Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिमिक्स जमलंय पण मी अशी अर्धी
रिमिक्स जमलंय पण मी अशी अर्धी जीन घालून येणार नाही बरं>>>> मग तू अर्धी नववारी घाल / नेस
तुझी टेस्ला लावणी परत वाचायला हवी 
हार्ले वगैरे तुम्च्या आम्रविकेत.>>>>>> व्हय जी आमच्याकडं हाय हार्ले पण अस्मिताकडे जायचं म्हणजे टेस्लाच घेऊन यायला बरी
अस्मिताकडे जायचं म्हणजे
अस्मिताकडे जायचं म्हणजे टेस्लाच >>> आमाला तर विमानाला पर्याय नाय!

मग तू अर्धी नववारी >>> इश्श
(No subject)
आम्हाला अस्मिताकडे जाणं
आम्हाला अस्मिताकडे जाणं परवडणार नाही
मी पासपोर्टच काढला नाहीये अजून.
वर अनेक उल्लेख केलेले पिक्चर्स बघावेसेच वाटत नाही अपवाद वाळवी, तो बघायचा आहे.
"घरत गणपती" हा पिक्चर पाहिला
"घरत गणपती" हा पिक्चर पाहिला आता.
छान वाटला. फॅमिली ड्रामा, भावंडामधील वाद आणि गणपतीच्या बरेच गोष्टी रीलेट झाल्या. त्यात कोकणातील असल्याने जरा जास्तच. त्यामुळे शेवटी डोळ्यात पाणी सुद्धा आले.
कोकणचे काही सीन सुद्धा मस्त घेतले आहेत. हल्ली मराठी पिक्चरचे वाढलेले बजेट आणि सुधारलेले तंत्रज्ञान यामुळे कोकण छान दाखवले जाते हे बघून बरे वाटते.
मध्ये जरा बाईपण ट्रॅक पकडला होता, नशीब तिथे जास्त नाही घुसले. गेले काही काळात त्याचा ओवरडोस झाला आहे.
बाकी कलाकार सुद्धा चांगले आहेत. स्पेशली अजिंक्य देव आणि अश्विनी भावे बरेच दिवसांनी बघून बरे वाटले. नॉस्टॅल्जिक वाटले.
आणि हो, हिरोईन क्यूट वाटली. हिला कुठे पाहिले हे आठवतं होतो पण क्लिक होत नव्हते. पण एका सीनमध्ये अचानक ट्यूब पेटली, अरे ही तर कबीरसिंगवाली.. आणि एवढा वेळ मी मराठी पोरी आठवत होतो
सुरुवातीचे जे कोकणचे गाणे आहे ते इन्स्टा रिल मध्ये वायरल झाले आहे. ते यातले हे मला आज समजले. तसेच या पिक्चरचे नाव घरात गणपती नसून घरत गणपती आहे हे सुद्धा आजच समजले.
पिक्चर प्राईमवर आहे. चेक करा. या जोनरचे पिक्चर आवडत असतील तर बघा.
ऋन्मेऽऽष तुम्ही महागुरू आणि
ऋन्मेऽऽष तुम्ही महागुरू आणि स्वप्निल या दोघांचेही फॅन आहात तरी अजून नवरा माझा नवसाचा 2 बघितला नाही का ? कृपया रिव्ह्यू टाका
घरात गणपती नसून घरत गणपती आहे
घरात गणपती नसून घरत गणपती आहे हे सुद्धा आजच समजले>>
काय हे ऋन्मेष..
अजिंक्य देव आणि अश्विनी भावे बरेच दिवसांनी बघून बरे वाटले>> मला आवडतात दोघे ही.
नवरा माझा नवसाचा-२ पाहिला का
नवरा माझा नवसाचा-२ पाहिला का कोणी? कसा आहे? ऋन्मेश तू तरी बघितला असशील ना?
ट्रेलर धमाल वाटतोय. इथे काही येणार नाही, त्यामुळे आयपीटीव्ही शिवाय पर्याय नसेल.
भयंकर आहे असे लोक म्हणताहेत.
भयंकर आहे असे लोक म्हणताहेत.
नवरा माझा नवसाचा-२ पाहिला का
नवरा माझा नवसाचा-२ पाहिला का कोणी?
अशी चौकशी पोस्ट मीच काल टाकणार होतो पण राहिले..
संमिश्र प्रतिसाद येत आहे. काहींना मजा येत आहे तर काहींना ते विनोद जुन्या काळातील वाटत आहेत.
काही लोक उगाचच सचिन आणि स्वप्निल बघून तोंडसुख घ्यायला बघत आहेत.
पिक्चर बॉक्स ऑफिसवर जोरात चालू आहे हे छान.
चित्रपट सुद्धा तितकाच छान आहे का हे बघितल्यावरच समजेल.
गाणी बंडल आहेत असा सूर मात्र सरसकट सर्वांचा आहे.
सध्या गेले दोन तीन महिने आम्ही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणे थांबवले आहे. अन्यथा नेमका काय कसा हे बघायची इच्छा तर होतीच. कारण मनाची पाटी कोरी असलेल्या मुलीला आवडायची शक्यता होती.
काल तासभर 'बाई गं' बघितला.
काल तासभर 'बाई गं' बघितला.
स्वप्नील जोशी, सुकन्या कुलकर्णी , अदिती सारंगधर, सागर कारंडे, प्रार्थना बेहरे, दीप्ती देवी, नेहा खान अजून दोन बायका. समीर धर्माधिकारी चक्क देव आहे.
सगळा चित्रपट ओढूनताणून- 'चलो सबसिडाईज्ड लंडन' आहे. स्वजोची बाईल प्रार्थना सकाळी उठल्यापासून किरकिर करत असते. पण ते नॉर्मलच आहे म्हणा. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिला तो बाहेर नेणार असतो पण अडलेल्या प्रमोशनसाठी तो अचानक ठरलेल्या मिटींगसाठी थांबतो. तर ही तडक बॅग भरून घर सोडून निघून जाते. ह्या दुःखात लंडन ब्रीजवर सागर कारंडे सोबत दारू पितो. ह्या बायका अशाच वगैरे चर्चा होतात. 'बाई/ ह्या बायका' म्हटले की पुढे काय क्रींजोत्तम वाढून ठेवलंय या काळजीने माझे कान टवकारतात आणि हात फुरफुरतात. त्याच हाताने हे लिहितेय.
तर- अचानक समीर धर्माधिकारी दत्त म्हणून उभा ठाकतो. कोणता देव आहे कळाले नाही पण कोटी करता यावी म्हणून 'दत्त' लिहिले. तो म्हणतो, 'तू मागच्या अनेक जन्मी एक सूडघेऊ नवरा होतास म्हणून तुला बायकोचे सुख नाही. त्या पाच बायकांची इच्छा पुरी कर मग तुला विवाहसुख मिळेल'. दुसऱ्या दिवशी पहिली बाई येते. या बायका आपापल्या काळातून लंडनमध्ये प्रगट होतात. पोर्टल न वापरताच. सुकन्या कुलकर्णी काष्टा, पदर, कंबरपट्टा, जुने दागिने लेवून लंडनच्या रॅन्डम रस्त्यावर 'सांप्रत टाईप' भाषेत पोलिसाला भांडताना एकदम प्रगट होते. एकदा तर ती याच भाषेत रस्त्यावरच्या ब्रिटीश माणसाला माझ्या यजमानांच्या निवासस्थानी जावयाचे आहे म्हणते तर तो 'व्हेअर ईज युवर यॅजमॅन आणि व्हेअर ईज युवर निवॅसॅस्टॅन' विचारतो. त्याला कळले हो...
मग दुसरी शर्मिला टागोर वगैरे सत्तरीच्या नट्यांप्रमाणे कपडे घातलेली येते. आणि एक ऐंशीच्या आता नंतर धक्कादायक(?) काहीतरी म्हणून गोव्याची जेनी टाईप, एक करिअरिस्टिक अदिती सारंगधर आणि शेवटी शेजारणीचे पण याच्यावरच प्रेम निघते. सहा बायकांना समजून घेण्यासाठी 'बाई गं' तमाशा आहे. प्रत्येकीच्या इच्छा पुरी करता करता तारांबळ उडते.
पहिल्या गाण्यात तर एवढी बंडल कोरिओग्राफी आहे की 'तुम्ही जसे जमेल तसे हलवा, आम्ही त्यावरच गाणं वाजवू' वाटते. ब्रिटिश ललना स्वजोवरून जीव ओवाळून टाकत होत्या. फारच वाईट दिसत होता तो, त्यामुळे शिशुपाल आणि कृष्णाची गोष्ट आठवून मोजायला सुरुवात केली.
नंतर प्रत्येकीला घरी नेऊन लपवणे व एकमेकांबद्दल खोटे सांगणे, अचानक बायको परत येणे मग तिलाही गुंडाळणे, शिवाय गोड शेजारणीला गुंडाळणे त्यात सागर कारंडे या मित्राची मदत घेणे. एकही विनोद दर्जेदार नाही, कालबाह्य आहेत. मराठी चित्रपटातला विनोद चाळीस वर्षांपूर्वीच्या काळात अडकला आहे. ईवॉल्व होत नाहीये.
नेहा खान रिफ्रेशिंग वाटते पण तिचे काम लक्षात रहात नाही. तिचे पबमधे 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' (यात हातातले फूल हलवून प्रात्यक्षिक दाखवले आहे.) पुन्हा रिपिटावर 'मी मारते बाण बाण बाण, मग पुन्हा 'पान पान पान' असे काही तरी डिजे रिमिक्स गाणे आहे. 'पान, पान, पान' आले की 'चली आना तू पान की दुकानपे साडेतीन बजे' हे मंत्रघोषासारखे तोंडातून बाहेर पडले.
या सगळ्याजणी म्हणजे पाच एक्स आणि बायको योगायोगाने एकाच मॉलला जातात. तिथे यांच्या पासून लपून रहाण्यासाठी हा बाईचा वेश घालतो. आणि आता मी बायकांना जास्त चांगले समजून घेऊ शकेन म्हणतो. शिशुपाल अलर्ट.
शेवटी सागर कारंडे पण झगा घालून जॉईन होतो, मधेच एक गाणे आहे. सगळ्यांच्या इच्छापूर्ती करत करत या सात आठ बायका जे काही करतात ते असह्य झाल्याने मग बंद केला. शिशुपाल वध.
---सबसिडाईज्ड लंडन की जय
चला, मी सोडून अजून कुणीतरी
चला, मी सोडून अजून कुणीतरी पहिला बाई गं. अशक्य पीळ सिनेमा आहे. फक्त बायकांसारखा वेश करून बायकांना जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता येवू शकतं? हहपुवा...
गर्लझ (छबीदार छबी रिमिक्स वाला सिनेमा पण ह्याच कॅटेगरीमधला आहे)
भक्ती, हो का. 'बाई गं' सपोर्ट
गर्ल्स नाही बघितला , गाणे मात्र अनेकवेळा बघितले आहे.
पहिल्या गाण्यात तर एवढी बंडल
पहिल्या गाण्यात तर एवढी बंडल कोरिओग्राफी आहे की 'तुम्ही जसे जमेल तसे हलवा, आम्ही त्यावरच गाणं वाजवू' वाटते
पबमध्ये ‘गोरी गोरी पान’?
>>>>
कोण आहे गं कास्टिंग डिरेक्टर? समीर धर्माधिकारी देव आणि स्वप्निल जोशी हंक?
नक्की काय घेऊन कास्ट केलं?
आणि ब्रिटीश ललना स्वजोवर फिदा असतात? बरं.
नेहा खान माहिती नाही. या पिक्चरमध्ये बघायलाही जाणार नाही.
नका बघू रे असे छळवादी चित्रपट
नका बघू रे असे छळवादी चित्रपट.
ही बायकांचे ड्रेस घालून मॉलमध्ये जायची कल्पना गोलमाल रिटर्न्स मधली वाटते.
बिलकुल. गर्ल्स तर पाहू ही
बिलकुल. गर्ल्स तर पाहू ही नकोस. म्हणजे पिसं काढण्यासाठी म्हणून ही नाही. तो, तो बॉईज, त्यांच्या फ्रांचायझी, झिम्मा फुगडी आणि तत्सम सिनेमे टाईमपास म्हणून ही पाहू शकतं नाही..
कोण आहे गं कास्टिंग डिरेक्टर?
कोण आहे गं कास्टिंग डिरेक्टर? >>> ते त्याच देवाला माहीत.
नेहा खान 'शिकारी' मधे होती. पूर्ण वेळ क्लीवेज दाखवते, चावट मराठी सिनेमा होता तो. ट्रेलर बघितले होते.
गोलमाल रिटर्न्स मधे सीन असेल, काहीच ओरिजनल नाही यात.
आता काही दिवस बदल म्हणून सिनेमांची नावे 'पुरुषप्रधान' व्हावीत.
बाई गं - अरे अरे पुरुषा
नाच गं घुमा - गा रे घुम्या
बाईपण भारी देवा - पुरुषपण हलके घ्यावा
झिम्मा फुगडी - खोखो कबड्डी
आणि साडूसाहेब जोरात
आणि साडूसाहेब जोरात
पर्फेक्ट.
खतरनाक वर्णन आहे. बघायलाच
पुढे काय क्रींजोत्तम वाढून ठेवलंय >>>
'तुम्ही जसे जमेल तसे हलवा, आम्ही त्यावरच गाणं वाजवू' वाटते >>>
सबसिडाईज्ड लंडन >>>
'गोरी गोरी पान फुलासारखी छान' (यात हातातले फूल हलवून प्रात्यक्षिक दाखवले आहे.) >>>
पान पान पान बद्दल टोटली. तेच आठवले आधी.
ब्रिटिश ललना स्वजोवरून जीव ओवाळून टाकत होत्या >>> हे एक काय फॅड आहे कोणास ठाऊक. हिंदी पासून ते तेलुगू पर्यंत सर्वांना पिक्चरमधल्या हीरो वर परदेशी ललना फिदा आहेत हे दाखवायची काय खुमखुमी असते त्यांनाच माहीत. त्याही बहुतांश फक्त गोर्या
हे दाखवायची काय खुमखुमी असते
हे दाखवायची काय खुमखुमी असते त्यांनाच माहीत.
>>> मी महाराष्ट्रीयन असून मला बघवत नव्हता आणि गोऱ्या मुली फिदा. पिकतं तिथं विकत नाही.
हे एक काय फॅड आहे कोणास ठाऊक.
हे एक काय फॅड आहे कोणास ठाऊक. हिंदी पासून ते तेलुगू पर्यंत सर्वांना पिक्चरमधल्या हीरो वर परदेशी ललना फिदा आहेत हे दाखवायची काय खुमखुमी असते त्यांनाच माहीत. त्याही बहुतांश फक्त गोर्या>>> >
गोर्या रन्गाच अनादी अनत कालापासुन आकर्षण हेच एकमेव कारण..
ढेबर्या स्वप्निल कडे कधी आधीही बघवत नव्हत आता ५० शीला आलाय आणी फिटनेस आणी सगळ्याचीच बोन्ब आहे..
अस्मिता भारीच पेशन्स 'बाई गं'
अस्मिता भारीच पेशन्स 'बाई गं' तुझ्यात
मी ती प्रार्थना बेहेरे सकाळी सकाळी वँ वँ करत असते आणि नक्की कशावरून हेच कळलं नाही आणि तेच ते जगप्रसिद्ध तमाम मराठी सिनेमा सिरेलीतल्या खोटं खोटं ऑफिस ऑफिस खेळणं बघून जिथे रात्री १२ वाजेपर्यंत प्रेझेंटेशन मिटींगा चालतात वगैरे बघून बंद केला.
छे छे साडूसाहेब कोमात….
छे छे साडूसाहेब कोमात….
शिशुपाल
शिशुपाल
अस्मिता, खूप भारी लिहीलंय. थोडक्यात आटपलंय असं म्हटलं असतं. पण पिक्चरचाच जीव तेवढा असेल तर तू तरी काय करणार? 
यॅजमॅन आणि व्हेअर ईज युवर निवॅसॅस्टॅन
चली आना तू पान की दुकानपे
>>>
मला फक्त एकच गोष्ट कळली नाही. स्वजो काय प्रत्येक दशकात एक जन्म घेत असतो का? म्हणजे मग मरतो कधी आणि पुन्हा जन्म घेऊन लग्न करण्याइतका मोठा होतो कधी? का 'एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन' वाला अप्रोच आहे? हे काळकामवेगाचं गणित सोडवलंय का कोणी?

किंवा निदान आधीच्या जन्मात तो लखोबा लोखंडे असायला हवा
मी महाराष्ट्रीयन असून मला
मी महाराष्ट्रीयन असून मला बघवत नव्हता आणि गोऱ्या मुली फिदा >>>
जगप्रसिद्ध तमाम मराठी सिनेमा सिरेलीतल्या खोटं खोटं ऑफिस ऑफिस खेळणं >>>
हाच सर्वात धमाल भाग असतो अनेकदा.
अस्मिता - पिक्चर प्राइमवर की आयपीटीव्ही? प्राइमवर विकत घ्यावा लागतोय असे दिसते.
ट्रेलर पाहिला "ऑफिशियल". एक नाच अगदी तेलुगू स्टाइल आहे. रस्त्यावर हा डान्स स्टेप्स करतोय, आणि विगमुळे तेलुगूमधेही पन्नाशीचे लोक अगदी तरूण हिरॉइन्सबरोबर नाचतात तसेच वाटते, आणि त्याच फिदा वाल्या पोरी. नंतर एका खडकावर प्रार्थना व स्वजो उभे राहून हाताने दोन सर्कल्स करून दाखवत आहेत. वेषभूषा पाहताना एकूण कल्पना चांगली वाटली पण वरच्या वर्णनावरून फार्सिकल टाइप केलेले दिसते. नवरा कोणापासून तरी लपणे, एखादे अफेअर , स्त्रीवेष बहुतेक सगळे विनोदी समजले गेलेले चेकमार्क्स आहेत. बायकांच्या मनातले जाणून घ्यायला बायकांसारखे कपडे घालावे लागतात हा नवीन शोध आहे. मॉल के३जी मधलाच आहे का?
टॉवर ब्रिजच्या जवळ आणि वेस्टमिन्स्टरच्या जवळ दोन स्पॉट मधे "इथे काय नाचायचंय ते नाचा" सांगितल्यासारखे तेथेच बरेच सीन्स दिसतात त्या लंडन मूव्हीज चे. यारा दिलदारा मधल्या बागेतील कोपर्यासारखे.
यारा दिलदारा मधल्या बागेतील
यारा दिलदारा मधल्या बागेतील कोपर्यासारखे >>>
त्या बागेला तोड नाही!
फा, भारी वर्णन केलंय. बहुधा मी पाहिलं आहे हे. आता परत पाहण्याची इच्छा नाही
अस्मिता दंडवत स्वीकार.
अस्मिता
दंडवत स्वीकार.
अंजली,
अंजली,
हो, लक्षात आले होते. समरकॅम्प टाईप वाटले. कितीदा एकाच गोष्टीला नावे ठेवणार म्हणून लिहिले नाही.
जगप्रसिद्ध तमाम मराठी सिनेमा सिरेलीतल्या खोटं खोटं ऑफिस ऑफिस खेळणं >>
रमड,

हे अगदी चपखल लिहिलेयस.
पण पिक्चरचाच जीव तेवढा असेल तर तू तरी काय करणार? >>>> तो छोटासा जीवही शोधून शोधून घेतला आहे.
स्वजो काय प्रत्येक दशकात एक जन्म घेत असतो का?>>>> हो, आणि बायकांचा पुनर्जन्म का नाही झाला. त्या टेलिपोर्ट झाल्या.
निदान आधीच्या जन्मात तो लखोबा लोखंडे असायला हवा>>>>
फा,
. सुरवातीला लागोपाठ गाणी आणि नाचासारखे काहीतरी आहे. तेलुगू- मराठीपेक्षा काहीतरी करायचे म्हणून उरकल्यासारखे वाटतेय. काही कन्व्हिक्शनच नाही. रस्त्यावर मुद्दाम आहे कारण तो चालतचालत जाताना मुलींनी आख्खा 'लंडन ठुमकदा' करत येऊन 'फ्लाईन्ग किसेस' द्यावेत. तो घरात बसला असता तर एकेकीला आणून 'ड्राईव्ह थ्रू फिदा' करावे लागले असते.
मला पोटात ढळढळले ते किस बघून. दंडवत घालते पण विकत घेऊन बघू नका./\ 
अस्मिता - पिक्चर प्राइमवर की आयपीटीव्ही? प्राइमवर विकत घ्यावा लागतोय असे दिसते >>> आयपीटिव्ही. बघू नका हा संदेश पोचला नाही का काय
टॉवर ब्रिजच्या जवळ आणि वेस्टमिन्स्टरच्या जवळ दोन स्पॉट मधे "इथे काय नाचायचंय ते नाचा" सांगितल्यासारखे तेथेच बरेच सीन्स दिसतात त्या लंडन मूव्हीज चे. यारा दिलदारा मधल्या बागेतील कोपर्यासारखे.>>>>>
extra subsidised area ?
धन्यवाद अंजूताई.

धन्यवाद सर्वांना.
अस्मिता,
अस्मिता,
Pages