाची बोळवण केली जाते. अर्थात वानुची गोष्ट व तसे सन्माननीय अपवाद आहेतच. कुत्र्यांबद्दल खालील गैरसमज प्रचलित आहेत.

१) कुत्रा चावला की रेबीज मग इन्जेक्षने नाहीतर हायड्रो फोबीया व मरणच.
हे घरात न पाळलेल्या/ रस्त्यावरील भट्क्या कुत्र्यांच्या बाबतीत खरे असु शकते. त्यांच्या बाबतीत चान्स घेउ नये. पण घरात पाळलेल्या कुत्र्यांचे जन्मल्यापासुनचे अतिशय कड्क इन्जेक्षन्स चे शेड्यूल असते ते काटेकोर पणे पाळले व नंतर दर वरषी बूस्टर डोस दिला तर त्रास नसतो.
http://www.who.int/mediacentre/factsheets/fs099/en/

प्रगत देशांमध्ये रेबीज वट्वाघुळे, जंगली प्राणी यांच्या चाव्यामुळे व्हायचा धोका जास्त असतो.
घरी पपी आणणार असल्यास प्राणीतज्ञांचा सल्ला जरुर घ्या.

२) कुत्रे पालन हा श्रीमंतांचा षोक/ शौक आहे. पॅरिस हिल्ट्न वगैरे जे खेळणी टाइप
कुत्रे घेउन हिंड्तात ते बघुन किन्वा राव बहादुर टाईप लोक भला मोठा अल्सेशिअन घेउन जाताना बघुन असा गैर समज होणे साहजिक आहे. पण छोट्या ब्रीडचे कुत्रे किंवा शेल्टर मधुन दत्तक घेतलेले कुत्रे तर
अतिशय कमी खर्चात येतात. त्यांचा पहिल्या वरषी व्हेट चा खर्च असतो.

३) त्यात काय? आणू की कुत्रा!
कुत्रा घरी आणणे हा लग्न/ मुल होउ देणे या पातळी वरचा महत्त्वाचा निर्णय आहे. मुले मोठी होतात पण कुत्र्याला कायम तुमच्या आधाराची गरज असते व तो दिला नाहीत तर ते दुक्खी होतात. हा निर्णय घाइत किन्वा चुकीच्या कारणांसाठी घेउ नये. घरातील सर्वांचा विचार घेउनच घरी पेट आणावे. जनरली कपल पैकी एकाला पेट्स आवड्तात व दुसर्‍याला आवड्त नाहीत. मुलांना आवड्तात पण कुत्र्यांचे जे काम रोज करावे लागते ते त्यांच्या ने होत नाही. व ज्याच्या वर ते काम पड्ते तो वैतागण्याची वेळ येते.

४) कुत्र्यांचे काम फार असते

कुत्र्यांचे जे मेन खाणे पेट फूड ते फार महाग नसते. कुत्रे अतिशय प्रमाणात खातात. मोठ्या ब्रीड ला अर्थातच जास्त खायला लागते पण ग्रेट डेन वगैरे घरी आणणारा माणुस नक्की त्याची सोय करणार. दुध वगैरे देणे आपल्या हातात आहे. बाकी औषधे, शांपू, बेल्ट व लीश हे महत्त्वाचे खर्च. पण ते आपल्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण आणतात त्या मानाने तो खर्च जास्त वाट्त नाही. कुत्र्यांना फॅन्सी कपडे/ दागिने/ कॉस्च्युम्स वगैरे घालणे वेस्ट आहे. तो एक हौसेचा भाग आहे. त्याना ते आवड्त नाही. अपमान वाट्तो. त्यांना महागडे झोपायचे बेड्स व इतर वस्तु लागत नाहीत. जुने आराम दायक क्विल्ट/ पोते हिवाळ्यात व जमीन उन्हाळ्यात त्याना बास होते.
( भारतात तरी. परदेशात प्राणी तज्ञाचा सल्ला घ्यावा. )

५) कुत्रे पालन ही एक सुपरफिशिअल अ‍ॅक्टिविटी आहे.

कुत्रे तज्ञ असे म्हणतात की आयुष्यातील कोणती ही बदलाची प्रक्रीया सह्य करायची असेल तर कुत्रा पाळावा. जसे तारूण्यातुन मध्यमवयाकडे जाणे, मुले परदेशी/ बाहेरगावी गेल्याने एकदम येणारे रिकाम पण
मानसिक धक्क्यातुन सावरण्यासाठी आवश्यक असणारा वेळ घालविण्यासाठी. अपंगपण सहन करताना इ. थेरपी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलेले असते. त्यांच्या रूटीन बरोबर आपले रुटीन फिट करता येते.
http://en.wikipedia.org/wiki/Therapy_dog

http://news.nationalgeographic.com/news/2002/08/0808_020808_therapydogs....
या विषयावर सगळ्यात चान्गले काम दस्तुरखुद्द अमेरिकेतच झाले आहे व होते आहे. भारतात शहरातील व्हेट्स व समुपदेशकांना याची माहिती असते.

६) २४ तास बांधले तर बरे या मेल्या कुत्र्यांना!

महत्त्वाचे म्हणजे भारतात कुत्र्यांना बांधून घालायची सवय असते ते कुत्र्यांच्या द्रुष्टीकोनातून अतिशय घातक. एक तर हालचाल नाही. व स्वातंत्र्यावर घाला. असेच कुत्रे जास्त वाइट स्वभावाचे व चावरे भुंकरे होतात. आपल्या घरात त्यांना चान्गली वागणूक मिळाली तर ते वाइट स्वभावाचे होत नाहीत. बांधलेले
कुत्रे काळजी एकटे पण, भय याने ग्रस्त असतात व त्यातुन भुंकत असतात. कुत्रा हा अतिशय सोशल प्राणी आहे. त्याला मागे बांधून घालणे व मालकाने इग्नोअर करणे यासारखे दु:ख नाही.

७)कसली ती कुत्री? काय उपयोग कुत्री पाळून?

मालकावर प्रेम, आज्ञाधारक पणा घरातील सभासदांसाठी लॉयल्टी हे त्यांचे गुण अनन्यसाधारण आहेत.

८) माझ्या जीवनात मी कुत्र्याला लिमिटेड अ‍ॅक्सेस देइन.
कुत्र्यांना व्यायाम आवड्तो, खेळायला आवड्ते. याचा उपयोग करून आपण व मुले आपल्या बैठ्या जीवनातुन बाहेर पडून चालणे पळणे असे व्यायाम करू शकतो, जिम ला न जाता. कुत्र्यांमुळे आपल्या इतर नातेसंबंधांना पण एक वेगळे अस्तर मिळते. अर्थात हे सर्व कुत्राप्रेमींसाठी. कुत्रे आवड्तच नसतील तर त्यामुळे वाईट भांड्णे पण होउ शकतात. कुत्र्यांना जास्त वेळ व लक्ष दिले तर दुसर्‍या पार्टनर ला ते आवडेलच असे नाही. मला कुत्रे चालविताना काही लोक असे भेट्ले आहेत की जे कुत्र्यांपेक्षा टेरीटोरिअल असतात व त्यांना कुत्रा म्हणजे आपल्या वैयक्तिक स्पेस वर आक्रमण वाट्ते.

९) मला घर अतिशय, फारच स्वच्छ लागते. मी हाउस प्राउड आहे. कुत्रा बाहेरच बरा!
कुत्रे छोट्या घरात पाळताना घरातील स्वच्छता टिकविणे अवघड गोष्ट आहे. कितीही ट्रेन केले तरी.
लहान पपीजचे दात शिवशिवतात. गाद्या, उश्या, क्विल्ट्स फाड्तात. चपला बूट व रबर स्लिपर्स पण!
ते कधी मधी ओकतात, कार्पेट घाण करतात. त्यांचे केस पड्तात. विचार करा! सोवळे ओवळे पाळणे अशक्यच कारण त्यांना चिकन/ बीफ खायला लागते. घरात हाड्के सांड्तात.

१०) कुत्रा अलग माझी फ्यामिली अलग.

मला अमेरिकन कुटुंबांची एक गोष्ट खूप आवड्ते म्हण्जे ते कुत्र्यांना पण एक घरचे सभासद मानतात.
घरे मोठी असल्या ने बहुतेक सोपे जात असेल. मुलांना वाढताना कुत्रे अतिशय चान्गले मित्र बनतात.
व म्हातार्‍यांना सोबत. मार्ली व मी पाहावा. वुफ वुफ.

गुलमोहर: 

जेट एअर वेज ही सुविधा उपलब्ध करते. तीनच तासाची फ्लाइट आहे. व्हेट्ला विचारून सिडेटिव्ह देता येते. परंतू काळजी घ्या. जास्त डोस दिल्यास कुत्रा गमावू शकता. खाली उतरल्या वर काय प्रोसीजर आहे माहीत नाही. आधी विचारून घ्या. मगच प्रयत्न करा.

ऑटिस्टिक मुलाचे पेट कुत्रे असल्यास केबिन मध्ये न्यायला परवानगी आहे.

अय्या किती छान प्रतिसाद आहेत. जुनी मायबोली!!! मिस यू. माझ्याकडॅ आता एकच कुत्रा आहे. व तो पण १२ वर्शे चा सिनीअर डॉग. सध्या लॉकडाउन मध्ये सात आठ मांजरे, दोन तीन कुत्रे ह्यांना रोज जेवण दूध पाणी द्यायचा प्रयत्न आहे. त्यात मांजरांषी छान मैत्री झाली आहे. हा एक प्लस पॉइंट.

अमा, बाफ वाचला आत्ताच. थँक्स..
खुप शंका होत्या त्या आता दुर झाल्या.. तुमचा 8वा मुद्दा चांगला आहे. अजुन लग्न वैगेरे झालेले नाही. करेल कि नाही हे सुद्धा माहिती नाही.. त्यामुळे पिल्लाची जबाबदारी अंगावर घ्यायची वेळ 5ते6 वर्ष पुढे ढकलायची गरज आहे. हे आत खोलवर जाणवलं.. Happy जेव्हा कधी भुभू घरी घेऊन येईन. इथे नक्की पोस्ट करेल..

हा लेख छान आहे
कुत्रा पाळणं खरोखरच लहान मूल जन्माला घालण्या इतकाच मोठा निर्णय आहे.
मार्ले अँड मी चे नाव परवा पासून आठवत आहे.खूप गोड पिक्चर.हिरोचं शेवटचं कुत्र्याबद्दल चं वाक्य रडवून जातं.

पिट बुल जातीच्या कुत्र्याने मालकीणी वर हल्ला केला आणि तिचं मांस खाल्लं,अशी बातमी हल्लीच ऐकली,
कुत्रे अचानक इतके हिंस्त्र कसे होतात?तेव्हा ते मालकीण, प्रेम, बांधीलकी वगैरे सगळं कसे विसरतात,
त्या बातमीत जेव्हा तिचा मुलगा आला तेव्हा तो कुत्रा पटकन पळून दुसऱ्या रूम मध्ये जाऊन लपला असं पण ऐकलं,म्हणजे त्या पिटबुल च डोकं अचानक ताळ्यावर आलं असं कसं??

मांस नाही हो खाल्लं
मीडियावर काय वाट्टेल ते सांगत आहेत

त्याने हल्ला केला आणि मालकीण 80 वर्षाची वृद्ध बाई होती
त्यात ती मेली

आता तो ब्राऊनी पोलिसांनी पिंजऱ्यात ठेवलाय
कशामुळे ट्रिगर झाला असेल काही कळत नाही
पण पिटबुल चिडखोर असतात आणि त्यांना ताळ्यावर ठेवायला भरपूर व्यायाम, शिस्त आणि ट्रेनिंग लागतं

त्यातलं काहीच न देता स्टेटस सिम्बॉल म्हणून पाळला असेल तर अशा दुर्घटना होऊ शकतात

पिटबुल जातीच्या कुत्र्यांचे असे हल्ले आणि त्यात मोठी माणस, मुलं आणि इतर कुत्री जखमी होणं आधीही ऐकलं आहे. या जातीचा नक्की काय problem होतो हे समजत नाही.

पिट्बुल हे पूर्वी नॅनी डॉग्ज होते. प्रेमळ.
त्यांना मुद्दाम, लढाऊ म्हणजे कुत्र्यांचि मारामारी म्हणुन ब्रीड केले गेले व त्यातून आता हिंस्त्र जीन्स राहीलेले आहेत. असे मी ऐकले.

पिटबुल बद्दल खरेच गैरसमज आहेत,

ही ब्रीड मालकालाच (वाचा मा ल क त्याचे कुटुंबीय नाही) इमानदार असते, अन त्याचे गार्डिंग खूप जास्त आक्रमकपणे करते.

लखनऊ पिटबुल अटॅक केसमधील सगळ्यात महत्वाचे फॅक्ट

तो कुत्रा ऍडॉप केला होता, ते ही फुल ग्रोन झाल्यावर, सबब त्याची इमानदारी त्याच्या जुन्या मालकालाच असण्याची दाट शक्यता आहे

त्यासोबत वर सांगितल्याप्रमाणे आहार, विहार अन मैथुन इत्यादी बेसिक प्राणिज गरजांची उपलब्धता किंवा वानवा हे पण त्याच्या मूड्स वर असर करू शकतेच.

मांस नाही हो खाल्लं>>>हो मी मीडिया वरच वाचलं/ऐकलं,
त्यांचे पोटातले ऑर्गन खाल्ले होते म्हणून खूप जास्त रक्तस्राव झाला आणि त्यातच जीव गेला असच ऐकलं

सर्व कुत्राप्रेमी मंडळींबद्दल आदर आहे, पण इन्शुरन्स कंपनीच्या रिस्क analysis वर माझा जास्त विश्वास आहे. त्यामुळे मी पुढील कुत्र्यांच्या जवळपासही जात नाही.

1. Pit Bull Terriers
2. Staffordshire Terriers
3. Rottweilers
4. German Shepherds
5. Presa Canarios
6. Chows Chows
7. Doberman Pinschers
8. Akitas
9. Wolf-hybrids
10. Mastiffs
11. Cane Corsos
12. Great Danes
13. Alaskan Malamutes
14. Siberian Huskies

These breeds always make the cut when it comes to an insurance company’s list of aggressive dogs.

मायला आमचं जर्मन शेफर्ड पण आहे ह्या लिस्टमध्ये ! दिसायला लांडग्यासारखं आहे म्हणून असेल, त्याहून खतरनाक ते बेल्जियन मेलनोईस आहे राव !

जर्मन शेफर्ड्स असतात पण भयानक लॉयल, बेबी फ्रेंडली, अर्थात त्यांचा बाईट फोर्स, एक्सरसाईज निड्स वगैरे जबर जास्त असतंय बेसिकली अल्पईन वर्किंग डॉग होय तो ! पिटबुल पेक्षा काही बाबतीत जीएसडी वेगळा पडतो

१. सरासरीपेक्षा जास्त बुद्धी
२. मालक एकटा नाही तर कुटुंबियांशी बांधिलकी

अर्थात लुक्स अन आकार पाहता त्यांचा दंगा मस्ती पण लोकांना शेक देऊ शकतो हे एक आहेच. माझ्या अनुभवात माझ्या पोरीला ३ महिन्यांची असल्यापासून शाम्याचा (आमच्या कुत्र्याचं नाव होतं शामराव, नॉट अ जोक) लळा लागणं नंतर लिटरली त्याचे कान ओढून अंगावर लोळण घेणे वगैरे दिव्य प्रकार पण शामराव बापूडवणे तोंड करून सहन करताना बघितले आहेत मी तरी, त्यामुळे जर्मन शेफर्ड ह्या लिस्टमध्ये पाहून खरंच जेन्यूईन नवल वाटलं.

तुम्हाला आश्चर्य वाटलं, याचं आश्चर्य वाटलं नाही. बरीच कुत्राप्रेमी मंडळी आणि त्यांच्या आवडत्या संस्था इन्शुरन्स कंपनीवर दबाव टाकत आहेत की तुम्ही आमच्या प्रिय कुत्र्यांना इन्शुरन्स नाकारून असा भेदभाव का करत आहात? आणि मग राज्य पातळीवर कायदे बदलणे (उदा. भटक्या कुत्र्यांना पकडू नका वगैरे. वगैरे.) प्रकार सुरू होतात.

कसे आहे कुत्रा काय कुठलाही प्राणी काय तुम्ही कसा वाढवता, कसे ट्रीट करता यावर खूप गोष्टी अवलंबून असतात
सिंह, बिबट्या सारखे हिंस्त्र प्राणी देखील प्रकाश आमटे यांनी प्रेमाने सांभाळून दाखवले आहेत
जर्मन शेफर्ड प्रचंड मायाळू असतात हे मी पाहिलं अनुभवला आहे पण माझ्या लहानपणापासून मला त्याची भीती होती कारण आमच्या सोसायटी मध्ये एकाकडे होता रॉकी
तो इतका वाईल्ड झाला होता की त्याला पूर्णवेळ जाड साखळी ने बांधावे लागत असे
ती देखील तो हिसका देऊन तोडत असे
आणि रॉकी सुटला असा आरडाओरडा झाला की अक्षरशः लोक सैरावैरा पळून घरात जाऊन दारे लावून घेत
जोवर ते काका त्याला शोधून पकडून बांधत नसत तोवर सामसूम असे पूर्ण सोसायटी मध्ये

अजून एक उदाहरण म्हणजे माझ्या आई ला पमेरियन चावला होता
पार इंजेक्शन घ्यावं लागलं होतं
आता ते कसलं गरीब दिसणार भुभु आहे
फक्त किरट्या आवाजात भुंकून डोकं उठवतात हे सोडलं तर ते काय डेंजरस मध्ये नाही

आणि काही लॅब देखील चिडखोर पाहिले आहेत
आम्ही फिरायला जातो तेव्हा एकजण आणतो, त्याला एक सेकंद पण मोकळा सोडत नाहीत, साखळी बांधूनच फिरवावे लागते कारण दुसरा भुभु दिसला की तो अग्रेसिव्ह होतोच होतो

कुत्रा पालन प्रेमी आहे बुआ मी, कुत्रा प्रेमी नाही, सूक्ष्म फरक लक्षात घेतलात तर कदाचित आपल्या मनात आमच्या श्वानपालनाविषयी तयार होऊ घातलेला बेसिक स्टिरीओटाईप धुवून निघेल, माफ करा स्पष्ट बोलतोय पण माझं जर्मन शेफर्ड मनमिळाऊ आहे म्हणून जगात हयात असलेली कोट्यावधी कुत्री तशीच असतील असे काहीसे माझे म्हणणे आपल्यास वाटत असेल तर ते नाही हे इथे निःसंदिग्ध स्पष्ट करतोय.

माझ्या म्हणण्याचा रोख बव्हंशी "मायला आमचं येडं पाहून तर ही कुत्री इतकी डेंजर असतील असे वाटत नाही" इतपतच आहे, बाकी कोट्यावधी डॉलर्सचा प्रश्न पडला की ब्रिडिंग इंडस्ट्री, केनेल्स अन इन्शुरन्स कंपनीज आपापसात ठरवून घेऊ दे काय ते, आम्हाला काय केला कायदा का पाळ अन भर टॅक्स संपली जिंदगानी !

(स्वर्गवासी. शामरावचा शामळू मालक) वांडो

कुत्रा प्रेमी म्हणा, कुत्रा पालन प्रेमी म्हणा किंवा "आमचा कुत्रा नाही हो तसा, तुम्ही त्याला कसा वाढवलाय त्याच्यावर अवलंबून आहे" हे म्हणा.

रिस्क मॅनेजमेंटला फक्त ४ पर्याय असतात: १. Avoid risk २. Reduce risk ३. Transfer risk ४. Accept risk
मुद्दा हा आहे की इन्शुरन्स कंपनी रिस्क analysis करते आणि त्यानुसार ठरवते की अग्रेसिव्ह कुत्रे कुठले आहेत ते. त्यांचे आणि माझे मत एक आहे. तुमचे मत त्याच्याशी जुळावे असा आग्रह नाही.

जाता जाता: मला स्वतःला कुत्रे आवडतात, पण अग्रेसिव्ह कुत्रे, सतत केकाटणारे (व्यक्तिशः मला त्रास होत असेल तर), त्यात बसत नाहीत.

मुद्दा हा आहे की इन्शुरन्स कंपनी रिस्क analysis करते आणि त्यानुसार ठरवते की अग्रेसिव्ह कुत्रे कुठले आहेत ते. त्यांचे आणि माझे मत एक आहे. तुमचे मत त्याच्याशी जुळावे असा आग्रह नाही.>>>
अखिर केहना क्या चाहते हो ?

हातीच्च्या मग ते सगळेच करतात की, हौसेने कोण जात असेल पीटबुल किंवा रॉटवायलरना कुरवाळयला असं वाटत नाही. असे हौशी असतीलही पण सर्वसामान्यपणे आपण लांबच राहतो असा माझा तर समज आहे.

मला वाटलं तुम्ही बंदी आणावी वगैरे काही म्हणाताय का, लांबच राहयचे असेल तर ठीके...

उत्तम निर्णय

जर्मन शेफर्ड आणि ग्रेट डेन मायाळू असतात. ग्रेट डेन भलताच उंच असतो, ताकदही खूप आहे. पण हिंसक उदाहरण ऐकण्यात नाही. बरीचशी जर्मन शेफर्ड आळशी पाहण्यात आहेत. जर्मन शेफर्ड मधलं सिंगल लेअर / सिंगल हड्डी वालं फिमेल कुत्रं जास्त अ‍ॅक्टीव्ह असतं असं पाहण्यात आहे. जास्त वजनाची कुत्री त्यांना व्यायाम मिळाला नाही कि आळशी होतात. चुभूदेघे.

कुत्र्यांचं एक निरीक्षण ( समजूत वगैरे नाही.):- कुत्रा पाळलेला असला आणि मालकच खायला घालू लागला तरीही झडप घालतात,खाणे हुसकावून घेतात. ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे. खाणं देण्यात वेळ लागला तर हाताला चावतात आणि डबा काढून घेतात.
त्यांना आपण खाणं देतोय असा विचार नसून त्यांचं खाणं आपल्याकडे आहे आणि ते लवकर हिसकावलं पाहिजे हा विचार असतो.

कधी भटकंती दरम्यान डबे काढून खायला घेतल्यावर एखादा कुत्रा बाजूल येतो. तेव्हा पोळीचा तुकडा दूर फेकतो. पण एकदा खायला समोर धरला तर त्याने एकटक पंधरा सेकंद पाहिले आणि मग झडप घातली तेव्हा दातांचा ओझरता स्पर्श झाला. नशीब जखम झाली नाही. अन्यथा ट्रिप खर्च ७५० ने वाढला असता.

कुत्रा पाळलेला असला आणि मालकच खायला घालू लागला तरीही झडप घालतात,खाणे हुसकावून घेतात. ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे.>>>>

त्या साठी त्यांना शिस्त लावावी लागते
आमचं भुभु कितीही आवडीचे खाणे असले तरी शांतपणे वाट बघत थांबतो
जोवर त्याला खा म्हणत नाही तोवर तो खात नाही
इतकंच काय स्टे ची ऑर्डर देऊन मी वेगळ्या खोलीत गेलो तर लाळ तपकवत बसून राहतो पण खात नाही

पण हेच ज्यावेळी तो पिल्लू होता आणि त्याला घरी आणलं होतं त्यावेळी भुंकत गुरुगुरत झडप घालायचा खाण्यावर
त्याला हळूहळू शिकवत समजवत नेल्याने आमूलाग्र बदल झाला आहे

Pages