
मी जर सोनमासळीचे शरीर घेवून या तलावाच्या तळाशी लपून राहीले असते
तेव्हा तू चंद्रबिंबासारखा या पाण्यावर तरंगत आला असतास
आणि माझ्या काळोख्या घरात चांदणे पसरवले असतेस
तरंगत म्हणालाही असतास या एकाकी तळ्यात , 'तुझ्यावरही कुणी प्रेम केले असते'. मग मी किनाऱ्यावर येऊन तुझ्याशी मैत्री केली असती, तुझ्या सोनमासळीने तुझा एकाकीपणा दूर केला असता. या कल्पनेने तुला 'सुकून' मिळाला असता, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती
'एट एम मेट्रो' सिनेमातली ही गुलजार यांची कविता. "एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं बन सकते" या हिंदी चित्रपटातील सर्व व्याख्यांना छेद देत कुठेतरी दूर नेऊन ठेवणारी थोडी परकी पण बरीचशी आपली वाटणारी दोन माणसांची कथा. ती कधीही स्त्रीपुरुषांची होत नाही, ना कधी 'जेन्डरलेस' स्नेहाचा बटबटीत दिखावा करते. ती शेवटपर्यंत दोन माणसांचीच राहते. तुम्हाला जे हवे ते तुम्ही घ्या, नको असेल तर नका घेऊ. इतकी कंफर्टेबल अभिव्यक्ती..!
साधीसरळ आत्मविश्वास कमी असणारी संवेदनशील गृहिणी इरा व टागोर, चेकॉव्ह, हरिवंशराय बच्चन अशा लेखकांच्या पुस्तकांत रमणारा इंट्रोव्हर्ट वाटावा असा प्रीतम अनपेक्षितपणे सकाळी आठ आणि संध्याकाळी सहा वाजताच्या हैदराबाद शहरातील मेट्रोत भेटतात, बोलतात, खुलतात, एकमेकांना शोधत- प्रेरित करत आपापला मार्ग शोधत 'यथा काष्ठं च काष्ठं च' म्हणत परतही जातात. आपण एकमेकांच्या रितेपणाला भरत आहोत ही जाणीव नेणीवेत जाते आणि दोन आठवड्यांचे निर्व्याज नाते खूप काही देऊन जाते.
इराला लहानपणी ट्रेनमधे काही काळ चुकामूक झाल्याने एकटे रहावे लागते व त्याचा तिला प्रचंड धक्का बसलेला असतो. त्यात तिला बहिणीच्या गुंतागुंतीच्या प्रेग्नंसीसाठी नांदेडहून हैद्राबादला मदतीसाठी यावे लागते. रोज बहिणीच्या घरून हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन येण्यासाठी ट्रेन घेताना पॅनिक अटॅक्स यायला लागतात. तेव्हा प्रीतम तेथेच असतो व गप्पा मारत तिचे लक्ष विचलीत करतो. सहज सुरू झालेल्या गप्पा तिच्या कविता व त्याच्या वाङमयीन रुची वर व्हायला लागतात. या गप्पा प्रोफाऊंड असूनही सहजपणे होतात, कधीकधी अगदी साध्याही असतात. त्यामुळे त्या मोजूनमापून केलेल्या न वाटतात आपोआपच झालेल्या वाटतात. इरा तिचे भय शब्दातही मांडते. हजारो गोष्टी सांगायच्या असतात पण भोवतालची ही पराकोटीची अनास्था बघून व्यक्त व्हावेसे वाटत नाही. तेव्हा संवेदनशील मनांनी काय करावे ते इरा मांडायचा प्रयत्न करते. फक्त स्वान्तःसुखाय. प्रथमच तिला तिची अभिव्यक्ती समजून घेणारे असे कोणी भेटते, तोवर तिला ही जाणीवही नसते की ती खरोखरच उत्तम काव्य करते. पण या स्वतःच्या चाचपडीत ती त्या सोनमासळी सारखी प्रीतमलाही 'सुकून' देत असते.
ते रोज गप्पा मारायला लागतात. फिल्टर कॉफी वरून जोरात प्रेस केली की डिकॉक्शन पातळ पडते आणि नाही जोर दिला तर ती कडवट होते. पण ती व्यवस्थित करणे ही प्रक्रिया मेडिटेशन सारखी असते. अशा शिळोप्याच्या ते-
आफ्रिकेतील आदिवासी लोक तिथले स्त्री-पुरूष एकमेकांशी कसे निर्विष, नॉन -जजमेंटल बोलतात व इतरांचा कानही होतात. ते आपल्या सोसायटीत या फेक संस्कारांच्या नियमांमुळे शक्य होत नाही म्हणजे एकप्रकारे मानवी नीतिमूल्ये आपण गमावून बसलो आहोत. सगळीकडे माणसांचा महापूर आलेला असूनही ऐकणारा समजू शकणारा कान सापडत नाही- अशा सखोल. चर्चा नव्हे गप्पा.
एकेदिवशी ते हैद्राबाद शहराची सहलही करतात. अतिशय साधी असलेली इरा खुलायला लागते व वडिलांनी अखेरच्या दिवसातल्या त्यांनी व स्वतः केलेल्या कविता म्हणून दाखवते. त्यांच्या शुश्रुषेतले एकाकी दिवस व आयुष्याचा व समाधानाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा कसा असू असतो असेही सांगते. तिची ट्रेनबद्दलची भीती कमी व्हायला लागते. मोकळा श्वास घ्यायला लागते. बहिणीचे आलेले प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करते.
प्रीतमही खुलून घरच्या -कुटुंबाची हसरी चित्रं रंगवतो. मृदुला व मुलांबद्दल गोड हितगूज करत असतो. मृदुलाही बंगाली कविता करत असते, ते कसे प्रेमात पडले, मुलांसोबत ते प्रत्येक क्षण कसा एन्जॉय करतात. तो कसा गोड बाबा व प्रेमळ नवरा आहे हे इरासोबत आपल्यालाही जाणवते. त्यांचे "खौफ" - भय कमी व्हायला लागतात.
वो कोई खौफ़ था या नाग था काला
मुझे टखनोंसे आ पकडा था जिसने
मै जब पहिली दफा तुमसे मिली थी
कदम घडने लगे थे मेरे जमींनमें
तुम्हीने हात पकडा और मुझे बाहर निकाला
मुझे कंधा दिया सर टेकनेको
दिलासा पाके तुमसे सांस मेरी लौट आयी
वो मेरे खौफ सारे जिनके लंबे नाखून गलेंमें चुभने लगे थे
तुमहीनें कांट फेके सारे फन उनके
मै खुलके सांस लेने लग गयीथी
ना माझी देखा, ना मुस्तक्बिलकी सोची
वो दो हफ्ते तुम्हारे साथ जीकर अलग एक जिंदगी जी ली
फकत मैं थी, फकत तुम थे
कुछ ऐसे रिश्तेभी होते है जिनकी उम्र होती है, ना कोई नाम होता है
वो जिने के लिये कुछ लम्हें होते है.
पण प्रीतममधले वैफल्य सुरवातीपासून जाणवत असते. बऱ्याचदा भरपूर वाचन असणारे, वरवर वाक्चतुर वाटणारे लोक खऱ्याखुऱ्या भावना शिताफीने लपवू शकतात, अजिबात खोटे न बोलताही. अशा लोकांचे नैराश्य/एकटेपणा कधीही कळत नाही. तेवढा पेशन्स असणारेही कोणी भेटत नाही. कुणाच्या कलाकलाने घ्यायला आपल्याला वेळ कुठे आहे एकमेकांसाठी. त्यांना समजून घ्यायला तितकेच 'रूतलेले' कोणीतरी लागते. इराही त्याच तलावात दडी मारून बसलेली, प्रीतमसारख्या चंद्रबिंबाप्रमाणे वरवर तरंगत राहणाऱ्या इंट्रोव्हर्ट आणि वैफल्यग्रस्त व्यक्तीची दोन आठवड्यांपुरती 'सोनमासळी' होते. त्या चंद्रबिंबामुळे तिलाही तिच्या अभिव्यक्तीने- तिच्या कवितांनी कुणा एका जीवाला 'सुकून' मिळतोय ही जाणीव होते. अजून लिहायला हवे, हे छापून यायला हवे अशी इच्छा प्रथमच वाटते. "तू जसा कुठेतरी एकटा नसूनही एकाकी आहेस तशी मीही भरलेल्या संसारात महत्त्वाकांक्षी नसलेली तरीही संसारापेक्षा जास्त काही तरी शोधणारी वरवर सुखी वाटणारी साधीसरळ गृहिणी आहे. या भयांच्या गर्तेतून मी कधीही बाहेर निघणार नाही असे वाटताना अनाहूतपणे तू भेटलास. आणि निनावी नाते खूप काही देऊन गेले."
अशाच गप्पांमधे इरा प्रीतमच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. प्रीतमही सरळपणे तयार होतो. ती भेट अर्थात होतच नाही व धक्कादायक प्रकारे तिला त्याच्या एकाकीपणाचे कारण कळते. तिच्या बहिणीला बाळ होते व तिच्या परत जाण्याची वेळ होते. ते वेगळे होतात, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. एकमेकांना चांदणे दाखवून, आपापल्या मार्गाने जातात. उरलेला प्रवास एकाकी असला तरी तो 'सुकून' घेऊन पुढे जाण्याने कमी बोचरा होतो. या सिनेमात फक्त इरा आणि प्रीतमचा संवाद आहे, बाकी काहीही महत्त्वाचे नाही. जे आहे ते संवादांची शृंखला एकमेकांना जोडणारे आहे, तेवढ्याचसाठी आहे. इराच्या सगळ्या कविता गुलजार यांच्या आहेत. त्या काव्याशिवाय ही कथा नाही, कथेला अधिक आर्तपणे त्या प्रेक्षकांपर्यंत पोचवतात. कथेशिवाय काव्यालाही अर्थ व सखोलता प्राप्त होत नाही. त्यामुळे ते दोन्ही इरा आणि प्रीतमप्रमाणे एकमेकांना परिपूर्ण करतात, नव्या उंचीवर नेतात. सुरवातीपासूनच हा बंध 'प्लेटॉनिक व तात्कालिक' आहे असे स्पष्ट दिसत असूनही हा संवाद ती उंची निश्चितच गाठतो. नात्यांमधली आणि अभिव्यक्तीमधलीही. हे पंधरा दिवस व ट्रेनमधल्या गप्पा दोघांचेही आंतरिक आयुष्य बदलवून टाकतात. पुढचा प्रवास कमी एकाकी करतात. प्रीतमही थेरपीच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकतो. आत्महत्येचा विचार रद्द करतो. त्याच ट्रेन ट्रॅकवर तो जीव द्यायला निघालेला असतो, जिथे इराला पॅनिक अटॅक्स आलेला बघताना पहिल्यांदा तिला सावरायला जातो.
इराच्या गप्पांनी/ तिच्या कवितांनी एका जीवाला शांतता मिळते. "अशांसाठी तू लिहायला हवेस इरा, सभोवताली असलेल्या अनास्थेची - 'बेरूखी'ची पर्वा न करता तू लिहायला हवेस इरा. एखाद्या जीवापर्यंत त्या पोचतील आणि त्याला कुठेतरी तृप्त करतील. तुझ्या रक्तात वाहणारी ती वेदना बोटांतून बाहेर पडू दे. चांदणे पसरू दे, खोल तलावातून बाहेर पड. चंद्रबिंबाप्रमाणे कुणीतरी तरंगत येईल".
येथे एडी मर्फीच्या 'Holy man' चित्रपटातला संवाद आठवला. समुद्रकिनारी चालत असताना लाटेसोबत वाहत येत वाळूत अडकून पडलेल्या हजारो स्टारफिशचा खच पडलेला असतो. शक्य तितके स्टारफिश परत प्रवाहात नेऊन सोडण्याची एका छोट्या मुलीची तडफड...! असे किती स्टारफिश आपण वाचवू शकणार आहोत, येथे तर खच पडलाय. आपल्या या तडफडीने असा कितीसा फरक पडणार. त्या छोट्यामुलीला जे समुद्रात जाऊन पुनर्जीवीत होतील, त्यांना तर खूप मोठा फरक पडेल असेच वाटलेले असते.
तसेच इराचे काव्य प्रीतमसाठी फरक पाडते, गारवा देते. तिलाही निश्चित दिशा मिळते. तिलाही ते सगळे मिळते, जे एका सोनमासळीला हवे असते. बरीच भयं दूर होतात, दिलासा मिळतो. मोकळा श्वास घ्यायला लागते. सुखी संसारात 'स्वत्व' सापडते. काही क्षणांमधे घडणारे आयुष्य अनोळखी व्यक्तीमुळे जगता येते.
इरा तिच्या कवितांचे पुस्तक छापते. त्याच हैदराबाद मधल्या पुस्तकांच्या नॉस्टॅल्जिक वाटणाऱ्या दुकानात तिथे ते त्याला मिळते. निरोप म्हणून 'काफ्का आणि बाहुलीची गोष्ट' तिने त्यात लिहिलेली त्याला सापडते. बर्लिनच्या एका पार्कमधे फिरताना काफ्काला एक छोटीशी मुलगी रडताना दिसते. बाहुली हरवल्याने ती रडत असते. दोघे मिळून बाहुली शोधतात पण ती काही सापडत नाही. दुसऱ्या दिवशी काफ्का त्या चिमुकलीसाठी बाहुलीकडून आलेले पत्र वाचून दाखवतो. बाहुली जगप्रवासाला निघालेली असते, त्यात तिने ह्या प्रवासातील साहसांबद्दल पत्रांत लिहिण्याचे वचन दिलेले असते. मुलीला गंमत वाटते. अशी बाहुलीची पत्रे वर्षभर येतात, काफ्का ते वाचून दाखवतो. एका वर्षांनी पूर्णपणे वेगळी वाटणारी बाहुली आणि शेवटचे पत्र येते. चिमुकली म्हणते, ही तर माझ्या भावली सारखी दिसत नाही, वेगळीच दिसतेय. भावली म्हणते, "मी जग बघितलेय आता आणि बदलून गेले आहे. पण मी तुझीच आहे." गोष्टीचे आणि सिनेमाचे तात्पर्य, प्रीतमसाठी इरा व इरासाठी प्रीतम त्या काफ्काच्या बाहुलीसारखे ठरतात.
Everything you love will probably be lost, but in the end, love will return in another way.
मला खटकलेली एकच गोष्ट म्हणजे सैयामीने वाचलेल्या कवितांमधे अजून एक्सप्रेशन हवे होते. चित्रपट समांतर सिनेमा वाटावा इतका संथ आहे. ज्यांना कविता व साहित्यात रूची नाही, त्यांच्यासाठी नक्कीच नाही. अभिनय उत्तम आहे. छोटेसेच पण ताकदीचे कथाबीज आहे. गुंतवून ठेवतो , काही ठिकाणी डोळ्यांत पाणीही येते. तुम्ही प्रेक्षक म्हणून त्या भावना जगलेल्याच नसतील तर यात काय अर्थ आहे असेही वाटू शकते. शेवटी पात्रांमधे कुठेतरी आपण स्वतःलाच शोधत असतो. कधीकधी आपलेच हरवलेले तुकडे शोधण्यासाठीच आपण चित्रपट बघतो, पुस्तक वाचतो, येथे येतो- चर्चा करतो. तुकडा गवसलाय वाटेपर्यंत आतले ब्रह्मांड अजून बदलून गेलेले असते. कुणाला गवसेलही काही कदाचित... यातून..!
संदर्भ-
Holy man- https://www.imdb.com/title/tt0120701/characters/nm0000552
Kafka and the lost doll- https://epicureanglobalexchange.com/kafka-lost-doll-little-girl/
Wikipedia
https://en.m.wikipedia.org/wiki/8_A.M._Metro
चित्र साभार विकी
इरा- सैयामी खेर
प्रीतम- गुलशन देवैय्या
इराचा नवरा- उमेश कामत
सगळ्या कविता गुलजार यांच्या आहेत.
©अस्मिता.
Update - फिल्म कंपॅनियनची लिंक ज्यात या परीक्षणापेक्षा वेगळा दृष्टिकोन ठेवून वेगळी बाजू मांडली आहे.
https://www.filmcompanion.in/reviews/bollywood-review/8-am-metro-movie-r...
छान लिहिलं आहेस अस्मिता.
छान लिहिलं आहेस अस्मिता. लंचबॉक्स आठवलाच.
स्टारफिश व काफ्का ची उदाहरणेही चपखल आहेत. >>> अगदी
मला वावे आणि अस्मिता दोघींचं
मला वावे आणि अस्मिता दोघींचं थोडं थोडं पटतंय. भिन्न जेंडरचं आकर्षण असं नाही. पण त्या जेंडरच्या व्यक्तीशी बोलताना आपले ब्रॉडकास्टर्स आणि सेन्सॉर्स वेगळ्या पद्धतीने काम करतात असं मला वाटतं. मलाही जवळचे म्हणावे असे मित्र आहेत. पण मैत्रिणीशी जे बोललं जातं, ते सगळ्यात जवळच्या मित्राशी बोललं जात नाही. उलट अनुभवही आहे. दुसर्या एका मैत्रिणीने तिच्या मनातल्या गोष्टी माझ्यापाशी मोकळ्या केल्या (शेअर केल्या लिहिता लिहिता हा शब्द आठवला) . तिलाही जवळच्या मैत्रिणी आहेत.
सरोवर मीही वाचली आहे, आठवत नाही.
--
मला घुटने टेकना आठवलं नाही. माथा टिकाना, काँधे पे सर टिकाना असं काय काय आठवलं. दोघांच्या अर्थांत किंचित फरक असावा.
लेख चांगला आहे.
लेख चांगला आहे.
त्या जेंडरच्या व्यक्तीशी
त्या जेंडरच्या व्यक्तीशी बोलताना आपले ब्रॉडकास्टर्स आणि सेन्सॉर्स वेगळ्या पद्धतीने काम करतात >> बरोबर आहे भरत, असंच काहीसं म्हणायचं होतं मला. तुम्ही जास्त जनरिक प्रकारे लिहिलं आहे. मी फक्त सकारात्मक बाजू विचारात घेऊन लिहिलंय.
ही घे टाळी.
धनुडी
भरत, सरोवर कादंबरीत बँकेत नोकरी करणारे, विवाहित मित्र-मैत्रीण आहेत.
संप्रति यांच्या नोंदी आवडल्या
संप्रति यांच्या नोंदी आवडल्या. दुसरी तर सध्या अनुभवतो आहे.
>>>>>>>शारीरिक आकर्षण नसलं
>>>>>>>शारीरिक आकर्षण नसलं तरी भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण हा भाग असतो.
करेक्ट!
>>> हे 'ह्यूमन टू ह्यूमन'
>>> हे 'ह्यूमन टू ह्यूमन' नाते असून, यात योगायोगाने ते स्त्री-पुरुष आहेत असे वाटले.
हो, मलाही असंच वाटलं.
>>> एक दृश्य आहे ज्यात तिचा तोल जाऊन ती त्याच्या कवेत पडते
बहुधा इतक्या दिवसांत प्रथमच तेव्हा त्यांना त्या जेन्डर डिफरन्सची अचानक आणि लख्ख जाणीव होते.
>>> त्या जेंडरच्या व्यक्तीशी बोलताना आपले ब्रॉडकास्टर्स आणि सेन्सॉर्स वेगळ्या पद्धतीने काम करतात असं मला वाटतं
यात सोशल कंडिशनिंगचा भाग असू शकेल का, किंवा किती असेल असा विचार करते आहे.
मला आता पुन्हा बघावा लागणार
मला आता पुन्हा बघावा लागणार हा सिनेमा!
सुंदर लिहिले आहेस , अस्मिता!
सुंदर लिहिले आहेस , अस्मिता!
मी आज पहिला.
तिचे कुरळे केस फारच कृत्रिम वाटतात. कोणत्याही क्षणी विग गळून पडेल असे वाटते. साधे नॉर्मल केस दाखवायला काय झाले होते?
बाकी
संप्रती यांच्या नोंदी अगदीच रिलेटेबल आहेत.
असा मैत्रीचा, आपलेपणाचा झुळझुळता झरा मिळायला भाग्य लागते...विशेषत: ती मैत्री प्रेमात कन्व्हर्ट होऊ न देता पुढे नेणं फार अवघड असतं.
तो हिरो..फारच छान काम केले आहे त्याने. उलझ मध्ये अगदी कमीना वाटणारा तो..इथे हळुवार, कवीमनाचा प्रीतम छान उभा करतो.
खरे तर, अशा हृदयाच्या तारा छेडल्या जाणं.... संगीतात त्याला सिंपथेटिक स्ट्रिंगज् म्हणतात. ..हा फारच वैयक्तिक अनुभव आहे. It can't be justified or explained!
किंबहुना हिणवले जाण्याची, नाती तुटण्याचीच शक्यता अधिक!
अतिशय सुंदर लेख... नक्की
अतिशय सुंदर लेख... नक्की पाहणार हा चित्रपट.
बाकी पोस्टी पण छान.
हा सिनेमा बघितलेला आहे आणि
हा सिनेमा बघितलेला आहे आणि आवडलेला. लेख अजुन सगळा वाचलेला नाही. शांतपणे वाचतो.
सोशल कंडिशनिंगचा भाग नक्कीच
सोशल कंडिशनिंगचा भाग नक्कीच असतो माझ्या मते.
सोशल कंडिशनिंगला मम.
सोशल कंडिशनिंगला मम. माणसामाणसातले सगळे दुरावे कसे बरोबर या बिंदूपाशी उगम पावतात.
भरत, तुम्ही लिहिलेले वाचले. हो, मनामधे सामाजिक टॅबूचे भान कायम ठेवावे लागते हे पटलेच आहे. त्यामुळे लेखातला तो आदिवासी समाजातील मुद्दा प्रकर्षाने जाणवला, आपला समाज खरोखरच मानवी नीतिमूल्ये गमावून बसला आहे.
तुम्ही सिनेमा बघा ना..! ज्यांना सखोल आणि अर्थपूर्ण संवादात रस आहे त्यांना विचार करायला लावणारा चित्रपट आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सुचवतेय.
वावे, सामो, स्वाती चर्चा आवडली.
खरे तर, अशा हृदयाच्या तारा
खरे तर, अशा हृदयाच्या तारा छेडल्या जाणं.... संगीतात त्याला सिंपथेटिक स्ट्रिंगज्.. हा फारच वैयक्तिक अनुभव आहे. It can't be justified or explained!
>>>> सुरेख
हल्ली IQ चांगला आणि EQ मात्र जेमतेम असेच लोक असतात, त्यांच्याशी गप्पा/ संवाद होऊ शकत नाहीत. झाल्या तरी सुपरफिशियलच राहतात, त्या सखोल व अर्थपूर्ण होऊ शकत नाहीत. अशांशी जन्मभर गप्पा मारल्या तरी अशी नाती कुठल्याही उंचीला जात नाहीत. ती वरवरचीच राहतात. तरीही IQ ला अवास्तव महत्त्व दिले जाते पण भावनांची कदर, जाणीव, भान वगैरे गावीही नसते. संवाद साधता येण्यासाठी वेवलेन्थ जुळावी लागते.
गुलजारचं कौतुक वाटतं. या
गुलजारचं कौतुक वाटतं. या वयातही ते तरल लिहू शकतात.
या तरल विश्वापासून फारकत घेतलेल्याला आता कैक वर्षे झाली. ती एक वेळ होती. नंतर जितकं प्रॅक्टीकल ते आवडू लागलं.
तरल भावविश्व मांडताना ते अॅब्स्ट्रॅक्ट असेल तर थोडाफार विरंगुळा म्हणून त्यातली कोडी सोडवत काही काळ प्रयत्न करावासा वाटतो. पण खूप लेखक, दिग्दर्शकांची तरल विश्व चितारताना फॅ फॅ उडते. अचानक पात्रं फिलॉसॉफिकल बोलू शकतात. मिस्टर सॉक्रेटिस अॅण्ड मिसेस सॉक्रेटीस कि अमर कहाणी असा सिनेमा चालू आहे असं वाटतं. मालिकांमधे जरा जास्तच असतं.
गुलजारचे संवाद साधे पण नेमके असायचे. पकड ढिली व्हायची नाही. स्त्री पुरूष नात्यात आडवा येणारा इगो हे त्याचं आवडतं चित्र.
या सिनेमाचं वर्णन या कुठल्याच साच्यात बसत नाहीये.
पाहिल्यावर बोलता येईल, पण सध्याच एव्हढ्या टोकाच्या भावनांच्या कल्लो़ळातून गेलेलो असल्याने ही वेळ योग्य नाही हे नक्की.
हरकत नाही आचार्य, तुम्हाला
हरकत नाही आचार्य, तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा. ही मेट्रो काही सुटणारी नाही.
सर्वांना धन्यवाद.
मस्त परीक्षण.. तुमचं लिखाण
मस्त परीक्षण.. तुमचं लिखाण नेहमीच आवडतं अस्मिता...खूप सुंदर लिहिता तुम्ही..
आणि पिक्चर तेव्हा ही आवडलेला..पण आत्ता वाचताना इतके छान संदर्भ लागले..अजून एकदा बघेन हे लिहिलेलं आठवत. संथ आहे पण थोड गुंतायला पण होतं त्यात.
गुलशन devaiyya... मस्तच काम करतो..
हल्ली IQ चांगला आणि EQ मात्र
हल्ली IQ चांगला आणि EQ मात्र जेमतेम असेच लोक असतात, त्यांच्याशी गप्पा/ संवाद होऊ शकत नाहीत. झाल्या तरी सुपरफिशियलच राहतात, त्या सखोल व अर्थपूर्ण होऊ शकत नाहीत. अशांशी जन्मभर गप्पा मारल्या तरी अशी नाती कुठल्याही उंचीला जात नाहीत. ती वरवरचीच राहतात. तरीही IQ ला अवास्तव महत्त्व दिले जाते पण भावनांची कदर, जाणीव, भान वगैरे गावीही नसते. संवाद साधता येण्यासाठी वेवलेन्थ जुळावी लागते.>>>>>>>>>>>>>>>> ++++१००००००
हा चित्रपट मी पाहिलाय. पण
हा चित्रपट मी पाहिलाय. पण शेवटाला कोणी तरी नेमकं तडमडलं & राहिलाय.
खूप छान लिहिलं आहेस. तरल.
आपण एकमेकांच्या रितेपणाला भरत आहोत ही जाणीव नेणीवेत जाते आणि दोन आठवड्यांचे निर्व्याज नाते खूप काही देऊन जाते. >>>वॉव!
लीड कास्ट अभिनय, दिसणे दोंहीत मला फार आवडते. म्हणुन आधी संथ वाटला तरी बघत गेले आणि आवडला.
मुका घ्या मुका वर लिहिणारी
मुका घ्या मुका वर लिहिणारी अस्मिता तूच का?
आशु - नाही, नाही. ती माझी
आशु
- नाही, नाही. ती माझी 'नॉटी' जुळी बहिण आहे, 'सीता और गीता' मधल्यासारखे. ती 'हवा के साथ साथ' करते आणि लोक मला विचारतात 'स्केटिंग करताना दिसलेली तूच का?' , मी तरी काय सांगू..! 
रच्याकने, हर्पेनने उच्च अभिरुची म्हटल्यावर तुम्ही 'मुका घ्या मुका' वाचलेले दिसत नाही असे लिहून खोडले होते.
पिकू
, 'अगं-तुगं' केले तरी आवडेल.
अंजली, आबा, धनुडी, पिकू, आशु, फा, भरत, वावे, स्वाती, हर्पेन, आचार्य, केकू, रमड, सामो, संप्रति, मी नताशा, अजनबी, देवकी तै, छल्ला सर्वांचे आभार.
कुणी पर्सनली घेणार नसेल तर हा
कुणी पर्सनली घेणार नसेल तर हा film companion चा रिव्यू वाचा.
https://www.filmcompanion.in/reviews/bollywood-review/8-am-metro-movie-r...
>>> together they travel the
>>> together they travel the path of road taken too much

त्याचं उत्तर लेखात आलंय खरंतर :

>>> म्ही प्रेक्षक म्हणून त्या भावना जगलेल्याच नसतील तर यात काय अर्थ आहे असेही वाटू शकते. शेवटी पात्रांमधे कुठेतरी आपण स्वतःलाच शोधत असतो.
वाटलच होत.
वाटलच होत.

लुत्फ़े मय तुझ से क्या कहूं ज़ाहिद
हाय! कमबख़्त तूने पी ही नहीं इत्यादी प्रतिसाद येणार म्हणून. आणि ते आलेच!
आता मी ते वाक्य 'डिस्क्लेमर'
लिंक वाचलेली नाही.
film companion ह्या साईटला
film companion ह्या साईटला underestimate करू नका. ही साईट अनुपमा चोप्रा चालवत होत्या. नाम तो सुनाही होगा.
केवळ हे एकच वाक्य together they travel the path of road taken too much तुम्ही पकडले आहे. अजूनही बरेच आहे.
जाऊ दे म्हणा.
असेल की, पण अस्मिताचा जो
असेल की, पण अस्मिताचा जो अनुभव, या चित्रपटाच्या मिषाने झालेलं जे चिंतन तिने मांडलं, ते कोणा प्रत्युष किंवा खुद्द अनुपमाकडूनसुद्धा कशाला व्हॅलिडेट व्हायला हवं आहे?
'लुत्फे़ मय'बद्दल सेम टु यू!

'जाऊ दे म्हणा' हेच अंतिम सत्य!
स्वाती, ज्जे बात..!
स्वाती, ज्जे बात..!
हो हो अगदी खरं आहे. आमचे बाघा
हो हो अगदी खरं आहे. आमचे बाघा महाराज म्हणतातच की. "बडे सयाने कहके गये है. बेटा, जिसकी जैसी सोच."
हो हो अगदी खरं आहे. आमचे बाघा
.
Pages