सध्या वाढता स्क्रीन टाइम आणि सततचं scrolling ही समस्या सर्वांना जाणवते आहे.
विरंगुळा म्हणून आपल्यापैकी बरेच जण reels scrolling मध्ये वेळ व्यतित करतात.
तर तुमचा हा अनावश्यक (? )वेळ किती आहे?
आकडेवारी चिंताजनक असेल तर कमी कसा करायचा?
काही सोपे उपाय असतील तर त्याबद्दल बोलूया.
(ऑफिससाठी करावे लागणारे काम आणि त्याचा स्क्रीन टाइम ह्यात धरला नाही, तो कमी केला तर खाण्यापिण्याचे वांदे होतील. पण त्यातही डोळ्यांवर कमी ताण पडावा वगैरे साठी किंवा काही smart पद्धती असतील तर तेही बोलू शकतो इथे ).
.
एक सोपी गोष्ट सध्या करायला सुरुवात केली आहे दिवसभरात काम करताना वगैरे फोन हातात घ्यायचा नाही. एकावेळी एकच काम करायचं.
जिथे focused काम करायचं आहे तेव्हा खासकरून फोन उलटा करून ठेवून द्यायचा. एकदा तो हातात आला की अर्धा तास किमान वाया जातो ते परवडत नाही.
.
इन्स्टा, youtube, fb uninstall करणे हा अजून एक तात्पुरता उपाय. पण त्याने काही फरक नाही पडला.
तुमचा बिनकामी स्क्रीन टाईम किती आहे?कमी करावा का?कसा करावा?
Submitted by किल्ली on 11 February, 2025 - 01:37
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
री
ब्युटी पार्लरमध्ये तू स्किन टाईम घालवतेस ना, त्यापेक्षा खूप कमी आणि स्वस्त पण, समजलं !!!
(No subject)
(No subject)
>>का करायचा आहे?
>>का करायचा आहे?
मला स्क्रीन टाईम केल्याचा गिल्ट वगैरे अजिबात येत नाही. जास्तच स्क्रीन टाईम झाला तर नंतर काहिहि पहायला सुरुवात केली की १० मिनिटात बोर व्हायला होतं. पण हल्ली तास दोन तास फोन वर काही पाहिलं कि नंतर बराच वेळ सगळं डबल डबल दिसत राहतं. नंबर चेक केला तर ०.२५ च्या वर नंबर नाहीय. त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करायचा आहे.
रच्याकने, हे सोशल मिडिया नव्ह्ते तेव्हा थेटरात एका आठवड्यात १३-१४ सिनेमे पाहिलेले आहेत. ऊस गावात असताना ब्लॉकबस्टरच्या किंवा नेट्फ्लिक्स च्या आठवड्याला ४-५ सीडी वर सिनेमे पाहायचो. आणि त्यांच ऑनलाईन स्ट्रीमींग सुरु झाल्या पासून जवळपास प्रत्येक वीकेंड शुक्रवार रात्र ते शनिवार पहाट आणि शनिवार संध्याकाळ ते रात्री २-३ वाजेपर्यंत काहीतरी लॅप्टॉप वर बघत घालवलेले आहेत
नवीन Submitted by पियू on 11
नवीन Submitted by पियू on 11 February, 2025 - 23:44>>>
का करायचा आहे?>> असा प्रश्न
का करायचा आहे?>> असा प्रश्न का पडतोय..?
डोळे & मेंदू उगा अ ती वापरला जातो. क्वालिटी टाईम जो वेळ कदाचित व्यायाम, मुलं यांना देऊ शकू तो रील बघण्यात जात असेल (व्यक्ती गणिक हे गणित बदलेल)
स्क्रीन वेळ हा मर्यादित च असायला हवा ओव्हरऑल तब्बेत & वेलबीईंग साठी- माझे मत असे आहे.
कमी करायचे मार्ग प्रतिसादांतून जे सुचवले आहेत, ते चांगले आहेत. अजू सुचवा प्लीज.
मी माझ्यापुरते साऊंड बाथ मेडिटेशन संगीत लाऊन नॅप घेते. हमखास झोप येते. अर्थात ते फोने वर च असते पण माझ्या स्क्रीन वेळेत हे धरले नाही जात.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी

भाऊ म्हणताहेत तसं स्किन time कडे लक्ष देईन
पैसे खर्च न करता, जमेल तेवढं
.
करमणूक हवीच माणसाला
कारण घरातला tv बारक्यानी घेऊन टाकलाय
ते सतत पाहतात असं नाही
पण मी तिथे असेन तर मला मिकी मिनी च पाहावे लागते.
नाहीतर त्यांची मैफिलसुरु होते.
.
डोळ्यांना त्रास होउ नये, झोप लवकर लागावी, वगैरे असे माफक हेतू आहेत.
वाचलेला वेळ घेऊन मी काही आव्हान पेलायला जाणार नाही.
रोजची कामे efficiently व्हावीत ही एक अपेक्षा.
.
प्रयत्न करते.
.
रोजचा time किती ह्यावर लक्ष ठेवत जाईन..
मग आपोआप कमी होईल
*मग आपोआप कमी होईल* -
*मग आपोआप कमी होईल* - शुभेच्छा !
हेवा वाटावा असं टापटीप आपलं किचन, आपल्या मुलांना घरच्या जेवणाचंच कौतुक, ह्या सर्वाचं सर्वस्वी श्रेय तुम्हाला मिळतंय, कारण माझा स्क्रीन टाईम कमी करून मी त्यात अजिबात लुडबुड करत नाहीं !!
भाऊ फॉर्मात आहेत
भाऊ फॉर्मात आहेत
भाऊ
भाऊ
*भाऊ फॉर्मात आहेत* - किचनमधलं
*भाऊ फॉर्मात आहेत* - किचनमधलं काम संपलं की विरंगुळा म्हणून असलं कांहीतरी करतो झालं !
पावरचे बटन प्रत्येक साधनाला (
अति तेथे माती. कुठलीही गोष्ट अती करु नाही. पावरचे बटन प्रत्येक साधनाला ( electronic device ) असते. जमेल तसे वापरयाचे.
स्क्रीन टाईम चार तास आहे.
स्क्रीन टाईम चार तास आहे. फेसबुक, वाटसप इन्सटा नाही. तरीही एवढा आहे.
वाढवायचा आहे कारण हल्ली फुकट शिकणे, फुकट पुस्तके वाचन हे मोबाईलमध्येच असते. घरबसल्या हे साध्य होते. ते कशाला सोडू आणि गंमत बंद करू? मनोरंजन आणि शिक्षण दोन्ही या डबीतूनच साध्य होते. आमच्या लहानपणी संध्याकाळी एखाद्या बागेत ( park) जाऊन बसणे एवढेच मनोरंजन होते. मग सह्याद्रीच्या चानेलवर बुधवारी संध्याकाळी अर्धा तास गजरा किंवा असाच कार्यक्रम सुरू झाला आणि स्क्रीन टाईम अर्धा तास झाला. मग कधीतरी विंबल्डन दाखवू लागले.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DFaX683xZYG/?igsh=YWF5c2hmaTB1bHhu
किल्लीSSSSS , .
किल्लीSSSSS ,
.
काय पाठवलसं म्हणून बघायला गेले आणि मग उगाच आणखी 5-7 मि. Reels बघत बसले.
ITSec वाले स्वतःच phishing mail पाठवतात आणि मग चुकून click केली की security training course assign होतं , ही गत आहे.
.
हल्ली माहित झाल्याने मी
बघितलं
बघितलं
कसा वेळ जातो ते
एकदा इन्स्टा उघडलं की
हाच प्रॉब्लेम आहे
आता मी sql query देव शब्दाप्रमाणे चालवत होते
माईंड डीटॉक्स सर्च देऊन पहा.
माईंड डीटॉक्स सर्च देऊन पहा.
स्क्रीन टाईम कमी करणे हे त्यात function at() { [native code] }यावश्यक आहे. आणखीही काही गोष्टी आहेत.
बघू कोण या विषयावर धागा काढतंय ते.
Pages