Submitted by अनन्त्_यात्री on 17 July, 2024 - 12:49
आठवती ओले पायठसे
मृद्गंध भारली सांज
नभी मेघमृदंगा साथ करी
रिमझिमती पाऊसझांज
नभ तोलून धरल्या क्षितिजाला
झगमगत दुभंगे वीज
ढग पापण्यात दडण्याआधी
अनिमिष जागतसे नीज
सृजनाची हिरवी हाक जरी
भवतालातून दुमदुमते
ओथंबून येता नभ अवघे
अवचितसे दाटून येते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर ....
सुंदर ....
>>> ढग पापण्यात दडण्याआधी
>>> ढग पापण्यात दडण्याआधी
अनिमिष जागतसे नीज
हे अप्रतिम!
>>> सृजनाची हिरवी हाक जरी
भवतालातून दुमदुमते
ओथंबून येता नभ अवघे
अवचितसे दाटून येते
उत्कृष्ट!
=====
(र्हस्व, हृस्व दीर्घ इत्यादी टायपो ही ओघवती रचना वाचताना दुर्लक्षिणे सहज शक्य आहे. काही ठिकाणी शेवटच्या लघु अक्षराचा गुरू उच्चार करणे जरा विचलीत करते.)
=====
कवितेला आशयदृष्ट्या विशिष्ट दिशा नाही. कविता सुरू नक्की होत आहे पण संपत नाही. कविता अत्यंत सुंदर आहे. मात्र, 'सुंदर आहे, म्हणून कविता आहे' असे वाटू नये इकडे कल असायला हवा, असे काहीतरी वाटले.
मनीमोहोर , बेफिकिर धन्यवाद!
मनीमोहोर , बेफिकिर धन्यवाद!
सुर्रेखच....
सुर्रेखच....
धन्यवाद शशांक!
धन्यवाद शशांक!
एकदम मॉन्सून अनुभवल्यासारखं
एकदम मॉन्सून अनुभवल्यासारखं वाटलं. छान!
कविता सुरू नक्की होत आहे पण संपत नाही >>> +१
rmd धन्यवाद
rmd धन्यवाद