नमस्कार मायबोलीकर,
२०२५ च्या मायबोली मराठी भाषा गौरव दिनाची सांगता झाल्याची घोषणा आता करत आहोत.
ह्यावर्षी आयोजित केलेल्या स्पर्धा व उपक्रमांत आपण सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो.
शशक स्पर्धेचा निकाल अजून बाकी आहे, तो यथावकाश लागेलच. ह्या निमित्ताने समारोपाचे चार शब्द आम्ही लिहू इच्छितो.
काही अपवाद वगळता मायबोली दरवर्षी हा उपक्रम आपल्या मायमराठीसाठी राबवत असते. "मराठी भाषा" - ज्या एका गोष्टीमुळे आज आपण सर्वजण या इथे एकत्र आहोत ; त्या मराठी भाषेची महती पुढील पिढीला कळावी, आपल्याच मराठी भाषेची वेगळी ओळख व्हावी आणि तिची व्याप्ती अधिकाधिक जाणून घ्यावी हा उद्देश साध्य झाला असे वाटते. आपण कितीही म्हटले तरी अजूनही आपली विचारप्रक्रिया मराठीतच चालते.
आधुनिक म्हणी, चित्रांची भाषांतरे, प्रकाशचित्रांचा झब्बू या खेळांना खूपच छान प्रतिसाद लाभला. उत्साही मायबोलीकरांनी नेहमीप्रमाणे रोजच्या खेळांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवला. निसर्गायण या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठी साहित्य संमेलन: आठवणी, किस्से, वादविवाद या उपक्रमाला मध्यम तर, मराठी शाळा या उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. असो.
वाचनमात्र असणारे अनेक जुनेजाणते मायबोलीकर यावर्षी पुन्हा लिहिते झाले ; तर काही नवमायबोलीकरांनी या उपक्रमात लेख लिहून मायबोलीवर खाते उघडले. या सर्व सहभागींचे विशेष कौतुक करावेसे वाटते.
मभागौदिदरम्यान विशेष लज्जत आणली ती विशेष लेखांनी. "शब्दांच्या पलीकडले... आणि अधलेमधलेही" ह्या स्वाती आंबोळे यांच्या High Context Communication बद्दलच्या लेखाने एक वेगळा दृष्टिकोन निर्माण केला. तर अस्मिता यांनी "शब्द" या त्यांच्या लेखातून शब्दाची व्याप्ती अलगद उलगडून सांगितली. ReenaAbhi यांच्या लेखातून बांधकाम क्षेत्रातील मराठी माणसाच्या उद्योजकतेच्या जिद्दी प्रवासाबद्दल वेगळी माहिती समोर आली. साजिरा यांनी चंद्रकांत खोतांची ओळख करून देणारा अभ्यासपूर्ण आणि सविस्तर लेख लिहिला. या सर्वांनी त्यांच्या कामातून वेळात वेळ काढून हे लेख वेळेत उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप आभार. तसेच घोषणा, इतर उपक्रम, स्पर्धांच्या मसुद्यांचे मुद्रितशोधन वेळेत करून दिल्याबद्दल भरत यांचे संयोजक मंडळ विशेष आभार मानू इच्छिते.
लहान मुलांच्या अक्षरचित्रांना प्रतिसाद आला पण लहान "मुलांसाठी गंमतखेळ - शॉर्ट्स/रिल्स बनवणे" यासाठी एकही प्रतिसाद आला नाही याची खंत वाटते.
पुढील वेळी मराठी भाषा गौरव दिनास मुलांचा सहभाग वाढावा यासाठी कोणते उपक्रम करावेत याबद्दल आपल्या काही सूचना असल्यास त्यांचेही स्वागत आहे.
त्याचबरोबर मायबोली वेमांनी संयोजक मंडळाला सतत आवश्यक ते सहकार्य ; तसेच विशेषतः तांत्रिक मदत उपलब्ध करून दिली, याबद्दल मायबोली प्रशासनाचे देखील आम्ही आभार मानतो.
आणि महत्त्वाचे म्हणजे इथल्या सर्व मायबोलीकरांच्या सहकार्याने हा मराठी भाषा गौरव दिन सोहळा शक्य झाला त्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आम्ही ऋणी आहोत.
अखेरीस मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व उपक्रमांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.
धन्यवाद.
आता भेटू पुढच्या वर्षी.
संयोजक मंडळ
छल्ला, mrunali.samad, अतरंगी, ऋतुराज, किल्ली आणि निलेश 81
खूप छान झाला असे तर नाही
खूप छान झाला असे तर नाही म्हणून शकत....
कारण अजून चालू आहे
नक्कीच गणपतीसारखी मजा आली असणार सर्वच माबोकरांना..
जेव्हा मायबोलीपलीकडचे जग एका दिवसापुरते व्हाट्सअप स्टेटस ठेवून हा दिवस साजरा करत होते तेव्हा मायबोलीकर दहा दिवसांचा उत्सव साजरा करत होते.
गणपतीसारखी सुट्टी आणि कमी काम अशी परिस्थिती नसल्याने वैयक्तिक फार बागडता आले नाही.. पण पुढचे काही विकेंड हे धागे वाचता येतील आणि आनंद देतील.
किंबहुना संयोजकांचे याचसाठी जास्तीचे कौतुक की त्यांनी मात्र गणपतीप्रमाणे सुट्ट्या आणि सणाचे वातावरण नसून देखील आपल्या रोजच्या कामकाजातून वेळ काढला.
सर्व व्याप सांभाळून इतक्या
सर्व व्याप सांभाळून इतक्या स्पर्धा आणि उपक्रमांचे संयोजन अवघड असते. ते उत्तमपणे पार पाडल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन. एखाद दोन गोष्टींना प्रतिसाद कमी आले तरी कृपया वाईट वाटून घेऊ नका. त्याचा अर्थ तुम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम आखले आणि त्यात क्वचित एखादे मागे पडले. नवीन प्रयोग केले नसते तर तोचतोपणा आला असता. त्यापेक्षा शशक वेगळ्या प्रकारे घेतलीत, अक्षर चित्रे हा कल्पक उपक्रम राबवलात, निसर्गायण हा नवीन लेख विषय दिलात, विशेष लेखांचे विषय पण वैविध्यपूर्ण होते या सर्व जमेच्या बाजू.
संयोजकांचे अभिनंदन आणि आभार!
संयोजकांचे अभिनंदन आणि आभार!
सर्व स्पर्धकांचे कौतुक!!
अनेक उत्तम लेख वाचण्यात आले. हा मराठी भाषा गौरव दिन सोहळा ज्ञानवर्धक होता.
<<"शब्दांच्या पलीकडले... आणि अधलेमधलेही" ह्या स्वाती आंबोळे यांच्या High Context Communication बद्दलच्या लेखाने एक वेगळा दृष्टिकोन निर्माण केला. << +1. फार सुंदर विवेचन केले आहे.
शेवटी हे मराठी भाषेचे पसायदानच!
"येथ म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ "
सोहळा खूप छान संपन्न झाला.
सोहळा खूप छान संपन्न झाला. उपक्रम छान होते.
काही वाचायचे राहिलेय. त्यात साजीरा यांचा विशेष लेख अद्याप वाचायचा आहे, स्नॉर्केल करत चाळला.
यावेळेस तिकडे साहित्य समेंलनातले दर्जेदार अध्यक्षीय भाषण आणि माबोवरील दर्जेदार लेख यामुळे हा मभागौदि स्मरणात राहील.
सर्व संयोजकांचे आभार व कौतुक.
अतिशय सुरेख आणि नियोजनबद्ध
अतिशय सुरेख आणि नियोजनबद्ध झाला या वर्षीचा मभागौदि. चित्रखेळ, आधुनिक म्हणी आणि शशकांमधे सर्वांनी भाग घेतला. निसर्गायण हा उपक्रम मला सर्वात जास्त आवडला. निसर्गरम्य ठिकाणी कल्पनेनेच पण माबोकरांसोबत फिरायला जाता आले.
विशेष लेख सदरात मला लेखनाची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळाची आणि माबो ॲडमिन टीमची मी ऋणी आहे. या निमित्ताने मलाही अनेक वर्षांनी गाणी, कविता व ओव्यांमधे रमता आले. लहान मुलांची अक्षरचित्रे फारच गोड होती. सगळ्या माबोकर कुटुंबातील मुलांचे कौतुक करता आले. बहुतेक लेखन वाचून अभिप्राय नोंदवले आहेतच, तरीही काही गोष्टी वाचायच्या आहेत अजून. हळूहळू वाचेन.
संयोजकांचे - छल्ला, mrunali.samad, अतरंगी, ऋतुराज, किल्ली आणि निलेश 81- पुन्हा एकदा आभार.
संयोजकांचे अभिनंदन! खूप छान
संयोजकांचे अभिनंदन! खूप छान साजरा झाला मभागौदि!!
खूप छान साजरा झाला मभागौदि.
खूप छान साजरा झाला मभागौदि..
इतर दैनंदिन व्यवधानं सांभाळून खूप नाविन्यपूर्ण उपक्रम साजरे झाले. सर्वांचा सहभाग ही उत्तम होता. संयोजकांचे कौतुक आणि आभार
>>> अतिशय सुरेख आणि
>>> अतिशय सुरेख आणि नियोजनबद्ध झाला या वर्षीचा मभागौदि
+१
मोजक्याच पण कल्पक आणि सर्वसमावेशक उपक्रमांमुळे आठवडा नांदताजागता राहिला. मजा आली.
खूप खूप धन्यवाद, संयोजक.
संयोजक टीम अभिनंदन आणि
संयोजक टीम अभिनंदन आणि धन्यवाद.
आठवडाभर रोज काहीतरी नवं छान
आठवडाभर रोज काहीतरी नवं छान वाचायला मिळत होतं. अजुनही काही निसर्गायन लेख वाचायचे आहेत. अत्यंत कल्पक उपक्रम राबवलेत तुम्ही. मजा आली.
अनेक धन्यवाद!
संयोजकांना धन्यवाद!
संयोजकांना धन्यवाद!
आधुनिक म्हणी करताना आणि वाचताना दोन्ही वेळेला मजा आली.
अक्षरचित्रे उपक्रम हे छान होता.
निसर्गायण या विषयामुळे काही रेंगाळलेले लेख लिहायला घेतले गेलेत..
मराठी शाळा हा उपक्रम सुद्धा चांगला होता पण वेळ कमी पडल्यामुळे माहिती गोळा करायला जमले नाही.
मोजक्याच पण कल्पक आणि
मोजक्याच पण कल्पक आणि सर्वसमावेशक उपक्रमांमुळे आठवडा नांदताजागता राहिला. मजा आली.>>+१
धन्यवाद संयोजक
खूप मेहनत घेऊन उपक्रम राबवलात
खूप मेहनत घेऊन उपक्रम राबवलात संयोजक. कल्पक खेळ आणि उपक्रम होते. भाग घ्यायला मजा आली.
फार छान साजरा झाला मभागौदि!
फार छान साजरा झाला मभागौदि! नाविन्यपूर्ण, मनोरंजक, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असे उपक्रम राबवलेत. कितीतरी जण या निमित्ताने लिहिते झाले. मजा आली. स्वाती, अस्मिता आणि साजिरा यांचे लेख माझ्यासाठी highlight होते. धन्यवाद संयोजक.
उत्तम !
उत्तम !
संयोजकांचे अभिनंदन आणि आभार!
सोहळा खूप छान संपन्न झाला.
सोहळा खूप छान संपन्न झाला. उपक्रम छान होते.
काही वाचायचे राहिलेय.
संयोजकांना धन्यवाद!
संयोजकांचे अभिनंदन! खूप छान
संयोजकांचे अभिनंदन! खूप छान साजरा झाला मभागौदि!! +१००
छान झाला मराठी भाषा गौरव
छान झाला मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा.
वरच्या सगळ्यांना अनुमोदन.
खूप छान साजरा झाला मभागौदि!
खूप छान साजरा झाला मभागौदि!
संयोजकांचे अभिनंदन!
छान झाला मराठी भाषा गौरव
छान झाला मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा.
वरच्या सगळ्यांना अनुमोदन.>>>+123
अजून बरंच वाचायचं बाकी आहे..वेळ मिळेल तसं वाचणार
सर्व संयोजक आणि माबो admin
सर्व संयोजक आणि माबो admin टीम धन्यवाद
छानच झाला गौरव दिन
म्हणी, चित्रावरून लिहिणे, शशक, विशेष लेख सर्व जमून आले.
लहान मुलांनी कल्पक चित्रकला दाखवली.
पेहराव आणि दागिने धाग्यावर खूप छान फोटो आले.
संपन्न झाला सोहळा असेच वाटले.
शशक मतदान यादीत रसरंगी यांची
शशक मतदान यादीत रसरंगी यांची परिवर्तन ही शशक दिसली नाही.
मराठी भाषा गौरव दिनी बाकी
मराठी भाषा गौरव दिनी बाकी मराठी जगत शालू-शेले-फेटे यातच रंगले असतांना (nothing wrong with that though) माबोवर मात्र सर्व वयोगटांच्या आणि पार्श्वभूमीच्या सदस्यांसाठी उत्तम, रिलेव्हंट, कल्पक उपक्रम झाले, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला हे फार आवडले, संयोजकांचे खूप कौतुक वाटले.
बरेच लेख वाचायचे आहेत अजून, जे वाचले ते आवडले.
उपक्रमासाठी विशेष लेख लिहिण्याची आयोजकांची सूचना मी खूपच उशिरा पाहिली. वेळ निघून गेली असे वाटले म्हणून काही लिहिले नाही.
पण मग गेल्या दोन तीन दिवसात वरातीमागून आलेले घोडदळ पाहून पुरेसा प्रयत्न न केल्याचे वाईट वाटले
सर्व संयोजकांचे आभार आणि परिश्रमाचे खूप कौतुक. ❤
खूप छान साजरा झाला मराठी भाषा
खूप छान साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन .
मी पहिल्यांदाच अश्या उपक्रमात प्रतिसादातून का होईना भाग घेतला मजा आली .शशक आणि विशेष लेख छान होते .निसर्गायण विषयावरचे लेख अप्रतिम आहेत परत परत वाचण्यासारखे.लहान माबोकारांची चित्रंही सुरेख .
सर्व संयोजकांचे आभार आणि परिश्रमाचे खूप कौतुक.
आयोजक , संयोजक आणि स्वयंसेवक
आयोजक , संयोजक आणि स्वयंसेवक ,
अभिनंदन .
नाविन्यपूर्ण उपक्रम ,
लहान माबोकरांची चित्रे ,
वा ! सारंच उत्तम .
जियो माबो !
शशक विभाग -
शशक विभाग -
इथे मात्र मतदान कमी का झाले बुवा ?
संयोजक, मतदाना आवाहन करणारे
संयोजक, मतदाना आवाहन करणारे मेसेजेस टाका कृपया. गुरांना गोठ्याकडे वळवावे लागते.
मराठी भाषा गौरव दिनाचे उपक्रम
मराठी भाषा गौरव दिनाचे उपक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद! सगळं लेखन वाचून झालेलं नाही पण वाचलं तितकं छान होतं. उपक्रमांचे विषय कल्पक होते.
मला लेख लिहायला एक दिवस उशीर झाला. गेल्यावर्षातल्या अनुभवांबद्दल इथे किंवा ब्लॉगवर लिहायचं डोक्यात होतं पण उपक्रमांमध्ये हाच विषय आल्याने लिहिलं गेलं. त्यामुळे परत एकदा धन्यवाद
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे..
खालील लिंक वर मतदान करावे.
https://www.maayboli.com/node/86433
संयोजकांना मानाचा मुजरा!
संयोजकांना मानाचा मुजरा!
यंदा मी चक्क २ फोटो टाकून सहभाग नोंदवला म्हणून स्वतःलाच शाबासकी दिली!
हळूहळू जमेल तसं वाचतेय बाकीचंही. मनापासून आभार संयोजक चमूचे.
Pages