बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'छावा' बघून संपलीये मी इतक्यात >>> मी असा ट्रायच मारला नाही. मारायचाही नाही असं ठाम ठरवलंय. गाणी आवडली नाहीयेत. बाकी इकडून तिकडून जे काही कानावर पडलंय ते इतकं डेंजर आहे की त्यापेक्षा मी नवीन येणारा 'सिनर्स' बघेन थेट्रात असं ठरवलंय. हॉररच बघायचा तर जो अ‍ॅक्चुअली हॉरर आहे तो तरी पहावा Proud

संभाजी आणि कवी कलश यांना आपण भगतसिंगासारखे फासावर चढतोय असं का वाटावं >>> रिअली?

एकूणच या सिनेमावरची माझी मतं कुठे लिहिली तर घरावर मोर्चा येईल >>> लिहूच नकोस मग. बघतोस काय मुजरा कर टाइप व्हिडिओ कर एखादा Proud

<<<सगळ्यात डोक्याला शॉट त्या 'श्री-सखी' नं लावला.>>

त्यांनी सगळ्या (ऐतिहासिक माहितीच्या) रकान्यात बरोबर ची खुण करायचीच असा चंग बांधलेला दिसला.

येसुबाई ह्या काही काळासाठी संभाजीच्या दीवाण होत्या. आणि राज्यकारभारात जी मुद्रा असते ती त्यांची "श्रीसखी राज्ञी जयंती" अशी काही तरी होती. म्हणून पुर्ण पिक्चर भर त्या श्रीसखी.

संभाजी महाराजांनी बुधभूषण हे काव्य लिहिले तेव्हा कवी कलश हे त्यातील वृत्त वगैरे तपासुन गरज वाटल्यास सुधारणा सुचवित असतं म्हणून ते पुर्ण पिक्चर भर छंदोगामात्य.

पण अभ्यास इथेच थांबवला बहुतेक. गणोजी शिर्के हे संभाजीच्या मोठ्या बहिणेचे (आणि संभाजी गणोजीच्या लहान बहिणेचे म्हणजे येसुबाईचे) यजमान होते. त्यामुळे त्या नात्याचा आदर म्हणून ते किमान त्यांना "दाजी" किंवा तत्सम काही तरी संबोधन वापरत असणार. पिक्चर मध्ये मात्र संभाजी महाराज त्यांना डायरेक्ट गणोजी म्हणतात.

फा ने हिंदि सिनेमातील काही नियम लिहिले आहेत
उदा : आपल्या समोर तो व्हिलन आहे , ज्याला मारण्यासाठी आपण जंग जंग पछाडले आहे, आपल्या हातात भरलेली बंदूक आहे, तो गलितगात्र झाला आहे, अशावेळी त्याल थेट गोळी न मारता किंवा त्याला पायावर गोळी मारून जखमी न करता आपण का बदला घेणार आहोत त्याबद्दल लंबी चवडी भाषणे देणे व त्याने केलेल्या पापांचा गिट लॉग वाचणे.

त्यात माझी अ‍ॅडिशन : चिखलात पडून आपले कपडे घाण झाले व आपण रस्त्यावरचा हापसा, एखादे उडुपी हॉटेल वगैरे टाळून एका परिचित अविवाहित स्त्रीच्या घरी जाऊन तोंड धुण्याची परवानगी मागितली व मग बाथरूम मध्ये तोंड धुताना अचानक डोक्यावर शॉवर सुरू झाला तर शॉवर मधून लगेच बाजूला जाणे, बाथरूम मधून बाहेर येणे वगैरे न करता तिथेच शॉवर मध्ये भिजत नॉब हुडकणे व मग 'ये शॉवर बंद क्यूं नहीं होता' असे ओरडून तिला बाथरूम मध्ये बोलावणे.

विकु Lol

जितेंद्र साठी नियमावली लिहायला सांगूया फा ला Happy

विकु Lol

जितेंद्र साठी नियमावली लिहायला सांगूया फा ला >> +१

मुलगी दोन दिवसापुर्वी सन्निवेल मध्ये internship साठी शिफ्ट झाली. बायकोला पण ३ महिन्या करता पाठवले आहे. भारतिय पासपोर्ट असल्याने immigration ची भिती वाटत होती पण ऑफिसरने ३ महिनेच का राहताय ६ महिने का नाही असे म्हणत शिक्का मारला. गेल्या गेल्या अपार्ट्मेंट मिळाले, नेट, युटिलिटी पण काही तासात सेट झाले. ईन्स्टा वर ग्रोसरी पण मागवली. मुलीच्या कंपनीची शटल बस पण जवळच येते. सगळे सेट झाले. दोन प्रश्न आहेत.
१> बे एरियात खास करुन सन्निवेल मध्ये बाहेर चालणे सुरक्षित आहे का ? दोघी संध्याकाळी बाहेर फिरायला जातात. mid-west मध्ये असे बाहेर फिरणे सुरक्षित न्हवते.
२> मेमोरियल डे आठवड्यात माझा पण अमेरिका जाण्याचा प्लॅन आहे. कार भाड्याने घ्यायचा विचार आहे. . तर ह्या ३ दिवसात कुठे जाता येईल? SFO- LA drive, Yosemite , grand canyon झाले आहे. ,

वर उत्तरेला जा रेडवूडला. तिथेही बरेच काही आहे. सकोया हा पर्याय पण आहे. आधी बघितले नसेल तर जाच. योसेमिटीपेक्षाही वेगळे वाटते.

बे एरियात तुम्हाला रिमोटली वेलकम साहिल शहा Happy सनीवेलचा कोणता भाग आहे? एल कमिनो रिआल वर किंवा जवळ असेल तर तेथे लोक चालत फिरताना दिसतील, फॅमिलीज सुद्धा. माझी माहिती आता ८-१० वर्षे जुनी आहे, पण एल कमिनो वर नॉर्थला बर्नार्डो अ‍ॅव्हेन्यू व साउथला लॉरेन्स एक्स्प्रेसवे पर्यंतचा भाग जनरली सेफ आहे. सनीवेलचे १०१ जवळचे भाग आता कसे आहेत माहीत नाही पण सनीवेल जनरली सेफ समजले जाते. त्यात आता भरपूर भारतीय सगळीकडे आहेत.

फिरायला ती वरची ठिकाणे ऑलरेडी झाली असतील तर असामी म्हणतो तसे रेडवूड किंवा सेकोया नॅशनल पार्कचा पर्याय आहे.

बे एरियातून इंटरस्टेट ५ ने शास्ता लेक/माउण्ट शास्ता वगैरे पाहून ओरेगॉन बॉर्डर पर्यंत जायचे. दुसर्‍या दिवशी तेथून क्रेटर लेक पाहून कॅलिफोर्नियाच्या किनार्‍यावर यायचे. तिसर्‍या दिवशी तेथून हायवे १०१ ने बे एरियाकडे परत, अशी तीन दिवसांची ट्रीप आम्ही पूर्वी केलेली आहे. नाहीतर निव्वळ १०१ वरून रेडवुड फॉरेस्ट्स बघत सुद्धा २-३ दिवसांची ट्रीप होईल. आम्ही तशीही केलेली आहे. बरीच बघण्यासारखी ठिकाणे आहेत.
ट्रकी-लेक टाहो अशी सुद्धा होऊ शकेल. तेथे अजून स्नो असेल तर स्नोमोबिल, स्लेडिंग/ट्युबिंग वगैरे करता येईल. आवड असेल तर सॅक्रमेण्टो रेल्वे म्युझियम व कॅलिफोर्निया कॅपिटल बिल्डिंग मस्त आहे. नुसते सॅक्रमेण्टो तर दोन दिवसांतही होईल.

कार्मेल बाय द सी ,बिग सर,रेडवुड, सिकोया, किन्ग कॅनियन अन्डररेटेड आहे पण मला खुप आवडल.
लेक ताहोला स्नो नसला तरी तसही फिरायला छान आहे..

धन्यवाद फा आणि असामी , रेड वुड डोक्यात होत पण आजुन बरीच चांगली माहिती मिळाली.

सनीवेल मध्ये कॅल रेल्वे स्टेशन जवळ आहे. जर मुंबई सारखा रेल्वे रुळा वरुन चालण्याचा पर्याय असता तर स्टेशन वरुन दक्षिणेला ५-१० मिनिटात अपार्ट्मेट येईल. नाहितर १५ मिनिटे लागतिल .

सनीवेल कॅलट्रेन म्हणजे एव्हलिन अ‍ॅव्हेन्यू च्या बाजूला घर असेल तर तो सगळा एरिया चांगला आहे. बाजूला तर सनीवेल डाउनटाउन आहे. खूप रेस्टॉ वगैरे आहेत. ट्रॅक्सच्या दुसर्‍या बाजूला (कॅलिफोर्निया अ‍ॅव्हेन्यू, सेण्ट्रल एक्सप्रेसवे) असेल तर कल्पना नाही - तेथे नॉन-रेसिडेन्शियल भाग बराच आहे. पण ट्रॅक्सच्या डाउनटाउनच्या बाजूचा भाग (एव्हलिन ई) फिरायला चांगला आहे. मथिल्डा अ‍ॅव्हेन्यू च्या बाजूला किंवा फेअर ओ़क्स वरून पुढे (दक्षिणेकडे) पार एल कमिनो पर्यंत. नकाशावर ८२ दिसेल - तोच एल कमिनो. एक्झॅक्ट पत्ता इथे द्यायची गरज नाही पण जेथे असाल तेथे एकदा संध्याकाळी ६-७ च्या सुमारास चक्कर मारून बघा, तुम्हालाही अंदाज येईल.

तरी कोणालातरी विचारतो. पूर्वी मी व माझे बरेच मित्र तेथेच आसपास राहायचो - एल कमिनोच्या जवळ. पण गेल्या काही वर्षांत सगळेच तेथून बाहेर पडलो बहुतांश लोकांनी दुसर्‍या भागांत घरे घेतल्याने.

कार्मेल बाय द सी ,बिग सर >>> हो ते ही पर्याय आहेत. हायवे १ चा तो भाग सुंदर आहे. बे एरियातून सांता क्रूझला जाउन तेथे बीच बोर्डवॉक वर एक दिवस, किंवा तेथील एखाद्या बीचवर, मग तेथे जवळपास राहून दुसर्‍या दिवशी दक्षिणेकडे हायवे -१ ने जाउन कार्मेल/कार्मेल बाय द सी, १७ माइल ड्राइव्ह हे ही करता येईल. तेथे मॉण्टरे अ‍ॅक्वेरियम आहे तेही मस्त आहे. पाहण्यासारखे आहे. आम्ही अ‍ॅन्युअल मेम्बरशिप घेतली होती किमान एकदा.

काही काही डे ट्रिप्स आहेत. सॅन फ्रान्सिस्को जवळ म्युईर वूड्स म्हणून एक जागा आहे. नुकताच माबोवर कोणीतरी एक लेखही लिहीलेला आहे त्याबद्दल. जरा लांब आहे व कधीकधी तेथील पार्किंग लौकर भरते म्हणून गोल्डन गेट ब्रिजजवळ एका ठिकाणी पार्क करून शटल असते. वेबवर चेक करून जा. पण फार सुंदर आहे. रेडवुड फॉरेस्टचा अनुभव फार लांब न जाता तेथेही मिळेल. तेथे आणखी पुढे एक स्टिन्सन बीच आहे.

स्टॅनफोर्ड युनि. चा परिसर फिरायला चांगला आहे. बर्कलीचाही असेल पण मी पाहिलेला नाही.

मात्र समुद्राजवळ किंवा इव्हन बे जवळ कोठे जाताना जॅकेट्स घेउन जा. अगदी उन्हाळ्यातही तेथे थंड हवा असते.

टेक्नॉलॉजी मधे इंटरेस्ट असेल तर बे एरियाला त्याचा समृद्ध इतिहास आहे - सेमिकंटक्टर ते आत्तापर्यंत. सॅन होजे मधले टेक म्युझियम पाहण्यासारखे आहे. तेथील जवळपासचा भागही मस्त आहे. जवळ एका पार्क मधे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इण्टेल म्युझियम व पॉलो ऑल्टो मधे एक कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियम आहे. मी दोन्ही पाहिलेली नाहीत. तसेच स्टॅनफोर्ड व बर्कली मधेही तेथील सेमिकण्डक्टर च्या काळापासूनची माहिती नक्की असेल.

Wow बरेच काही करण्यासारखे आहे. एव्हलिन अ‍ॅव्हेन्यू मध्ये घर आहे. बाजुला बरेच रेस्टॉरंट आहेत. आजुन त्या परिसरात गेलो नसल्याने नक्की कुठे घर आहे ते सांगता येत न्हवते. ( माय लेकी आधी गेल्या आहेत. मी पुढच्या आठवड्यात जाणार आहे)
टेक्नॉलॉजी मध्ये बराच interest आहे . आयुष्य सेमिकंड्क्टर मध्ये घालवल्यामुळे संटा क्लरा , सॅन होसे ह्या परिसराचे आकर्षण आहे . त्यामुळे टेक म्युझियम ला नक्कीच जाईन . पुर्ण मॅसेज नोट्स मध्ये ठेवला आहे. जसे जमेल तसे जाण्याचा विचार आहे.

मग तर तुम्हाला नक्की आवडेल. हाय टेक बूम च्या आधीही तेथे सेमीकंडक्टर इण्ड्स्ट्रीमुळे नाव होतेच, किंबहुना सिलिकॉन व्हॅली नावाचा संबंध सेमिकण्डक्टर कंपन्यांमुळेच आहे हे तुम्हाला नक्की माहीत असेल.. बे एरियात त्याच्या खाणाखुणा खूप होत्या पूर्वी. अजूनही अनेक असतील. एक उदाहरण म्हणजे सनीवेल मधले फ्राइज इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान. ते आता दुर्दैवाने बंद झाले. पण २००० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक्सची आवड असणार्‍यांकरता तेथे जाणे हा एक आवडता उद्योग होता. एखाद्या वॉलमार्टच्या पसार्‍याइतके मोठे दुकान पण पूर्ण इलेक्ट्रॉनिक्सला वाहिलेले. टीव्ही, कॉम्प्युटर्स पासून ते छोटे छोटे स्पेसिफिक इलेक्ट्रॉनिक पार्ट्स तेथे मिळत. पण ट्रान्झिस्टरचा शोध लागला त्याबद्दलची त्या दुकानातील भिंतींवर असलेली माहिती, तेव्हाचे बर्कली युनि. वगैरेमधले फोटो हे भव्य स्वरूपात होते. नुसते ते पाहायलाही छान वाटत असे. हे दुकान आता बंद झाले. पण बर्कलीच्या युनि. मधे अशी काहीतरी माहिती नक्की जतन केलेली असेल. बाकी टेक म्युझियम व कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियममधेही असेल.

एव्हलिन अ‍ॅव्हेन्यू असेल तर जनरली एरिया चांगला आहे.