शहर मुंबई, काळ नव्वदीचा.
उपनगरात विक्रोळी इथे राहणारा एक लहान मुलगा त्यादिवशी फार खुश होता. कारणही तसेच होते. परीक्षा झाल्यावर त्याला त्याच्या आईवडिलांनी एक गाडी गिफ्ट केली होती. गाडीचा फोटो गूगलवरून शेअर करतो. कारण ती बघितल्याशिवाय किस्स्याची मजा नाही.

तर हीच ती सायकल, जिला तीन चाकी स्कूटर सुद्धा म्हटले जाते. एक पाय फूटबोर्डवर ठेवून, तर दुसरा पाय जमिनीवर होडी वल्हवल्यासारखा मारत उभ्याउभ्यानेच चालवायची असते. एकदा रिदम पकडले तर वेगाला काही मर्यादा नसते. बस याच रिदम आणि वेगाने घात केला.
तर झाले असे,
मे महिन्याच्या सुट्ट्या चालू होत्या. काका नुकतेच कुटुंबासह मुंबईहून विक्रोळीला शिफ्ट झाले होते. एरीयाचे नाव होते टागोर नगर. बऱ्याच बिल्डिंगची मिळून एक वसाहत होती. ज्यात काकांच्या बिल्डिंग समोर लांबलचक त्रिकोणी आकाराचे गार्डन होते. नवीन सायकल चालवायला ती एक उत्तम जागा होती. काही दिवस माझ्या भावाने तिथे सायकल चालवली. पण एकदा का त्यात एक्स्पर्ट होताच त्याला नवनवीन क्षितिजे खुणावू लागली. बरे ही सायकल सुद्धा चालवायला अगदी सोपी असते. कोणीही शिकू शकते. आणि कितीही न कंटाळता चालवू शकते.
तर एकदा दुपारी आई घरात झोपली असताना माझा हा भाऊ सायकल चालवायला गार्डनमध्ये गेला. पण त्या दिवशी भाईच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लान शिजत होता. गार्डन पार करून त्याने सायकल सरळ समोरच्या मेनरोडवर घातली. गुळगुळीत रस्त्यावर वाऱ्याशी स्पर्धा करत चालवायची मजा येऊ लागताच गडी सुसाट सुटला. बघताबघता विक्रोळीची हद्द ओलांडून घाटकोपरमध्ये पोहचला. ही घटना विशेष होती कारण आजवर कधी त्याने एकट्या दुकट्याने विक्रोळी पलीकडे प्रवास केला नव्हता. किंबहुना त्यापलीकडे घाटकोपर नावाचे स्टेशन आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हते इतका तो लहान होता.
पण इतक्यावरच तो आज थांबणार नव्हता. आता तर कुठे त्याला मजा येऊ लागली होती. मजेमजेतच त्याने विद्याविहार गाठले. आणि बघता बघता कुर्ल्याला पोहोचला!
काळ काम वेग शिकायचे वय नव्हते ते. इतके आलो आहोत तर तितकेच उलट पावली परत सुद्धा जायचे आहे याची त्याला कल्पना नव्हती. अजूनही त्याची ताकद आणि उत्साह टिकून होता. त्यांच्या जीवावर त्याने आपला घोडा अजून पुढच्या दिशेने दामटवायला सुरुवात केली. तितक्याच वेगात सायन माटुंगा ओलांडून तो मुंबईची आन बान शान.. छे, शाहरूख खान नाही, तर दादरला पोहोचला.
हो मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण दादर, जिथे लोकं येतात आणि तिथल्या मार्केटच्या गर्दीत हरवून जातात. जिथे रेल्वे स्टेशनला गेले तर कुठला ब्रिज कुठल्या प्लॅटफॉर्मला जातो हे पहिले वर्षभर तरी कळत नाही. रस्त्यावर उतरले तर रस्ता क्रॉस कसा करायचा या विचारानेच भंबेरी उडते. सिग्नल लागला की नजर जाणार नाही तिथवर गाड्यांची लागलेली रांग बघून भांबावायला होते. तर अश्या या दादरला एक असा मुलगा जो आजवर राहत्या घरापासून चारशे मीटर दूर कधी एकट्याने गेला नव्हता तो किमान १७ ते १८ किलोमीटर प्रवास करून आला होता. तसेच आपण कुठे आलो आहोत आणि काय पराक्रम केला आहे या बद्दल अजूनही अनभिज्ञ होता.
आपल्या मुलाबाबत असे घडण्याचा विचार जरी केला तरी अंगावर भितीने शहारा येईल. पण तेव्हा याची जराही कल्पना नसलेल्या माझ्या काकी आपल्या घरात निवांत झोपल्या होत्या, किंवा उठून आपल्या कामाला लागल्या होत्या. कारण त्यांच्या मते घरासमोरच गार्डनमध्ये खेळत असलेला आपला मुलगा अंधार पडला, भूक लागली, खेळून दमला की स्वताहून परत येणार होता. पण त्यांच्या मुलाकडे त्यावेळी भूक लागल्यास ना पैसे होते, ना तहान लागल्यास पाणी होते. अंधार पडला तरी पुन्हा परत यायची खात्री नव्हती कारण परतीचा नेमका रस्ता त्याला ठाउक नव्हता.
चित्रपटात छान असते. जर चांगले घडलेले दाखवायचे असेल तर ऐनवेळी कोणीतरी मसीहा हिरो बनून पडद्यावर अवतरतो. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे होणे कठीणच असते.
पण त्या दिवशी ते झाले. एखादी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहावी तसे खरेच एकजण देवासारखा तिथे प्रकट झाला. त्यांच्याच टागोर नगरमध्ये शेजारच्या एका बिल्डिंगमध्ये राहणारा आणि याला चेहऱ्याने ओळखणारा एकजण तिथे दादरला उपस्थित होता.
त्याने माझ्या भावाला पाहिले. चौकशी केली. काय झाले हे कळले तेव्हा डोक्याला हात लावला आणि त्याला सायकलसह ट्रेनमध्ये टाकून अंधार पडायच्या आत घरी सुखरूप परत आणला 
------------------
परवा एका व्हॉटसअप मित्रांच्या ग्रूपवर हा किस्सा लिहीला. इतका डिटेलमध्ये नाही, तर विषय निघाला म्हणून फक्त चार ओळीत लिहीला. पण काही जणांना तो खोटा वाटला. कारण साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यात घडलेला हा किस्सा होता. कदाचित यावर श्रद्धेचा मुलामा चढवला असता आणि अमुक तमुक कृपेने भाऊ घरी परतला असे म्हटले असते तर कदाचित चार लोकांनी हात जोडले असते. आणि ज्यांना पटले नसते त्यांनीही इतरांच्या श्रद्धा दुखावतील या भीतीने खिल्ली उडवली नसती.
याउपर एक मानवी स्वभाव सुद्धा असतो. ट्रेनमध्ये अनोळखी लोकांकडून ऐकलेल्या गोष्टीवर एकवेळ विश्वास ठेवला जातो. पण तेच ओळखीच्या लोकांकडून असा किस्सा ऐकला की मन चटकन विश्वास ठेवायला तयार होत नाही. जे आपल्या आयुष्यात घडले नाही ते याच्या आयुष्यात कसे काय घडले असा विचार डोक्यात येतो. त्यात हा किस्सा होताही खरेच थोडा अविश्वसनीय. म्हणून मी अविश्वास दाखवणाऱ्या कोणाचे बोलणे मनावर घेतले नाही. पण त्यावरून प्रेरणा घेऊन हा धागा काढायचे ठरवले.
तसे हा किस्सा माझ्या स्वताच्या आयुष्यात घडलेला नाही तर माझ्या भावाच्या आयुष्यात घडला आहे. माझे स्वतःचे आयुष्य फार सरल आणि सपक आहे. तीन लग्ने झाली हा अपवाद वगळता विशेष जगावेगळे घडल्याचे चटकन काही आठवत नाही. पण इथे कित्येक मायबोलीकरांच्या स्वत:च्या आयुष्यात किंवा ओळखीच्या लोकांत असे काही ना काही घडले असेल ज्यावर चटकन कोणाचा विश्वास बसू नये. म्हणून विचार केला की अश्या घटनांचा एक धागा काढुया. आपल्या आयुष्यातील अश्या घटना इथे प्रामाणिकपणे लिहूया. आणि एकमेकांवर विश्वासाने विश्वास ठेवूया 
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
चालण्याचा वेग ५००० मीटर / तास
चालण्याचा वेग ५००० मीटर / तास म्हणजे अंदाजे १.४ मीटर /सेकंद. किक स्कूटर नक्कीच २.८ ते ३ .० मीटर/सेकंद वेगाने अंदाजे १०००० मीटर/तास अंतर कापू शकते. खूपच खड्डे असले तरी लहान मुलांना खड्ड्यातून किक स्कूटर चालवण्याचा मोह आवरता येत नसल्याने ते जीवाच्या आकांताने सर्कस मधील जीप जंप प्रमाणे स्कूटर हवेत उडवतात. हवेत चाकांना जमिनीसारखा अवरोध नसल्याने स्कूटर अधिक अंतर कापते. जितके अधिक खड्डे तितके अधिक अंतर प्रतितास कापले गेल्याने वेळेची बचत होते. त्यामुळे ही सत्यघटना असल्याचे मी मान्य करतो.
बालपणी मी मे महिन्यात दुपारच्या भर उन्हात दगडाने कैऱ्या पाडायला निघायचो. माझा आतेभाऊ माझ्याच वयाचा होता ,परंतु तो फोफसा असल्याने त्याचा दगड पाच एक फुटाच्या वर जात नसे. मला दगड आणून देणे आणि मी पाडलेल्या कैऱ्या गोळा करणे हे त्याला चांगले जमायचे. सतत दगड मारूनही मला टिपुसभर घाम येत नव्हता आणि थकवा येत नसे,परंतु आतेभाऊ घामाने भिजून जायचा , त्याच्या काखेतून घामाचे फवारे उडायचे त्यामुळे तो थकून जायचा. सांगायचे तात्पर्य हे की उन्हाचा आणि मेहनतीचा घामाशी आणि थकव्याशी काहीही संबंध नाही. प्रत्येकाच्या शरीरातील किडे वेगळे असतात.
एके दिवशी मी कैऱ्या पाडत असताना एक तरुण इंजिनीयर माझ्या बाजूला येऊन उभा राहीला. त्याने टेबल टेनिसच्या चेंडूच्या आकाराचा एक दगड माझ्या हातात दिला आणि मला म्हणाला बघू किती उंच फेकू शकतोस तू हा दगड आणि त्याने त्याच्या हातातील घड्याळाकडे बघून दगड फेकायचा इशारा केला. मी सर्व शक्ती एकवटून दगड आकाशात फेकला, दगड इतका उंच गेला की तो गोटी ( काचेच्या ) इतका दिसू लागला. थोड्या वेळाने तो दगड खाली येऊन बाजूच्या एका मोठ्या दगडावर आपटला आणि त्या मोठ्या दगडाचे तुकडे तुकडे झाले. तो इंजिनिअर तरुण एकदा माझ्याकडे आणि एकदा त्या दगडाच्या तुकड्यांकडे अविश्वासाने बघत राहीला. घड्याळाकडे बघत मनातल्या मनात काहीतरी आकडेमोड केली आणि म्हणाला ह्यापुढे इतका उंच दगड फेकत जाऊ नकोस , आकाशात विमाने उडत असतात.
बालपणी मी खूप फेकायचो आता वयोमानाने जास्त फेकता येत नाही.
ह्यापुढे इतका उंच दगड फेकत
ह्यापुढे इतका उंच दगड फेकत जाऊ नकोस , आकाशात विमाने उडत असतात. >>>
बालपणी मी खूप फेकायचो आता
बालपणी मी खूप फेकायचो आता वयोमानाने जास्त फेकता येत नाही.>>व्वा. क्या बात है!
फेंकी मैंने ऊँची ऊँची
ऊँची’आपा हो गया
फेको मगर प्यार से.
बालपणी मी खूप फेकायचो आता
...डपो
आग्या
आग्या
दहा वर्षाच्या मुलाचा
दहा वर्षाच्या मुलाचा धावण्याचा वेग: ८-१०.
Submitted by मानव पृथ्वीकर on 3 April, 2025 - 22:02
>>>> मानव माझ्या मते बऱ्याच जणांना इथे मी जे सुचवू इच्छितो आहे ते समजलेंलं नाही आणि त्याचं कारणं सोपं आहे आपण कोणत्याही गोष्टीचा अंदाज बाधायला जातो तेव्हा आपला मेंदू आपल्या माहितीतील जे सर्वात सोपं उत्तर असतो त्याला ॲंकरींग करुन त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो, ईथे बऱ्याच जणांनी लिहीलयं की ती सायकल धावून पकडता यायची नाही. पण ती कुठवर? माझ्या मते आपण सर्व जणांनी ही अशी रेस फार तरं ५ मिनिटे पाहीली असेल. जर कुणी १ तास धावला आणि १ तास धक्का मारुन सायकल चालवली तर निकाल काय असेल याचा ठोकताळा आपण त्या ५ मिनीटांच्या आपण फॅमीलीअर असलेल्या रेस वरुन लावतो.....तसाच प्रकार सायकल्स च्या क्षमतेतील तफावतीचा, आपला मेंदू आताच्या किक स्कूटर्स चा वेग जो युट्यूबवर पहात असतो त्याला ॲंकरींग करुन आधीच्या लहान मुलांच्या खेळण्याच्या सायकल्स च्या वेगाचा अंदाज बांधतो....हा डेटा वापरुन काढलेला निष्कर्ष होऊ शकत नाही.
ईथे मी कही रेडीट वरचे स्क्रीनशॉट आणि इथल्याच मायबोली वरच्या विवीध मॅरेथॉन धावणाऱ्यांच्या प्रौढ युजर्सच्या ( बहूतेक अर्ध मॅरेथॉन २१ किमी ) धाग्यांतील स्क्रीनशॉट डकवत आहे. वेगाच्या रेफरंस साठी उपयोगी पडतील असं मला वाटतयं. (रेडीट वरचे स्क्रीनशॉट हे आधुनिक किक बाइक्स च्या वेगाबद्दल चे आणि एफर्ट बद्दल चे आहेत).. आजूनही मला वाटतं की ईथे बहूसंख्य लोकं मे महीन्याच्या दुपारी एक १० वर्षांचा मुलगा १८-१९ किमी अंतर ( सलग ३-३.५ तास) जुन्या मॉडेलच्या तिन चाकी स्कूटर वर पाय मारुन कापतो, या कामगीरीसाठी आवश्यक असणाऱ्या फिजीकल स्टॅमीना आणि एन्ड्यूरंसकडे, सराव असणे /नसणे याकडे तौलनीकदृष्ट्या फारसं डोळस पणे पहात नाही आहेत.
:::
लोकांनी चांगले स्पीड दिले
लोकांनी चांगले स्पीड दिले आहेत की किक स्कूटरचे..\
ज्याची जशी स्कूटर त्याचे तसे अनुभव.. सगळ्या एकाच क्वालिटी आणि स्पीडच्या नसणार हे उघड.
बाकी मॅरेथॉन ईथे कश्याला आले ते समजले नाही.. एकवीस किलोमीटर पायी पायी जीव जातो ओ माणसाचा.. त्याची तुलना तेवढ्याच अंतराच्या किक स्कूटरशी कशी होऊ शकते?
तरी मी वॉकला दिड दिड तास सहज चालतो. अडीच तासाचा विक्रम आहे कारण एका मैत्रीणीशी बोलत चाललो होतो.
असो, पण
बहुधा तुम्हाला किक स्कूटर चालवतात कशी आणि त्यात किती कमी ताकद लागते किंवा किती कमी दमायला होते याची सुद्धा कल्पना नाही असे वाटते
या कामगीरी साठी आवश्यक
या कामगीरी साठी आवश्यक असणाऱ्या फिजीकल स्टॅमीना आणि एन्ड्यूरंसकडे, सराव असणे /नसणे याकडे तौलनीकदृष्ट्या फारसं डोळस पणे पहात नाही आहेत.
>>>>>>>>
आणि तुम्ही बहुधा FUN FACTOR लक्षात घेत नाही आहात
याचे संदर्भासहित स्पष्टी द्यायच्या आधी मला सांगा की तुम्ही कधी तारगाडी चालवली आहे का?
तारगाडी? नाही. लाथ गाडी
तारगाडी? नाही. लाथ गाडी लाथाडी.
सर, ही ही एक अदभुत आणि
सर, ही ही एक अदभुत आणि अविश्वसनीय, पण मानवीय सत्यघटना!
https://allthatsinteresting.com/dashrath-manjhi
फाविद: मुद्दा बरोबर आहे.
फाविद: मुद्दा बरोबर आहे.
अशी स्कुटर मी तेव्हा पाहिलीय ८-१० वर्षांची मुले त्याने अर्धा ते एक तास खेळताना. तासभर सलग चालवत नसतात, मध्ये कितीतरी ब्रेक असतात दमुन, जरा धापा टाकुन (एखादा मिनिट) पुन्हा सुरू.
हे पार्क मध्ये सपाट स्केट्स ट्रॅकवर. त्यातही तहान लागते.
चढ असताना चांगलाच दम लागणार. शिवाय रस्त्यातले खाच खळगे. म्हणुन मी लिहिले आहे की फार तर कुर्ल्या पर्यंत वगैरे ठीक होते.
जर्मनी मध्ये अशा किकबोर्ड, स्केट्सचा वापरत स्पोर्ट्स व्यतिरिक्त जा-ये करण्यास वापरणारे बरेच दिसतात(९५ पासून पहातोय.) स्केट्स लावुनच पुलाच्या पायऱ्या चढुन-उतरून जातात. शाळा-कॉलेज मधील विद्यार्थी ते आमच्या तिथल्या कंपनीत येणारे एक दोन तरुण.
पण हे सगळे एक तर व्यवस्थित शिकून एक्सपर्ट असलेले आणि दुसरे म्हणजे तिथे यासाठी असलेली सोय, तसे रस्ते, ट्रॅक्स. ९० साली काय आता सुद्धा त्याची तुलना विक्रोळी-दादर रस्त्याशी होऊ शकत नाही.
माझा मुद्दा एवढंच आहे की किक स्कुटर या यंत्राचा वेग, चाकांचे rpm याची इथे मर्यादा नाही. अशा स्वस्तातल्या ते चांगल्या किक स्कुटर्स इथेही मिळत. स्वस्तातल्या म्हटले तर सलग उन्हात रस्त्यावर एवढे अंतर जाण्यानेच चाकाच्या वरची रबरी रिंग लूज होऊन निसटु लागेल. या किश्शातील स्कुटर कुठली, मुलाचे वय किती हे गुलदस्त्यात आहे. (आणि सोयी प्रमाणे ऍडजस्ट करून मिळेल.) तर स्कुटरच्या क्वालिटीची, वेगाची कसलीही मर्यादा मानली नाही तरी सुद्धा फार तर कुर्ल्या पर्यंत ठीक असते असे मी म्हटले आहे.
केशवकूल, दशरथ माझी.. मी
केशवकूल, दशरथ माझी.. मी त्याचा चित्रपट सुद्धा पाहिला आहे. नवाझ होता त्यात. नशीब त्यावर चित्रपट निघाला. मायबोलीवर धागा निघाला असता तर त्या माणसाची काही खैर नव्हती
तारगाडी? नाही. लाथ गाडी
तारगाडी? नाही. लाथ गाडी लाथाडी
>>>
हे मजेत म्हटले आहे का की असे खरेच काही असते? असल्यास कल्पना नाही. डिटेल द्याल का?
बाकी तारगाडी माहीत आहे का? कारण Fun Factor हा मुद्दा त्या अनुषंगाने छान समजावता येईल..
किंबहुना त्यावर वेगळा नवीन धागा काढता येईल. आपल्याला रोजच्या आयुष्यात बरीच उदाहरणे मिळतील..
तार गाडी: एकाच तारेची ८-१०
तार गाडी: एकाच तारेची ८-१० सेमीची दोन चाके मधल्या दांड्या सकट. आणि मधल्या त्या दांड्याला आकडा करून जोडून हातात येईल असे तारेचे स्टीअरिंग.
दुसरी म्हणजे जाड तारेची मोठी दोन अडीच फूट रिंग आणि त्याला आकडा करून जोडलेले तारेचा दांडा. तो धरून मोठी रिंग ढकलली की आकड्याच्या गॅप मधुन ती फिरू लागते ती रस्स्यावर पळवत न्यायची.
यातील कुठली?
पहिली आमची आम्ही तयार करत असु.
याचे संदर्भासहित स्पष्टी
याचे संदर्भासहित स्पष्टी द्यायच्या आधी मला सांगा की तुम्ही कधी तारगाडी चालवली आहे का?>>>> तारगाडी ??
मानव
मानव
तुमची तारगाडी वाचून मला माझ्या लहानपाणीची आठवण झाली. आम्ही कडबा छिलून त्याची बैलगाडी किंवा चष्मा इत्यादि बनवत असू त्याची आठवण झाली.
कडबा की कामट्या? म्हणजे
कडबा की कामट्या? म्हणजे बांबू उभा कापून केलेल्या, त्याला आमच्याकडे कामट्या म्हणायचे. त्याची आम्ही सुद्धा केलीय बैलगाडी. छिलताना त्याची टोके कधी बोटात टोचत.
कडबाच. कामट्या नाही.
कडबाच. कामट्या नाही.
तारगाडी
तारगाडी
म्हणजे एक चाक जे तारेने ढकलत न्यायचे. वेगवेगळी गोलाकार चाके, रिंग गाडी म्हणून वापरली जायची पण आमच्या इथे फेमस होते ते एक स्टीलचे जाडजूड चाक. ते कुठल्या दुकानात विकत मिळायचे नाही तर आमच्या येथे घोड्याचा तबेला म्हणून एक भला मोठा गॅरेज एरिया होता. तिथून मुले ती गाडी वेचून आणायचे. साधारण ८ इंच (२० सेमी) व्यास. आणि एक इंच जाडीची रिंग जी कुठल्या सपोर्ट शिवाय सुद्धा उभी राहावी.
तार असायची तिच्या टोकाचा पूर्ण गोलाकार आकडा केला नाही जायचा. फक्त U आकार करून त्या गाडीला दोन्हीकडून सपोर्ट दिला जायचा जेणेकरून ती डगमगणार नाही. चालवताना चुकला तर गाडी पडली. वेगात चालवताना बॅलन्स करायला कौशल्य लागायचे. स्पेशली टर्न करताना, आणि ते सुद्धा टर्निंग रेडियस कमी असेल तितके कौशल्य जास्त.. पण सरावाने जमून जायचे, विकसित व्हायचे.
आता अशी ही तार गाडी चालवताना आपल्यालाच तिच्यासोबत फास्ट चालावे लागायचे आणि अजून वेगात चालवायचे असल्यास धावावे लागायचे. याचे खेळ खेळताना बरेचदा कोण वेगात चालवतो, कोण न पडता सलग जास्त वेळ चालवतो याच्या स्पर्धा लागायच्या. टीम बनवून एकमेकांच्या गाडी पाडायचा खेळ चालायचा जसे पतंगाची पेच लढवली जाते.
पण यापैकी कुठल्याही गेमचे स्वरूप नाही दिले तरी तासनतास नुसते ती गाडी चालवायला सुद्धा एक मजा यायची.
सिरियसली, म्हणजे चाळीच्या आतल्या मैदानात खाचखळग्यात संमोहित झाल्यासारखे गाडी चालवतच राहणे यात ऍक्च्युली खूप मजा यायची. कोणी फोटो काढायला नसायचे, कोणी व्हिडिओ बनवून ते अपलोड करणारे नसायचे, कुठला रेकॉर्ड नोंदवला जाणार नसायचा, कुणाला फूशारक्या मारून हे सांगायचं नसायचे, पण फक्त स्वतःला मजा येते म्हणून केले जायचे. पाय दुखणे या प्रकारच नसायचा. आजच्या तारखेला ती मजा नेमकी कसली हे सुद्धा सांगता येणार नाही. आणि ज्याने अनुभवली नसेल त्याला कोणी सांगून कळणारही नाही.
आज आपल्याला कोणी विक्रोळी ते दादर प्रवास किक स्कूटर किंवा सायकल वरून करायला सांगितले तर आपण कागद पेन्सिल घेऊन अंतर किती, गाडीचा वेग किती, ऊन किती, आपली शक्ती किती, वगैरे आकडेमोड करायला सुरुवात करू..... लहान मुले आनंदाने एक उडी मारतील आणि सायकल उचलून निघतील सुद्धा.. आणि जिथवर त्यांना मजा येतेय, त्यांचे पॅशन टिकून आहे तिथवर ते कोणी न सांगता पोहोचतील सुद्धा.
एक १०-११ वर्षांचा मुलगा ज्याला रोडवर गाडी चालवायचे आकर्षण आहे. कधीतरी घातली देखील असेल रोडवर गाडी पण घरचे ओरडले असतील. अश्या मुलाला एक दिवस संधी मिळते आणि तो अश्या एका प्रवासाला निघतो. विचार करा काय जुनून सवार असेल त्याच्या डोक्यावर.. तुमचे हे एखाद्या एव्हरेज मुलाची क्षमता वगैरे यांच्या कितीतरी पलीकडे असेल तो त्यावेळी.. त्याच एकाच गार्डनमध्ये रोज गाडी चालवणारा तो जेव्हा त्याला दर वळणावर वेगळा रस्ता, वेगळी दुकाने, वेगळी माणसे दिसत असतील तेव्हा ती नवनवीन क्षितीजे पादाक्रांत करायची हाव त्याला कुठवर घेऊ जाऊ शकते हा विचार करा..
तहान भूक उन्ह पाऊस खाचखळगे ट्रॅफिक वगैरे समस्या आपल्या जागी असतीलच, पण त्याच्या डोक्यात हे विचार शिवले सुद्धा नसतील.
पण आपण आकडेमोड करणारे कागदावरच लढाई हरतो, कारण मग तोच आपल्यासाठी आपल्या क्षमतेचा बेंचमार्क बनतो जो आपला मेंदू स्वीकारतो.
क्रमशः - याचा स्वतंत्र धागा हवा....
आम्ही त्याला घनगडी म्हणत असु.
आम्ही त्याला घनगडी म्हणत असु. बैलगाडीचे लाकडी चाक, त्याला एक्सल म्हणुन जो लाकडी दांडा असतो, त्यावर चाक फिट होते. त्या चाकाच्या भागावर वरून ही लोखंडी रिम बसवतात. घोडागाडीला पण तशीच असणार.
(जशी पूर्ण चाकालाही वरुन बसवतात. ती फार मोठी व जड असते खेळायला. ही वरची छोटी छान असते.)
दुसरा खेळ म्हणजे सायकलचे चाक, टायर ट्यूब, बिअरिंग, स्पोक्स काढलेली फक्त ती मोठी मेटॅलिक रिम. तिला मध्ये खाच असते तिथे फक्त दांडू घालुन ढकलायचे. खाच असल्याने दांडू सटकत नाही.
कसला भिकार आहे हा
कसला भिकार आहे हा
तशीच पण अजून जाडजूड असायची.
तशीच पण अजून जाडजूड असायची. आणि आकाराने छोटी असल्याने बॅलन्स चांगला राहायचा.. फोटो सापडत नाहीये नेमके गूगलवर..
अजून एक मजा म्हणजे स्पीडने चालवता चालवता ती मध्येच सोडून द्यायची आणि पडायच्या आधी मागाहून धावत जाऊन पुन्हा तारेच्या सपोर्टने कंट्रोल करायची.
तशीच पण अजून जाडजूड असायची. >
तशीच पण अजून जाडजूड असायची. >>
१ इंच जाड की रुंद?
पूर्वी एक हातगाडी असायची, तिला लिव्हर टाइप हॅण्डल असायचे, पोती वगैरे घालुन हमाल लोक ओढायचे. तिच्या चाकांचा व्यास असेल ८ इंच आसपास, आणि रुंदी दीड इंच आणि चांगली जाड असायची ८-१० मिमि जवळपास.
दोन्ही जवळपास एक इंच.. थोडे
दोन्ही जवळपास एक इंच.. थोडे उन्नीसबीस असेल..
आतल्या कडेने ग्रीस लागलेले असायचे ते साफ करून घ्यायचो.
अद्भुत नाही म्हणता येणार पण
अद्भुत नाही म्हणता येणार पण अविश्वसनीय वाटावी किंवा सिनेमा मध्ये आढळणारी अशी एक सत्य घटना...
https://www.maayboli.com/node/82147
हो, वाचला आहे तो धागा, ती
हो, वाचला आहे तो धागा, ती घटना.. माझे प्रतिसाद सुद्धा आहेत तिथे.
दोन चार अविश्वासाचे प्रतिसाद तिथे सुद्धा आले आहे
Pages