माझ्या निकटच्या नातेवाईकांना (ते IT मध्ये काम करतात) अमेरिकेमध्ये कामासाठी जाण्याची संधी मिळाली आहे. ती स्वीकारावी का नको याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी व मी चर्चा करून पुढील मुद्दे मांडले आहेत.
https://docs.google.com/document/d/e/2PACX-1vQlq6PhlKxGfYsWgdmnZpvCM6qdd...
यावर मायबोलीकरांचे मत जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः ज्यानी याच परिस्थितीत अमेरिकेला जाण्याचा किंवा न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये न आलेले मुद्देसुद्धा मांडावेत हि विनंती. आभार.
अजून काही माहिती -
अमेरिकेत जाण्याचे ठिकाण : Overland Park, Kansas
एक मूल, वय १.३ वर्षे
तर दोन मोठी माणसे आणि एक बेबी यांचा वरील ठिकाणी राहण्याचा खर्च काय येऊ शकेल?
UPDATE ---
या धाग्यातील चर्चेतून Pros आणि Cons यांची यादी पुनर्लेखित केली आहे. इतरांना उपयोगी पडेल अशी आशा करतो.
Pros (फायदे) :
१) पैसा - एकटे गेलात तर जास्त बचत होईल आणि कुटुंबासोबत कमी. पण कुटुंबासोबत जास्त समृद्ध आयुष्य जगता येईल.
२) नवीन अनुभव - नवीन लोक, ठिकाणे, अन्न, संस्कृती ई. चा अनुभव मिळेल.
३) करिअर - नवीन जबाबदारी, नवीन कामाची संस्कृती, नवीन लोकांबरोबर कामाचा अनुभव करिअर मध्ये उपयोगी पडेल. व्यक्तिमत्व विकासाला मदत होईल. नवीन टेक किंवा बिझनेस शिकायला मिळणे.
४) इंग्रजी - इंग्रजीत बोलायचा सराव होईल.
५) आयुष्याचा दर्जा - मोठी घरे, शुद्ध हवा, कमी गर्दीची व शिस्तबद्द वाहतूक, मुबलक resources, शिस्त आणि ह्या सगळ्यामुळे रोजच्या जीवनातल्या (९० टक्के ) कमी झालेल्या कटकटी.
६) शाळा - शिक्षणाचा दर्जा चांगला, पण शिक्षण महाग असू शकते, विशेषतः उच्च शिक्षण
७) अमेरिकेत भारतीय बऱ्याच संख्येने आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मिनी-भारता मध्ये राहिल्यासारखे आहे. सर्व भारतीय खाद्यपदार्थ, स्वयंपाकाचे जिन्नस, वस्तू विकत मिळतात.
Cons (तोटे) :
१) मोलकरीण किंवा नातेवाईक यांची स्वयंपाकात-घरकामात आणि मुलांना वाढविण्यात मदत मिळणार नाही. भारतासारखा साग्रसंगीत स्वयंपाक करायला मिळेल याची खात्री नाही. व्यायामाला वेळ मिळेल याची खात्री नाही. शनिवार व रविवार किराणा माल भरणे व घराची साफसफाई करणे यात निघून जातात.
२) बायकोला नोकरी सोडावी लागेल. त्यामुळे पैसे, अनुभव यांचे नुकसान. अमेरिकेत बायकोला वर्क-परमिट मिळायला बराच उशीर लागतो.
३) हवामान - उत्तर व मध्य अमेरिकेत हिवाळा कडक असतो. शून्य अंशाखाली तापमान जाऊ शकते. बर्फवृष्टी होऊ शकते. घरात हिटर असतो. उबदार कपडे घालून बाहेर जाता येते. मोठी बर्फवृष्टी झाल्यास बाहेर जाण्यावर मर्यादा येऊ शकतात. ढगाळ हवामान व हिवाळा यामुळे काही लोकांस उदास वाटू शकते.
४) वाहतूक - बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. स्वतःची कार घ्यावी लागते. स्टिअरिंग व्हील हे दुसऱ्या बाजूला असते, पण त्याची काही अडचण येत नाही. सरावाने जमून जाते.
५) दवाखाना - चांगले डॉक्टर्स आहेत पण अपॉइंटमेंट लवकर मिळत नाही. वैद्यकीय खर्च बराच येतो. ऑफिस कडून आरोग्यविमा असावा.
६) शाळेत जाणारे मूल असेल आणि त्याला इंग्रजी पुरेसे येत नसेल, तर जुळवून घेण्यास कदाचित अडचण येऊ शकेल.
७) अमेरिकेत मित्र कष्ट करून मिळवावे लागतात, (भारतात बालपणापासूनचे मित्र आपण मिळवलेले असतात)
८) अमेरिकेत सुद्धा महागाई वाढत आहे असे काही लोकांचे मत पडले.
तुम्ही कंपनीतर्फे येणार आहात
तुम्ही कंपनीतर्फे येणार आहात की इथल्या कंपनीत नोकरी मिळालेली आहे? विचारायचे कारण हे की बाळ मोठं झाल्यावरती परत गेलात तर त्या वेळी शाळकरी असल्यास, तुमच्या अपत्यास खूप अॅडजस्ट करावं लागेल.>>> सामो! खुप जण जातात मधेच..माझ्यामते तरी ४-५ वी पर्यत काही प्रॉब्लेम येत नाही...थोड शिक्षण पद्धतिचा फरक पडतो पण मुल फास्ट लर्नर असतात त्यामुळे होतात निट अॅडजस्ट...आमचे बरेच फ्रेण्डस मुल एलिमेटरी एजेस मधे असताना परत गेलेत काही प्रॉब्लेम आला नाही...७वी ८वी नतर अवघड होवु शकत.
देशात राहिलात काय किंवा
देशात राहिलात काय किंवा परदेशात दोन्ही कडे काही फायदे आणि काही तोटे आहेतच. अति विचार करू नका, स्वतःच्या मनाचे ऐका आणि पटकन निर्णय घेऊन टाका आणि जो घ्याल तो आनंदाने निभवा... जेवढा जास्त विचार कराल तेवढा निर्णय घेणे कठीण होईल. फारच गोंधळला असाल तर छापा की काटा करा (हलके घ्या )
धन्यवाद प्राजक्ता, मेक्स
धन्यवाद प्राजक्ता, मेक्स सेन्स.
फारच गोंधळला असाल तर छापा की
फारच गोंधळला असाल तर छापा की काटा करा
आणि मनाप्रमाणे छापा किंवा काटा आला नाही तर हवे तसे उत्तर येईपर्यन्त करत रहा.
माफ करा, पण ही यादी मुलाच्या
माफ करा, पण ही यादी मुलाच्या बापाने मुलाने जाऊ नये म्हणून केलेली आहे का? मिलेनिअल्सना हे प्रश्न पडतील असं वाटतं नाही. हे बूमर्स किंवा जेन एक्स चे प्रश्न असतील फारतर.
ती भली मोठी घरे मिलियन्स च्या
ती भली मोठी घरे मिलियन्स च्या दरात आहेत ओ! >>> Kansas मध्ये नाही. ३०० ते ४०० k मध्ये बऱ्यापैकी मोठं घर मिळून जाईल.
बे एरियात २ / ४ मिलियन म्हणजे
बे एरियात २ / ४ मिलियन म्हणजे डील झालं की!
बाकी एकूण अमेरिकेत घरे अजूनही स्वस्त आहेत आणि शिक्षण प्रचंड महाग. आमच्या इथे शिक्षण स्वस्त आहे. घरे इतकी वर्षे ठीक होती. कोव्हीड नंतर फार महाग झाली आहेत.
Kansas supreme court
Kansas supreme court reaffirms the right to abortion is protected by the he constitution. As per reddit. Strikes down two laws.
अमेरिकेत घर स्वस्त मिळतात
अमेरिकेत घर स्वस्त मिळतात याला कारण म्हणजे तिथले बेस्मेंटस्. त्या तळघरात अमानवीय शक्तींचा वास असतो. बेसमेंट म्हणजेच पाताळ लोक जिथे नैसर्गिकरित्या अमानवीय शक्ती वावरत असतात. पुरेसा सूर्यप्रकाश नसणं, हवा खेळती नसणे हे अमानवीय शक्तींसाठी पोषक वातावरण तयार करते.
तुमची जर शून्यातून सुरवात
तुमची जर शून्यातून सुरवात करण्याची तयारी असेल तर अवश्य या. काही मदत लागली तर मला फोन करा. आपण काही तरी करू.
पण अशी अपेक्षा असेल कि भारतात तुम्ही आयुष्यात जिथं आहात तिथून पुढे चालू करायचं,तर भारतातच जास्त सुखात राहाल.
तुमची जर शून्यातून सुरवात
तुमची जर शून्यातून सुरवात करण्याची तयारी असेल तर अवश्य या. काही मदत लागली तर मला फोन करा. आपण काही तरी करू.
पण अशी अपेक्षा असेल कि भारतात तुम्ही आयुष्यात जिथं आहात तिथून पुढे चालू करायचं,तर भारतातच जास्त सुखात राहाल.
बाकी अमेरिकेबद्दल बरेच समज
बाकी अमेरिकेबद्दल बरेच समज गैरसमज आहेत, आणि त्यातले काही खरे सुद्धा आहेत. अमेरिकेत मित्र कष्ट करून मिळवावे लागतात, (भारतात बालपणापासूनचे मित्र आपण मिळवलेले असतात)
अमेरिकेत घरकाम स्वतःच करावं लागतं.
पत्नीला (किंवा H4 व्हिसा वर येण्याला व्यक्तीला) नोकरी करण्यासाठी साधारण २-२.५ वर्ष थांबावं लागतं.
पण त्याबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यावसायिक संधी खूप असतात. संशोधन करण्याचा स्वभाव असेल तर उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. पण त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात.
आपण कुटुंबाला देत असलेला वेळ आणि आपले छंद जोपासण्यासाठी स्वतःवर खर्च करण्याचा वेळ यात प्रचंड वाढ होते.८-९ तासांच्या पलीकडे एक मिनिट सुद्धा काम करण्याची आवश्यकता नाही. कराराने कामावर जात नसाल तर बहुतेक वेळा काम ६-७ तासात संपत. कराराने काम करताना मात्र (contracting) तास भरावे लागतात.
थोडक्यात जितके कष्ट तितकं फळ हा नियम पूर्ण कसोशीन पाळला जातो. आणि सतत पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं. तेवढं केलं तर भरपूर संधी आहे.
वर मी बऱ्याच कॉमेंट बघितल्या
वर मी बऱ्याच कॉमेंट बघितल्या ८ तास कामाच्या..
पण इकडे पोस्ट कोविड/ हायब्रीड structure मध्ये कित्येक लोकाना (प्रॉडक्ट / स्टार्टअप / small/ big) बर्याच वेळा जास्तीच काम करायला लागत, wknds ना काम करतात.. lay offs नंतर इकडेही परिस्थिती बदलते आहे.
एखाद वर्षात पूर्ववत होईल ..
बे एरिया, न्यू जर्सी, डलास
बे एरिया, न्यू जर्सी, डलास वगैरे सारख्या भागात राहणाऱ्यांना जे साधे प्रॉब्लेम वाटतात ते इतर लहान भागात रहाणाऱ्यांसाठी फार मोठे प्रॉब्लेम असू शकतात तेंव्हा अमेरिकेत रहायचं का नाही आणि इथे रहाणं चांगलं का वाईट ते प्रत्येक जण स्वतःच्या अनुभवानुसार ठरवू शकतो. शिवाय अनेक वर्ष सेटल झालेल्या लोकांना आता नव्याने येणाऱ्यांचे प्रश्न हास्यास्पद वाटू शकतात पण ते तसे नसतात. किंवा इथे बऱ्याच काळापासून राहिलेल्या लोकांची एक लाईफ स्टाईल सेट झालेली असते जी भारतात अनेक वर्ष राहिलेल्यांना आत्मसात करायला फार त्रास होतो. अमेरिकेत भारतात गेलेल्या लोकांना तिथे सेटल होईल वेळ लागेल ना? तसंच!
त्यामुळे येणाऱ्याने आपल्याला इथे का यायचं आहे त्याचा विचार करावा. परदेशात जाण्याची जनरली खालील काही कारणे असतात-
१. पैसे कमावणे
२. लाईफ स्टाईल
३. घरच्या कटकटीचा वैताग (सास बहु वगैरे) (हो हे ही असतं. पटो वा ना पटो)
४. बेटर करिअर ऑप्शन, कामाच्या वेळा वगैरे.
तर पैसे कमावणे - मुळात भारतात काय किंवा अमेरिकेत काय तुम्हाला एक नॉर्मल उच्च मध्यमवर्गीय आयुष्य जगायचं असेल तर नवरा बायको दोघांच्या नोकऱ्या हव्यात. अगदी हेवी पगाराच्या नसल्या तरी एकाच्या पगारात घर फक्त भागलं जातं, सेव्हिंग आणि भविष्याची तरतूद होत नाही. म्हणजे मग पैसे हा फायद्याचा मुद्दा तसा बाद झाला.
तुम्ही भारतीय कंपनी मधून अमेरिकेत येत असाल तर तुम्हाला फार चणे फुटाण्याएवढा पगार असतो (स्वानुभव). जे मिनिमम वेज असतं तेच मिळत. इथे येऊन स्विच करायचं तर पुन्हा भारतात जाण्याची इच्छा असेल तर तिकडे जाऊन नव्याने जॉब शोधा वगैरे धावपळ आहे. इथेच सेटल होणार असाल तर त्याला बरेच वर्ष लागतील. त्यासाठीचे पेशन्स ठेवण्याची तयारी आहे का याचा विचार करा. कितीही कोणीही छातीठोक पणे सांगितलं की भरपूर पगार असतो तरी जे लोकं भारतातून एच १ वर नॉन मॅनेजर पदावर आले आहेत त्यांच्याकडे चौकशी करा. ते काय ते सांगतील. मी आईला नेहमी उदाहरण देते की इथे मी १० डॉलरची वस्तू खरेदी करताना किती वेळा विचार करते बघ. तेच भारतात ८४० रुपयाची वस्तू चटकन घेऊन टाकली असती. कारण इथे मला महिन्याला ४५०० डॉलर मिळतात पैकी २००० माझा रेंट जातो आणि इतर खर्च भागवता हातात महिन्याचे खर्चायला ५०० डॉलर उरतात, त्यातून १० डॉलर
विचार न करता घालवणे मोठीच गोष्ट आहे. तेच भारतात मला किमान पगार १ लाख असेल तर रेंट देऊन हातात खर्चायला किमान ३०-४० हजार उरतायेत. त्यात ८४० गेले तर ह्या त्यात काय एवढं वाटतं (या फिगर्स जस्ट उदाहरण आहेत) .
२. लाइफस्टाइल - इथली लाईफास्टाइल चांगली का वाईट यावर मोठी डिबेट होऊ शकते. इथे जे जे वॉव कॅटेगरीमधलं वाटतं ते सगळं आता पुणे, मुंबई, बंगलोर सारख्या भागात पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर मिळू शकतं. या उलट घरात सगळ्या कामांसाठी मेड आहेत, तुम्हाला मी टाईम, फॅमेली टाईम सेक्रिफाय करायला लागत नाही. अमेरिकेत वर्षानुवर्ष रहाणाऱ्यांसाठी मेड नसणे बेटर आयुष्य वाटू शकतं पण ज्यांना मदतनीस व्यक्तीची सवय आहे त्यांना इथे खूप जड जातं. अशक्य आहे हे मी म्हणत नाहीये, अवघड आहे म्हणते आहे. फिरायला तुम्ही बरेच वर्ष उठ सुठ निघून जाऊ शकत नाही कारण खर्च फार असतो. दर विकेंडला फिरायला गेलो हे एकत्याच्या पगारावर करणं शक्य नाही. भारतात आपल्याला याची सवय असते. शिवाय भारतात अगदी खर्च केला नाहीत तरी वीकेंडला मित्रांकडे, नातेवाईकांकडे जाता येतं. इथे ते ही नाही. सोमवार ते शुक्रवार नोकरी, शनिवारी ग्रॉसरी शॉपिंग, रविवारी साफ सफाई, पुढच्या आठवड्याची तयारी इत्यादी इत्यादी मधे निघून जातात. भारतात उठून मनाला येईल तेंव्हा जाऊ शकणार नाही सतत कारण संपूर्ण कुटुंबाचं तिकीट परवडण्यासारखं नसतं.
३. घरची कटकट - हे माझ्यासाठी फार valid कारण आहे कारण मानसिक शांतता महत्त्वाची. या वर माझ्याकडे लिहिण्यासारखं नाही काही.
४.भारतीय कंपनी मधून अमेरिकेत आलेल्यांना भारतात असतं त्यापेक्षा जास्त काम पडत आणि कामाचे तास भरपूर असतात. इथेही नोकऱ्यांचे भरपूर प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे जॉब सिक्युरिटी वगैरे विसरून जा. भारतात बेकार झालात तर वडापाव ची गाडी टाकून जागू शकता. इथे बेकार झालात तर भारतात परत जाऊन वडापाव ची गाडी टाकावे लागेल आणि त्यासाठी स्ट्रगल नक्कीच जास्त आहे. मुद्दा - वर्क विसा ची दर वर्षीची कटकट आणि डोक्यावर एक्सटेंशन, प्रॉजेक्ट एक्सपांशन वगैरेची टांगती तलवार असते. देशात काही करुन जगू शकता इथे बंधन आहेत.
आता एका पार्टनरचा जॉब नसणे ही त्या पार्टनर साठी मन:शांती नष्ट करणारी गोष्ट असू शकते. मी १२ वर्ष नोकरी केल्यानंतर २ वर्ष घरी बसले आहे . मी खूप ठामपणे सांगू शकते की याचा लाँग टर्म मधे स्वतःवर, कुटुंबावर, नवरा बायकोच्या नात्यावर खूप गहिरा परिणाम होतो. वर्क परमीट यायला बराच काळ लागतो. काही कंपन्या (विप्रो उदा) एच वन वर साडे पाच वर्ष पूर्ण झाल्याशिवाय ग्रीन कार्ड अप्लाय करायला तयार नसते मग अशा वेळेला ते साडे पाच वर्ष+ २ वर्ष असे ७ वर्ष त्या व्यक्तीचं करिअर खराब होतं. आपण काही करूया म्हणून शिकायला एमएस , पी एच डी सारखे पर्याय शोधावे लागतात जे खर्चिक असतात.
अमेरिकन हेल्थ केअर तर जोकच आहे. त्याबद्दल मी काही लिहू इच्छित नाही तेंव्हा आजारपणाचा खूप त्रास होतो. लहान मोठे आजार झाले तर ठीक पण मोठं काही झालं तर मग देव भरोसेच! असो!
मग असं असताना इथे यावं का नाही? त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही तुम्हाला का यायचं आहे ते आधी शोधा. जर नवीन अनुभव म्हणून, जग एक्सप्लोर करायला यायचं असेल तर थोड्या रिस्कची तयारी ठेवून या. अगदीच जमलं नाही तर परत जाता येईल हा ऑप्शन ओपन ठेवून या पण मला थोडेच वर्ष येऊन ट्राय करुन बघायचं आहे असं असेल तर नुकसान होणार आहे हे डोक्यात ठेवून या. तिथे बना बसाया सेट अप सोडून तुम्ही येणार आहात तेंव्हा बराच स्ट्रगल असणार आहे, संपूर्ण कुटुंबाला याची जाणीव आणि तयारी असू द्या. शेवटी कम्फर्ट झोन सोडून आपण येतोय, आपल्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा वेगळं काही तरी करायला जातो आहे तेंव्हा सगळं फुलोंकी चादर Type नसणार आहे याची जाणीव ठेवून या. एकदा सगळे अडथळे लक्षात घेतले आणि accept केले की इथे रहायला अवघड वाटणार नाही.
जाता जाता - बॅचलर लोकांनी अजिबात अति विचार न करता इथे यावं, भरपूर फिरावं, शेअरिंग मधे रहावं, करिअर सेट करुन घ्यावं. फॅमेलीने एकाच्या नोकरीवर सगळं घरदार उचलून आजीबाबत येऊ नये. दोघांना नोकऱ्या असतील तर किंवा तुम्ही मोठ्या पदावर, पगारावर येत असाल तर जरा तरी वर्थ आहे पण मिनिमम वेजेस वर कंपनी पाठवत असेल आणि दुसरा पार्टनर नोकरी करू शकणार नसेल तर इथे येण्यात काही अर्थ नाही. भारतातलं आयुष्य बेटर आहे.
एच १ कन्सल्टिंग कंपन्या
एच १ कन्सल्टिंग कंपन्या मिनिमम वेजेस पे करतात ? सॉफ्टवेअर / टेक्नॉलॉजी च्या जॉब्स ना ?
रिया, मिनिमम वेज १२/ १५/ १७
रिया, मिनिमम वेज १२/ १५/ १७ डॉलर तासाला असेल स्टेट प्रमाणे.
एच वन मिनिमम ब्रॅकेट वेज देत असतील. ते ही कमीच असेल पण त्याला मिनिमम वेज नाही म्हणत. बेकरीत मला वाटतं ११० -१२०के होतं का काय... त्यात फॅमिली ऑफ फोर ला जगणे मुश्कील आहे यात वाद नाहीच. पण ते मिनिमम वेज च्या चौपट झालं.
मैत्रेयी, मी भारतातून
मैत्रेयी, मी भारतातून अमेरिकेत नोकरी निमित्त आलेल्या लोकांबद्दल बोलते आहे. हे कसं सांगू? म्हणजे आपण म्हणतो ना ऑन्साईट ला गेला कोणी तरी तेंव्हा त्याची सॅलरी. हे कन्सल्टन्सी वाले किंव्हा फुल टाईम एम्प्लॉई नाहित अमेरिकन कंपन्यांचे. वेंडर्स बेसिकली.
अमित बरोबर. झोपेत शब्द चुकला. मिनिमम ब्रॅकेट वेजेस च म्हणायचं आहे मला. सॉरी. आता एडिट नाही करता येतेय.
मला स्वतःला जी सॅलरी होती ती इतर दोन प्रकारातल्या लोकांपुढे (फूल टाईम आणि कन्सल्टंसी वाले) खरंच इतकूशी होती. शिवाय त्याचा आणखी एक तोटा म्हणजे जेंव्हा मी भारतात परत गेले तेंव्हा माझी भारतातली सॅलरी पण वाढली नव्हती. त्यामुळे स्विच करुन पण भारतात भरपूर पॅकेज मिळालं नाही. आत्ता सुद्धा मी १२ वर्ष अनुभवाच्या मानाने सॅलरी पॅकेज खूपच कमी घेत होते कारण ते जे ३०% ५०% हाइक देत होते त्यासाठी माझं बेसिक पॅकेजच एकदम कमी होतं.
म्हणून मी म्हणाले की अमेरिकेत यायचं तर इथेच सेटल होईचं आहे म्हणून येणार असाल तर हवं तसं स्वप्नातलं आयुष्य जगायला वेळ लागणार. भारतात परत जाण्याच्या इराद्याने येणार असाल तर सगळी तिकडे नीट बसलेली घडी बिघडणार आहे आणि बरेच गॅप्स निर्माण होणार आहेत परत जाल तेंव्हा. तर त्या स्ट्रगल साठी माईंड रेडी असू देत.
मला स्वतःला भारतात भरपूर पैसे कमवत राहून वेगळे वेगळे देश सुट्यांमध्ये फिरत राहण्याचा पर्याय जास्त सोईस्कर वाटतो.
(हे सगळं लिहिताना मी भारतात नवरा बायकोची मिळून लाखापेक्षा जास्त रुपये दर महिना घरात येतात आणि अमेरिकेत मॅनेजर/ व्हीपी वगैरे पदावर येणार नाही आहात असं अज्युम करते आहे. तसं नसेल तर माझे पॉईंट्स बहुतेक इनव्हॅलिड होतील कारण इन एनी केस मग तुलनेने पैसे अमेरिकेतच जास्त मिळतील)
माझ्या पोस्ट मधे पैसा हा मुद्दा अधोरेखित होतो आहे सतत कारण नोकरी आपण पैसे कमावण्यासाठीच करतो आणि आपल्या निर्णयांनी त्याचीच घडी तुटली तर वाट लागते.
कोणत्याही कंपनीत पहिले चार
कोणत्याही कंपनीत पहिले चार पाच महिने नवीन असतो तेव्हा मजा येते. आपण नवीन असतो त्यामुळे जास्त जबाबदारी नसते आणि पगार पण फुल मिळतो. एकदा पाच सहा महिने झाले की आपण दोनच कारणांमुळे जॉब करतो पहिलं म्हणजे दुसरा जॉब मिळत नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःहून जॉब सोडला तर घरचे बडबडतील.
अरे! आत्ता शान्तपणे प्रतिसाद
अरे! आत्ता शान्तपणे प्रतिसाद वाचते आहे तर लक्शात आलं की माझ्या प्रतिसादाची गरज नव्हती. अनुने, फा ने आणि इतर अनेकांनी मला जे म्हणायचं आहे ते सगळं कव्हर केलं आहे.
माझा या धाग्याशी काही संबंध
माझा या धाग्याशी काही संबंध नाही, त्यामुळे हा प्रतिसाद अवांतर म्हणून दुर्लक्ष करा किंवा उडवलात तरी चालेल.
काही प्रतिसाद वाचताना न राहवून पुलंच्या मुंबईकर मधलं "अवश्य यावे, फक्त येताना कॉलरा इन्फ्ल्युएन्झा इंजेक्शनं घेऊन यावे. गेल्या महिन्यात २-४ मृत्यू झाले, पण त्याचे विशेष नाही. काविळीची साथ पुन्हा चालू झाली आहे, तरी अवश्य यावे.... चिरंजीव बाळकुशास आशीर्वाद" हे आठवलं.
(No subject)
हपा
हपा
एम आय टी चा लिविंग वेज कॅलक्युलेटर या संस्थळावर राज्य, राज्यातील काउंटी - मेट्रो एरीआ वगैरे माहिती भरुन त्या त्या भागात जगायला आवश्यक पगार याबद्दल माहिती मिळते. त्यावरुन आर्थिक दृष्ट्या झेपेल का नाही याचा साधारण अंदाज बांधता येइल.
शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती! प्रत्येकाचा पिंड वेगळा, प्राधान्याचे मुद्दे वेगळे! जो काही निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी योग्य ठरावा ही शुभेच्छा!
>>वर्क परमीट यायला बराच काळ
>>वर्क परमीट यायला बराच काळ लागतो. काही कंपन्या (विप्रो उदा) एच वन वर साडे पाच वर्ष पूर्ण झाल्याशिवाय ग्रीन कार्ड अप्लाय करायला तयार नसते मग अशा वेळेला ते साडे पाच वर्ष+ २ वर्ष असे ७ वर्ष त्या व्यक्तीचं करिअर खराब होतं. आपण काही करूया म्हणून शिकायला एमएस , पी एच डी सारखे पर्याय शोधावे लागतात जे खर्चिक असतात.
सहमत.
अमेरिकेत येण्यासंदर्भात माझ्यादृष्टीने सर्वात त्रासदायक मुद्दा म्हणजे ग्रीनकार्ड व्हायला लागणारा कालावधी. हा सध्या कमीतकमी २० वर्षे आहे असे ऐकून आहे. तोपर्यंत एचवन रिन्यू करत राहणे हाच पर्याय उरतो जो काहींसाठी स्ट्रेसफुल असूच शकतो. शिवाय या दरम्यान लेऑफ झाल्यास, नवीन जॉब मिळवून एचवन दुसरीकडे ट्रान्सफर करण्यास केवळ ६० दिवसांचा कालावधी असतो, हे अजून एक. एलवनच्या बाबतीत बहुतेक परतच जावे लागते कारण एलवन वर एम्प्लॉयर हॉपिंग करता येत नाही (माझ्या माहितीनुसार).
तरीही इथे येउच नये असे माझे अजिबात मत नाही. एचवन-ग्रीनकार्ड स्ट्रेस नको असणारे कॅनडा/युरोप/इतर देश यांचा पर्याय घेतात हेही पाहिले आहे. उदा. एकीकडे कॅनेडीयन पीआर साठी एकीकडे प्रयत्न करणे किंवा कंपनी तयार असल्यास कॅनडा/युरोपला ट्रान्सफर करुन घेणे इ. कॅनडाचे पीआर --> सिटिजनशिप झाल्यावर अमेरिकेत टीएन विसावर येऊन काम करणे. (माझ्या सध्याच्या कंपनीत असे भारतीय आहेत + एका कन्सल्टींग फर्मच्या कॅनडा ब्रँचच्या भारतीय लोकांची मोठी टिम कॅनडातूनच आमच्या कंपनीसाठी काम करते). काहीजण तिथेच रमतात, अमेरिकेत परतायची आवश्यकता वाटत नाही. किंवा तिकडच्या अनुभवावर बेस्ड असा एलवन विसा घेऊन अमेरिकेत परत येतात. सांगायचा मुद्दा हा की पर्याय कसे कुठे उभे राहू शकतात हे सांगता येत नाही. अर्थात हेही स्कीलसेट, कुठली कन्सल्टसी किंवा एंड क्लायंट यावर अवलंबून आहे पण अगदीच अशक्य नाही.
>>शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती! प्रत्येकाचा पिंड वेगळा, प्राधान्याचे मुद्दे वेगळे!
हे स्वातीताईने लिहिलेले सोळा आणे सत्य आहे. अमेरिकाच असं नाही एकंदरीत कुठेही भारताबाहेर संधी मिळत असली तर ती सोडू नये हे माझं ठाम मत आहे. त्यामुळे मिळणारे बरे-वाईट अनुभव आणि संधी, हे सगळेच डॉलरमध्ये मोजता येऊ शकत नाहीत. त्यांचे महत्त्व वेगळेच आहे.
मोलकरीण किंवा नातेवाईक यांची
>मोलकरीण किंवा नातेवाईक यांची स्वयंपाकात-घरकामात आणि मुलांना वाढविण्यात मदत मिळणार नाही. भारतासारखा साग्रसंगीत स्वयंपाक करायला मिळेल याची खात्री नाही. व्यायामाला वेळ मिळेल याची खात्री नाही. शनिवार व रविवार किराणा माल भरणे व घराची साफसफाई करणे यात निघून जातात.
अगदीच लहान मूल नसेल तर मोलकरीण नसणे हा प्रॉब्लेम नाही. घरोघरी वॉशिंग मशीन्स व डिश वॉशर्स असतातच. सर्वजण आपापली कामे घरीच करतात. साग्रसंगीत म्हणजे नक्की काय? आजकाल भारतात तरी रोजच्या जेवणात कोशींबीर, पापड, कुरडया, लोणचे, ई ई असते का? हा सवयीचा भाग आहे, अजिबात प्रॉब्लेम नाही. इथे इंग्रो मध्ये तयार पोळ्या मिळतात, रोज एक भाजी व आमटी करण्याइतका वेळ नक्कीच असतो. हळू हळू वन डिश मील ची वगैरे सवय होतेच. व्यायामाला वेळ मिळेल याची खात्री नाही हेही खरे नाही. नक्की वेळ मिळतो.
इथे येणार्या लोकांना मिळणार्या पैशाची रेंज मोठी आहे. त्यामुळे नक्की किती पैसे मिळणार आणी त्यात सर्व खर्च भागतील का हा विचार महत्वाचा आहे.
अजून तुमच्या मुद्द्यातल्या
अजून तुमच्या मुद्द्यातल्या अजून एक मुद्द्यावर लिहायच राहील. अबाऊट bragging तर ते both ways करता येईल तुम्हाला. जर आलात तर इकडे आलात, survive केलंत, अनुभव घेतलात असं ब्रॅग करता येईल आणि नाही आलात तर संधी होती पण असून पण मी नाही घेतली, असं पण ब्रॅग करता येईल आणि अजिबात उपरोधाने म्हणत नाहीये माझ्या पाहण्यात खूप जण आहेंत जी संधी असून येत नाहीत. त्यांची कारण काहीही असो, आणि सिटीझन, GC असून परत गेलेली पण आहेंत ओळखीत. आणि मजेत आहेंत एकदम तिकडं without फोमो.
खरंय बिल्वा. मी पण रोज स्वप्न
खरंय बिल्वा. मी पण रोज स्वप्न बघते परतुनी पाहेची

मी परत गेले की ब्रॅग करणारच आहे
मी खूप वेळा ये जा केली आहे.
हो रिया,मी खूप वेळा ये जा केली आहे. दर वेळी नशीब भिंगरी लावत पायाला आणि मी परत इकडं land होते.फिर ले आया दिल मजबूर क्या किजिये

पण यावेळी जेव्हा परत परत जाईन तेव्हा मी पण ब्रॅग करणार की सारखं सारखं पाठवलं तरी मी परत येते चं परंतुनीं माहेरा
एकंदरीत तुमची बॅलन्स शीट
एकंदरीत तुमची बॅलन्स शीट वाचून असे वाटते की तुमच्या अथवा पत्नीच्या मनात खूपच किंतु-परंतु आहेत. फक्त अमेरिका आहे म्हणून कंफर्ट झोन च्या बाहेर पडायचे का असा एक प्रश्न डोक्यात आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही नाही म्हणालात तर दुसरा कोणीतरी जाईल आणि ५-१० वर्षानंतर तुम्हाला निर्णय चुकला याची हळहळ वाटेल कारण तोवर तुमच्या जागी गेलेला त्याच नोकरीमध्ये टिकला असेल तर तुमचा बॉस बनेल.
तुमच्या गैरसोयीचे मुद्दे असे आहेत की ज्याला पर्याय आहेत, काही ठिकाणी टेकनॉलॉजि वापरावी लागेल, पैसे अथवा तुमचे आपापसातील सहकार्य. अमेरिकेत बरेचदा आठवड्याच्या शेवटी भेटीगाठी होत असतात आणि घरातील सगळी व्यवधाने सांभाळून सगळेच करत असतात.
तुमचे नंतरचे प्रतिसाद वाचले, अजुनही तुम्ही दुविधेत आहात. आधी एकटे जाऊन ६ महिन्यांनी बायको आणि मुलाला बोलावून घेणे. मारा उडी आणि पडा इथल्या आश्वासक परिघाबाहेर.
काही गोष्टी स्वानुभवातून.
काही गोष्टी स्वानुभवातून.
१. फॅमिली असेल तर एकटं येन टाळा किंवा ३-४ महिन्यात फॅमिली घेऊन या. कारण लवकरच तुम्ही होमसिक होणार आणि परत जायचा विचार करणार.
२. कंपनी बरोबर बोलून GC चा निर्णय कधी आणि कसा असणार यावर ई-मेल घ्या. (व्हर्बल कंमिन्टमेन्ट नको)
३. कमीतकमी १०-१२ वर्ष राहणार असाल तरच यायचा निर्णय घ्या.
४. इथे फॅमिली आणि गाडी असली तर संपूर्ण आयुष्य सुरळीत असत काही प्रॉब्लेम नसतो.
५. केवळ पैसे वाचवायचे आहेत म्हणून येऊ नका. निसर्ग , आयुष्य आणि नवीन गोष्टीचा आस्वाद घ्यायला या.
६. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व गोष्टी आहेत , त्यामुळे त्याचा जास्त विचार करू नका.
बाकी भारतात असणारे तुमचे सगेसोयरे / प्रॉपर्टी , त्यांची जबाबदारी , तुमची कर्तव्य हे केवळ तुम्हीच जास्त/ योग्य समजू शकता. त्यावर विचार करा किंवा योग्य सल्ल्ला घ्या.
काही कारणास्तव परत जावे लागले किंवा येणे नाही झाले तर उगाच दोन देशांची तुलना करू नक, जगणे अवघड होईल.
लेख लिहिणारी व्यक्ती आणि
लेख लिहिणारी व्यक्ती आणि ज्यांना अमेरिकेला जायचं आहे/नाही ती व्यक्ती एकच आहे ("asking for a friend "). किंवा त्यांनी चर्चा करून लेख लिहिला असल्यामुळे त्या दोघांचीही माहिती, मते इत्यादि सारखे आहेत असे गृहीत धरून प्रतिसाद देत आहे. इतरांनी खूप चांगली माहिती दिली आहे. पण मी ह्या व्यक्तीला केंद्रस्थानी धरून त्या दृष्टीकोनातून analysis करण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्यामागे हिणवण्याचा हेतू अजिबात नसून सद्भावनाच आहे हे सांगू इच्छितो.
अमेरिकेला जाऊन इंग्रजी बोलण्याचा सराव होईल हा जर प्लस पॉईंट असण्याची परिस्थिती असेल तर ही व्यक्ती IT करिअरच्या शर्यतीत frontrunner होण्याची शक्यता कमी आहे. तसे असावे की नसावे हा मुद्दा अलाहिदा, पण भारतातच राहूनसुद्धा ITइंडस्ट्रीत करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी साठी इंग्रजी कॉन्फिडन्टली आणि व्यवस्थित बोलता येणे महत्त्वाचे आहे.
२०२४ साली IT इंडस्ट्रीतल्या व्यक्तीला अमेरिकेची इतकी कमी/चुकीची माहिती असणे आणि विमान प्रवासाबाबत बेसिक शंका असणे असे दर्शविते की exposure खूप कमी आहे. हे अनेक कारणांमुळे होऊ शकतं. exposure असणाऱ्या लोकांच्या वर्तुळात आपण समाविष्ट नसणे (कदाचित इंग्रजी बोलण्यात सफाईदार नसल्यामुळं) , खेडेगाव, लहान शहरांची पार्श्वभूमी असणे इत्यादि.
तिसरी गोष्ट मला अशी दिसते की ही व्यक्ती खूप protected वातावरणात राहिलेली आहे. थोडाफारही बदल म्हणजे बाऊ करण्यासारखी गोष्ट वाटते. अगदी एकही छोटासाही con सुटू नये असा अटीट्युड काही वेळा फायदेशीर ठरतो. कॉर्पोरेट जगात जुनिअर लेव्हलच्या कामांसाठी हा चांगला गुण आहे. पण dealing with uncertainty हेही महत्त्वाचे आहे. साध्या प्रोजेक्ट मॅनेजरला सुद्धा प्रोजेक्टची १००% माहिती नसताना निर्णय घ्यावे लागतात आणि नंतर ते निभावून न्यावे लागतात. Uncertainty ला सामोरे गेला नाहीत तर करिअर मध्ये पुढे जाणे कठिण आहे.
तर मला असं वाटतं की ही व्यक्ती exposure ह्या बाबतीत मुंबई-पुण्यातल्या average IT engineer पेक्षा मागे आहे. कदाचित इंग्रजीमुळे, कदाचित uncertainty टाळण्याच्या, risk averse अटीट्युडमुळे. ह्यात कुणाला दोष देण्याचा हेतू नाही. कुठल्याही गोष्टीची माहिती होण्याआधी आपण सर्वच त्या बाबतीत अडाणी असतो. माझ्या स्वतःच्या अडाणीपणाच्या, मूर्खपणाच्या, फजितीच्या, तोंडावर आपटण्याच्या गोष्टींची लांब यादी होऊ शकते. पण इथून पुढे आपण काय करू इच्छितो हा कळीचा मुद्दा आहे. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने (मग भलेही काही काळानंतर भारतात परत आले तरीही मिळालेला आत्मविश्वास, अवेअरनेस, बोल्डनेस भारतातल्या करिअर साठीसुद्धा उपयोगी पडेल) ही संधी हा एक crash course म्हणून बघितली जाऊ शकते. आधी एकटे गेलात तर flexibility जास्त असेल/व्याप कमी असतील. त्यामुळे गोष्टी सेट करणे सोपे जाईल. त्यानंतर कुटुंबाला आणता येईल. पत्नीचा जॉब हा मात्र आर्थिक आणि इतर दृष्टीने महत्त्वाचा असल्यास न जाण्याच्या पारड्यात वजन टाकेल. निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा.
सहज म्हणून chatGPT ला हा
सहज म्हणून chatGPT ला हा प्रश्न विचारला. त्याने सुद्धा छान उत्तर दिले. निर्णय घेण्यासाठी काही टिप्स पण दिल्या. त्याच्या उत्तरातील जवळजवळ सर्व मुद्दे येथे चर्चिले आहेत. पण येथे चर्चिलेले काही मुद्दे त्याने विचारात घेतले नाहीत. उदा. हवामानातील बदल, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव, डॉक्टरांची अपॉइंटमेंट लवकर न मिळणे, इत्यादी. एकंदरीत मनुष्य सल्ल्याला अजून पर्याय नाही, पण अश्या समस्यांसाठी सुद्धा AI हा एक चांगला स्टार्टींग पॉईंट असू शकतो हे समजले.
chatGPT चा सल्ला =
https://chatgpt.com/share/258c4b7d-ecaa-4ea6-997d-bb3082c38131
अजबराव, तुमचा प्रतिसाद
अजबराव, तुमचा प्रतिसाद वाचताना शेरलॉक होम्सचे मनोगत टाईप काही तरी वाचतोय असे वाटले.
हा हा रघू आचार्य. खरंच आहे.
हा हा रघू आचार्य. खरंच आहे. मला काही प्रश्न वाचून हसू आले, आणि इतक्या meticulously प्रश्न तयार करणाऱ्या व्यक्तीचे कौतुकही वाटले. प्रश्नांची उत्तरे बऱ्याच जणांनी आधीच दिली आहेत. मला personal level वर जाऊन हे प्रश्न मुळात विचारले का जात आहेत ह्याचा विचार करून त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला निर्णय घ्यायला मदत करणे अभिप्रेत होते. थोडक्यात त्यांच्या अल्गोरिथमला प्रोसेस करण्यासाठी information देण्याऐवजी तुमच्या विचार करण्याच्या algorithm मध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून पहा असे सांगण्याचा उद्देश होता. त्यामुळे बऱ्याच गोष्टी guess केल्या आहेत. शेरलॉक होम्स तरी निरीक्षणांवरून अनुमान काढायचा. माझे तर केवळ अंदाज आहेत. त्यात खूप चुकाही असतील.
कुणी "अजबराव अतिशहाणा" असा प्रतिसाद दिला की "अहो एक काय सात अतिशहाणा" असा प्रतिसाद द्यायला माझं स्वतःचं काय जातंय ? 
प्रत्यक्ष आयुष्यात अगदी जवळचे मित्र सुद्धा असे personal level वर जाऊन सल्ला द्यायला धजावत नाहीत. बऱ्याच लोकांना personal comments नाही आवडत. पण त्यांनी इतक्या कळकळीने आणि मेहनतीने प्रश्न विचारले आहेत, तर असाही विचार करून पहा असे मला सांगावेसे वाटले.
कित्येकांना माझा प्रतिसाद condescending वाटू शकेल. त्यात तथ्थ्यही असेल. इथे मायबोलीवर प्रश्न विचारणाऱ्याची आणि उत्तर देणाऱ्याची anonymity सोयीस्कर पडते
condescending >> असं
condescending >> असं वाटण्याचं कारण दिसत नाही. अतीशहाणा वाटण्यासारखं देखील काहीच नाही.
तुमच्या प्रतिसादात वेध घेण्याच्या तुमच्या तंत्राचं कौतुक वाटलं. प्रभावित झालो म्हणून मुद्दाम उल्लेख केला.
मला थोडा अती वाटला तो
मला थोडा अती वाटला तो प्रतिसाद, माफ करा.एखादा मोकळेपणाने काढलेले मुद्दे मांडत असेल, कदाचित मुद्दे मुद्दाम वर्स्ट केस म्हणून छोटे छोटे दोष पण काढणारे लिहिले असतील तर त्यावरून frontrunner होण्याची शक्यता कमी, एक्सपोजर मध्ये कमी वगैरे जजमेंट देण्याची विशेष आवश्यकता आणि प्रयोजन वाटले नाही.फ्लूएन्ट सोडा, नॉर्मल 5 वी व्याकरणात पण गंडलेले इंग्लिश असलेले लोक अमेरिकेत स्वतःच्या टेक्निकल ज्ञानावर जाऊन व्यवस्थित काम करताना पाहिले आहेत.एखाद्याचं इंग्लिश, एक्सपोजर यापेक्षा त्याचा नव्या वातावरणात पटकन शिकण्याचा, हवं ते मिळवण्याचा स्ट्रीटस्मार्टनेस किती आहे यावर सर्व्हायव्हल ठरते.
(धागालेखक माझे ड्युप्लिकेट आयडी/नातेवाईक किंवा स्नेही किंवा परिचित नाहीत.)
(धागालेखक माझे नातेवाईक किंवा
(धागालेखक माझे नातेवाईक किंवा स्नेही किंवा परिचित नाहीत >>>
द्युआय नाहीत एव्हढा डिस्क्लेमर पुरे ! 
लगेच क्लॉज ऍड केला बघा
लगेच क्लॉज ऍड केला बघा
अनु+१. मलाही जजमेंटल वाटलं ते
अनु+१. मलाही जजमेंटल वाटलं ते.
>>त्याचा नव्या वातावरणात पटकन
>>त्याचा नव्या वातावरणात पटकन शिकण्याचा, हवं ते मिळवण्याचा स्ट्रीटस्मार्टनेस किती आहे यावर सर्व्हायव्हल ठरते.>> सहमत. आणि त्यासाठी नवनव्या वातावरणांचे एक्सपोजर उपयुक्त ठरते असे माझे मत आहे.
अनु+१. मलाही जजमेंटल वाटलं ते.>> +१
जजमेंटल आहे खरंच. The response is to my perception of the person. लेख वाचून, लिहीणाऱ्या व्यक्तीची एक प्रतिमा मनात निर्माण करून त्या प्रतिमेला उद्देशून प्रतिसाद देताना जजमेंटल होणं टाळणं कठिण आहे. ह्या perception मागचे अनेक अंदाज ह्यापूर्वी पाहण्यात आलेल्या इतर व्यक्ती, आलेले अनुभव ह्यांच्यामुळे बायस्ड नक्कीच असतील. त्यामुळे काही गोष्टी धागाकर्त्या व्यक्तीला लागू असतील, काही नसतील. ज्या गोष्टी लागू आहेत त्यावर विचार करून फायदा झाला तर चांगलंच आहे. गैरलागू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग आहेच.
>>त्याचा नव्या वातावरणात पटकन
.
>>>>नॉर्मल 5 वी व्याकरणात पण
>>>>नॉर्मल 5 वी व्याकरणात पण गंडलेले इंग्लिश असलेले लोक
"आय डिड वेन्ट" मैत्रिण पण फायडेलिटीत, क्लायंट फेसिंग, अॅसेट असोसिएट म्हणुन काम करते आहे. याउलट औषधांमुळे माझी व्हर्बल अॅबिलिटी नगण्य होउन बसलेली आहे. ती ओव्हर अ पिरीअड कमी-कमी-कमी होत जाताना मला जाणवलेली आहे. त्यामुळे मला "लॅन्ग्वेज बॅरिअर" वाले जजमेन्ट ऐकून घ्यावे लागलेले आहे/लागते.
इन फॅक्ट टेक्निकल स्किल्स व्यवस्थित असतानाही मला चॅटजीपीटी अॅप वरती इन्टर्व्ह्यु देण्याचा सराव करावा लागतो नेहमी.
तेव्हा हे खरे आहे की भाषा अगदी अस्खलित येण्याचा व अमेरीकेत यशस्वी होण्याचा फॉर्म्युला असा नसावा. हां कॉर्पोरेट जारगन व वेळ टाळण्यापुरता, काही जार्गन फ्रेझेस येणे मात्र आवशयक आहे.
>>>> risk averse अटीट्युडमुळे
हां ही वृत्ती , कामात मागे ठेवते खरी. अगदी जैसे थे ठेवते.
प्रोज अॅण्ड कॉन्स गुगल सर्च
प्रोज अॅण्ड कॉन्स गुगल सर्च दिला तर मिळतील.
युट्यूबवर एका मराठी मुलीचा तिच्या नवर्यासोबत एक व्हिडीओ आहे.
मायबोलीकर आहेत का ते ?
माझ्या ओळखीत बर्याच जणांनी
माझ्या ओळखीत बर्याच जणांनी बायकोला करीयर गॅप/h4 या कारणास्तव इथे येणे नाकारणे , काही काळापुरते एकट्यानेच येणे आणि परत जाणे, बायकोने h1 साठी प्रयत्न करुन वर्षभराने येणे असे वेगवेगळे पर्याय निवडले. बायको आधी आली मग नवरा त्याच्या स्वतःच्या वर्क विसावर आला असेही आहेत. मुलं देशात आजीआजोबांकडे असेही आहेत. इथे एच वन - ग्रीन कार्ड कटकट म्हणून अमेरीकेऐवजी दुसर्या देशात संधी शोधणारेही आहेत. काहीजण कामासाठी वर्षाचे काही महिने जगभर फिरतात मात्र होमबेस भारत.
ती मराठी मुलगी खूप बेसिक
ती मराठी मुलगी खूप बेसिक बाळबोध गोष्टी सांगते.जरा बोअर होतात.(माझ्या ओळखीची आहे.)
येथे सुचवल्याप्रमाणे त्यांनी
येथे सुचवल्याप्रमाणे त्यांनी मध्यम-मार्ग स्वीकारला आहे. नवरा एकटाच गेला आहे. तो काही काळ तेथे राहून, परिस्थिती पाहून, मग बायको व बाळाने जायचे कि नाही याचा निर्णय ते घेतील. येथील चर्चेमध्ये भाग घेतलेल्या सर्वांचे मनापासून आभार.
अगदी सुजाण, उत्तम निर्णय!
अगदी सुजाण, उत्तम निर्णय!
परत येऊन इथे आठवणीने अपडेट
परत येऊन इथे आठवणीने अपडेट दिल्याबद्दल तुमचे पण आभार. असा योग वारंवार येत नाही. _/|\_
परत येऊन इथे आठवणीने अपडेट
परत येऊन इथे आठवणीने अपडेट दिल्याबद्दल तुमचे पण आभार. >> +1
अरे वा. छान. हे पाऊल
अरे वा. छान. हे पाऊल त्यांच्या आयुष्यात आणि करिअर मध्ये सकारात्मक बदल घडवेल असं वाटतं. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
< ऋन्मेष मोड ऑन :
< ऋन्मेष मोड ऑन :
>>येथे सुचवल्याप्रमाणे त्यांनी मध्यम-मार्ग स्वीकारला आहे. नवरा एकटाच गेला आहे. तो काही काळ तेथे राहून, परिस्थिती पाहून, मग बायको व बाळाने जायचे कि नाही याचा निर्णय ते घेतील.
हेच मी सुचवलं होतं
>>>>आधी एकटे गेलात तर flexibility जास्त असेल/व्याप कमी असतील. त्यामुळे गोष्टी सेट करणे सोपे जाईल. त्यानंतर कुटुंबाला आणता येईल.
Submitted by अजबराव on 9 July, 2024 - 09:53
(इतर शंभर जणांनी सुद्धा हेच सुचवलं असेल पण ते एक असोच).
परदेस सिनेमात सुद्धा शाहरुखचा मित्र अमेरिकेतून भारतात येण्याआधी शाहरुख सर्व व्यवस्था आधी मार्गी लावण्यासाठी एकटाच येतो. शाहरुखोच्छिष्ट्म जगत्सर्वम - check
ऋन्मेष मोड ऑफ >
Pages