Submitted by Nilisha on 15 September, 2024 - 09:52
पायावरील त्वचा , घोट्याच्या वर सोरायसिस झाले आहे, खुप त्रास होतो,खाज सुटते, पुण्यातील डॉ please सुचवा व कोणती treatment घ्यावी?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कोणती ट्रिटमेंट घ्यावी हे
कोणती ट्रिटमेंट घ्यावी हे कोणी सांगू शकणार नाही. पण डॉक्टरची नावे सुचवता येतील.
टिळक रोडवर वडील आणि मुलगा डॉ केळकर प्रसिद्ध आहेत. आणि मला हर्पीस झाल्यावर डॉ अनिता वेगास कडून ट्रिटमेंट घेतली होती. ती अतिशय हुशार डॉक्टर होती. तुमचा एरिया सांगितला तर इथे बरेच लोक त्यांना माहित असलेले डॉक्टर सुचवतील.
वडगाव धायरी
वडगाव धायरी
डॉ ची नावे पुणेकर सांगतीलच
डॉ ची नावे पुणेकर सांगतीलच
पण अनुभवाचे चार पैसे डकवते - सुरुवात असेल तरी पुर्ण बरे व्हायला वेळ लागू शकतो. पण न कंटाळता ट्रिटमेंट पुर्ण करा.
बरेच होत नाही म्हणून निराश होऊन ट्रिटमेंट बंद करु नका
किंवा आता तर अलमोस्ट बरे झालेय आता काही गरज नाही असे म्हणून रिलॅक्स होऊन ट्रिटमेंट बंद करु नका
खरोखर गरज संपते औषधाची तेव्हा डॉ आपणहून सांगतात ट्रिटमेंट बंद करायला. डॉ चे ऐका
पथ्य सांगितली तर शक्य तितकी पाळा
आहार आणि व्यायाम दोन्हीकडे औषधाबरोबरच लक्ष द्या
हा संसर्गजन्य आजार नाही (मोस्ट केसेस मधे तरी) त्यामुळे लोकांचे भोचक प्रश्न आणि सल्ले याकडे दुर्लक्ष करा. हा आजार संपूर्ण बरा होतो (परत काही कालावधीने ट्रिगर होऊ शकतो पण तेव्हाही तो लवकर आटोक्यात आणणे शक्य होते) (वेळखाऊ आजार वाटला तरी तो आपलाच आहे आणि आपल्याला त्यावर मात करायची आहे. आपल्या त्वचेचा राग करु नका. मलाच का असाही विचार करु नका) बरे होण्यासाठी शुभेच्छा!
इतरेजन डॉ सुचवतीलच. पण २
इतरेजन डॉ सुचवतीलच. पण २ मैत्रिणींच्या अनुभवानुसार प्रचंड मानसिक तणाव, आयुष्यात कोंडी झालीय अशी भावना असेल तर त्वचाविकार विशेषतः सोरायसिस निर्माण होतात/बळावतात. एका मैत्रिणीने डॉ उपचारांसोबत मेडीटेशन सुरू केले. तिचा विकार आटोक्यात राहिला व परिस्थितीनिरूप निवळत नाहीसा झाला. तेव्हा मानसिक तणाव असेल तर डॉक्टरी उपचारांसोबत ताण कमी करण्यासाठी काही करता येते का पहा.
.
.
.
.
टिळक रोडवर वडील आणि मुलगा डॉ
टिळक रोडवर वडील आणि मुलगा डॉ केळकर प्रसिद्ध आहेत >>> वडील - श्रीकांत केळकर - गेले बहुधा काही वर्षांपूर्वी. मुलगा अमित केळकर. हिराबाग चौकात आहे दवाखाना.
डॉ अनघा दुधभाते
डॉ अनघा दुधभाते
020 - 25462491
सोरायसिस आहे कि एक्झिमा ते डॉ
सोरायसिस आहे कि एक्झिमा ते डॉ. कडून कन्फर्म करून घ्या. स्ट्रेस इंड्यूस्ड एक्झिमा असेल तर नुसता ओव्हर द काउंटर क्रीम ने बरा होतं नाही. स्टिरॉइड क्रीम ने थोडा फार अराम मिळतोय असा वाटत, पण पूर्ण बरा होतं नाही. बरा होतोय असा वाटणे आणि परत त्रास वाढणे असा याचा आंदोलनकाल असतो. स्ट्रेस कमी करणे हाच रामबाण उपाय आहे.
अलोपथीक उपचार खटाटोप असतात.
अलोपथीक उपचार खटाटोप असतात. उपचार औषधे घेऊनही गुण दिसत नाही तक्रार केल्यास आमच्याकडे औषध नाही हे कबूल करत नाहीत. आंबट, मैद्याचे पदार्थ खाऊ नका सांगत राहतात. स्ट्रेसमुळे होतं म्हणतात आणि हा विचार सगळ्यांना पटतो.
.
.
पण होमिओपॅथिक मलम ग्राफाईट( ओवर द काउंटर मिळते.) त्याने चुटकीसरशी उतार पडतो. स्कीन केअरची होमिओपॅथिक अठरा मलमे असतात. त्यापैकी हे एक आहे.
होमिओपॅथिक औषध :खीखी:
होमिओपॅथिक औषध
वाह वाह, किती मस्त. मुळात काही रोगच होऊ नये म्हणून होमिओपॅथीमध्ये काही उपाय नाहीये का?
करू नका.
करू नका.
एकदम बरोबर, होमिओपॅथिकसारख्या
एकदम बरोबर, होमिओपॅथीसारख्या भंपक प्रकाराचा प्रचार करू नका, मग भले तुम्ही ॲलोपॅथीक उपचार वापरा अथवा वापरू नका.
Homeopathy or homoeopathy is a pseudoscientific system of alternative medicine.
प्रचार करू नका म्हणता पण
प्रचार करू नका म्हणता पण सामान्य रुग्णाला शाखेशी देणं घेणं नसतं. रोग बरा झाला पाहिजे एवढीच अपेक्षा. ग्राफाइटीस मलम पूर्वी बेंकोमेंट कंपनी बनवत असे. त्यांनी बंद केले. SBL चे आणले तरी गुण येतो म्हणजे काही तथ्य आहे. कुठे दहा पंधरा हजार रुपये खर्च आणि कुठे साठ रुपये.
मी डॉक्टर नाही.
मी डॉक्टर नाही.
एका अगदी जवळच्या सोरायसिस झालेल्या मित्राशी बोलत होतो. माझ्या माहितीप्रमाणे त्याला ९-१० वर्षे हा त्रास होता. तो म्हणाला कामाच्या निमित्ताने त्याला २-३ महिने थायलंडमधे रहावे लागले. तिथे पोळ्या/रोटी मिळणे अवघड होते त्यामुळे त्याला फक्त भात खाऊन रहावे लागले. आणि सोरायसिस एकदम गेला. भारतात आल्यावर पुन्हा सुरुवात झाल्याने , त्याने अॅलर्जी टेस्ट केल्यावर त्याला गूल्टनची अॅलर्जी निघाली. आता तो ग्लूट्नवजा पदार्थ खातो आणि त्याचा सोरायसिस पूर्ण बरा झाला आहे. त्याला डायबेटीज वगैरे काही अडच्ण नसल्यामुळे ही पथ्थे पाळणे सोपे जाते.
पण ही एक शक्यता असते हे लक्षात घ्या आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ अनघा दुधभाते
डॉ अनघा दुधभाते
>>>>
मी पण यांच्याकडे एकदा ट्रिटमेंट घेतली आहे. चांगल्या आहेत पण वेटिंग फार असते. त्या कोणते तरी ॲपवरून appointment घ्यायला सांगतात. ते केल्यावर जास्तवेळ थांबायला लागत नाही.