शहर मुंबई, काळ नव्वदीचा.
उपनगरात विक्रोळी इथे राहणारा एक लहान मुलगा त्यादिवशी फार खुश होता. कारणही तसेच होते. परीक्षा झाल्यावर त्याला त्याच्या आईवडिलांनी एक गाडी गिफ्ट केली होती. गाडीचा फोटो गूगलवरून शेअर करतो. कारण ती बघितल्याशिवाय किस्स्याची मजा नाही.

तर हीच ती सायकल, जिला तीन चाकी स्कूटर सुद्धा म्हटले जाते. एक पाय फूटबोर्डवर ठेवून, तर दुसरा पाय जमिनीवर होडी वल्हवल्यासारखा मारत उभ्याउभ्यानेच चालवायची असते. एकदा रिदम पकडले तर वेगाला काही मर्यादा नसते. बस याच रिदम आणि वेगाने घात केला.
तर झाले असे,
मे महिन्याच्या सुट्ट्या चालू होत्या. काका नुकतेच कुटुंबासह मुंबईहून विक्रोळीला शिफ्ट झाले होते. एरीयाचे नाव होते टागोर नगर. बऱ्याच बिल्डिंगची मिळून एक वसाहत होती. ज्यात काकांच्या बिल्डिंग समोर लांबलचक त्रिकोणी आकाराचे गार्डन होते. नवीन सायकल चालवायला ती एक उत्तम जागा होती. काही दिवस माझ्या भावाने तिथे सायकल चालवली. पण एकदा का त्यात एक्स्पर्ट होताच त्याला नवनवीन क्षितिजे खुणावू लागली. बरे ही सायकल सुद्धा चालवायला अगदी सोपी असते. कोणीही शिकू शकते. आणि कितीही न कंटाळता चालवू शकते.
तर एकदा दुपारी आई घरात झोपली असताना माझा हा भाऊ सायकल चालवायला गार्डनमध्ये गेला. पण त्या दिवशी भाईच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लान शिजत होता. गार्डन पार करून त्याने सायकल सरळ समोरच्या मेनरोडवर घातली. गुळगुळीत रस्त्यावर वाऱ्याशी स्पर्धा करत चालवायची मजा येऊ लागताच गडी सुसाट सुटला. बघताबघता विक्रोळीची हद्द ओलांडून घाटकोपरमध्ये पोहचला. ही घटना विशेष होती कारण आजवर कधी त्याने एकट्या दुकट्याने विक्रोळी पलीकडे प्रवास केला नव्हता. किंबहुना त्यापलीकडे घाटकोपर नावाचे स्टेशन आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हते इतका तो लहान होता.
पण इतक्यावरच तो आज थांबणार नव्हता. आता तर कुठे त्याला मजा येऊ लागली होती. मजेमजेतच त्याने विद्याविहार गाठले. आणि बघता बघता कुर्ल्याला पोहोचला!
काळ काम वेग शिकायचे वय नव्हते ते. इतके आलो आहोत तर तितकेच उलट पावली परत सुद्धा जायचे आहे याची त्याला कल्पना नव्हती. अजूनही त्याची ताकद आणि उत्साह टिकून होता. त्यांच्या जीवावर त्याने आपला घोडा अजून पुढच्या दिशेने दामटवायला सुरुवात केली. तितक्याच वेगात सायन माटुंगा ओलांडून तो मुंबईची आन बान शान.. छे, शाहरूख खान नाही, तर दादरला पोहोचला.
हो मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण दादर, जिथे लोकं येतात आणि तिथल्या मार्केटच्या गर्दीत हरवून जातात. जिथे रेल्वे स्टेशनला गेले तर कुठला ब्रिज कुठल्या प्लॅटफॉर्मला जातो हे पहिले वर्षभर तरी कळत नाही. रस्त्यावर उतरले तर रस्ता क्रॉस कसा करायचा या विचारानेच भंबेरी उडते. सिग्नल लागला की नजर जाणार नाही तिथवर गाड्यांची लागलेली रांग बघून भांबावायला होते. तर अश्या या दादरला एक असा मुलगा जो आजवर राहत्या घरापासून चारशे मीटर दूर कधी एकट्याने गेला नव्हता तो किमान १७ ते १८ किलोमीटर प्रवास करून आला होता. तसेच आपण कुठे आलो आहोत आणि काय पराक्रम केला आहे या बद्दल अजूनही अनभिज्ञ होता.
आपल्या मुलाबाबत असे घडण्याचा विचार जरी केला तरी अंगावर भितीने शहारा येईल. पण तेव्हा याची जराही कल्पना नसलेल्या माझ्या काकी आपल्या घरात निवांत झोपल्या होत्या, किंवा उठून आपल्या कामाला लागल्या होत्या. कारण त्यांच्या मते घरासमोरच गार्डनमध्ये खेळत असलेला आपला मुलगा अंधार पडला, भूक लागली, खेळून दमला की स्वताहून परत येणार होता. पण त्यांच्या मुलाकडे त्यावेळी भूक लागल्यास ना पैसे होते, ना तहान लागल्यास पाणी होते. अंधार पडला तरी पुन्हा परत यायची खात्री नव्हती कारण परतीचा नेमका रस्ता त्याला ठाउक नव्हता.
चित्रपटात छान असते. जर चांगले घडलेले दाखवायचे असेल तर ऐनवेळी कोणीतरी मसीहा हिरो बनून पडद्यावर अवतरतो. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे होणे कठीणच असते.
पण त्या दिवशी ते झाले. एखादी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहावी तसे खरेच एकजण देवासारखा तिथे प्रकट झाला. त्यांच्याच टागोर नगरमध्ये शेजारच्या एका बिल्डिंगमध्ये राहणारा आणि याला चेहऱ्याने ओळखणारा एकजण तिथे दादरला उपस्थित होता.
त्याने माझ्या भावाला पाहिले. चौकशी केली. काय झाले हे कळले तेव्हा डोक्याला हात लावला आणि त्याला सायकलसह ट्रेनमध्ये टाकून अंधार पडायच्या आत घरी सुखरूप परत आणला 
------------------
परवा एका व्हॉटसअप मित्रांच्या ग्रूपवर हा किस्सा लिहीला. इतका डिटेलमध्ये नाही, तर विषय निघाला म्हणून फक्त चार ओळीत लिहीला. पण काही जणांना तो खोटा वाटला. कारण साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यात घडलेला हा किस्सा होता. कदाचित यावर श्रद्धेचा मुलामा चढवला असता आणि अमुक तमुक कृपेने भाऊ घरी परतला असे म्हटले असते तर कदाचित चार लोकांनी हात जोडले असते. आणि ज्यांना पटले नसते त्यांनीही इतरांच्या श्रद्धा दुखावतील या भीतीने खिल्ली उडवली नसती.
याउपर एक मानवी स्वभाव सुद्धा असतो. ट्रेनमध्ये अनोळखी लोकांकडून ऐकलेल्या गोष्टीवर एकवेळ विश्वास ठेवला जातो. पण तेच ओळखीच्या लोकांकडून असा किस्सा ऐकला की मन चटकन विश्वास ठेवायला तयार होत नाही. जे आपल्या आयुष्यात घडले नाही ते याच्या आयुष्यात कसे काय घडले असा विचार डोक्यात येतो. त्यात हा किस्सा होताही खरेच थोडा अविश्वसनीय. म्हणून मी अविश्वास दाखवणाऱ्या कोणाचे बोलणे मनावर घेतले नाही. पण त्यावरून प्रेरणा घेऊन हा धागा काढायचे ठरवले.
तसे हा किस्सा माझ्या स्वताच्या आयुष्यात घडलेला नाही तर माझ्या भावाच्या आयुष्यात घडला आहे. माझे स्वतःचे आयुष्य फार सरल आणि सपक आहे. तीन लग्ने झाली हा अपवाद वगळता विशेष जगावेगळे घडल्याचे चटकन काही आठवत नाही. पण इथे कित्येक मायबोलीकरांच्या स्वत:च्या आयुष्यात किंवा ओळखीच्या लोकांत असे काही ना काही घडले असेल ज्यावर चटकन कोणाचा विश्वास बसू नये. म्हणून विचार केला की अश्या घटनांचा एक धागा काढुया. आपल्या आयुष्यातील अश्या घटना इथे प्रामाणिकपणे लिहूया. आणि एकमेकांवर विश्वासाने विश्वास ठेवूया 
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
मला वाटते किमान १०-१२ किमी
मला वाटते किमान १०-१२ किमी प्रतितास तरी वेग असावा तिचा. कमाल २०.
चालण्याचा वेग असलेली सायकल
चालण्याचा वेग असलेली सायकल कोणीतरी दहा-बारा वर्षाचा मुलगा चालवेल का>>>> रस्त्यावर चालण्याच्या कमाल आणि किमान वेगाच्या रेंजमधे फारसे अंतर नसते त्या बाबतीत आपण कुणाचेही चालणे हे एकसमान वेगाने( जोवर थकत नाही अथवा जास्त उतार चढाव नसतील तर) होते असे म्हणू शकतो.... पण कोणत्याही चाके असलेल्या वाहनाच्या कमाल व किमान वेगामधे मोठे अंतर असू शकते आणि ते अंतर वाहन, रस्त्याची स्थिती आदी गोष्टींवर देखील अवलंबून असते....मी जो ५-६ किमी प्रती तास वेग सांगितला आहे तो ताशी सरासरी वेग आहे.....याचा अर्थ असा होत नाही की ती सायकल फक्त ५-६ किमी प्रती तास याच एकसमान गतीने चालवली जाऊ शकते.... एक्स्प्रेस वे वर ७०-८० km/h च्या सरासरीने जी गाडी अंतर कापते ती ड्रायव्हरने काही सेकंदांसाठी १२०-१३०km/h च्या वेगाने देखील हाकलेली असते आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, खरं थ्रिल ड्रायव्हर १२० च्या वेगाने गाडी हाकतानाच घेतात....पण थ्रिल घेण्यासाठी किंवा गाडी त्या वेगाने पळू शकते म्हणून १२० च्या वेगाने तासभर गाडी हाकणे कधीच शक्य नसते, कारण ईथे गाडी गाठू शकत असलेला कमाल वेग, ड्रायव्हरची इच्छा या व्यतिरिक्त बरीच सारी व्हेरीएबल्स ते साध्य करण्यासाठी सोईची असावी लागतात आणि तुम्ही सांगीतलेल्या कथेत इतर बरीचशी व्हेरीएबल्स विपरीच होती असं दिसतं...असो, इथेच थांबतो.
चालण्याचा वेग असलेली सायकल
मला वाटते किमान १०-१२ किमी प्रतितास तरी वेग असावा तिचा. कमाल २०.>>>> असहमत, On flat ground, a normal cyclist can reach speeds of around 20-30 km/h हे फॅक्ट आहे. पॅडल वाल्या दुचाकी सायकल वेग झाला आणि या लहान मुलांच्या पायाने ढकलायच्या सायकलचा कमाल वेग २० किमी प्रती तास??

फार्स तुम्ही जो वेग सांगितला
फार्स तुम्ही जो वेग सांगितला तो सरासरी आहे याची कल्पना आहे...
काही पॅचमध्ये वेग सरासरी वेगापेक्षा जास्त असतो तसा मग तो काही पॅचमध्ये कमी सुद्धा असेल हे बरोबर.. पण सरासरी वेगच चालण्याच्या वेगा इतका असेल तर काही पॅचमध्ये तो चालण्याच्या वेगापेक्षा कमी होतो हे अजून अनपटणेबल होत आहे.
आणि हो तुम्ही आपल्या फोटोतील चाके गंजलेली तकलादू सायकल का पकडून बसला आहात...
मी माझ्या भावाची सायकल अशी खटारा नव्हती. त्या सायकलवर डबल सीट बसता येते म्हणजे विचार करा किती मजबूत असेल. अर्थात वरची खटारा घेऊन सुद्धा आरामात चांगला वेग पकडता येईल, फक्त चालवणारा नल्ला नसावा..
अरे हो यावरून आठवले, मोकळ्या गार्डन, मैदानात अश्या सायकलवरून पकडा पकडी सुद्धा खेळली जायची. म्हणजे पकडणाराच नाही तर पळणारे सुद्धा अशी सायकल घेऊन. अर्थात यावर सुद्धा अविश्वास दाखवायचा तुमचा हक्क अबाधित आहे.
पण प्रामाणिकपणे सांगतो तुमचे अश्या प्रकाराच्या सायकल बद्दलचे ज्ञान अपुरे आहे. आणि हे तुम्हाला स्वीकारता येत नसेल तर चर्चेला अंत नाही
दहा वर्षाच्या मुलाचा
दहा वर्षाच्या मुलाचा धावण्याचा वेग: ८-१०.
ही सायकल चालवणाऱ्याला धावुन पकडता येत नसे तेव्हा त्या पेक्षा जास्त १०-१२.
कमाल म्हणजे अगदी थोड्या वेळेला एखाद्या सुदृढ बालकाने गाठलेला स्पीड. तो कदाचित जास्तीत जास्त २० असेल.
विक्रोळी-दादर रस्त्यावर मेन्टेन केलेला स्पीड नव्हे.
रस्त्यात खाच खळगे, फुटपाथ
रस्त्यात खाच खळगे, फुटपाथ कुठे आहे कुठे नाही, आहे तिथे कुणीतरी व्यापलेला, नाही तिथे अशी सायकल दामटवण्या एवढा गुळगुळीत नाही, रस्त्यावर ९० मध्येही हेवी ट्राफिक, रस्त्यातले चढ उतार, एक्जर्शन मुळे आणि तशात एप्रिल -मे महिना यामुळे सतत लागणारी तहान, ईस्टर्न एक्स्प्रेस हाय वे ला त्याकाळी असणारा पाणपोयांचा अभाव, खास करून सायन सर्कल पुढे ट्राफिक अतीच. तशात आधीच कुर्ल्यातील स्वस्तिक चेंम्बर्सचा चौक ओलांडणे एक दिव्यच.
किस्से सांगण्याची स्टाइल असते लोकांची, एकाने विक्रोळी ते घाटकोपर संगीतले, दुसऱ्याने विद्याविहार, तिसऱ्याने कुर्ला.
इथ पर्यंतही चालले असते.
अन्यथा दहा वर्षाच्या मुलाने गुळगुळीत रस्त्यावर वर उल्लेखल्या प्रमाणे अडथळे नसताना २० किमी अंतर तीन तास आसपास कापणे शक्य आहे.
कन्नमवार नगर ते दादर टीटी १६
कन्नमवार नगर ते दादर टीटी १६ किमी दाखवतंय. ते या स्कूटर वरुन १० च्या वेगाने दीड तासात विना वाहक, विना थांबा गाठता येईल. इथे वाचलं त्या प्रमाणे मुलाला अडीच तीन लागले असं दिसतंय. त्यामुळे सरासरी वेग कमीच झाला आहे.
त्यात अविश्वसनीय काय वाटतंय? १० वर्षांच्या पोट्ट्यांच्या मनात आलं तर सकाळ काय आणि दुपार काय आरामात कापतील अंतर. किमान यात अविश्वसनीय काही वाटत नाही.
तुम्ही लहान असताना मे महिन्यात असे सकाळ पासून रात्री पर्यंत जेवणाचा ब्रेक घेऊन उन्हात खेळला नाहीत का? किंवा सायकल चालवली नाहीत का? इथे फक्त एक दिवस तीन तास चालवायची आहे.
ह्या हल्लीच्या आई-बापांचा आपल्या मुलांना छत्रछायेत वाढचून सगळेच असे लेचेपेचे असतात असा समज असतो का?
सातवीत असतानाची म्हणजे १३
सातवीत असतानाची म्हणजे १३ वर्षाचा असतानाची गोष्ट.
मोठी सायकल आम्हाला सीटवरून येत नव्हती कैची(मधुन पाय घालुन) किंवा दांड्या वरून चालवायचो पण बहुत करून कैची. मी आणि माझा मित्र १३-१४ किमी लांब मंगरूळ-दस्तगीर नामक एका खेड्यावर त्याच्या आत्याकडे गेलो. फेब्रुवारी/मार्च असावा.
मध्ये बरेचदा तहान फार लागली. रस्त्यात किमान दोन तीनदा तरी मळ्यात विहिरीवरून पाणी शेंदून (दोरी-बादली तिथे लागलेली असे) पिऊन गेलो. दोन तास लागले असावेत.
त्याच्या आत्याने रागावले एवढ्या लांब पोरं सायकल ने आलीत म्हणुन. तिथे दही साखर पोळी खाल्ली, आत्ते भावडां सोबत पत्ते खेळलो तासभर. मग तिथुन एक ट्रॅक्र्टर आमच्या गावच्या अर्ध्या पेक्षा जास्त वाटे पर्यंत जात होता. त्यात आमच्या सायकली घालुन आम्हाला पाठवले. तिथे उतरून दिल्यावर परत येताना एक ओळखीच्यांची वाडी होती तिथे चौथी पर्यँत आमच्या वर्गात असलेली त्यांची मुलगी होती, आम्हाला पाहुन तिने हाक मारली. मग आम्ही जरा वाडीत उंडारलो पेरू, बोरं खाल्ली. तिच्या वडिलांनी मग आम्हाला सोलाणे गठ्ठा बांधुन दिले घरी न्यायला. ते कॅरीअरवर लावुन घरी आलो. घरी एवढा वेळ कुठं गायब विचारल्यावर पराक्रम सांगितला, बोलणी खाल्ली आणि ताकीद मिळाली परत विचारल्या शिवाय गावाबाहेर जायचं नाही. आणि काही दिवस सायकलीला हात लावु दिला नव्हता.
मानव, तुम्हाला उद्देशुन
मानव, तुम्हाला उद्देशुन न्हवतं लिहिलं.
आणि शेवटी ऋन्म्याचा धागा आहे. उन्नीसबीस तर असणारच ना! किस्से सांगायची पद्धत हे ही आहेच. मला प्रश्न पडलेला स्कूटर पीक आवरला विक्रोळी स्टॉपिंग तेज लोकल मधुन आणली का स्टॉपिंग अॅट ऑल? लोक बोंबलले नाहीत का? का सामानाच्या डब्यात शिरुन आणली? सामानाच्या डब्याला मधला बार नसतो तर मुलाला दारात उभं केलं असेल तर ते काही बरोबर नाही. पण दार उभं रहायचं की एक थ्रिल असतं. १० वर्षांचा मुलगा उभा राहू शकेलच.
मानव, तुम्हाला उद्देशुन
मानव, तुम्हाला उद्देशुन न्हवतं लिहिलं.>> हो, मी अशीच आठवण लिहीली. त्यात अजुन गमती जमती आहेत.
मध्ये काही नाले होते आणि सडक झाली असली तरी एकदम उतार आणि वर चढाव होता काही ठिकाणी.
त्यात एके ठिकाणी मधल्या खोलगट भागात पायवाट येऊन मिळत होती, आणि आमच्या सायकली उताराला लागल्या तेवढ्यात एक आजी पायवाटेने रस्त्यावर मोळी घेऊन आल्या डोक्यावर. आम्ही करकचून ब्रेक दाबत पुढे उतरून पायाने वेग कमी करत ओय आजे आजे करत ओरडलो. तिने थांबुन मान इकडे वळवुन बघितले आम्ही कसे बसे धापा टाकत थांबलो तिला धक्का न मारता. आणि ती " माय वं, काय इचिन पोट्टे! बरं झालं दोघाईच्या ढुंगनात बिरेक हुते!" असे म्हणुन सरळ नाल्याच्या पुढच्या पायवाटेने तरा तरा निघुन गेल्या.
अमितव हो खरे आहे, आजच्या
अमितव हो खरे आहे, आजच्या काळातील मुले याबाबतीत लेचेपेचे वाटतात.. आईबाप त्यांना लाडाकोडाने आणि अतीकाळजीने बनवून ठेवतात किंवा यामागे बरेचदा जमाना खराब आहे हा विचार सुद्धा असतो जो तितका चुकीचाही नाही.
मी आठ वर्षे नऊ महिने या वयाचा असताना पासून माझगाव ते दादर थेट बसने, किंवा माझगाव ते भायखळा बसने आणि तिथून भायखळा ते दादर दुसऱ्या बसने किंवा ट्रेनने, आणि तिथून दादर टीटी चे काही मोठाले ट्रॅफिक रस्ते ओलांडून हिंदू कॉलनी मधील शाळेत असा तेव्हाचा साधारण पाऊण तासाचा प्रवास रोज सकाळ संध्याकाळ एकटा करायचो हे सांगितले तर इथे किती जणांना पटेल शंका आहे
<< तुमचे अश्या प्रकाराच्या
<< १० वर्षांच्या पोट्ट्यांच्या मनात आलं तर सकाळ काय आणि दुपार काय आरामात कापतील अंतर. किमान यात अविश्वसनीय काही वाटत नाही. >>
<< तुमचे अश्या प्रकाराच्या सायकल बद्दलचे ज्ञान अपुरे आहे. आणि हे तुम्हाला स्वीकारता येत नसेल तर चर्चेला अंत नाही >>
<< कन्नमवार नगर ते दादर टीटी १६ किमी दाखवतंय. >>
ते अंतर अजून कमी समजू १५ किमी आणि ते सुद्धा ५ तासात पूर्ण केले असे समजू. म्हणजे वेग झाला ३ किमी म्हणजे ३,००० मीटर्स प्रति तास. म्हणजे ५० मीटर प्रत्येक मिनिटाला. चाकाची त्रिज्या (radius) समजू अर्धा फूट म्हणजे १५ सेंटीमीटर्स. मग परीघ (circumference) झाला 2 x पाय x r = २ x ३.१४ x १५ = ९४.२ सेंटीमीटर. The formula for the circumference of a circle is C=2πr
आता rpm किती होतील ते काढा. ५००० भागिले ९४.२ = ५३.०८ इतके rpm शक्यच नाहीत त्या स्कूटरला. आता म्हणाल की स्कूटरचे चाक तर १ फूट व्यासाचे नसतेच मुळी. बरोबर आहे, पण मग rpm अजूनच वाढेल. ५३ शक्य नाही तिथे १०० शक्य होईल का? या rpm ने तुम्ही तरी न थांबता, न थकता इतके अंतर जाऊ शकाल का याचा विचार करा. झालं का आतातरी दूध का दूध, पानी का पानी? पुढच्या वेळी विचार करून थापा मारा.
आर पी एम काढल्याने दूध का दूध
आर पी एम काढल्याने दूध का दूध कसं झालं हे समजलं नाही.
इतके आर पी एम शक्य का नाहीत हे पण कळलं नाही.
हो मलाही कळले नाही हे rpm का
हो मलाही कळले नाही हे rpm का शक्य नाही..
आणि हे वाक्य तर बिलकुल नाही कळले...
<<<< या rpm ने तुम्ही तरी न थांबता, न थकता इतके अंतर जाऊ शकाल का >>>>
मी का चाकासारखा गोल गोल घरंगळत जाऊ?
स्केट्सने किती स्पीडने जाऊ
@उबो: स्केट्सने किती स्पीडने जाऊ शकतात मुले?
त्यांच्या चाकांचा व्यास किती, आणि मग rpm किती करा बरं गणित.
स्कूटरच्या चाकाचा डायमीटर ८
स्कूटरच्या चाकाचा डायमीटर ८ इंच असतो. जुन्या स्कूटरचा किंचित जास्त असेल. १० इंच समजा.
तरी पण ती स्कूटर इतक्या आर पी एम ने जाईल किंवा जाणार नाही हे कसं ठरवायचं ?
नॉर्मल माणूस ताशी पाच किमी वेगाने चालू शकतो. शहरी माणसाचा वेग निम्मा समजा. स्कूटर त्या पेक्षा दुप्पट वेगाने जाईल कि नाही जाणार ?
ताशी पाच किमी वेग धरला तरी नॉर्मल माणसाच्या चालण्याच्या वेगाइतका आहे.
तासाला पाच हजार मीटर धरावे लागेल.
दहा इंच चाकाचे गणित केलं तर चुकीचं होईल का ?
हिशोब कसा करायचा ते सांगितले
हिशोब कसा करायचा ते सांगितले आहेच. अजून आयती उत्तरे देऊ शकत नाही. मायबोलीवर अजून स्पून फिडिंग करायचा उत्साह नाही.
८ इंच व्यास असेल, तर ५००० ÷ (३.१४ x 20 cm) = ७९.६२ rpm
हा व्हिज्युअलायझर वापरून बघू शकता की चाक किती जोरात जायला हवे ( सायकलप्रमाणे या जुन्या स्कूटरला बॉल बेअरिंग नसतात, हा पण मुद्दा आहे. शिवाय स्कूटर सतत पायाने ढकलावी लागते.) आणि याच rpm ने सलग ५ तास न थांबता, न थकता, ७-८ वर्षांचा मुलगा भर मे महिन्यात दुपारी मुंबईच्या रस्त्यांवर इतके अंतर जाऊ शकेल का याचा विचार करा. तुलनेसाठी १०० rpm सुद्धा करून बघा.
(तरीही सरांच्या थापांवर विश्वास ठेऊन, कदाचित शक्य झाले असेल असे वाटत असेल तर शुभेच्छा.)
वरती ५००० मीटर आहेत ना ?
वरती ५००० मीटर आहेत ना ? त्याला सेंटीमीटर ने थेट कसं काय ड्डिव्हाईड केलं ?
माझं गणित चुकीचं असेल कदाचित. पण
८ इंच = ०.२०३२ मीटर * ३.१४ = ०.६३८०४८
५००० / ०.६३८०४८ = ७८३६ ( रेव्होल्युशन्स पर अवर )
७८३६ / ६० = १३०.६ आर पी एम
प्रत्यक्षात पायाने ढकलायची स्कूटर चालण्याच्या वेगापेक्षा बर्यापैकी जास्त वेग पकडते. सहा किमी पेक्षा जास्तच.
थापांवर विश्वास असं काही
थापांवर विश्वास असं काही नाही. माझा एक मामेभाऊ होता.
त्याला थापा मारायची सवय असल्याने त्याचं नाव कानफाट्या पडलं होतं.
नंतर नंतर या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं ही सवय झाली होती.
पण त्याने काही खरं सांगितलं तरी कुणी विश्वास ठेवत नव्हतं.
तो जे काही सांगेल त्याचा एकमेव साक्षीदार, पोलीस आणि जज्ज तोच सबकुछ असे.
अशा वेळी विश्वास ठेवायचा कि नाही हा ऑप्शनच नसे.
इथे गणित मांडून तुम्ही चांगला अॅप्रोच दाखवलात. पण त्या गणितात काही तरी खटकलं म्हणून विचारलं.
अशी स्कूटर चालण्यापेक्षा थोडी तरी वेगात जाईल हा अंदाज आहे. चालण्याच्या वेगापेक्षा जास्तच वेग असेल.
इथे नॉन मोटराइज्ड किक स्कूटरचा ताशी वेग (मैलांमधे) दिला आहे. बेअरींग नसणे, क्वालिटी खराब म्हणून कमी असेल थोडासा.
https://www.levyelectric.com/resources/unlocking-the-speed-potential%3A-....
फक्त तासभर ही स्कूटर कुणी लहान मुलगा चालवेल का याबद्दल शंका आहेच. पण ती बोलून दाखवून काय फायदा ?
तुम्हाला त्रास झाला असेल तर क्षमस्व.
<<हिशोब कसा करायचा ते
<<हिशोब कसा करायचा ते सांगितले आहेच. अजून आयती उत्तरे देऊ शकत नाही. मायबोलीवर अजून स्पून फिडिंग करायचा उत्साह नाही.>>
लोक हो, गुगल शोध, लिनीयर
लोक हो, गुगल शोध, लिनीयर स्पीडचा rpm वगैरे थांबवा.
आम्ही नाही पाहिली तेव्हाची ती किक स्कुटर, आम्हाला नाही माहीत किती वेगाने ती जाऊ शकत होती एवढे म्हणा, झालं.
ऋनम्या स्वतःच शीर्षकात
ऋनम्या स्वतःच शीर्षकात लिहायचं अविश्वसनीय आणि लोकांनी अविश्वास दाखवला की त्यांना खरं आहे म्हणून पटवत बसायचं.
काय मिळतं तुला असं करून
स्वतःच शीर्षकात लिहायचं
स्वतःच शीर्षकात लिहायचं अविश्वसनीय आणि लोकांनी अविश्वास दाखवला की त्यांना खरं आहे म्हणून पटवत बसायचं >>>
काय मिळतं तुला असं करून >> प्रतिसाद
जोक्स द अपार्ट, आक्षेप अविश्वास दाखवण्यावर नाही. पण मुद्दे चुकीच मांडू नका..
जसे की सायकलचा वेग चालण्याइतका आहे असे विधान करणे..
वेगाला आरपीएम मध्ये कन्व्हर्ट करून ते शक्य नाही असा दावा करणे..
आता वरच्या पोस्टमध्ये बघा त्यांनी मुलाचे वय सात आठ वर्षे केले
सलग ५ तास न थांबता, न थकता, ७
सलग ५ तास न थांबता, न थकता, ७-८ वर्षांचा मुलगा
>>>>>
तास ५ केले मुलाचे वय ७-८ केले.. आपल्या मनाने काहीही चालू आहे
सराना माझा पूर्ण आणि बिनशर्त
सराना माझा पूर्ण आणि बिनशर्त पाठींबा जाहीर करताना मला अतीव आनंद होत आहे. सर, ह्या जगात विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. त्यांच्यासाठी म्हणून शेक्स्पिअऱ्याने लिहून ठेवले आहे,
"There are more things in heaven and earth, Horatio,
Than are dreamt of in your philosophy. "
सर आपल्यासाठी म्हणून मराठी भाषांतर करतो.
" स्वर्गात आणि पृथ्वीवर अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याची , हे उपाशी बोक्या, किंवा इथे कुणाचेही नाव टाका, तुम्ही स्वप्नात देखील कल्पना करू शकणार नाही."
किंवा असे पण आहे की
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवम्
हपा ह्याचा अर्थ सांगतील.
विरोधकांच्या तोंडावर फेकायला एव्हढे पुरेसे आहे.
धाग्यावरचे प्रतिसाद वाचुन छान
धाग्यावरचे प्रतिसाद वाचुन छान करमणुक झाली. ऋन…चीही झाली असावी…
कर मुक्त करमणूक.
कर मुक्त करमणूक.
सर त्यासाठीच तर धागे काढतात, आणि लोक अल्लद जाळ्यात फसतात.
सर त्यासाठीच तर धागे काढतात,
सर त्यासाठीच तर धागे काढतात, आणि लोक अल्लद जाळ्यात फसतात.>>> खरचं बोललात...मलाही हळू हळू आता याची जाणीव होऊ लागली आहे की वास्तवात सरांचा भाऊ दुपारभरात अगदी गेट वे ऑप इंडिया च्या टोकाला जाऊन अखेरीस खुणावत असलेल्या क्षितीजावरचा रस्ताच खुंटल्याने निरुपाय होऊन माघारी फिरला, आणि माघारीच्या 'सफरी' मधे तो दादरला त्या ओळखीच्या व्यक्तीला गावला असण्याची शक्यता जास्त आहे. आता त्या पामराला त्याच्या अल्प-स्वल्प बुद्धीने वाटले असावे की मी याला दादरला पकडला. असो लोकं एखाद्याच्या achivement ची रेष कळत नकळत छोटी करतात (ईथे तर लोकं त्याला दादर पर्यंत ही जाऊ देत नाही आहेत... काय म्हणाव याला..
) ती अशी. 
एकदा मनाला प्रामाणिकपणे
एकदा मनाला प्रामाणिकपणे विचारून बघा हा धागा ऋन्मेऽऽषचा नसता तरीही तुम्ही सायकलचा वेग चालण्याइतकाच असतो यावर ठाम असता का?
भावाचे त्यावेळचे नेमके वय मला माहित नाही. पण लोकांनी आपल्या मनाने थेट ७ वर्षे केले काय बोलावे..
दुपारच्या उन्हाचा मुद्दा तर अगदी विशुववृत्ताच्या मध्यावर नेऊन उभे केले अशा अविर्भावात चर्चिला जात आहे. जर त्याने दुपारी तीन ते सहा या काळात हा प्रवास केला असेल तर उन्ह तितके कडक नसावे जे पूर्ण मे महिन्याची सुट्टी उन्हात क्रिकेट खेळणाऱ्या पोरांना त्रासदायक जावे.
अरे येवढे काय अवघड वाटतय
अरे येवढे काय अवघड वाटतय तुम्हा लोकांना. मी तर आजकाल एक पावशेर इंधन टाकले की घरबसल्या पार चंद्रावर पण जाऊ शकतो.
तसच कुणालाही मुंबईच्या गर्दीत कुठून कुठेही कसाही पोचवू शकतो. पण लिहिता येत नाही. इंधन बदलून बघतो.
Pages