खऱ्या अज्ञातवासीची कथा... - भाग १

Submitted by अज्ञातवासी on 30 October, 2024 - 14:14

आय अचीव इट स्नेहल, इट्स माय बर्थडे टुडे...
मी स्नेहलला मेसेज टाकला, एक फोटो टाकला, आणि खरच ढसाढसा रडलो.
गेल्या काही दिवसांपूर्वी तिनेच माझं स्टेटस ठेवलं होतं.
लॉस्ट ३२ केजी...
आणि हा प्रवास खरच सांगतो, अजिबात सोपा नव्हता.
कारण मी सुरुवातच अगदी अगदी वाईट अवस्थेत केली होती..
...माझी प्रोफाईल होती एक्सपोर्ट मॅनेजर म्हणून... वेगवेगळे देश फिरण्याची हौस...
पण कधीही फोटो काढला नाही. कधीही नाही. फोटोफोबिक नावाचा प्रकार मी कसोशीने पाळला...
अरे एवढा भारी दिसतोय, एक फोटो तरी काढ. आई नेहमी बजवायची...
...पण नाही.
त्यात एकदा पासपोर्ट हरवला. आजारपणाने फिरणं बंद झालं.
६ मे २०२३ रोजी ही सुरुवात झाली होती. सुरुवातीचं प्रॉमिस होतं सहा महिन्यांचं, पण नाही शक्य झालं.
कारण सांगतो...
...मी काही कारणामुळे प्रचंड डिप्रेशनमध्ये होतो. खूप डिप्रेशन. जीवघेणं.
तेच ते. काहीतरी खूप सुंदर गमावल्याची वगेरे भावना...
सो सुरुवात तशी रडतखडत झाली...
...डिप्रेशन आणि स्ट्रेस असताना, तुमची कॉर्टीसोल लेव्हल वाढते. त्याने रॅपिड वेट गेन होतं एवढं बेसिक नॉलेज होतं.
...त्यात आजारपण. कंटीण्यू आजारपण... ताकद उरली नव्हती...
खरच नव्हती...
दिवसरात्र स्ट्रेस आणि एकच विचार...
...कधीकधी रडून घ्यायचो. देवाला दोष द्यायचो.
हातातून सगळं सुटत चाललय अशी भावना होती.
(सुसायडल टेंडसीसुद्धा तेव्हा डेव्हलप झाली होती.)
बेंगलोर ला गेलो, हात थरथर कापत होते माझे...
...पाय लटलटत होते.
पंधरा दिवस मी हॉटेलवर होतो... झोपून...
शेवटी निम्हान्स ला गेलो. बेंगलोरला.
...खूप झगडलो. पण शेवटी आलोच परत. आणि केली सुरुवात झाली ट्रेडमिल पासून.
४ किलोमिटर प्रती तास.
पंचवीस मिनिटे...
...लोक बघत होते आणि काहीजण हसले देखील...
इतका घामेघुम मी झालेला होतो.
डायट दिली होती.
मॉर्निंग. वन प्रोटीन स्कुप आफ्टर वर्क आऊट.
त्यांनतर नाश्ता ४ एग व्हाईट आणि वन एग होल.
दुपारी जेवण, चिकन वा पनीर, एक वाटी राईस, एक नागली अथवा ज्वारीची भाकरी.
संध्याकाळी मूठभर फुटाणे.
रात्री परत रिपीट पण विथ हाफ केजी सलाड...
पहिल्या दिवशी डाएट..चार समोसे. दुपारी एक चिकन बिर्याणी, रात्री एक पिझ्झा आणि कोक.
तेव्हा बरं वाटलं.
दुसऱ्या दिवशी तेच.
शेवटी आईच कामाला येते.
बसवलं जवळ...
"हे बघा, तुमचा इश्यू मला माहितीये. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, जर माझ्या हातात असतं, तर मी सगळं केलं असतं. पण जे तुम्हाला हवय, ते कायमच गेलं हे जेव्हा स्वीकाराल, तेव्हा आयुष्य पुढे जाईन. नाहीतर स्वतःच आयुष्य बरबाद करून घ्याल.
मला माझ्या मुलावर अभिमान होता, त्यावर मी बाकीच्या मुलांना तुच्छ लेखलं असेल. तुमचं देखील हेच होतं. तुमचा गर्व आणि अहंकार इतका होता ना, की रावण देखील लाजला असता. म्हणून हे घडलं...
अहंकार दाखवायचा असेल, तर तसं बना, मग तुम्ही रावण बनलात तरी चालेल. आणि त्यानंतर विनम्र बना...
...तुम्हाला अजूनही काही कमी नाही, हवा तितका पैसा खर्च करा, पण रिझल्ट द्या... आणि आता स्वतःला मारणं थांबवा... गाल लाल असतात सकाळी तुमचे..."
...मी अक्षरशः ढसाढसा रडलो हे ऐकून...
कारण दररोज मी स्वतःला मारायचो. तेही वेड्यासारखं... दररोज... पन्नास साठ, कितीही.
जितका स्वतःला त्रास होईल तितका त्रास द्यायचो. स्वतःचाच इतका तिरस्कार करायला लागलो होतो.
मी तिला गच्च मिठी मारून रडलो. अगदी गच्च.. पोटाला...
...आयुष्य असं नसतं राजा. आयुष्याचं नाव असतं मुव ऑन करणं. कबीर सिंग बघितला होता ना आपण, ती मूवी होती... आयुष्यात तसं वागशील, तर फक्त आणि फक्त बरबाद होशील...
..हो आई...
मला पुन्हा रडू फुटलं...
"...वेडा आहेस. खूप वेडा. पण माझा मुलगा, त्याच्या व्हॅल्यू, त्याचे एथिक्स ते आहेत ना रे इंक्टॅक्ट?"
"आई ते कधीच मागे पडलेत." मी अजूनही रडत होतो.
"असं नाही होत. त्यांना जप. पुन्हा हिरो बन...माझा मुलगा मला हवाय परत. ज्यावर मी गर्व नव्हे माज केला, तो हवाय परत."
बस...
झाला प्रवास सुरू.
डिप्रेशन होतं, स्ट्रेस होता, चिडचिड होती...
पण वेड होतं.
पुन्हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट फेज गाठायचा...
...कॉलेजचा...
जिथे मी स्टार होतो.
बिबीएचा टॉपर, एमबीएचा टॉपर... बेस्ट आउटगोइंग स्टुडंट...
...मिस नाशिकचा बॉयफ्रेंड...
बेस्ट फेज.
...आणि मी सुरुवात केली.
सगळ्यात आधी तर साखर शून्य केली. डोकं दुखायचं आधी.
पण केली शून्य...
मग हळूहळू डाएट कंट्रोल, वरचा प्लॅन कसोशीने पाळायला लागलो.
दहा किलो, दोन महिन्यात कमी केलं...
मी हवेत...
₹दात पुढे आलेत का रे..." एकदा भगिनी निरीक्षण करत म्हणाल्या.
झालं. वेड लागलं.
चार अक्कलदाढी काढल्या, उरलेल्या दाताना क्लिप्स...
...त्याही बाहेरून...
वाह क्या सिन है.
...मग काही दिवसांनी, अचानक...
"आता चष्म्याचा नंबर काढू, छोटा आहे, निघून जाईल..."
भगिनी परत...
झालं. लेजीक ऑपरेशन झालं. मात्र याने महिनाभर जिम बंद.
सात किलो वजन कमी असा काटा आला. दोन महिन्यात.
आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात काहीही नाही...
...कारण जे कमी झालं, ते वॉटर वेट होतं.
आता चरबी जळायची बाकी होती.
आठवणी गेल्या नव्हत्या, फेड मात्र झाल्या होत्या.
नवीन जॉबमध्ये पुन्हा दक्षिण भारत फिरायला सुरुवात केली. वेड्यासारखं फिरलो.
फोटोज् काढायची भीती होतीच.
एकावेळी एकच प्रॉब्लेमशी झुंजताना बरं असतं...
इथे तर दैव देखील माझ्या विरोधात होतं.
एक छान ॲक्सीडेंट झाला, दोन महिने पुन्हा बेडरेस्ट...
तुझे कोई डॉक्टर नही, बल्की ज्योतिषी की जरुरत है...
इति भगिनी...
...आता स्पीड वाढला होता. चारचा आठ झाला होता.
जिममध्ये हसणारे लोक कुतूहलाने बघत होते.
...आणि काही जीवाभावाचे मित्र देखील जोडले. अक्षरशः एक मोठा भाऊ, एक छोटा भाऊ, आणि एक जुळा भाऊ सुद्धा...
आयुष्यातला काही चांगला काळ असेल, इथेच एन्जॉय केला...
अज्ञातवासी दररोज आता चौदा किलोमिटर पळत होता. एक तास चाळीस मिनिटे.
...घामाने अंघोळ निघायची.
हळूहळू प्रगती होत होती. ग्राफ छान होत होता...
सप्टेंबर २०२४.
खूप सुंदर गेला. अतिशय सुंदर... खूप प्रगती केली.
२ ऑक्टोबर २०२४, एक मेसेज आला.
बिलिव मी... मी जग जिंकलं...
आणि नंतर कळलं, मृगजलाच्या पाठीमागे पळणे काय असतं ते.
असो...
तिचं बैचेनी, तेच डिप्रेशन वाट्याला आलं.
येस, सायकॉलॉजीस्ट होतीच दिमतीला. खूप लोकांना त्रासही दिला.
प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ देखील यामुळे डिस्टर्ब झाली.
...पण यावेळी डेट चुकवायची नव्हती.
...खरच नाही...
बिलकुल नाही...
... पण बोललो होतो ना, दैव माझ्या विरोधात होतं...
आयुध पूजेला बेंगलोरला गेलो...
...तिकडून आल्यावर बारीक बारीक पुरळ अंगावर उठले...
मी अलर्ट झालो... लगेच घरगुती उपचार केले...
पण नंतर पाणी भरलं, आणि फोड आले.
याला म्हणतात herpes zoster...
उर्फ नागीण...
आईशपथ... शेवटच्या क्षणी दैवाने घात केला. पाच दिवस हॉस्पिटल, परत...
...आणि मात्र स्त्रिक्ट आराम.
वेदना, प्रचंड वेदना, सूज आणि ताप...
पुन्हा एकदा दैव माझी संधी हिरावून घेणार होतं.
...आजचा दिवस. बंगल्यात पडून होतो. सकाळीच...
निराश... हताश...
मातोश्री आल्या.
"उठ."
मी उठून बसलो.
"जसा आहेस तसा जा. जाऊ दे ते पुरळ वगेरे.
आई. चेहरा सुजलाय माझा. पुरळ बघ.
"दिवस टाळू नकोस, नाहीतर पुन्हा खोटारडा असण्याचा डाग लागेल. पुन्हा त्यातच वेडा होशील.
मला माझा मुलगा आता परत हवाय. हे वचन पूर्ण करून. सरळ जसा आहे तसा टाक."
कसातरी उठलो...
...दादूस... इति भगिनी...
बोल...
तुझ्यासाठी ड्रेस आणलाय मी. पुण्याहून.
मी अंघोळ करून आलो...बर्फ दे...
मी लिटरली बर्फाच्या पाण्याने अंघोळ केली.
...आणि कसाबसा एक फोटो काढला...
स्टेटस ला टाकला...
थोड्याच वेळात जिमची मंडळी मला घ्यायला आली, न जुमानता घेऊन देखील गेली.
सो...
अज्ञातवासीचा प्रवास इथेच संपन्न झाला?
फोटो बघून ठरवा..

कुणीतरी मला म्हटलं होतं... खळी पडते रे... तर सुजलेल्या चेहऱ्यावर आणली कशीतरी...

भाग २ टाकतो उद्या...चला एका वचनाची गोष्ट तीस ऑक्टोबरच्या आत संपू दे.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. >> +१

वाचतोय
हॅप्पी बड्डे तुम्हाला.

Real life स्टोरी म्हणावी तर काही कळाले काही कळाले नाही.
व्यायाम करण्याचा निर्णय बेस्ट.
वेट ट्रेनिंग ऍड करा, जास्त फरक पडतो असे वाटतेय.
अर्थात तुम्ही इथे लिहिले नसेल तरी डॉ सल्ल्यानुसार करत असणार तुम्ही.
काळजीपोटी न मागता सल्ला दिलाय, मनाला नका लावून घेउ.

पुढचा भाग येउदे.

वाचतेय.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आणि हे सगळे खरे असेल तर काळजी घ्या.

वाढदिवसाच्या आणि सुदृढ आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा अज्ञातवासी ..!

फोटो बघून ठरवा.. >>>

फोटो कुठे आहे..?

मी काही कारणामुळे प्रचंड डिप्रेशनमध्ये होतो. खूप डिप्रेशन. जीवघेणं.
तेच ते. काहीतरी खूप सुंदर गमावल्याची वगेरे भावना... >>

विकल परिस्थितीशी झगडलात आणि त्यातून तावून - सुलाखून निघून यशस्वी सुद्धा होताहेत .. खरंच आनंदाची गोष्ट आहे . तुम्हांला तुमच्या आईची ही त्यात बहुमुल्य अशी साथ मिळाली .. भाग्यवान आहात खूप .. पुढे भविष्यातही तुम्हांला यश मिळत राहो..

मात्र एक लक्षात ठेवायचं खूप सुंदर गमावल्याची भावना पुन्हा मनाच्या उंबरठ्यावर येताच तिला उडवून लावायची .. कारण ह्या भल्या मोठ्या दुनियेत सुंदर कमावण्यासारखंही खूप काही आहे .. स्वतःलाच ठाम समजावायचं की, हे डिप्रेशन - बिप्रेशन मला आणि माझ्या आप्त- स्वकीयांना परवडणार नाहीये .. उठायचं आणि आपल्या कामाला लागायचं .. हे लिहायला सोपं असलं तरी अंमलात आणणं कठीण आहे.. तरीही अशक्य नाहीये .. (एक न मागता दिलेला सल्ला - )

वजन कमी करण्याचा तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

आठ वर्षापूर्वी मी सुद्धा दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर ३ महिन्यात जीम आणि डाएट करून १५ किलो वजन कमी केलं होतं .. .करोना पर्यंत वजन आटोक्यात होतं .. त्या काळात जीम बंद झाले आणि वजन हळूहळू वाढू लागलं ... आता अगदी खूप वाढलं नसलं तरी नको असलेली चरबी कमी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.. आठ वर्षापासून ( करोनाचा काळ सोडला तर ) जीम सुरू आहे .. पण जेमतेम एक तास वेळ मिळतो .. तुमचा प्रवास वाचून दिवाळीनंतर जोरदार सुरुवात करायला हवी ..!

कुणीतरी मला म्हटलं होतं... खळी पडते रे... तर सुजलेल्या चेहऱ्यावर आणली कशीतरी...>> हा .. हा.... हा ..!

माझ्या उजव्या गालावर पडते खळी .. पण गालावर थोडी चरबी वाढल्यामुळे ती जरा अस्पष्ट झालीयं .. तिच्यासाठी तरी वजन कमी करायला पाहिजे ..!

अर्धवट राहिलेल्या कथा पूर्ण करायला घ्या आता अज्ञातवासी ..!
एक ना धड भारंभार चिंध्या करून ठेवल्यात सगळ्या कथांच्या ..( रागावू नका... दिवे घ्या बरं ..)

वाचले..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लवकर बरे व्हा... कायमचे. डिप्रेशनचा त्रास जेवढा पेशंट ला होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त त्याच्या जवळच्या लोकांना होतो. म्हणून तरी बरे व्हा लवकर.

@diggi - धन्यवाद
@केशवकुल - धन्यवाद
@उपाशी बोका - धन्यवाद. भाग २ आला आहे.
@ झकासराव - सगळं अगदी अगदी खरं, जे घडलं ते लिहिलं.
वेट ट्रेनिंग, कार्डियो सगळं केलं.
@किल्ली - धन्यवाद
@नी.३ - धन्यवाद
@रुपाली - धन्यवाद. एक नवीन कथा चालू करतोय, आता नव्याने.
@ शर्मिला - धन्यवाद

वाचतेय.
वाढदिवसाच्या शुभेच्छा..... +१.