प्रेमकहाणी...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

प्रेमकहाणी..

पाहता पाहता विलीन झाले
रोहीत पक्षांचे थवे
मावळतीच्या आकाशात
आता उगवलेचं कोर दुधाळशी
चांदणं झिरपेल संध्येच्या प्याल्यात

जेंव्हा बुडायला येईल चंद्र
मी असेल निवांत एकटाच
तळ्याकाठी पहुडलेला आणि
भरून आलेल्या काळोखात
चांदण लागेल फुलायला

क्षितिजरेषेवर विसावलेली
माझी अढळ नजर टिपेल
तीच चमचमणारी चांदणी
हुरहुरणार्‍या आठवणी
उलगडतील एक कहाणी

- बी
=========
असामीने सुचवलेले कडवे जास्त बरे वाटले म्हणून पुर्वीचे कडवे काढून टाकले. खाली ते कडवे वाचायला मिळेल. असामी, चिनू तुमच्या सुचनांबद्दल मी आभारी आहे.

तू आता इथे नाहीसच,
क्षितिजरेषेवर विसावलेली
माझी अढळ नजर टिपेल
तोच चमचमणारा तारा
आणि हुरहुरणार्‍या आठवणी
वदतील तुझीमाझी प्रेमकहाणी

- बी

प्रकार: 

पूर्वी बी नावाचे कवी होवून गेले....
मला वाटते मुरलीधर नारायण गुप्ते त्यांचे नांव असावे
परत अवतरले का ते !
बाय द वे कविता चांगली आहे .......
गोदेय

बी, दुधाळशी चंद्रकोर आवडली Happy
चांदणं झिरपेल संध्येचा प्यालात - असे हवे.
चंद्र बुडतांना चांदणं फुलणं - काही कळल नाही. सूर्य मावळल्यावर चांदणं फुलते ना?
हुरहुरणार्‍या आठवणी- असे हवे.
वदतील तुझीमाझी कहाणी.. छानच.

चिन्नू, धन्यवाद!

मी कोर बुडेल असे म्हंटले आहे. तेंव्हा ही कोर प्रथमेची जर असेल तर ती फार जास्त वेळ राहत नाही. तेंव्हा चांदण फिकटसं असतं. पुर्णपणे फुललेलं नसतं, म्हणून कोर बुडेल आणि चांदणं फुलेलं असं म्हंटलं आहे.

संध्येचा प्यालात: हे वाचताना चुकल्यासारखे वाटते. खात्रीपुर्व़क कुणी सांगू शकेल का?

- बी

चांगलीये रे कविता.

बघ कसे वाटतेय ते shevatache kaDave

क्षितिजरेषेवर विसावलेली
माझी अढळ नजर टिपेल
तीच चमचमणारी चांदणी
हुरहुरणार्‍या आठवणी
उलगडतील एक कहाणी

आणि ते शीर्षक लिहून त्यावर कविता करण्यापेक्षा उलट करून पहा बर. Happy

अरे मी टंकतांना चुकले. मला संधेच्या ऐवजी 'संध्येच्या' असे म्हणायचे होते.
खुलाश्याबद्दल धन्यवाद.

बी कविता चांगली आहे, पण 'कोर' कधी संध्याकाळी उगवत नाही ना? खगोलदृष्ट्या गडबड आहे. आणि रात्री कोर जास्त वेळ दिसत नाही हे बरोबर आहे पण एकदा उगवल्यानंतर चांगली १०-१२ तास दिसते की. जाउ दे, एवढी रोमँटिक कवित आहे आणि हे असलं काहीतरी आम्हाला आठवतं Sad

असामी आणि चिनू, तुमच्या सुचना मी अमलात आणल्यात. धन्यवाद.

आणि ते शीर्षक लिहून त्यावर कविता करण्यापेक्षा उलट करून पहा बर.>> असामी मला समजलेच नाही तू नक्की काय म्हणतो आहे. मी 'प्रेमकहाणी' चे उलट 'णीहाकमप्रे' असे केले Happy

फार ऐंड - अवसेनंतरची कोर ही लगेच संध्याकाळ झाल्यानंतर उगवते आणि लगेच बुडते. १०/१२ राहणारी कोर मी तरी अजून पाहिली नाही. प्रतिक्रिया दिलीस त्याबद्दल आभारी आहे.

असामी मला समजलेच नाही तू नक्की काय म्हणतो आहे. >> म्हणजे हल्ली तू आधी शीर्षक ठरवून त्यावर कविता लिहितोस असा Feel येतो रे. You can do better than that असे मला वाटते.

चांदणं झिरपेल संध्येच्या प्याल्यात... व्वा !!
बदलल्यावर आणखी छान झालीये रे.

    ***
    माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
    एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि

    बी कविता चांगली आहे.
    some confusion,
    are tuza prembhang zala ka tu eteranchch karavtos,
    not clear bee be clear baba.