Disclaimer: This article is based on personal experience only. I am not a trainer or vet. But more of a Dog Whisperer.
मायबोलीवरील एक प्राणी मैत्रीण व पर्यावरणप्रेमी व्यक्ती म्हणुन खालील माहिती लिहीत आहे. खूप लोकांना कुत्रे तसेच इतर पाळीव प्राणी फारसे आवड्त नाहीत. आपल्या साहित्यातही कुत्रे/ पक्षी पाळणार्यांची गणना विक्षिप्त लोकांच्यात केली जाते किंवा बालीश आवड म्हणुन ह्या छंदाची बोळवण केली जाते. अर्थात वानुची गोष्ट व तसे सन्माननीय अपवाद आहेतच. कुत्र्यांबद्दल खालील गैरसमज प्रचलित आहेत.
१) कुत्रा चावला की रेबीज मग इन्जेक्षने नाहीतर हायड्रो फोबीया व मरणच. हे घरात न पाळलेल्या/ रस्त्यावरील भट्क्या कुत्र्यांच्या बाबतीत खरे असु शकते. त्यांच्या बाबतीत चान्स घेउ नये. पण घरात पाळलेल्या कुत्र्यांचे जन्मल्यापासुनचे अतिशय कड्क इन्जेक्षन्स चे शेड्यूल असते ते काटेकोर पणे पाळले व नंतर दर वरषी बूस्टर डोस दिला तर त्रास नसतो.
http://www.who.int/mediacentre/factsheets/fs099/en/
प्रगत देशांमध्ये रेबीज वट्वाघुळे, जंगली प्राणी यांच्या चाव्यामुळे व्हायचा धोका जास्त असतो.
घरी पपी आणणार असल्यास प्राणीतज्ञांचा सल्ला जरुर घ्या.
२) कुत्रे पालन हा श्रीमंतांचा षोक/ शौक आहे. पॅरिस हिल्ट्न वगैरे जे खेळणी टाइप
कुत्रे घेउन हिंड्तात ते बघुन किन्वा राव बहादुर टाईप लोक भला मोठा अल्सेशिअन घेउन जाताना बघुन असा गैर समज होणे साहजिक आहे. पण छोट्या ब्रीडचे कुत्रे किंवा शेल्टर मधुन दत्तक घेतलेले कुत्रे तर
अतिशय कमी खर्चात येतात. त्यांचा पहिल्या वरषी व्हेट चा खर्च असतो.
३) त्यात काय? आणू की कुत्रा!
कुत्रा घरी आणणे हा लग्न/ मुल होउ देणे या पातळी वरचा महत्त्वाचा निर्णय आहे. मुले मोठी होतात पण कुत्र्याला कायम तुमच्या आधाराची गरज असते व तो दिला नाहीत तर ते दुक्खी होतात. हा निर्णय घाइत किन्वा चुकीच्या कारणांसाठी घेउ नये. घरातील सर्वांचा विचार घेउनच घरी पेट आणावे. जनरली कपल पैकी एकाला पेट्स आवड्तात व दुसर्याला आवड्त नाहीत. मुलांना आवड्तात पण कुत्र्यांचे जे काम रोज करावे लागते ते त्यांच्या ने होत नाही. व ज्याच्या वर ते काम पड्ते तो वैतागण्याची वेळ येते.
४) कुत्र्यांचे काम फार असते
कुत्र्यांचे जे मेन खाणे पेट फूड ते फार महाग नसते. कुत्रे अतिशय प्रमाणात खातात. मोठ्या ब्रीड ला अर्थातच जास्त खायला लागते पण ग्रेट डेन वगैरे घरी आणणारा माणुस नक्की त्याची सोय करणार. दुध वगैरे देणे आपल्या हातात आहे. बाकी औषधे, शांपू, बेल्ट व लीश हे महत्त्वाचे खर्च. पण ते आपल्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण आणतात त्या मानाने तो खर्च जास्त वाट्त नाही. कुत्र्यांना फॅन्सी कपडे/ दागिने/ कॉस्च्युम्स वगैरे घालणे वेस्ट आहे. तो एक हौसेचा भाग आहे. त्याना ते आवड्त नाही. अपमान वाट्तो. त्यांना महागडे झोपायचे बेड्स व इतर वस्तु लागत नाहीत. जुने आराम दायक क्विल्ट/ पोते हिवाळ्यात व जमीन उन्हाळ्यात त्याना बास होते.
( भारतात तरी. परदेशात प्राणी तज्ञाचा सल्ला घ्यावा. )
५) कुत्रे पालन ही एक सुपरफिशिअल अॅक्टिविटी आहे.
कुत्रे तज्ञ असे म्हणतात की आयुष्यातील कोणती ही बदलाची प्रक्रीया सह्य करायची असेल तर कुत्रा पाळावा. जसे तारूण्यातुन मध्यमवयाकडे जाणे, मुले परदेशी/ बाहेरगावी गेल्याने एकदम येणारे रिकाम पण
मानसिक धक्क्यातुन सावरण्यासाठी आवश्यक असणारा वेळ घालविण्यासाठी. अपंगपण सहन करताना इ. थेरपी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलेले असते. त्यांच्या रूटीन बरोबर आपले रुटीन फिट करता येते.
http://en.wikipedia.org/wiki/Therapy_dog
http://news.nationalgeographic.com/news/2002/08/0808_020808_therapydogs....
या विषयावर सगळ्यात चान्गले काम दस्तुरखुद्द अमेरिकेतच झाले आहे व होते आहे. भारतात शहरातील व्हेट्स व समुपदेशकांना याची माहिती असते.
६) २४ तास बांधले तर बरे या मेल्या कुत्र्यांना!
महत्त्वाचे म्हणजे भारतात कुत्र्यांना बांधून घालायची सवय असते ते कुत्र्यांच्या द्रुष्टीकोनातून अतिशय घातक. एक तर हालचाल नाही. व स्वातंत्र्यावर घाला. असेच कुत्रे जास्त वाइट स्वभावाचे व चावरे भुंकरे होतात. आपल्या घरात त्यांना चान्गली वागणूक मिळाली तर ते वाइट स्वभावाचे होत नाहीत. बांधलेले
कुत्रे काळजी एकटे पण, भय याने ग्रस्त असतात व त्यातुन भुंकत असतात. कुत्रा हा अतिशय सोशल प्राणी आहे. त्याला मागे बांधून घालणे व मालकाने इग्नोअर करणे यासारखे दु:ख नाही.
७)कसली ती कुत्री? काय उपयोग कुत्री पाळून?
मालकावर प्रेम, आज्ञाधारक पणा घरातील सभासदांसाठी लॉयल्टी हे त्यांचे गुण अनन्यसाधारण आहेत.
८) माझ्या जीवनात मी कुत्र्याला लिमिटेड अॅक्सेस देइन.
कुत्र्यांना व्यायाम आवड्तो, खेळायला आवड्ते. याचा उपयोग करून आपण व मुले आपल्या बैठ्या जीवनातुन बाहेर पडून चालणे पळणे असे व्यायाम करू शकतो, जिम ला न जाता. कुत्र्यांमुळे आपल्या इतर नातेसंबंधांना पण एक वेगळे अस्तर मिळते. अर्थात हे सर्व कुत्राप्रेमींसाठी. कुत्रे आवड्तच नसतील तर त्यामुळे वाईट भांड्णे पण होउ शकतात. कुत्र्यांना जास्त वेळ व लक्ष दिले तर दुसर्या पार्टनर ला ते आवडेलच असे नाही. मला कुत्रे चालविताना काही लोक असे भेट्ले आहेत की जे कुत्र्यांपेक्षा टेरीटोरिअल असतात व त्यांना कुत्रा म्हणजे आपल्या वैयक्तिक स्पेस वर आक्रमण वाट्ते.
९) मला घर अतिशय, फारच स्वच्छ लागते. मी हाउस प्राउड आहे. कुत्रा बाहेरच बरा!
कुत्रे छोट्या घरात पाळताना घरातील स्वच्छता टिकविणे अवघड गोष्ट आहे. कितीही ट्रेन केले तरी.
लहान पपीजचे दात शिवशिवतात. गाद्या, उश्या, क्विल्ट्स फाड्तात. चपला बूट व रबर स्लिपर्स पण!
ते कधी मधी ओकतात, कार्पेट घाण करतात. त्यांचे केस पड्तात. विचार करा! सोवळे ओवळे पाळणे अशक्यच कारण त्यांना चिकन/ बीफ खायला लागते. घरात हाड्के सांड्तात.
१०) कुत्रा अलग माझी फ्यामिली अलग.
मला अमेरिकन कुटुंबांची एक गोष्ट खूप आवड्ते म्हण्जे ते कुत्र्यांना पण एक घरचे सभासद मानतात.
घरे मोठी असल्या ने बहुतेक सोपे जात असेल. मुलांना वाढताना कुत्रे अतिशय चान्गले मित्र बनतात.
व म्हातार्यांना सोबत. मार्ली व मी पाहावा. वुफ वुफ.
आम्हीपण कुत्रे-प्रेमी बाकी
आम्हीपण कुत्रे-प्रेमी
बाकी लेख खुपच छान आहे. त्यातले बरेच पॉइंट माझ्याही मनात आले होते डेझी यायच्या आधी. पण नंतर तिच्याप्रेमापुढे ते सर्व नगण्य ठरले. 
निबंध मला हा लेख कुठे दिसलाच
निबंध मला हा लेख कुठे दिसलाच नाही. डेझी ला हॅपी न्यु इअर. पण सगळे कसे संभाळतेस? घर, नोकरी, मुले काम व कुत्री पण? चालायला कोण नेते?
मामी अहो वाटतं अवघड पण रोजचे
मामी
अहो वाटतं अवघड पण रोजचे टाइमटेबल ठरवले की सगळ सोप्प होते
चालायला मी आणि माझी दोन मुले नेतो त्यामुळे आम्हालाही मोकळा वेळ मिळतो जो आम्ही मस्त गप्पे मारत घालवतो. थंडीत थोडं अवघड जातं. बहुतेक आम्ही संध्याकाळी सातच्यानंतरच जातो. माझ्या मुलांना अजुन पुष्कळ पेट्स हवे आहेत. म्हणजे अजुन एक तरी कुत्रा, मांजे आणि पोपट. बघु कधी जमेल ते. 
विनी आणि स्वटी काय म्हणतायेत?
छान लेख! ते सुद्धा आपल्या
छान लेख!
ते सुद्धा आपल्या मुलांसारखेच असतात, व्यवस्थित त्यांचं सगळं पार पाडणार नसाल तर घरात आणु नये. सारखं बाहेर बांधुन ठेवणं, आजारी पडल्यावर उपचार न करणं ह्या गोष्टी प्रचंड संतापजनक आहेत.
आम्ही एकदा मुले लहान असताना
आम्ही एकदा मुले लहान असताना मांजर पाळले होते त्याची इतकी अॅटॅचमेन्ट झाली होती की ते मेल्यावर पुन्हा कोणतेही पेट पाळायचे नाही असा निर्णय घेतला
मामी, चांगली माहिती आहे.
मामी, चांगली माहिती आहे.
कुत्रे आणि मांजरी स्वत:च्या फायद्यासाठी पाळणार्यांचा मला भयंकर राग येतो. आमच्याकडे "अहो घरात उंदीर/पाली/झुरळं खूप झालेत, तुमच्या मांजरीला पिल्ल झाली की एक द्या" असे सांगत लोकं यायचे. अक्षरश: हाकलुन लावावेसे वाटते अशा लोकांना.
अॅटॅचमेन्टच्या बाबतीत
अॅटॅचमेन्टच्या बाबतीत रॉबीनहुडशी सहमत. पण ते दु:ख घालवण्यासाठीच परत दुसरे पाळावे असे वाटते. वैद्य अगदी बरोबर आहे तुमचं. आमच्याघरी तिला क्रिसमस गिफ्टपण आणावे लागते
मस्त! माझ्या जन्मापासून घरात
मस्त!
माझ्या जन्मापासून घरात २-२ कुत्री आहेत. कुत्रा-मांजर यांच्यशिवाय घर ओकंबोकं वाटतं.
आणखी एक, पाळीव प्राणी ज्यांच्या घरात असतात ती लोकं जास्ती सोशल/प्रेमळ असतात असं कोणत्याशा लेखात वाचलं होतं. तो तर्क खरा/खोटा देव जाणे पण, माझ्या बघण्यात मात्र खरंच अशी लोकं आलेली आहेत जी ज्यांच्या घरी पेट नाही त्यांच्यापेक्षा खूप सोशल होती.
(No subject)
मामी लेख सुरेख आहे. वाचल्यावर
मामी लेख सुरेख आहे. वाचल्यावर असं जाणवलं की खरंच घरात एखादं तरी पेट हवंच...
बाकी एकंच गोष्ट
>>कुत्रे छोट्या घरात पाळताना घरातील स्वच्छता टिकविणे अवघड गोष्ट आहे. कितीही ट्रेन केले तरी.
लहान पपीजचे दात शिवशिवतात. गाद्या, उश्या, क्विल्ट्स फाड्तात. चपला बूट व रबर स्लिपर्स पण!
ते कधी मधी ओकतात, कार्पेट घाण करतात. त्यांचे केस पड्तात. >> सगळं मान्य पण आपल्या घरात लहान बाळं कधी ना कधी असतातच की त्यांचं प्रेमाने करतो ना? मग कुत्र्यांचं करायला काय? मायेचा प्रकार मात्रं एकच हवा... माझ्यामते माणसाच्या पिल्लापेक्षा कुत्र्याचं पिल्लु लवकर मोठं आणि इन्डिपेन्डन्ट होत असेल...
मामी. लेख झकास आहे. कुत्री
मामी. लेख झकास आहे.
कुत्री खरं म्हणजे आवडत नाहीत, पण मांजरी लै पाळल्यात. एकदम आठवण झाली लेख वाचून.
आमच्या मांजराने पुश्तैनी सोफाच्या मागची जाळी कुरतडून त्याची वाट लावली होती, आणि दुस-या एकाची शी काढायला आम्हा पोराटोरांना वार नेमुन दिलेले होते, माझ्या वाटची बाबा काढायचे कारण भोंगा पसरून मी ऐनवेळेस कच खायचे. मांजरांना बाकी कुटूंबनियोजनाचे अजिबातच महत्व नाही. दोन वर्षात सहा झाल्यावर मग आईवडलांनी हात टेकले अँड मांजरं सगळी सुस्थळी दिली.
पोरीला कुत्री खुपच आवडतात. ती एकदा का आमच्या मागे लागली कुत्र घ्या म्हणुन, की संपलंच.
सगळं मान्य पण आपल्या घरात
सगळं मान्य पण आपल्या घरात लहान बाळं कधी ना कधी असतातच की त्यांचं प्रेमाने करतो ना? मग कुत्र्यांचं करायला काय? मायेचा प्रकार मात्रं एकच हवा...>> किती गोड. युअर हार्ट इज इन द राइट प्लेस. माझे हेच मत आहे.
अजुन एक: कुत्र्यांचे बॉडी टेम्परेचर आपल्यापेक्षा थोडे जास्त असते त्यामुळे त्यांना जवळ घेउन बसणे अतिशय सुखद गरम असते. माझे एक लांबोडे कुत्रे डोक्याशी ( चमेलीची वेणी घालतो तसे) व एक पायाशीच झोपते. मुलांना अतिशय आवडते कुत्र्या बरोबर झोपायला.
मामी,छान आहे लेख. माझ्याकडे
मामी,छान आहे लेख.
माझ्याकडे एक लॅब होता. मी कधी ही त्याला साखळीने बांधुन ठेवला नाही. तो पण एवढा गुणी की त्याला साखळी वगैरे बंधनं कधी ही लागलीच नाहीत. त्या जीवाचे अखेरीस जे हाल झाले ते पाहुन मला स्वतःलाच कुत्रा प्रचंड आवडत असुनसुद्धा मन होत नाहीय. शेवटपर्यंत मात्र त्याला तितक्याच प्रेमाने सांभाळला.:अरेरे:
मामी, खूप छान लिहीलयंत. मला
मामी, खूप छान लिहीलयंत. मला स्वतःला कुत्रा खूप आवडतो पण आईला आवडत नाही आणि त्यामानाने घर छोटं त्यामुळे कधीच पाळता आला नाही. पण आता सासरी मात्र २ कुत्रे आहेत.
बादवे, तुम्ही Me n Marley हा पिक्चर बघितला आहेत कां? नसेल तर जरूर बघाच. मी शेवटी ओक्साबोक्शी रडले.
पाळिव प्राण्यांचा लळा हिच एक
पाळिव प्राण्यांचा लळा हिच एक वाईट गोष्ट आहे, सोडवू म्हणता सुटत नाही.

मी ही १ वर्षं माझ्या काकाकडे होते शिकायला, तो बेळगावला आर्मी मध्ये होता त्याच्याकडे ते पुर्वी व्हिडिओकॉन च्या जाहिरातीत दाखवायचे तसलं (झिपरं) कुत्रं होतं, त्याचे डोळे ही दिसायचे नाहीत. टायगर नाव होतं त्याचं.. (कुत्रं असून नाव मात्रं टायगर... :फिदी:) नावाला काळिमा होतं.. कधी भुंकायचं नाही..काकाने त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती.... त्याला फिरायला नेणं, खाऊ घालणं, केस विंचरणं, आठवड्यातून एकदा अंघोळ.... सगळं.... मला खूपदा इच्छा व्हायची त्याला जवळ घेऊन झोपायची, पण आर्मीचे संस्कार आड यायचे, तरिही मला त्याचा भयंकर लळा लागला होता. मी ही त्यावेळी घरापासून दूर होते, मला डिप्रेशन होतं, पण टायगर माझा साथी होता तेव्हाचा....
टायगर वयाने खूप होता, त्यामुळे काकाची सततची बदली त्याला झेपण्यासारखी नव्हती, बेळगावहून काकाची बदली जेव्हा अयोध्येला झाली तेव्हा टायगर ला आयुष्यातून मुक्त केले...
मला कुत्रे आवडत नव्हते पण
मला कुत्रे आवडत नव्हते पण लेकीला खुपच आवडायचे म्हणुन तिच्यासाठी एक रस्त्यावरचे कुत्रे उचलुन आणले.. क्रॉसब्रीड होता बहुतेक रस्त्यावरची कुत्री+अल्सेशियन.. लुक, उंची वगैरे एकदम अल्सेशियनची... त्याचे सगळॅ केले मी, ट्रेनर ठेऊन ट्रेनिंग दिले, इंजेक्षन्स वगैरे दिली.
वर्षभर होता माझ्याकडे, शेवटी शेजा-यांच्या कटकटीमुळॅ त्याला गावी सोडुन दिला. पण त्याने त्या एका वर्षात मला आणि माझ्या लेकीला इतका लळा लावला... अजुनही त्याची आठवण आली की डोळे पाणावतात. माझी मुलगी तर तासभर रडत होती त्याला सोडताना.....
सध्या दिवसाला १२-१३ तास घर बंद असते म्हणुन दुसरा कुत्रा आणला नाहीय, पण परिस्थिती बदलली की लगेच नविन अल्सेशियनच आणणार...
तो मुळचा भटका असल्याने मोठा झाल्यावर घरात एकटा राहिना, मग त्याला खाली सोडायला लागले.. मोठी गंमत म्हणजे तो गेल्यावर वर्षभरातच सेम त्याच्यासारखी दिसणारी एक कुत्री आमच्या घराखाली दिसायला लागली . तिला गेल्या दिवाळीत पिल्लेही झाली. मुलगी सुट्टीत घरी आल्यावर त्यातले एक पिल्लू सेम बंटीसारखेच दिसते असा तिला साक्षात्कारही झाला
आता आम्ही त्या पिल्लांना बंटीचे नातु म्हणतो आणि एखादी चपाती वगैरे मुद्दाम खायला घालतो.
अश्विनी मस्त लिहिलयंस!
अश्विनी
मस्त लिहिलयंस!
धन्यवाद शेपूट हलवून
धन्यवाद शेपूट हलवून
मामी, इथे आपल्या बाळांचा फोटो
मामी, इथे आपल्या बाळांचा फोटो लावला तर चालेल का? की दुसरा बाफं उघडा!! अशी कानऊघडणी केली जाइल?
नुसता फोटो लावु नका, त्याचे
नुसता फोटो लावु नका, त्याचे किस्से पण लिहा.
ते ही लिहीन पण मामींची
ते ही लिहीन पण मामींची परवानगी असेल तर.
खुप छान लिहलय आणि सगळ्यांचे
खुप छान लिहलय आणि सगळ्यांचे रिप्लायही मस्त....
मस्त लिहिलय हो मामी. माझ्या
मस्त लिहिलय हो मामी. माझ्या आईने मागे इथे माबोवर आमच्या वान्याबद्दल एक छान लेखमालिका लिहिली होती..
कुत्र्यापेक्षा इमानी जनावर नाही.. मला सगळ्यात कोण आवडत असेल तर कुत्राच
आमच्या घरात पण वान्यानंतर आता परत कुत्रा पाळायचा नाही असा 'पण' झाला.. पण आत्ता घरी गेलो होतो तर चक्क एक मांजरी पाळली आहे घरात..
वैद्यबुवा माझी कसली परवानगी.
वैद्यबुवा माझी कसली परवानगी. तुम्हाला माहीतच आहे की. अहो आणि हे ललित आहे बीबी नाहीये. टाका ना फोटो. व लिहा पण. टण्या, वेल्कम ब्याक. किदर है तु आजकल. दिखताइच नै? ( अ.अ.अॅ. मधिल अमिताभचा ड्वायलाक आहे).
आमच्या दोघी घरात प्यांट्वाल्याला येउच देत नाहीत. डायरेक्ट भुंकायलाच सुरुवात. मोठी सिक्युरिटी आहे व
अगदी मस्त थेरपी. आम्ही खालील प्राणी पाळले होते. कुत्र्यांच्या आधी.
पिंजर्यात लव बर्डस, ते पिंजर्याच्या सळ्या फाकवून एक दिवस चुपचाप भुर्र.
ससे दोन. पण घरात वास येउ लागला म्हणुन देउन टाकले. ( आमच्यात वासाचे फार तंत्र आहे. नुसते वास येत नाहीत त्याचे पार जीसी अनॅलिसिस करुन येते. )
एक कोंबडीचे चिक. एक दिवस जगले बिचारे. गोड चिप चिप करत असे.
एक जखमी कबुतर - ज्याला एक दिवस चक्क रिबिन बांधुन खोक्यात ठेवले होते. ते उडुन गेले.
घरात पक्ष्यांसाठी पाणी व बर्ड सीड ठेवलेले असते. एक हमिन्ग बर्ड आहे जो जानेवारीतच येतो.
एक मांजराचे पिल्लु जे दुध प्यायला येत असे.
इथे आन्ध्रात एक गरीब बाइ आहे जी रोज कावळ्यांना खायला घालते. तिचा नवरा गेला आहे. त्याच्या आवडीच्या गोष्टी करून घालते. एखाद दिवस त्यांनी खाल्ले नाही की म्हणते आज यांना स्वैपाक आवड्ला नाही वाट्तं- पेपर मध्ये वाचले ते सांगत आहे.
-------------------
वूफ वूफ टू आल रीडर्स.
छान माहीतिपुर्ण लेख.
छान माहीतिपुर्ण लेख.
मुटे साहेब शेतावरील
मुटे साहेब शेतावरील प्राण्यांबद्दल लिहा की. औताचे बैल, दुभत्या म्हशी, कोंबड्या, कुत्रे व मांजरी.
थॅन्क्स मामी, ह्या विषयावर
थॅन्क्स मामी, ह्या विषयावर लिहायचं लिहायचं म्हणत (आनी नुस्त म्हणतच) होतो, असो, आता मासे पाळण्यावर लिहीन. उत्तम काम केलत. कुत्र्यांविषयी काही प्रॉब्लेम्स असल्यास मांडायची सोय हवी. मला अॅनिमल बिहेवीयर कन्सलटन्ट व्हायचं होतं. नाही जमलं. तूम्ही "टेरिटोरीयल" नसणार हे गृहीत धरुन तुमच्याच मुद्यांवर काही लिहीन म्हणतो. चुभूद्याघ्या.
रेबीज विषयी सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे तो १०१ % फॅटल असतो. माझ्या डॉक्टरने सांगितलं की जर कोणी डॉक्टर म्हणाला की मी रॅबिज / रेबीज ची केस बरी केली तर त्याचा अर्थ एव्हढाच की त्याचं निदान चुकलं होतं. हे मी घाबरवण्यासाठी लिहीत नाहिये, आपल्या पाळीव प्राण्यांना रेबीजचं ईंजेक्शन देणे ही आपली जबाबदारी आहे हे सर्वांना समजाव म्हणून लिहीतोय. रेबीज हा फक्त रेबीज झालेल्या प्राण्याद्वारेच होउ शकतो, त्यामुळे रेबीज न झालेला प्राणी चावला तर रेबीज होत नाही.
कुत्रं पाळणं म्हणजे अॅडिशनल खर्च आहे आणि तो करायची तयारी असल्याशिवाय कुत्र पाळूही नये. पण तूम्ही म्हंटल्याप्रमाणे हा खर्च ब्रीडवर अवलंबून आहे. बजेटमध्ये हे कधीही बसवू शकता येतं पण इच्छाशक्ती पाहीजे आणि विचारशक्तीही. जर तुम्हाला वेळ असेल आणि ओबिडियन्स कॉम्पिटीशन किंवा स्पेशलाईज्ड ट्रेनिंग (गाईड डॉग, ट्रॅकिंग डॉग, स्फोटके शोधणे, पर्सनल प्रोटेक्शन (शुल्ट्झहंड) वगैरे )द्यायची ईच्छा नसेल तर ट्रेनर ठेवण्यापेक्षा हे घरच्या घरीच करावे. वेळही छान जातो त्याशिवाय कुत्र्याबरोबर एक मस्त बॉन्ड बनतो जो एखाद्या टिममेट / सोलमेट बरोबर असतो.
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळच्या वेळी लस दिल्यास कुत्र्याला डॉक्टरकडे न्यायची गरजही पडत नाही आणि खर्चही म्हणण्याइतका होत नाही.
मुलं स्वतःला सांभाळण्याइतकी मोठी झाल्याखेरीज घरात नवीन कुत्र आणणं टाळाव. अर्थात हा काही नियम नाही पण शेवटी कुत्रा ही मालकाची जबाबदारीच आहे. लहान मुल आणि कुत्रा ह्यात एकमेकांविषयी जेलसी असायची शक्यता असते (निव्वळ वाचलेलं, प्रत्यक्ष अनुभव अत्यंत उलटा).
कुत्र पाळायला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक १५ ते २० वर्षांची कमिटमेंट करतोय हे लक्षात ठेवावे...
बादवे, मामी मागे तुम्हाला सांगितल्या प्रमाणे इंडियन हाउंडस् परत सुरु करतोय. तुमच्या शुभेच्छा असुद्यात. ह्या ब्रीडस् विषयी सविस्तर लिहीनच.....
तो पर्यंत वूफ वूफ वूफ....
छान माहिती असुदे. मामी, तुमचे
छान माहिती असुदे. मामी, तुमचे पण अजून अनुभव लिहा. हे प्राणी घरात आणले की खरच एकदम वेगळं वातावरण होउन जातं.
आमच्याकडे एक बोका होता. दिवसभर गच्चीवर आळशासारखा लोळायचा. पण संध्याकाळी भाऊ घरी आला की कान झटकुन उठायचा आणि त्याच्याकडुन लाड करुन घ्यायचा. भावाला सोसायटीच्या टोकालाच गाडी न्युट्र्लला टाकायची सवय होती म्हणजे तो आलेला आईला कळत नाही असे त्याला वाटायचे. मग गेटपाशी मित्रांशी गप्पा करत उभे रहायचे. पण ह्या बोक्याला तो न्युट्रल गिअर बरोब्बर ऐकु जायचा आणि त्यामुळे आईला कळायचे भाऊ आलेला
छान लेख! ते सुद्धा आपल्या
छान लेख!
ते सुद्धा आपल्या मुलांसारखेच असतात, व्यवस्थित त्यांचं सगळं पार पाडणार नसाल तर घरात आणु नये. सारखं बाहेर बांधुन ठेवणं, आजारी पडल्यावर उपचार न करणं ह्या गोष्टी प्रचंड संतापजनक आहेत.
=============================================================
वैद्य बुवांशी सहमत १००%
हे सर्व करण्याची मनाची अजून तरी तयारी होत नाहीये ... पुढे कधी झाली तर सांगता येत नाही.
छान माहिती असुदे. माझाही
छान माहिती असुदे.
माझाही अनुभव सिंडीप्रमाणेच. माझ्या मोटारसायकलचा आवाज माझ्या कुत्र्याला कसा कळायचा मला अजुन कळलेलं नाही. त्यावेळेस माझ्याकडे हिरो होंडा होती. बिल्डींगमध्येही पुष्कळशा हिरो होंडाच होत्या. पण माझी गाडी सोसायाटीत आलीय हे माझ्या आईला आमच्या कुत्र्यावरुन कळायचं. गाडी गेटमधुन येत असताना हे साहेब ग्रिलमधून माझ्याकडेच बघत असायचे. पुष्कळवेळा मी बाईक बंद करुन आणलीय पण साहेब ग्रिलमध्ये असणारच.
Pages