नालायक राज्यकर्त्यांनो (ए मेरे वतन के लोगो)

Submitted by वैभ्या on 30 December, 2009 - 05:38

हे विडंबन नसुन जन जागृती आहे असे समझले तरी चालेल,
(चालः- ए मेरे वतन के लोगो)

नालायक राज्यकर्त्यांनो, जरा लाज बाळगा मनी,
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||धृ||

तुम्ही केले किती घोटाळे, पैशांनी भरले वाडे,
टाळुचे खाऊन लोणी ,त्या प्रेतांना मग गाडे,
तुम्हा ठायी कसली निती, तुम्ही निर्लज्ज बेईमानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||१||

इथे रक्त सांडले ज्यांनी, त्यांना मरते समयी ना पाणी,
पण कैदेचा शत्रु जो, त्यासी रोज चिकन बिर्याणी,
जनतेच्या समोर तांडव, आणि आत मदन मस्तानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||२||

आता कसले हवे पुरावे, किती बघावे तुमचे कावे
शहिदांनी चढविले जे, ते जॅकेट तुम्हा न गावे,
गेला देश, धर्म खडड्यात, तुम्ही करा आपली मनमानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||३||

नालायक राज्यकर्त्यांनो, जरा लाज बाळगा मनी,
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||धृ||

गुलमोहर: 

छान..

गेला देश, धर्म खडड्यात, तुम्ही करा आपली मनमानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी....

छान आहे...विचारप्रवर्तक आहे !!
अभिनंदन !!